बकेट लिस्टः ती काहीच रिस्क घेत नाही!!!

Submitted by अश्विनीमामी on 27 May, 2018 - 10:17

भरला संसार मागे सोडून ती जीवनाचा अर्थ शोधायला हिमालयात गेली, मैत्रीणींबरोबर मज्जा करायला मे डिटरेनिअन क्रूज वर गेली, वस्तू जमवण्यातली व्यर्थता समजून ओदिशाच्या जंगलात आदिवाश्यांना आरोग्य सेवा द्यायला गेली, पोस्ट ग्रॅजुएट शिक्षण पूर्ण करून चांगली कन्सल्टंट झाली. स्टार्टप कंपनी काढून वर्किंग विमेनना सपोर्ट सर्विसेस चालू केल्या.........................

बकेट लिस्ट सिनेमातली मधुरा असे काहीही करत नाही. अर्धे आयु ष्य अतिशय सुखात, आईबाबांकडून प्रेमळ नव र्‍या कडे अलगद ट्रान्सफर झालेली ही सान्यांची सून चार लोकांसाठी एकच भाजी चार प्रकारे करण्यात धन्यता मानते. सगळंच फार गोड गोड. प्रभात रोड वर प्रशस्त लॉरी बेकर स्टा इलचा बंगला( पण ह्याची गल्ली कुठली ते नेम प्लेट वर लिहीलेले नाही.) टॉलरेबल सासू( वंदना गुप्ते स्लीप वॉकिंग थ्रू द रोल!!) कोणी तरी नि ष्प्रभ सासरा, ओके टाइप किड्स , सुमीत राघवन सक्सेसफुल नवर्‍याच्या हुकमी भूमिकेत अनेकाव्यांदा, मुलीशी माफक जनरेशन गॅप..... असे सर्व सुखद चित्र असताना ही मधुरा इतकी लकी की तिला हार्ट ट्रान्सप्लांटची गरज असताना ते हार्ट लगेच मिळून जाते.... अशीच सिनेमाची सुरुवात आहे मी उगाच लिहीत नाही.......

आता ही डोनर जी अपघातात वारली तिने ऑर्गन डोनेशन चा प्रण केलेला असतो. त्यानुसार ती आठ लोकांना नवे जीवन देते, पण तिच्या स्वतःच्या काही तारुण्य सुलभ इच्छा अपुर्‍या राहतात. आपली सरळ स्वभावाची मधुरा डोनर फॅमिली ला शोधून काढते. त्यांच्या ग्रीवींग प्रोसेस वर अतिक्रमण करून ह्या इच्छा पूर्ण करायचा प्रण करते ही
थो डक्यात कन्सेप्ट आहे.

माधुरी प्रत्येक फ्रेम मध्ये आहे. व दिसते पण सुंदर. प्रत्येक साडीत ड्रेस लेदर जॅकेट मध्ये इत्यादि. एकदा पार्टीवेअर पण घातले आहे. व हसते पूर्वी सारखीच. चेहरा थोडा ओघळत चालला आहे पण ते वयानुरूप होणारच. पण त्या पलीकडे एक अभिनेत्री म्हणून काहीही ग्रोथ झाली आहे असे पूर्ण चित्रपट भर जाण वत नाही. इथे माझी निराशा झाली. मी माधुरी फॅन आजिबातच नाही . पण कथेतही फार दम आणलेला नाही. ती रिस्कच घेत नाही कुठे.
कथा वस्तूत, संवादात, गाण्यात, नाचण्यात...... हार्लि डेविड सन बाइक चालवताना सुद्धा शी डझ नॉट चॅनेल हर इनर सेक्सी ऑर हर इनर सेल्फ टु बिगिन विथ..... सर्व कसे मोजून मापून. गोड हसत.

ती सई देशपांडे( डोनर ची )बकेट लिस्ट पूर्ण करायचा प्रयत्न करते आहे ह्याचे सईच्या फॅमिलीवर व
आप ल्यावरही दडपणच येते. कुठेच रिलीज किंवा क्लोजर ( हा शब्द चित्रपटात वापरला आहे. ) मिळत नाही. असे
मृत्यू नंतर सहा महिन्यांच्या आत क्लोजर मिलत असते तर काय हवे होते. मधुराची हार्ट कंडिशन, सईचे जाणे
हे सर्व एका सुपरफि शिअल व कधी कधी विनोदी पद्धतीने घेतले आहे. पण ब्लॅक ह्युम र नाही. कॉज रिमेंबा...
शी ड्झ नॉट टेक रिस्कस!!!

विशीच्या मुली च्या साध्या सुध्या इच्छा ही चाळीशीची दोन पोरांची आई पूर्ण करू बघते हे खरे पोटेन्शिअल आयडिया आहे. सईची व्यक्तिरेखा जेवढी आपल्याला समजते ती देखील खूप जेन्युईन वाटते. दापोलीतले सीन्स अतिशक सुरेख घेतले आहेत व्हिजुअली.

मधुराचे प्रयत्न अति शय लेम पद्धतीने पड द्यावर साकारले आहेत. हार्ली ची रेस तर अतिच विनोदी. सो लेम
त्यासाठी हिने डिझायनर लेदर जॅकेट कशाला घातले आहे असा प्रश्न पडतो. पोझ करत बसते नुसती. सईच्या बॉयफ्रेम्ड ला किस करायचा पहिला सीन एकदम इउ इंड्युसींग आहे. आय वॉज अन्कंफर्टेबल वॉचिंग इट. मधुरा क्लब मध्ये जाउन दारू पिऊन दंगा करते तो सीनही अतिशय लेम आहे. दारू पीनेसे यक्रु त विकृत होता है हे वाक्य अगदी फर्गेटेबल आहे. त्यापेक्षा कंगनाचे क्वीन मधले ड्रंकन सीन्स बघावे.

सईच्या भावाचे काम चांगले आहे. ही ग्रीविंगच्या मध्ये मध्ये येते आहे हे तो क्लीअर करतो. मधुराच्या माधुरीपणाने दबलेला वाटत नाही. पणजीच्या भूमिकेत शुभा खोटे एकदम मिसकास्ट आहे. साने वाटत नाही. मी साने गोडबोले
जोशी गोखले लोकांच्या पणज्या पाहिल्या आहेत.( कृपया वाचकांनी ऑफेंड होउ नये.. मी फक्त व्यक्ति रेखे च्या ओरिजिनॅलिटी साठी लिहीले आहे. त्या पिढीतील स्त्रिया बारीक किंचीत वाकलेली शरीरय्ष्टी , सुरकुतलेली स्किन, पांढर्‍या धोप पातळ केसांची बारीकशी मागे अम्बुडी, सुती नौवारी साडी अश्या असत. दिग्दर्शकाने रिसर्च करायला हवा इतका तरी. ) ती खोड कर आहे ते बरोबर आहे पण व्हिस्की ची बा टली जवळ बाळगून असते हे पटत नाही. दिग्दर्शकाने सर्व स्टिरीओ टाइप्स वापरून वापरून वैताग आणला आहे. पण कुठेही नॅरेशन मध्ये नाट्यमयता तो एक उच्च बिंदू येत नाही. प्रश्न समोर उभे राहतात त्यापेक्षा सहज पणे ते सुटतातही. बाईच्या सुंदर ़ कपाळाला आठ्या पडल्यातर? रडली आणि डोळ्या खाली काळे झाले तर? उगीच रिस्क नको.

मधुराचे सोनेरी वर्तूळ पूर्ण करणारे आईबाप आहेत दिलीप प्रभावळकर व एल दुगो मधली आई. मध्येच ही प्ण बकेट लिस्ट बनवते व त्या प्रमाणे हळदी कुंकू करते. व एक लेक्चर देते ़ कृ ष्णाच्यावेळी कुठे फोटो होते इत्यादि. व सर्वांना नौ वारी साडी नेसायची व पारम्पारिक दागिने घालायची एक संधी. हा लुक पण आता खूपच क्लिशेड झाला आहे. त्या हळदी कुंकवात मला गौरीची मूर्तीच कुठे दिसली नाही.

टॅटू काढवून घेणे, पेट अ‍ॅडॉ प्ट करणे ह्या आय टेम ला हात लावलेला नाही. कारण त्यात आरस्पानी सौंदर्याला धक्का पोहोचू शकतो व अटेन्शन पेट वर डायवर्ट होउ शकते. फ्रँक ली हाफ वे थ्रू द मुव्ही आय वॉज चेकीं ग पप फ्लिक्स ऑन इन्स्टाग्राम फॉर सम ओरिजिनल एक्स्प्रेशन्स अ‍ॅड फीलिन्ग्स.

मध्यंतरानंतर काहीतरी होईल म्हणून आप्ण वाट बघतो. तर काय? मलेशियाला जाउन मध्यम वयीन सेकंड हनीमून टाइप प्रेमगीत, सुमीत राघव न साराभाई वर्सेस सारभाई मध्ये एकदा सुरज हुआ मध्यम प्रेमगीत एका पेशं ट बरोबर गातो आहे असे मोनिशाला वाटते त्याच सीन्स मधले साधारण कपडे त्याने घातले आहेत. मधुरा एका डे फंक्षनला रेड कार्पेट टाइप मॅजेंटा पर्पल गाउन घालते!!!! हे प्र झेंटेशन सक्सेसफूल होउन सान्यांना सान होजे मध्ये जायचे आमंत्रण मिलते पण मधुरा जात नाही. इथेच राहुन लिस्ट पूर्ण करीन म्हणते. व्हॉट क्रायसीस. ड्वाले पाणावले. नॉर्मली सुद्धा कपल्स फॅमिलीज आपापल्या सोयीने जातात इथे तिथे.

शेव टी एक फर्गेटेबल गाणॅ व पार्टी. एका सीन मध्ये मला आशा होती की सईचा आत्मा किंवा स्पिरीट येउन मधुराला धन्यवाद म्हणेल तसे इरी लोकेश न तयार केले होते. पण इथे पण पतिराज च येउन पप्पी घेतात. ती ही
स्क्रीन वर नाही. उगीच रिक्स कशाला!!!

मग एक तू कशी स्फूर्ती प्रेर णा आहेस वगैरे टाइप शाळकरी स्वगत. व प्रभात रोड वरची स्टोरी सुफळ संपूर्ण.

एखादी स्मिता उंबर ठा कॅरी करते, एखादीच रिमा एखादीच अँजेलिना जोली, कधी तरी मेरील स्ट्रीप, कधी तरी सुलभा देशपांडे , विजया बाईं सारख्या ललना डो ळ्यात प्राण आणून बघावे असे अ‍ॅक्टिंग चेहर्‍याव रच्या सुरकुत्या न लपवतपू, पूर्ण शरीराचे माध्यम करून आपल्या परेंत पोहोचवतात. कारण त्या रिस्क घेतात. रिस्क घ्यायची असते लाइफ मध्ये. पुट दॅट इन युअर बकेट लिस्ट लेडी!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रपट थेटरातून उतरला आहे . माधुरी तीला मिळालेले पैसे कनवटीला लावून निघूनही गेली आहे. आता धाग्यात काही दम नसल्यान टाळे ठोकण्यात यावे.

सस्मित Happy
एखाद्या कन्नड/ तेलगू घरात जाऊन खा मात्र. आपल्याला नेमके चांगले जमतात असं नाही.

माधुरी तीला मिळालेले पैसे कनवटीला लावून निघूनही गेली आहे.
>>>
आज अमित शहांनी त्यांची बक्केट लिस्ट पुर्ण केली बहुतेक

मी करणार नाहीच्चे. फक्त खायचा विचार आहे. फक्त टेस्ट करायचा आहे खरंतर.
कारण तो गोळा जो गूगलुन पाहिल्यावर दिसलाय एका रेस्पीत आणि त्याच्या बरोबरचं पात्तळ सांबार / रस्सम तर मला अगदीच खाणेबल वाटलं नाहीये. :-)म्हणुन तर बकेट लिस्टीत घातलंय. नैतर लगेच्च जाउन खाल्लं असतं मी Happy

माधुरी, उर्मिला टॉपला होत्या तेव्हा मराठीत आल्या नाहीत. आता उतारवयात हिंदी चित्रपट मिळेनासे झाले म्हणून मराठीत ट्राय करून पाहू.. प्रेक्षक काय आपलीच आहे.. सांभाळून घेतील अशा विचाराने हे पदार्पण असेल तर मला तरी नाही आवडणार असे

पण मराठीत येऊन त्या छान परफॉर्म करणार असतील तर काय हरकत आहे... मी हिंदीतून आले म्हणून मी भारी असे मरठीत करायला गेल्या तर त्यांना कोणीही भाव देणार नाही.
मराठीतले टॉप नायक हिंदीत नोकराची भुमिका करायचे ते जरा ऑड वाटायचे. पण हिंदीत त्या भुमिकेसाठी जास्त पैसा मिळतो म्हणून ते तिकडे जात असतील तर त्यांचा चॉईस.

तब्बू, नाना पाटेकर टॉप ला होते तरीपण मराठीत काम केले होते. तब्बू तर अमराठी. नानाने तर नाटक सुद्धा केले. हा मुद्दा आहे.

नाना पाटेकर, माधुरी दिक्षीत इतका टॉप ला कधी होता? मुळात नाना पाटेकर स्टार कधीच नव्हता. दुसरं म्हणजे, तो मराठीतून हिंदीत गेला. तसं काही माधुरी दिक्षीत च्या बाबतीत घडलं नाही. तिनं हिंदी सिनेमांतून कारकीर्द सुरू केली आणी तिथे ती स्टार झाली.

दुसरं असं की नाना पाटेकर ने जे केलं त्याचीच अपेक्षा माधुरी दिक्षीत कडून का करावी? मुळात हिंदीतच काम का केलं, मराठीत का नाही वगैरे गोष्टी मला तरी महत्वाच्या नाही वाटत. जिथे तुम्हाला तुमची रोजी-रोटी घेऊन जाते, तिथे जावं, प्रामाणिकपणे काम करावं आणी कुणालाही त्रास न देता, सुखात जगावं. बाकी गोष्टी फिजूल आहेत.

तुम्हाला काय महत्वाचे वाटते ते मला का वाटावे? मला जे वाटले तेच तुम्हाला वाटावे अशी सक्ती केली आहे का? कि माझे काही वाटणे म्हणजे माधुरी वर सक्ती केली आहे?

नाना स्टार नव्हता या विधानाला फ्रेम करून भिंतीवर टांगून ठेवावे असे वाटतेय. मराठीतून हिंदीत गेला काय आणि हिंदीतून हिंदीत गेली होती हे अशक्य आहे. तब्बू पण मराठीतून हिंदीत गेली होती का?

"मला जे वाटले तेच तुम्हाला वाटावे अशी सक्ती केली आहे का?"

"मी हिंदीतून आले म्हणून मी भारी असे मरठीत करायला गेल्या तर त्यांना कोणीही भाव देणार नाही." - हे सर्वसमावेशक विधान केलत त्यातच तुमच्या मताची सक्ती केलीत. तेव्हा पुन्हा, मी अशी सक्ती केलीये का असा प्रश्न विचारण्यात काय हशील?

"नाना स्टार नव्हता या विधानाला फ्रेम करून भिंतीवर टांगून ठेवावे असे वाटतेय" - जरूर ठेवा. पण चर्चेच्या दृष्टीनं, त्यापेक्षा जर काही डेटा / मुद्दा वगैरे देऊ शकलात, तर चर्चा पुढे जाईल. आणी वादासाठी वाद घालणार असाल, तर त्यासाठी खरच वेळ नाहीये.

"तब्बू मराठी होती का" - ह्या प्रश्नाला तुमचं 'नो-सक्ती' वालं लॉजिक वापरू शकता.

मी हिंदीतून आले म्हणून मी भारी असे मरठीत करायला गेल्या तर त्यांना कोणीही भाव देणार नाही >>> तुमच्या डोळ्यात गुगल प्लस आहे का हो ? नसलेलं दिसतंय म्हणून विचारलं .

मी हिंदीतून आले म्हणून मी भारी असे मरठीत करायला गेल्या तर त्यांना कोणीही भाव देणार नाही>>अहो ते मी म्हटले होते. असे मला वाटते. ती मराठीत काय आता तेलगू/गुजरती अजुन कुठेही गेली तरी चांगल्या कामाला पर्याय नाही.

'कोणीही' खटकत असेल तर आता तसे वाटले म्हणून लिहिले.

चांगल्या कामाला पर्याय याच्याशी असहमत असण्याचे कारण नाही. फक्त जसा तिचा चॉईस असू शकतो तसा माझाही...

"तुमच्या डोळ्यात गुगल प्लस आहे का हो ? नसलेलं दिसतंय म्हणून विचारलं ." - तुम्हालाही प्रश्न पडला ते बरं झालं असं वाटेपर्यंत, वाक्याचा दुसरा पार्ट वाचला आणी परत एकदा तो 'Presumptuous' टोन जाणवला. असो. तुमचं चालू द्या.

माधुरी दिक्षीतच्या सिनेमाच्या धाग्यावर नाचणीची उकड.... माधुरी नाचणीच्या गोळ्यांसारखी दिसते का उकड खाते सिनेमात?

>>बकेट लिस्टः ती काहीच रिस्क घेत नाही!!!<<

खरंतर माधुरीने हा चित्रपट करुन रिस्क घेतलेली आहे. चित्रपटाचा विषय (गाभा) सेंसेशनल असुनहि सादरीकरण अत्यंत टुकार असल्याने त्याचं बिल माधुरीवर फाडण्यात येतंय. बकेट लिस्टमधला प्रत्येक आय्टम निवडण्यात आणि त्याला खुलवण्यात चित्रपटाचे लेखक्/दिग्दर्शक सपशेल तोकडे पड्लेले आहेत. यापुढे माधुरीने अशी रिस्क घेउ नये... Proud

शेवटच्या समारंभात्ला तिचा नाच.. अजुनहि कातील...

नेट्फ्लिक्सवर आलेला आहे.

शेवटच्या समारंभात्ला तिचा नाच.. अजुनहि कातील...>>. अरे भौ तेच तर अपयश आहे. ह्या वयातही नाचच फक्त? इतर काही मसल्स हलवाव्यात की चेहर्‍यावरच्या वगैरे . अ‍ॅक्टिंग करावे?! वयाच प्रश्न नाही एक सीझन्ड कलाकार म्हणून.

ईथल्या पब्लिकने डेढ ईश्किया पाहिला नाही का अजून? चांगले काम केले आहे. त्यात ईस्मत चुगतईच्या लिहाफचा संदर्भ आहे. छान काल केले आहे दोघींनी त्यात.

कालच नेट्फ्लिक्सवर बकेट लिस्टः बघितला . फारच टुकार . असे तुकडे बघितल्यासरख वाटल. सलग movie चा फिल च नाहि आला. माधुरी very average in the movie

>>ह्या वयातही नाचच फक्त?<<

या वयातहि इतका स्टनिंग, ग्रेस्फुल नाच?, या दृष्टिकोनातुन बघा. माधुरीचा गाण्यातला तो छोटा पिस आणि वहिदा रेहमानचा देल्हि ६ मध्ला एक छोटासा पिस अ‍ॅप्रिशिएट करणारे आहेत अजुन...

आणि चेहेर्‍यावरचे मसल्स हलवणे याला अ‍ॅक्टिंग म्हणतात होय, बऽऽरं...

>>>ईथल्या पब्लिकने डेढ ईश्किया पाहिला नाही का अजून? चांगले काम केले आहे.
अजिबात नाही. फारच कृत्रिम वाटते त्यात माधुरी.. फक्त हसणे. हुमा कुरेशी बेस्ट

अजिबात नाही. फारच कृत्रिम वाटते त्यात माधुरी.. फक्त हसणे. हुमा कुरेशी बेस्ट>> अजिबात कृत्रिम वाटली नाही बराच संयत अभिनय केलाय दोघींनी , समलिंगी संबंधांचा अंडरकरंट आहे पूर्ण चित्रपटात जो दोघींनी व्यवस्थित उभा केलाय.

ताईंची एक नेट फ्लिक्स वर सीरीअल येत आहे. बघु या. मध्यमवर्गीयांच्या स्ट्रगल वर आधारित आहे असे वाचले. बायोपिक तर येइलच
कधीतरी.

Pages