भरला संसार मागे सोडून ती जीवनाचा अर्थ शोधायला हिमालयात गेली, मैत्रीणींबरोबर मज्जा करायला मे डिटरेनिअन क्रूज वर गेली, वस्तू जमवण्यातली व्यर्थता समजून ओदिशाच्या जंगलात आदिवाश्यांना आरोग्य सेवा द्यायला गेली, पोस्ट ग्रॅजुएट शिक्षण पूर्ण करून चांगली कन्सल्टंट झाली. स्टार्टप कंपनी काढून वर्किंग विमेनना सपोर्ट सर्विसेस चालू केल्या.........................
बकेट लिस्ट सिनेमातली मधुरा असे काहीही करत नाही. अर्धे आयु ष्य अतिशय सुखात, आईबाबांकडून प्रेमळ नव र्या कडे अलगद ट्रान्सफर झालेली ही सान्यांची सून चार लोकांसाठी एकच भाजी चार प्रकारे करण्यात धन्यता मानते. सगळंच फार गोड गोड. प्रभात रोड वर प्रशस्त लॉरी बेकर स्टा इलचा बंगला( पण ह्याची गल्ली कुठली ते नेम प्लेट वर लिहीलेले नाही.) टॉलरेबल सासू( वंदना गुप्ते स्लीप वॉकिंग थ्रू द रोल!!) कोणी तरी नि ष्प्रभ सासरा, ओके टाइप किड्स , सुमीत राघवन सक्सेसफुल नवर्याच्या हुकमी भूमिकेत अनेकाव्यांदा, मुलीशी माफक जनरेशन गॅप..... असे सर्व सुखद चित्र असताना ही मधुरा इतकी लकी की तिला हार्ट ट्रान्सप्लांटची गरज असताना ते हार्ट लगेच मिळून जाते.... अशीच सिनेमाची सुरुवात आहे मी उगाच लिहीत नाही.......
आता ही डोनर जी अपघातात वारली तिने ऑर्गन डोनेशन चा प्रण केलेला असतो. त्यानुसार ती आठ लोकांना नवे जीवन देते, पण तिच्या स्वतःच्या काही तारुण्य सुलभ इच्छा अपुर्या राहतात. आपली सरळ स्वभावाची मधुरा डोनर फॅमिली ला शोधून काढते. त्यांच्या ग्रीवींग प्रोसेस वर अतिक्रमण करून ह्या इच्छा पूर्ण करायचा प्रण करते ही
थो डक्यात कन्सेप्ट आहे.
माधुरी प्रत्येक फ्रेम मध्ये आहे. व दिसते पण सुंदर. प्रत्येक साडीत ड्रेस लेदर जॅकेट मध्ये इत्यादि. एकदा पार्टीवेअर पण घातले आहे. व हसते पूर्वी सारखीच. चेहरा थोडा ओघळत चालला आहे पण ते वयानुरूप होणारच. पण त्या पलीकडे एक अभिनेत्री म्हणून काहीही ग्रोथ झाली आहे असे पूर्ण चित्रपट भर जाण वत नाही. इथे माझी निराशा झाली. मी माधुरी फॅन आजिबातच नाही . पण कथेतही फार दम आणलेला नाही. ती रिस्कच घेत नाही कुठे.
कथा वस्तूत, संवादात, गाण्यात, नाचण्यात...... हार्लि डेविड सन बाइक चालवताना सुद्धा शी डझ नॉट चॅनेल हर इनर सेक्सी ऑर हर इनर सेल्फ टु बिगिन विथ..... सर्व कसे मोजून मापून. गोड हसत.
ती सई देशपांडे( डोनर ची )बकेट लिस्ट पूर्ण करायचा प्रयत्न करते आहे ह्याचे सईच्या फॅमिलीवर व
आप ल्यावरही दडपणच येते. कुठेच रिलीज किंवा क्लोजर ( हा शब्द चित्रपटात वापरला आहे. ) मिळत नाही. असे
मृत्यू नंतर सहा महिन्यांच्या आत क्लोजर मिलत असते तर काय हवे होते. मधुराची हार्ट कंडिशन, सईचे जाणे
हे सर्व एका सुपरफि शिअल व कधी कधी विनोदी पद्धतीने घेतले आहे. पण ब्लॅक ह्युम र नाही. कॉज रिमेंबा...
शी ड्झ नॉट टेक रिस्कस!!!
विशीच्या मुली च्या साध्या सुध्या इच्छा ही चाळीशीची दोन पोरांची आई पूर्ण करू बघते हे खरे पोटेन्शिअल आयडिया आहे. सईची व्यक्तिरेखा जेवढी आपल्याला समजते ती देखील खूप जेन्युईन वाटते. दापोलीतले सीन्स अतिशक सुरेख घेतले आहेत व्हिजुअली.
मधुराचे प्रयत्न अति शय लेम पद्धतीने पड द्यावर साकारले आहेत. हार्ली ची रेस तर अतिच विनोदी. सो लेम
त्यासाठी हिने डिझायनर लेदर जॅकेट कशाला घातले आहे असा प्रश्न पडतो. पोझ करत बसते नुसती. सईच्या बॉयफ्रेम्ड ला किस करायचा पहिला सीन एकदम इउ इंड्युसींग आहे. आय वॉज अन्कंफर्टेबल वॉचिंग इट. मधुरा क्लब मध्ये जाउन दारू पिऊन दंगा करते तो सीनही अतिशय लेम आहे. दारू पीनेसे यक्रु त विकृत होता है हे वाक्य अगदी फर्गेटेबल आहे. त्यापेक्षा कंगनाचे क्वीन मधले ड्रंकन सीन्स बघावे.
सईच्या भावाचे काम चांगले आहे. ही ग्रीविंगच्या मध्ये मध्ये येते आहे हे तो क्लीअर करतो. मधुराच्या माधुरीपणाने दबलेला वाटत नाही. पणजीच्या भूमिकेत शुभा खोटे एकदम मिसकास्ट आहे. साने वाटत नाही. मी साने गोडबोले
जोशी गोखले लोकांच्या पणज्या पाहिल्या आहेत.( कृपया वाचकांनी ऑफेंड होउ नये.. मी फक्त व्यक्ति रेखे च्या ओरिजिनॅलिटी साठी लिहीले आहे. त्या पिढीतील स्त्रिया बारीक किंचीत वाकलेली शरीरय्ष्टी , सुरकुतलेली स्किन, पांढर्या धोप पातळ केसांची बारीकशी मागे अम्बुडी, सुती नौवारी साडी अश्या असत. दिग्दर्शकाने रिसर्च करायला हवा इतका तरी. ) ती खोड कर आहे ते बरोबर आहे पण व्हिस्की ची बा टली जवळ बाळगून असते हे पटत नाही. दिग्दर्शकाने सर्व स्टिरीओ टाइप्स वापरून वापरून वैताग आणला आहे. पण कुठेही नॅरेशन मध्ये नाट्यमयता तो एक उच्च बिंदू येत नाही. प्रश्न समोर उभे राहतात त्यापेक्षा सहज पणे ते सुटतातही. बाईच्या सुंदर ़ कपाळाला आठ्या पडल्यातर? रडली आणि डोळ्या खाली काळे झाले तर? उगीच रिस्क नको.
मधुराचे सोनेरी वर्तूळ पूर्ण करणारे आईबाप आहेत दिलीप प्रभावळकर व एल दुगो मधली आई. मध्येच ही प्ण बकेट लिस्ट बनवते व त्या प्रमाणे हळदी कुंकू करते. व एक लेक्चर देते ़ कृ ष्णाच्यावेळी कुठे फोटो होते इत्यादि. व सर्वांना नौ वारी साडी नेसायची व पारम्पारिक दागिने घालायची एक संधी. हा लुक पण आता खूपच क्लिशेड झाला आहे. त्या हळदी कुंकवात मला गौरीची मूर्तीच कुठे दिसली नाही.
टॅटू काढवून घेणे, पेट अॅडॉ प्ट करणे ह्या आय टेम ला हात लावलेला नाही. कारण त्यात आरस्पानी सौंदर्याला धक्का पोहोचू शकतो व अटेन्शन पेट वर डायवर्ट होउ शकते. फ्रँक ली हाफ वे थ्रू द मुव्ही आय वॉज चेकीं ग पप फ्लिक्स ऑन इन्स्टाग्राम फॉर सम ओरिजिनल एक्स्प्रेशन्स अॅड फीलिन्ग्स.
मध्यंतरानंतर काहीतरी होईल म्हणून आप्ण वाट बघतो. तर काय? मलेशियाला जाउन मध्यम वयीन सेकंड हनीमून टाइप प्रेमगीत, सुमीत राघव न साराभाई वर्सेस सारभाई मध्ये एकदा सुरज हुआ मध्यम प्रेमगीत एका पेशं ट बरोबर गातो आहे असे मोनिशाला वाटते त्याच सीन्स मधले साधारण कपडे त्याने घातले आहेत. मधुरा एका डे फंक्षनला रेड कार्पेट टाइप मॅजेंटा पर्पल गाउन घालते!!!! हे प्र झेंटेशन सक्सेसफूल होउन सान्यांना सान होजे मध्ये जायचे आमंत्रण मिलते पण मधुरा जात नाही. इथेच राहुन लिस्ट पूर्ण करीन म्हणते. व्हॉट क्रायसीस. ड्वाले पाणावले. नॉर्मली सुद्धा कपल्स फॅमिलीज आपापल्या सोयीने जातात इथे तिथे.
शेव टी एक फर्गेटेबल गाणॅ व पार्टी. एका सीन मध्ये मला आशा होती की सईचा आत्मा किंवा स्पिरीट येउन मधुराला धन्यवाद म्हणेल तसे इरी लोकेश न तयार केले होते. पण इथे पण पतिराज च येउन पप्पी घेतात. ती ही
स्क्रीन वर नाही. उगीच रिक्स कशाला!!!
मग एक तू कशी स्फूर्ती प्रेर णा आहेस वगैरे टाइप शाळकरी स्वगत. व प्रभात रोड वरची स्टोरी सुफळ संपूर्ण.
एखादी स्मिता उंबर ठा कॅरी करते, एखादीच रिमा एखादीच अँजेलिना जोली, कधी तरी मेरील स्ट्रीप, कधी तरी सुलभा देशपांडे , विजया बाईं सारख्या ललना डो ळ्यात प्राण आणून बघावे असे अॅक्टिंग चेहर्याव रच्या सुरकुत्या न लपवतपू, पूर्ण शरीराचे माध्यम करून आपल्या परेंत पोहोचवतात. कारण त्या रिस्क घेतात. रिस्क घ्यायची असते लाइफ मध्ये. पुट दॅट इन युअर बकेट लिस्ट लेडी!!!
हृदय फेल होण्याचा कर्व
हृदय फेल होण्याचा कर्व माणसाच्या वयावर असतो का हृदयाच्या ? अशा अर्थी.>>हो. बरोबर अमितव. मला हेच विचारायचे होते.
उषा किरण यांनी उमेदीच्या
उषा किरण यांनी उमेदीच्या काळात स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, शिकलेली बायको यासारखे काही चांगले मराठी चित्रपटही केलेत. त्या मुंबईच्या नगरपाल (शेरीफ) देखील होत्या.
उषा किरण यांनी उमेदीच्या
उषा किरण यांनी उमेदीच्या काळात स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, शिकलेली बायको यासारखे काही चांगले मराठी चित्रपटही केलेत. त्या मुंबईच्या नगरपाल (शेरीफ) देखील होत्या.>>>
कन्यादान हा त्यांचा अतिशय गाजलेला चित्रपट. त्या काळाच्या मानाने बराच प्रोग्रेसिव्ह होता. पोस्टातली मुलगी हाही अजून एक चित्रपट. हे बहुतेक सगळे त्यांच्या उमेदीच्या काळातलेच होते.
मला तर पतिताचा अपवाद वगळता त्यांचे बरेचसे हिंदी चित्रपट माहितीच नाहीत. मराठी चित्रपटच जास्त लक्षात राहिलेत
मराठी बद्दल्च प्रेम ऐन
मराठी बद्दल्च प्रेम ऐन उमेदीच्या काळात कधी दिसलं नाही>>>>>>> सगळा पैशाचा खेळ आहे, ज्या निर्मात्यांना तिचा भाव परवडतो त्यांच्याकडेच ती काम करणार. कथा आणि इतर गोष्टी वगैरे सगळं नंतर...... ८०-९० च्या दशकातल्या कोणत्या मराठी निर्मात्याला तिचा भाव परवडणार होता? आज ही फार वेगळी परिस्थिती नसावी.
बाकी ती मराठी बोलताना अडखळते हे जाणवतं.
अमा ! एक गमत तुम्ही दिलेल्या
अमा ! एक गमत तुम्ही दिलेल्या टायटल मधे च कुठेही लावला तरी काहिच फरक पडत नाही
बकेट लिस्टः तीच काही रिस्क घेत नाही
बकेट लिस्टः ती काही रिस्कच घेत नाही
बकेट लिस्टः ती काही रिस्क घेतच नाही
बकेट लिस्टः ती काही रिस्क घेत नाहीच
मराठी बद्दल्च प्रेम ऐन
मराठी बद्दल्च प्रेम ऐन उमेदीच्या काळात कधी दिसलं नाही
>>>>
तिच्या ऐन उमेदीच्या काळात मराठीत एक सो एक बंडल चित्रपट बनायचे.
आणि माधुरी म्हणजे काही कसलेली अभिनेत्री नाही की तिने मराठीतल्या कलात्मक चित्रपटात काम करावे. ती हवी तर कमर्शिअल सिनेमाच हवा. कश्यात काम करणार होती? महेश कोठारे आणि लक्ष्याच्या धडाकेबाज, झपाटलेला आणि थरथराटमध्ये? आणि तिचा मराठीचा प्रॉब्लेम आहे. मग तेव्हाही तो असताच. तसेही मला नाही वाटत की माधुरीने मराठीत काम न केल्याने मराठी चित्रपटसृष्टीचे फार काही नुकसान वगैरे झाले. आणि केले असते तर काही फायदा वगैरे झाला असता..
अगदी. परवा फेसबुकवर रैनाने
अगदी. परवा फेसबुकवर रैनाने लिहिल्याप्रमाणे ही बाई अगदीच 'आवली सरोज खरे' टाईप वाटते. सगळं मोजकंच करायचं, आणि आव असा आणते की मराठी पोरी/ बायकांना हे सगळं माहितंच नाही. त्या ह्या गोष्टी करतच नाहीत. नवीनच काही करते आहे.
Eye Candy Madhuriम्हणून सर्च केलं की ह्या बाईंचेच विचार दिसतात, आणि वागणे मात्र विपरीत.. तुमच्या नंतर आलेल्या पोरींचे पिक्चर्स पहा म्हणावेसे वाटते.
ट्रेलर पाहिल्यावरच बघायचा नाही हे बर्यापैकी ठरवलं होतं. हे परिक्षण वाचून नक्की केले. इकॉनॉमिक टाईम्समधला रिव्ह्युही मस्त आहे. ह्या पिक्चरवर उतारा म्हणून श्रीदेवीचा इंग्लिश विंग्लिश पहावा असा सल्ला आहे त्यात.
खरंच इंग्लिश विंग्लिशची खूप
खरंच इंग्लिश विंग्लिशची खूप आठवण येते. पण तुमच्या लक्षात येते आहे का? हिने लेडी डॉनची भूमिका केली आहे ढेढ इशिकिया मध्ये वेगळ्या स्त्रीची भूमिका केली आहे आजा नचले मध्ये एन आर आय कमिंग बॅक टु इंडिया व लेडी स्वदेस टाइप. बट इट इज नॉट मेकिंग एनी डेंट कारण सर्व भूमिकांमध्ये गोड्वा सोडून कॅरेक्टर मध्ये घुसाय चे प्रयत्न तितकेसे झालेले नाहीत. ब्लॅक मिरर सीरीअल चा एक एपिसोड आहे त्यात हिरॉइन कायम स्वतःला किती रेटिंग मिळेल हे चेक करत असते. पाच च्या पुढे रेटिंग हवे. तर तुम्ही सोशली अॅक्सेप्टेड. त्यात पुढे एका लग्नाला वेळेवर पोहोचायच्या धडपडीत तिला एक मध्यमवयीन किंवा म्हातारी ट्रक वाली स्त्री दिसते. व ती तिला लिफ्ट देते व मदत देखील करते. मी पण एकेकाळी तुझ्या सारखी रेटिंग्ज सा ठी धडपडत असे असे अतिशय वाइज अनुभवी सुरात तिला सांगते.
वयस्कर अनुभवी स्त्रियांच्या व्यक्तिरेखा असतात व त्या खूप इंटरेस्टिंग पण असतात. उदा. मा आनंद शीला.
स्टार वॉर्स लास्ट जेडाय मधील लॉरा डर्न ची कमांडर. मला तर आपल्या पुण्यातील हेमा साने ह्यांच्यावर सिनेमा बनला तर ती देखिल व्यक्तिरेखा खूपच इं टरेस्टिंग आहे. ह्या वयात बाय्कांचा जगण्यातला प्रिटेन्स संपून त्या जश्या आहेत तश्या वागतात. व ते साकारणे अॅज अॅक्ट्रेस फार मस्त असणार. हॅम्लेटची आई व ऑफेलिया मधला फरक. असे. रंगदे बसंती मधील किरण ने साकारलेली हिरोची आई जरा वेगळी आहे. असे चौकटीत राहूनही प्रयोग करता येतात. बरे हिला सर्वा यव्हलची काळजी नाही. मग इतका बोटचेपे पणा का?
ब्लॅक मिररार - सॅन जुनीपरो
ब्लॅक मिररार - सॅन जुनीपरो नक्की बघा.
बरे हिला सर्वा यव्हलची काळजी
बरे हिला सर्वा यव्हलची काळजी नाही. मग इतका बोटचेपे पणा का? >> सर्व्हायवल ची नाही नंबर सोडण्याची इच्छा नाही, त्यामुळे आपण सतत शिखरावरच असले पाहिजे ही भावना जोवर जात नाही तोवर यांच्याकडून चांगली कामे होणार नाहीत.
मला नाही वाटत की माधुरीने
मला नाही वाटत की माधुरीने मराठीत काम न केल्याने मराठी चित्रपटसृष्टीचे फार काही नुकसान वगैरे झाले. आणि केले असते तर काही फायदा वगैरे झाला असता >>> बकेट लिस्टचे रिव्ह्यू बघता +१
बरे हिला सर्वा यव्हलची काळजी नाही. मग इतका बोटचेपे पणा का? >> सर्वायव्हलची काळजी नाही असे आपल्याला वाटते. खरे काय आहे कोण जाणे.
खरे काय आहे कोण जाणे.>>
खरे काय आहे कोण जाणे.>> सार्वजनिक उपलब्ध माहितीनुसार आ धि गडगंज कमावून ठेवलेले आहे. मग नवरा सर्जन
कुठेही उत्तम प्रॅक्टिस चालेल भारत किंवा अमेरिका, दोन मुलगे. मुलीचे लग्न करून द्यायची वगैरे पण चिंता नाही एज अँड ब्युटी इज ऑन हर साइड. सासर माहेरला फार पैसे खाउ नातेवाइक नाहीत. जसे श्रीदेवी, गोविंदा ह्यांचे होते. अश्या मध्यमवर्गीय अर्थाने म्हटले हो. आकस नाही. उलट शी इज इन हर बेस्ट प्लेस. अब घबरनेका नै. फ्रंट फुटपे आके खेलनेका बीबी. असे वाटते.
अब घबरनेका नै. फ्रंट फुटपे
अब घबरनेका नै. फ्रंट फुटपे आके खेलनेका बीबी. असे वाटते. >> हे मला पटतेय. तिच्यासारख्या कलाकाराकडून आता जरा वैविध्याची अपेक्षा आहे.
Picture hit vhyayla pahije ka
Picture hit vhyayla pahije ka nako pan! Nahitar tila dusrya marathi offers yetil ka?
Mala mahit nahi picture hit jhalay ka nahi? Hit jhalay ka? Kinva mala ha cinema streaming var aalyashivay baghayla milaychi shakyata shoonya
तिच्यासारख्या कलाकाराकडून>>>
तिच्यासारख्या कलाकाराकडून>>> ती कलाकार नाही. बाहुली होती बाहुली आहे बाहुली राहणार. सुंदर दिसणे आणि सुंदर नाचणे, पुरुष प्रेक्षकांच्या भावना चाळवणे, ड्रीमगर्ल असणे ह्या प्रकाराला कला म्हणत नसावेत.
माधुरीने परिपक्व का काय, गंभीर भूमिका कराव्यात म्हणायला तीचे तेवढे कॅलिबर नाहीये हो. वरच्या प्रतिसादांत ज्या काही तिच्याकडून स्मिता पाटील वगैरेच्या अपेक्षा केल्या जात आहेत. माधुरी फारतर झीनत अमान आणि परवीन बाबी ह्यां दोघींच्या बरोबरीची आहे...
>>माधुरी फारतर झीनत अमान आणि
>>माधुरी फारतर झीनत अमान आणि परवीन बाबी ह्यां दोघींच्या बरोबरीची आहे...>> नाही हो. त्या दोघी तिच्यापेक्षा नक्कीच वरचढ आहेत. कॅब्रे करायची वेळ आली तर त्या दोघी जास्त ताकदीने करु शकतील माधुरीपेक्षा. नुसतं गोग्गोड हसणं काय कामाचं?
सायो करेक्ट
सायो करेक्ट
ट्रेलर मधे १ मिनिटाच्या आसपास
ट्रेलर मधे १ मिनिटाच्या आसपास `सईबाईंची बकेट्लिस्ट' म्हणण्णारा आवाज कोणाचा आहे? छान आहे. ओळखीचा वाटतोय.
हा सिनेमा बघितला नाही, पण
हा सिनेमा बघितला नाही, पण बघणार आहे. काही हरकत नाही गोड-धोड, टाईमपास, सुंदर निर्मितीमुल्यं असणारा सिनेमा पहाण्यात. उगाच आपलं, उदास, गरीब, संथ काहीतरी पहायचं आणी 'घनता, खोली' वगैरे गोष्टींचं कौतुक करायचं ह्यात काहीही अर्थ नाहीये.
माधुरी दिक्षीत चा सिनेमा आवडला नसेलही, पण उगाचच, ती स्मिता पाटील पेक्षा, झीनत अमान पेक्षा, परवीन बाबी पेक्षा कशी कमी आहे वगैरे टीका अगदीच uncalled for आहे. ती जेव्हा करियर च्या शिखरावर होती, तेव्हा तीचं यश - सिनेमे चालणं, तिला असणारी डिमांड, तिला मिळाणारं मानधन - हे सगळं मोठं होतं. ती स्टार होती. उगाच ह्या गोष्टींना नावं ठेवून, किंवा त्या कशा कमी महत्वाच्या आहेत वगैरे सांगून मनाचा कद्रुपणा कशाला दाखवायचा? कुणीतरी तिच्या 'eye candy' कॉमेंट चा संदर्भ देऊन प्रत्यक्षात ती कशी वेगळी आहे, हे म्हटलय. असणारच. पब्लिक स्टेटमेंट करताना, सेलिब्रिटीज ना ते अवधान संभाळावच लागतं. सिने-नटांनी मुलाखतीत बोललेलं आणी प्रत्यक्ष जीवनात वागलेलं ह्यात एक-वाक्यता असावी ही अपेक्षाच बाळबोध आहे.
सगळं काही, सर्व-सामान्यांच्या आयुष्यात घडतं तेच सिनेमात पहायचं असेल, तर घरच्या घरी स्वतःचा व्हिडीओ काढून पहावा. दैनंदिन आयुष्यापेक्षा वेगळं, larger than life, पहाण्यासाठीच तर सिनेमा पहायचा असतो. ऋन्मेष ने म्हटल्याप्रमाणे, प्रसिद्धीच्या आणी यशाच्या शिखरावर असताना मराठी सिनेमात काम करण्याच्या दर्जाचा असा काय ग्लॅमरस मराठी सिनेमा होता? खरं तर आजही नाही. गेली बरीच वर्षं मराठी सिनेमा एका infinite length च्या सापासारखा कातच टाकतोय.
इंग्लिश-विंग्लिश चं कौतुक केलं गेलय म्हणून त्याविषयी थोडसं. ह्या सिनेमात सुद्धा असंख्य तृटी होत्या. मुळात मेड-अप प्रॉब्लेम होता. नवरा-सासू कुणीही काहीही त्रास देत नसताना, एका टीन-एजर मुलीच्या टोमण्यांमुळे पार अमेरिकेला जाऊन, लपुन-छपुन इंग्लिश शिकण्याइतकी हिम्मत असलेली, स्वतंत्र व्यवसाय करणारी बाई, इतकी न्यूनगंडाने पछाडलेली वगैरे असणं ही कल्पनाच हास्यास्पद होती.
प्रत्येकाच्या सिनेमाकडून अपेक्षा वेगवेगळ्या असणं स्वाभाविक आहे. त्या पुर्ण झाल्या / न-झाल्याबद्दल सिनेमाचं कौतुक / टीक हे सुद्धा अपेक्षित आहे. पण उगाच एखाद्यावर वैय्यक्तिक टीका करणं, त्या व्यक्तीच्या यशाला कमी लेखणं अनावश्यक आहे.
फेरफटका बाकी ठिक आहे पण हे
फेरफटका बाकी ठिक आहे पण हे नाही पटलं >>सिने-नटांनी मुलाखतीत बोललेलं आणी प्रत्यक्ष जीवनात वागलेलं ह्यात एक-वाक्यता असावी ही अपेक्षाच बाळबोध आहे.
"पण हे नाही पटलं >>सिने
"पण हे नाही पटलं >>सिने-नटांनी मुलाखतीत बोललेलं आणी प्रत्यक्ष जीवनात वागलेलं ह्यात एक-वाक्यता असावी ही अपेक्षाच बाळबोध आहे." - सिने-नटच का, सर्वसामान्य माणसं सुद्धा घरातलं / पर्सनल आयुष्य आणी बाहेरचं / सार्वजनिक / सोशल आयुष्यात वेगळं वागतातच की.
प्रत्येकाच्या सिनेमाकडून
प्रत्येकाच्या सिनेमाकडून अपेक्षा वेगवेगळ्या असणं स्वाभाविक आहे. त्या पुर्ण झाल्या / न-झाल्याबद्दल सिनेमाचं कौतुक / टीक हे सुद्धा अपेक्षित आहे. पण उगाच एखाद्यावर वैय्यक्तिक टीका करणं, त्या व्यक्तीच्या यशाला कमी लेखणं अनावश्यक आहे.>> हे पटलं.
)
पण इंग्लिश विंग्लिशबद्दलचं तुमचं मत नाही पटलं.
आपल्याकडे इंग्रजी बोलता येणं हे स्मार्टनेसचं लक्षण मानलं जातं. ( भले यात काही अर्थ नसो, मानलं जातं हे खरं आहे). अशा वेळी घरात नवरा, मुलगी फाडफाड इंग्लिश बोलत असताना आणि मोठी होत असलेली मुलगी यावरून आईची चेष्टा/ अपमान करत असेल, तिला आईची लाज वाटत असेल ( पेरेंट टीचर मीटिंगचा प्रसंग) तर आईला न्यूनगंड वाटणं स्वाभाविक आहे. स्वतःचा व्यवसाय करत असताना ती व्यवस्थित आत्मविश्वासपूर्ण दाखवली आहेच. तिथे तिला मान मिळतानाही दाखवलाय. अमेरिकेत गेल्यावर दुकानात झालेली embarassment, बहिणीच्या कुटुंबात इंग्लिशमधे चाललेल्या गप्पांमधे बाजूला पडल्यासारखं वाटणं यातून ती इंग्रजी शिकायचं ठरवते. मला खटकलेली गोष्ट अशी की ती हे सगळं बहिणीपासून गुपित का ठेवते? तिला सांगायला हरकत नव्हती. ( पण मग सपक सरळसोट पिक्चर झाला असता कदाचित
बहिणीपासून गुपित का ठेवते?
बहिणीपासून गुपित का ठेवते? तिला सांगायला हरकत नव्हती. ( पण मग सपक सरळसोट पिक्चर झाला असता कदाचित ----- आपल्या प्रत्येक गोष्टीची जशी खिल्ली उडवली जाते तशीच याही गोष्टीची उडवली जाईल याची भीती वाटत असावी शशी ला.
पण हे भारतीय गृहिणी एकदम
पण हे भारतीय गृहिणी एकदम सत्शील सुगुणी दाखवायचेच का प्रेशर असावे दिग्दर्शकावर? बोअरींग नवरा सोडून संसार राहाटी सोडून ती किंवा इंवि मधली श्रीदेवी स्वतःचा खरा शोध का घेत नाहीत मॉरल फ्रेम सोशल कंडिशनिंग आड येत असावे. लोक्स दगडे मारतील असे ही असावे. त्यामानाने परमा किती पुढारलेली होती. मी त्याचे परीक्षण लिहीले आहे. इथे लिहीले आहे कि नाही माहीत नाही. पण पोस्ट करते. त्या सिनेमातले नवर्याकडून सिस्टिम कडून होणारे स्त्रीचे अपमान अ गदी जिव्हारी लागतील असेच आहेत. बट बॉय व्हॉट अ मुव्ही. आणि राखी लुक्स वे टू स्मॅशिन्ग.
माधुरी मराठी आहे.. मराठी लोक
माधुरी मराठी आहे.. मराठी लोक तिला नावं ठेवणारच.
श्रीदेवी ला तामिळ लोक नावे ठेवत असावीत, त्यांना माधुरी आवडत असेल.
"पण इंग्लिश विंग्लिशबद्दलचं
"पण इंग्लिश विंग्लिशबद्दलचं तुमचं मत नाही पटलं." - हरकत नाही. माझा मुद्दा असा होता की प्रत्येक सिनेमात प्रत्येकाला आवडणारं / न आवडणारं असं असतच. म्हणून त्या सिनेनटांवर वैय्यक्तिक हल्लाबोल करायची गरज नाही.
इंग्लिश-विंग्लिश बद्दल आणखीन एक मत व्यक्त करतो आणी थांबतो: हे लपून छपून इंग्लिश शिकायला अमेरिकेतच यायची गरज नाही. ते भारतातही करत येतं / आलं असतं. पण उच्च निर्मितीमुल्यं / सुंदर फ्रेम्स वगैरे गोष्टी करण्यासाठी ती कथा वळवून अमेरिका करण्यात आली असं मला वाटतं. तशी सौंदर्यनिर्मिती करणं सिनेमाच्या माध्यमासाठी योग्यच आहे. ग्लोबल ऑडियन्स सुद्धा जोडला जातो. good for them. (त्या गुलाबजामात नाही का तो हीरो इंग्लंडहून भारतात स्वयंपाक शिकायला येतो- कुकिंग वरची पुस्तकं, वेबसाईट्स, यू-ट्यूब वगैरे गोष्टींचा शोध लागायचा होता बहुदा)
"श्रीदेवी ला तामिळ लोक नावे
"श्रीदेवी ला तामिळ लोक नावे ठेवत असावीत" - मी आत्तपर्यंत तरी कुठल्याही तमिळ देशवासियांना त्यांच्या स्वदेशी: पक्षी तमिळ गोष्टींना - त्यांचा दर्जा कसाही असला तरी नावं ठेवताना फारसं पाहिलेलं नाही.
ओ वॉव... माधुरीवर होणारी
ओ वॉव... माधुरीवर होणारी चर्चा 'दर्जाचा' मुद्दा येताच हुशारीने श्रीदेवी आणि इंग्लिशविंग्लिशवर का वळवण्यात आली असावी?
'मेघपाल' - way out of the off
'मेघपाल' - way out of the off stump - left alone!
जागरुकपणे मांडलेला मानसिक
जागरुकपणे मांडलेला मानसिक प्रगतीचा विषय हाताळलेला चित्रपट म्हणता येईल.
—————————
*'द बकेट लिस्ट'*
2007 चा अमेरिकन चित्रपट. कुठलीही मारधाड़ नाही, स्पेशल इफेक्ट्स नाहीत, अॅनिमेशन नाही, कसलाही मसाला नाही, कुठलाही फॉर्म्युला नाही...
मग बघायचा तरी कशाला? बघायचा त्यातील अप्रतीम संदेशासाठी आणि जमलंच तर त्या संदेशाची जशी जमेल तशी वैयक्तिक पातळीवर अंमलबजावणी करण्यासाठी...
तर 'बकेट लिस्ट' म्हणजे नक्की काय?
इंग्लिश भाषेत एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूसंदर्भात एक बोली वाक्प्रचार आहे - To kick the bucket - त्याचा मराठी समानार्थी उपयोग सांगायचा तर 'त्याने अखेरचे डोळे मिटले' किंवा 'त्याने शेवटचा श्वास घेतला' असा सांगता येईल. मग बकेट लिस्ट म्हणजे काय, तर मरणापूर्वी करायच्या काही महत्वाच्या कामांची यादी. अशी यादी माणूस सहसा करत नाही. काही मोजक्या लोकांना मृत्यूची चाहूल लागते म्हणतात, ते लोक अशी यादी करत असावेत. अन्य काही थोडके लोक मृत्युपत्र करतात. पण बकेट लिस्ट म्हणजे मृत्युपत्र नव्हे. मृत्युपत्रात मरण पावलेल्या माणसाच्या इच्छेनुसार त्याच्या स्थावर जंगम मालमत्तेची विल्हेवाट कशी लावावी याची जंत्री असते. बकेट लिस्ट मध्ये अद्याप जिवंत असलेल्या पण मृत्यूची चाहूल लागलेल्या माणसाच्या अपूर्ण इच्छांची यादी असते. मग यात काहीही असू शकतं. अगदी ५ किलो आईसक्रीम एकट्याने खावं किंवा अमिताभ बच्चन सोबत चहा घ्यावा किंवा आयफेल टॉवर चढून जावा किंवा आयुष्यभर तोंड न पाहिलेल्या भावाशी पुन्हा जुळवून घेऊन मनसोक्त गप्पा माराव्यात यापैकी किंवा आपण कल्पनाही करू शकत नाही अशा कुठल्याही गोष्टी असू शकतात.
(आपल्याकडे काही वर्षांपूर्वी गाजलेल्या जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटातून, असाच काहीसा, या क्षणात जगून घ्या असा संदेश दिला आहे.)
'द बकेट लिस्ट' या चित्रपटात असेच दोन अवलिये दाखवले आहेत. दोन तोडीस तोड पट्टीच्या अभिनेत्यांनी या भूमिका समर्थपणे निभावल्या आहेत. *जॅक निकोलसन* आणि *मॉर्गन फ्रीमन* यांनी!
आयुष्यभर इमाने इतबारे कार मेकॅनीकचे काम केलेला कार्टर चेंबर्स (फ्रीमन) आणि अब्जाधीश असलेला रुग्णालय साखळीचा मालक एडवर्ड कोल (निकोलसन) या दोघांनाही फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याने पुढच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले जाते आणि ते दोघेही एकाच दोन खाटांच्या खोलीत एकमेकांना उपचारा दरम्यान भेटतात. दोघांनाही एकमेकांविषयी काहीही ममत्व वाटत नसते आणि आता आपण लवकरच मरणार आहोत ही जाणीव छळत असते. चित्रपटाच्या सुरुवातीलाच दोघांनाही त्यांचे डॉक्टर स्पष्ट पणे सांगतात की ते आता ६ महिने किंवा फार तर फार १ वर्षाचे सोबती आहेत. रुग्णशय्येवर पडल्या पडल्या कार्टर एक बकेट लिस्ट लिहित असतो. डॉक्टरांनी सहा महिन्याची मुदत जाहीर केल्यानंतर आणि पहिल्या तीन इच्छा लिहिल्यानंतर कार्टरचा त्या बकेट लिस्ट मधला रस जातो आणि त्या कागदाचा बोळा करून तो फेकून देतो. (त्याची १३ इच्छांची यादी खाली दिली आहे.)
१. Witness something truly majestic
२. Help a complete stranger
३. Laugh until I cry
४. Drive a Shelby Mustang
५. Kiss the most beautiful girl in the world
६. Get a tattoo
७. Skydiving
८. Visit Stonehenge
९. Drive a motorcycle on the Great Wall of China
१०. Go on a Safari
११. Visit the Taj Mahal
१२. Sit on the Great Egyptian Pyramids
१३. Find the Joy in your life
तो बोळा नेमका कोलच्या हाती येतो. तो ती यादी वाचतो आणि त्याला ती कल्पना भयंकर आवडते. कोल कार्टर ला त्या यादीविषयी विचारतो, त्यांची एक उत्तेजित भावनापूर्ण चर्चा होते आणि दोघांचे ठरते, की आपण ही बकेट लिस्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. कार्टरची बायको या सगळ्याला खूप विरोध करते. पण कार्टर तिला म्हणतो, "मी माझं सगळं आयुष्य कारच्या उघडलेल्या बॉनेट खाली दुरुस्ती करत काढलं. कुटुंबाप्रती सर्व जबाबदाऱ्या प्रेमाने निभावल्या. आता मला माझ्यासाठी म्हणून काही क्षण जगायचे आहेत. मला अडवू नकोस."
मी विचार करत होतो, आपण स्वतःसाठी खरंच किती जगतो? कायम जबाबदाऱ्या, रोजच्या जगण्यातली आव्हानं, मुलांचं मोठं होणं, पालकांचं दुसरं बालपण/ आजारपण, गृहकर्ज चुकवणे या आणि अशा असंख्य व्यवधानात आपलं आयुष्य कसं सरलं हे लक्षातही येत नाही. आपल्या मनातल्या काही इच्छा तरी, मरणाच्या दारात असताना पूर्ण करण्याची तयारी करण्यासाठी मन खंबीर असावं लागतं महाराजा! मला तर म्हणायचं आहे की मरणाच्या दारातच कशाला असं मन खंबीर करावं? एरवी देखील करावं कधी तरी ५ वर्षातून एकदा. आणि दरच वेळी काही महागडी टूर केली पाहिजे असं नाही. काही नाही तर निदान कासच्या पठारावर उमलणारा रानफुलांचा महोत्सव तरी बघावा एकदा डोळे भरून. कुठलेही बुकिंग न करता काशी यात्रा करून यावी. शेतात जाऊन कुणाच्या तरी मस्त मातीत हात घालावेत, भाकऱ्या भाजाव्यात चुलीवर, किंवा थोडा वेळ घालवावा एखाद्या hospice home मध्ये मरणासन्न लोकांचे अखेरचे बोल ऐकण्यात. करतो का आपण असं काही? का नाही करत? हे माझे मला 'बकेट लिस्ट' मुळे पडलेले प्रश्न.
मग निघतात दोघं सफरीला. स्काय डायविंग करतात, ताज महाल, चीनची भिंत, नेपाळ मधून हिमालय, इजिप्तचे पिरॅमीड, टांझानियाचे सिंह अभयारण्य असं आणि बरंच काही. इजिप्त मध्ये त्यांची चर्चा होते 'ममी'विषयी. कार्टर कोल ला विचारतो, की तुला या ममी संस्कृती विषयी काही माहिती आहे का? कार्टर ने या वेळी विचारलेले दोन प्रश्न माझ्या मनात घट्ट रुतून बसले आहेत. अगदी माधामाशीची नांगी त्वचेत रुतून बसते ना, तसे. खाली दिलेत.
Carter Chambers to Edward, (of the two questions asked of the dead by the gods at the entrance to heaven):
1. Have you found joy in your life?
2. Has your life brought joy to others?
एक: तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद मिळाला का?
दोन: तुम्ही आयुष्यात इतरांना आनंद देऊ शकलात का?
खूप खूप महत्वाचे प्रश्न आहेत हे. वरकरणी सोप्पे वाटतात. पण अर्थगर्भ आहेत. विचार करायला लावणारे आहेत. मी परवापासून गढलो आहे त्यातच. मी ठरवलं आहे की जेव्हा केव्हा माझी 'बादली लाथाडण्याची' वेळ येईल, तेव्हा मी स्वतःला हे दोन प्रश्न विचारेन. त्यांची उत्तरे ठाम, स्पष्ट, आत्मविश्वासपूर्ण हो अशी यायची असतील तर आज, आत्ता पासून सुरुवात करायला हवी. त्यासाठी मला माझी बकेट लिस्ट अर्थात मृत्यूपूर्व डोहाळे यादी करायला हवी. आणि नुसती करून उपयोग नाही, ती अंमलात सुद्धा आणायला हवी.
चित्रपटात पुढे बरंच काही घडतं. दोघे मिळून ती लिस्ट पूर्ण करतात.कार्टर चा कर्करोग मेंदूत पसरतो आणि त्याचे निधन होते. पण मृत्युपूर्वी तो कोल च्या मनातली त्याच्या मुलीविषयी असलेली अढी दूर व्हावी या विषयीची बीजे रोवतो. नंतर कोलचे देखील निधन होते. पण मरणापूर्वी त्याचे आणि त्याच्या लेकीचे मनोमीलन होते. तो त्याच्या नातीचा पापा घेतो आणि बकेट लिस्ट मधली Kiss the most beautiful girl in the world ही गोष्ट पूर्ण करतो.
हा चित्रपट बघाच आणि तुमचीही बकेट लिस्ट बनवाच. आणि, ती पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा.
*एका तरी माणसाला 'बकेट लिस्ट' करायला उद्युक्त करेन, ही गोष्ट मी माझ्या 'बकेट लिस्ट' मध्ये लिहिली आहे!*
Pages