खुर्ची : ६ (अंतिम)

Submitted by किल्ली on 2 June, 2018 - 10:50

आधीच्या भागांसाठी खालील धाग्यावर टिचकी मारा .
भाग १ ची लिंक : https://www.maayboli.com/node/65732
भाग २ ची लिंक : https://www.maayboli.com/node/65789
भाग ३ ची लिंक: https://www.maayboli.com/node/65842
भाग ४ ची लिंक: https://www.maayboli.com/node/65889
भाग ५ ची लिंक: https://www.maayboli.com/node/66145
पूर्ण कथा येथे पण उपलब्ध आहे : https://www.pallavikulkarni.in/खुर्ची-_-भयकथा/
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'खुर्ची' ह्या भयकथेचा अंतिम भाग किल्ली सहर्ष पोस्ट करत असून भाग टाकण्यास झालेल्या विलंबाबद्दल दिलगीर आहे.
अस्मादिकांच्या मित्रमंडळात चाललेल्या "माझे भुताचे अनुभव" ह्या चर्चेतून कथाबीज आलेले असून थोड्याफार प्रमाणात सत्यकथा म्हंणता येईल.
त्याबद्दल मी माझी मैत्रीण गायत्री आणि तिचे पती ओंकार ह्यांची आभारी आहे.
सादरीकरणाचे लेखनस्वातंत्र्य घेऊन घटनेचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला आणि अर्थातच कुठलीही अंधश्रद्धा पसरवण्याचा लेखिकेचा कोणताही हेतू नाही.मनोरंजनासाठी ह्या कथेचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती.
खुर्चीला तुम्ही सर्वानी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मंडळ आभारी आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
“पण आता माझ्या खिशात अल्बम आहे पोरा!! माझी शक्ती!! सगळे मरणार!”
असं म्हणून डोळ्यातून आग ओकत मयूर भेसूर हसू लागला !!!
मयूरला साधनाच्या भुताने पूर्णपणे पछाडले होते.
"ए शाम्या, तू तर सगळ्यात आधी मरणार! माझ्या आत्म्याला मृत्युनंतर छळणारा नराधम आहेस तू! माझ्याशी दोन हात करताना तुला हे कसं समजलं नाही की माझी designs शस्त्र आहेत! ह्या पोराच्या हातात आता माझ्या designs चा अल्बम आहे! आता भोग आपल्या कुकर्माची फळं!"
मयूरच्या ह्या कर्कश्य आवाजात बोलण्याने सगळ्यांची बोबडी वळली. शाम मात्र धीराने बोलला, "गप्प बस दुष्टे, स्वतः जिवंत असताना त्या designs चा उपयोग करू शकली नाही आणि आता काय करणार आहेस? पूर्ण तयारीनिशी ह्या युद्धात उतरलो आहे मी! ही मुले म्हणजे माझे प्यादे आहेत. ह्याच्या शरीराचा उपयोग करून तू मला काही करू शकत नाहीस. तुझा स्वतः चा आत्मा पण मला बांधील आहे."

शामचं हे शेवटचं वाक्य ऐकून मिलींद बुचकळ्यात पडला. तो विचार करू लागला,
"नक्की कोण दुष्ट आहे इथे, हा शाम आपल्याला फसवत तर नाही ना, असाही ह्याच्याकडे बघून कधीच प्रसन्न वाटत नाही. विचित्र आहे हा माणूस! "
त्याच्याकडे बघून मयूरच्या शरीरातली साधना कडाडली, "बरोबर विचार करत आहेस तू पोरा, अरे हा शाम दुष्ट शक्तींची आराधना करणारा मांत्रिक आहे, त्याचं शाम हे नावसुद्धा खोटं आहे. माझी designs ह्याला हवी होती , त्यांचा तो गैरवापर करणार होता. माझ्या नक्षी मार्फत जगात त्याचे हस्तक पसरवून सगळीकडच्या ऊर्जेचा ताबा घ्यायचा होता. त्यासाठी हा माझी नक्षी हस्तगत करण्याच्या मागे लागला होता. त्याने designs मिळवलीसुद्धा! पण त्याचे तंत्र मला अवगत होते. योग्य तो आकृतिबंध झाल्याशिवाय designs सिद्ध होत नाहीत आणि हे रहस्य त्याला हवं होत. मी माझी कला त्याला दिली नाही. म्हणून त्याने माझा अत्यंत छळ केला. मी बधले नाही म्हणून तर ह्याने माझ्याविषयी चुकीची मते पसरवली. ज्या कीर्तीसाठी मी आयुष्यभर झटत राहिले ती मला मिळू नये ह्याची पुरेपूर व्यवस्था केली. माझी कला जगासमोर आणण्याची मला संधी मिळूच दिली नाही. ह्या माणसाच्या वाईट ध्येयासाठी काहीही गुन्हा नसताना मला अपकीर्तीचा कलंक लागला. ह्याने शेवटी माझा खून केला आणि काळ्या विद्येद्वारे माझ्या आत्म्याला बांधून ठेवलं. मी अजून पूर्णपणे ह्याच्या कह्यात नाहीये म्हणून एवढंतरी बोलू शकत आहे आणि हे स्वातंत्र्य मला मयूरमुळे मिळालं. तो खुर्चीवर बसला आणि मला व्यक्त होण्यासाठी माध्यम मिळालं. त्या खुर्चीवर बसून मी माझ्या कलेत रममाण होत असे. त्यामुळे तिथे माझी सुष्ट शक्ती सामावली आहे. बाकीचे प्रभाव ह्या मांत्रिकाने तयार केले होते आणि ते तुमच्या हनुमान चालीसा पठणामुळे निष्क्रिय होत असत. तुम्हाला ईजा करण्याचा माझा कोणताच हेतू नव्हता. म्हणून देवाने मला त्या जागेवरून निष्प्रभ केले नाही. नाहीतर हनुमान चालीसेपुढे भल्या भल्या दुष्टांचा प्रभाव टिकत नाही. तुम्ही आज जिवंत आहात तो तुमच्या नामजपाचा प्रताप! तुम्हाला ह्या घरात आणण्याची योजना सुद्धा ह्याचीच होती! मयूर कमकुवत मनाचा आहे हे त्याने आधीच ताडले होते आणि त्यांच्याद्वारे त्याला दुष्ट शक्ती सिद्ध करून माझ्याकडून रहस्य वदवून घ्यायचं होतं. बाकी त्याने सांगितलेली अंगारा वगैरे सगळ्या भाकडकथा आहेत. खरं तर त्याने त्याच्या काळ्या विद्येद्वारे तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि इथवर आणलं. इथे माझी शक्ती कमी होते कारण मी खुर्चीपुरती सीमित आहे. इथे ह्या राक्षसाचं राज्य आहे. पोरांनो , ह्याच्यावर विश्वास ठेवून चूक केलीत तुम्ही!! मी ह्याला केलेल्या प्रतिकाराचा ह्याचा डोळा गेला. पण ह्यापेक्षा मी ह्याचं नुकसान करू शकले नाही. "
हे बोलत असताना मयूरचे डोळे शक्तीहीन होत चालले होते.

“माझे काही वाकडे तू करूही शकणार नाहीस! इथे ह्या पोरांना फसवून घेऊन आलो. ह्यांचं हनुमान चालीसेचं पुस्तक सुद्धा शिताफीनं रस्त्यात पडावं अशी मी व्यवस्था केली. इथे सर्वत्र मंतरलेली जमीन आहे. इथला वारासुद्धा माझ्या मर्जीने वाहतो. साधना मयुराच्या शरीरात फसली आहे. त्यामुळे २ बळी मला तिथेच मिळतील. साधनाचा तिच्या अल्बम सकट बळी दिला की मला शक्ती प्राप्त होईल आणि ह्या पोरांना मी सैतानाला खुश करण्यासाठी बळी देईल. मग मला कोणीच थांबवू शकणार नाही.” तेच नेहमीचे भयाण कुत्सित हास्य करत मांत्रिक करवादला.
थंड आणि संयमी डोक्याच्या मिलिंदने विचार करायला सुरुवात केली. "नामजप हेच सर्वात मोठे साधन आहे ह्या दुष्टाविरुद्ध लढण्यासाठी! रामरक्षा स्तोत्र! हे स्तोत्र अत्यंत प्रभावी, फलदायी, सिद्ध आणि रक्षण करणारे आहे. लहानपणी आईने पाठ करून घेतलंय, माऊलीची कृपा आणि रामरक्षा कवच वापरून आपण आपली, मित्रांची आणि निर्दोष साधना नामक कलाकार स्त्रीच्या आत्म्याची सुटका करायला हवी." मनोबल गोळा करून एकाग्रतेने त्याने स्तोत्रांचा हाच हुकुमी एक्का वापरायचे ठरवले. मनात विचार आल्याबरोबर उशीर कसला! त्याने मंत्रोच्चारण मोठमोठ्याने सुरु केले. शैलेशला डोळ्यानेच सूचक अर्थाने खुणवले. त्यांच्या पुण्याचा म्हणा अथवा मैत्रीचा, प्रेमाचा सकारात्मक प्रभाव म्हणा, शैलेश ती नेत्रपल्लवी समजून गेला आणि स्तोत्र पाठ नव्हते पण मिलींद च्या उच्चारांकडे मन एकाग्र करून राम नामाचा जप शैलेश करू लागला.

मांत्रिकही कमी नव्हता त्याने मुलांच्या एकाग्रतेत अडथळा आणण्यास सुरुवात केली. जोरदार वारा वाहू लागला, काळा धूर पसरू लागला. श्वास गुदमरत होता. सगळीकडे वावटळ सुटलं आणि मुलांना भोवळ यायला लागली. विचित्र किंचाळ्या आणि अमंगल कुबट वासाने वातावरण भरून गेलं. नेटाने मिलींद आणि शैलेश स्तोत्र आराधन करत होते. हळूहळू रामरक्षा स्तोत्राचा प्रभाव दिसायला सुरुवात झाली. धूर नाहीसा झाला, दुर्गंध जाऊन सुगंधी वारे वाहू लागले, वातावरणात पवित्रतेचे अनुभूती येत होती. मयूर बेशुद्ध होऊन कोसळला. साधनाचा आत्मा त्याच्या शरीरातून बाहेर पडला. सर्वात वाईट अवस्था आता मांत्रिकाची झाली होती. तो दुर्बल झाला आणि त्याच्या सर्व शक्ती निष्प्रभ ठरल्या. तो पळू लागला, पण साधनाचा आत्माही बाहेर पडला होता. तीने मांत्रिकाला अडवले आणि त्यानेच पेटवलेल्या आगीत ढकलून दिले. मांत्रिक गुरासारखा ओरडत होता, पण त्याच्या कुकर्माचा परिणाम भोगत होता. मांत्रिक मरून पडला तशी वातावरणात एकदम प्रसन्नता आली. साधना आनंदाने हसू लागली. मुलेही विधात्याचे आणि सर्व पालनहार श्रीरामाचे आभार मानू लागली. रामरक्षेने सिद्ध केलेले तीर्थ शिंपडून मयूरला मिलींदने उठवले. ती जागा आणि साधना दोन्ही मुक्त झाल्या. साधनाने मुलांचे, विशेषतः मिलींदचे आभार मानले आणि ती अनंतात विलीन झाली. क्लान्त तरीही सुहास्य मुद्रेने मुले घरी परतली.

घरी येऊन पाहतात तो काय ?
खुर्चीवर गुलाबाच्या पाकळ्या पसरल्या होत्या आणि फुलांच्या सुवासाचा दरवळ सर्वत्र पसरला होता!
खुर्ची मुक्त झाली होती!
-------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
--------------------------------------------------------------------------------------------------------
(समाप्त)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान होती ! Happy
पण शेवट गुंडाळलेला वाटला.
पुलेशु ! Happy

खुप सुंदर लिहिलंय .
दोन्ही शक्तींमधील विविध पातळीवरील संघर्ष नक्कीच खुलवता आला असता पण सकारात्मकतेने केलेला शेवट आवडला.
अंतिम विजय नेहमीच श्रद्धेचा आणि श्रद्धावानांचा होत असतो हां पॉझिटिव्ह विचार देणारे कथानक Happy

छान लिहिलंय किल्लीतै! सुरेख! Happy कथानक मांडण्याची हातोटीही उत्तम! अचानक दिलेला टर्निंग पाॅइंट आवडला. पुलेशु! Happy

पण शेवट गुंडाळलेला वाटला.>>> मलाही Lol
दोन्ही शक्तींमधील विविध पातळीवरील संघर्ष नक्कीच खुलवता आला असता>>>>>
अंतिम भागात कथानक अजून खुलवता आलं असतं असं मलाही वाटत आहे, पण सध्यातरी एवढंच सुचलंय Happy

धन्यवाद अंकु,रश्मी.. Happy
शेवट लवकर का आटोपला गं?>>>
तिम भागात कथानक अजून खुलवता आलं असतं असं मलाही वाटत आहे, पण सध्यातरी एवढंच सुचलंय Happy

part 6
ajun kahi tri lihyla have hote...suspense create kryla hava hota...mg mast vatle aste...
actually ase bhooth chya story read krtana suspense asel ase vatte.

@ VAISHAL@:
नक्की प्रयत्न करेन पुढच्या वेळेस शेवट खुलवण्याचा .. Happy
प्रतिसाबद्दल धन्यवाद .. Happy

@ dr pranjal
पुढच्या वेळेस शेवट खुलवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.. Happy
प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy