भरला संसार मागे सोडून ती जीवनाचा अर्थ शोधायला हिमालयात गेली, मैत्रीणींबरोबर मज्जा करायला मे डिटरेनिअन क्रूज वर गेली, वस्तू जमवण्यातली व्यर्थता समजून ओदिशाच्या जंगलात आदिवाश्यांना आरोग्य सेवा द्यायला गेली, पोस्ट ग्रॅजुएट शिक्षण पूर्ण करून चांगली कन्सल्टंट झाली. स्टार्टप कंपनी काढून वर्किंग विमेनना सपोर्ट सर्विसेस चालू केल्या.........................
बकेट लिस्ट सिनेमातली मधुरा असे काहीही करत नाही. अर्धे आयु ष्य अतिशय सुखात, आईबाबांकडून प्रेमळ नव र्या कडे अलगद ट्रान्सफर झालेली ही सान्यांची सून चार लोकांसाठी एकच भाजी चार प्रकारे करण्यात धन्यता मानते. सगळंच फार गोड गोड. प्रभात रोड वर प्रशस्त लॉरी बेकर स्टा इलचा बंगला( पण ह्याची गल्ली कुठली ते नेम प्लेट वर लिहीलेले नाही.) टॉलरेबल सासू( वंदना गुप्ते स्लीप वॉकिंग थ्रू द रोल!!) कोणी तरी नि ष्प्रभ सासरा, ओके टाइप किड्स , सुमीत राघवन सक्सेसफुल नवर्याच्या हुकमी भूमिकेत अनेकाव्यांदा, मुलीशी माफक जनरेशन गॅप..... असे सर्व सुखद चित्र असताना ही मधुरा इतकी लकी की तिला हार्ट ट्रान्सप्लांटची गरज असताना ते हार्ट लगेच मिळून जाते.... अशीच सिनेमाची सुरुवात आहे मी उगाच लिहीत नाही.......
आता ही डोनर जी अपघातात वारली तिने ऑर्गन डोनेशन चा प्रण केलेला असतो. त्यानुसार ती आठ लोकांना नवे जीवन देते, पण तिच्या स्वतःच्या काही तारुण्य सुलभ इच्छा अपुर्या राहतात. आपली सरळ स्वभावाची मधुरा डोनर फॅमिली ला शोधून काढते. त्यांच्या ग्रीवींग प्रोसेस वर अतिक्रमण करून ह्या इच्छा पूर्ण करायचा प्रण करते ही
थो डक्यात कन्सेप्ट आहे.
माधुरी प्रत्येक फ्रेम मध्ये आहे. व दिसते पण सुंदर. प्रत्येक साडीत ड्रेस लेदर जॅकेट मध्ये इत्यादि. एकदा पार्टीवेअर पण घातले आहे. व हसते पूर्वी सारखीच. चेहरा थोडा ओघळत चालला आहे पण ते वयानुरूप होणारच. पण त्या पलीकडे एक अभिनेत्री म्हणून काहीही ग्रोथ झाली आहे असे पूर्ण चित्रपट भर जाण वत नाही. इथे माझी निराशा झाली. मी माधुरी फॅन आजिबातच नाही . पण कथेतही फार दम आणलेला नाही. ती रिस्कच घेत नाही कुठे.
कथा वस्तूत, संवादात, गाण्यात, नाचण्यात...... हार्लि डेविड सन बाइक चालवताना सुद्धा शी डझ नॉट चॅनेल हर इनर सेक्सी ऑर हर इनर सेल्फ टु बिगिन विथ..... सर्व कसे मोजून मापून. गोड हसत.
ती सई देशपांडे( डोनर ची )बकेट लिस्ट पूर्ण करायचा प्रयत्न करते आहे ह्याचे सईच्या फॅमिलीवर व
आप ल्यावरही दडपणच येते. कुठेच रिलीज किंवा क्लोजर ( हा शब्द चित्रपटात वापरला आहे. ) मिळत नाही. असे
मृत्यू नंतर सहा महिन्यांच्या आत क्लोजर मिलत असते तर काय हवे होते. मधुराची हार्ट कंडिशन, सईचे जाणे
हे सर्व एका सुपरफि शिअल व कधी कधी विनोदी पद्धतीने घेतले आहे. पण ब्लॅक ह्युम र नाही. कॉज रिमेंबा...
शी ड्झ नॉट टेक रिस्कस!!!
विशीच्या मुली च्या साध्या सुध्या इच्छा ही चाळीशीची दोन पोरांची आई पूर्ण करू बघते हे खरे पोटेन्शिअल आयडिया आहे. सईची व्यक्तिरेखा जेवढी आपल्याला समजते ती देखील खूप जेन्युईन वाटते. दापोलीतले सीन्स अतिशक सुरेख घेतले आहेत व्हिजुअली.
मधुराचे प्रयत्न अति शय लेम पद्धतीने पड द्यावर साकारले आहेत. हार्ली ची रेस तर अतिच विनोदी. सो लेम
त्यासाठी हिने डिझायनर लेदर जॅकेट कशाला घातले आहे असा प्रश्न पडतो. पोझ करत बसते नुसती. सईच्या बॉयफ्रेम्ड ला किस करायचा पहिला सीन एकदम इउ इंड्युसींग आहे. आय वॉज अन्कंफर्टेबल वॉचिंग इट. मधुरा क्लब मध्ये जाउन दारू पिऊन दंगा करते तो सीनही अतिशय लेम आहे. दारू पीनेसे यक्रु त विकृत होता है हे वाक्य अगदी फर्गेटेबल आहे. त्यापेक्षा कंगनाचे क्वीन मधले ड्रंकन सीन्स बघावे.
सईच्या भावाचे काम चांगले आहे. ही ग्रीविंगच्या मध्ये मध्ये येते आहे हे तो क्लीअर करतो. मधुराच्या माधुरीपणाने दबलेला वाटत नाही. पणजीच्या भूमिकेत शुभा खोटे एकदम मिसकास्ट आहे. साने वाटत नाही. मी साने गोडबोले
जोशी गोखले लोकांच्या पणज्या पाहिल्या आहेत.( कृपया वाचकांनी ऑफेंड होउ नये.. मी फक्त व्यक्ति रेखे च्या ओरिजिनॅलिटी साठी लिहीले आहे. त्या पिढीतील स्त्रिया बारीक किंचीत वाकलेली शरीरय्ष्टी , सुरकुतलेली स्किन, पांढर्या धोप पातळ केसांची बारीकशी मागे अम्बुडी, सुती नौवारी साडी अश्या असत. दिग्दर्शकाने रिसर्च करायला हवा इतका तरी. ) ती खोड कर आहे ते बरोबर आहे पण व्हिस्की ची बा टली जवळ बाळगून असते हे पटत नाही. दिग्दर्शकाने सर्व स्टिरीओ टाइप्स वापरून वापरून वैताग आणला आहे. पण कुठेही नॅरेशन मध्ये नाट्यमयता तो एक उच्च बिंदू येत नाही. प्रश्न समोर उभे राहतात त्यापेक्षा सहज पणे ते सुटतातही. बाईच्या सुंदर ़ कपाळाला आठ्या पडल्यातर? रडली आणि डोळ्या खाली काळे झाले तर? उगीच रिस्क नको.
मधुराचे सोनेरी वर्तूळ पूर्ण करणारे आईबाप आहेत दिलीप प्रभावळकर व एल दुगो मधली आई. मध्येच ही प्ण बकेट लिस्ट बनवते व त्या प्रमाणे हळदी कुंकू करते. व एक लेक्चर देते ़ कृ ष्णाच्यावेळी कुठे फोटो होते इत्यादि. व सर्वांना नौ वारी साडी नेसायची व पारम्पारिक दागिने घालायची एक संधी. हा लुक पण आता खूपच क्लिशेड झाला आहे. त्या हळदी कुंकवात मला गौरीची मूर्तीच कुठे दिसली नाही.
टॅटू काढवून घेणे, पेट अॅडॉ प्ट करणे ह्या आय टेम ला हात लावलेला नाही. कारण त्यात आरस्पानी सौंदर्याला धक्का पोहोचू शकतो व अटेन्शन पेट वर डायवर्ट होउ शकते. फ्रँक ली हाफ वे थ्रू द मुव्ही आय वॉज चेकीं ग पप फ्लिक्स ऑन इन्स्टाग्राम फॉर सम ओरिजिनल एक्स्प्रेशन्स अॅड फीलिन्ग्स.
मध्यंतरानंतर काहीतरी होईल म्हणून आप्ण वाट बघतो. तर काय? मलेशियाला जाउन मध्यम वयीन सेकंड हनीमून टाइप प्रेमगीत, सुमीत राघव न साराभाई वर्सेस सारभाई मध्ये एकदा सुरज हुआ मध्यम प्रेमगीत एका पेशं ट बरोबर गातो आहे असे मोनिशाला वाटते त्याच सीन्स मधले साधारण कपडे त्याने घातले आहेत. मधुरा एका डे फंक्षनला रेड कार्पेट टाइप मॅजेंटा पर्पल गाउन घालते!!!! हे प्र झेंटेशन सक्सेसफूल होउन सान्यांना सान होजे मध्ये जायचे आमंत्रण मिलते पण मधुरा जात नाही. इथेच राहुन लिस्ट पूर्ण करीन म्हणते. व्हॉट क्रायसीस. ड्वाले पाणावले. नॉर्मली सुद्धा कपल्स फॅमिलीज आपापल्या सोयीने जातात इथे तिथे.
शेव टी एक फर्गेटेबल गाणॅ व पार्टी. एका सीन मध्ये मला आशा होती की सईचा आत्मा किंवा स्पिरीट येउन मधुराला धन्यवाद म्हणेल तसे इरी लोकेश न तयार केले होते. पण इथे पण पतिराज च येउन पप्पी घेतात. ती ही
स्क्रीन वर नाही. उगीच रिक्स कशाला!!!
मग एक तू कशी स्फूर्ती प्रेर णा आहेस वगैरे टाइप शाळकरी स्वगत. व प्रभात रोड वरची स्टोरी सुफळ संपूर्ण.
एखादी स्मिता उंबर ठा कॅरी करते, एखादीच रिमा एखादीच अँजेलिना जोली, कधी तरी मेरील स्ट्रीप, कधी तरी सुलभा देशपांडे , विजया बाईं सारख्या ललना डो ळ्यात प्राण आणून बघावे असे अॅक्टिंग चेहर्याव रच्या सुरकुत्या न लपवतपू, पूर्ण शरीराचे माध्यम करून आपल्या परेंत पोहोचवतात. कारण त्या रिस्क घेतात. रिस्क घ्यायची असते लाइफ मध्ये. पुट दॅट इन युअर बकेट लिस्ट लेडी!!!
थोडी मोठी मेकअप करून मुक्ता
थोडी मोठी मेकअप करून मुक्ता बर्वे
>>> ईsssss. माधुरी फालतू अकटिंग करते पण बर्वे म्हणजे अति फालतू अभिनय.. तोंडावरची माशी उडत नाही.
छान लिहिले आहे अमा. ट्रेलर
छान लिहिले आहे अमा. ट्रेलर पाहूनच अंदाज आला होता की चित्रपट अति गोग्गोड आणि भयानक बोअर असणार आहे!!
रिस्क घ्यायची असते लाइफ मध्ये. पुट दॅट इन युअर बकेट लिस्ट लेडी >>> हे पटलेच. सेकंड इनिंगमध्ये सुंदर दिसणे आणि नृत्य करणे ह्या पलिकडे जाऊन अभिनय करायला हवा.
शी ड्झ नॉट टेक रिस्कस!!! >>>
शी ड्झ नॉट टेक रिस्कस!!! >>> हे वाचून '...पण मी कधीच रिस्क घेत नाही' वाली तळीराम कविता आठवली
एकदम प्रामाणिक अभिप्राय वाटला. आवडलं वाचायला.
मामी, अभिप्राय आवडला.
मामी, अभिप्राय आवडला.
मी तसे माधुरीचे खूपच थोडे चित्रपट पाहिलेत. त्या चित्रपटात तिची अभिनय क्षमता कधीच जाणवली नाही.
शिरीष कणेकरांनी त्यांच्या एका लेखात मधुबालाबद्द्ल लिहीलं होतं की तिच्या अस्मानी सौंदर्याचीच एवढी तारीफ होत असे की ती अभिनयातही खूप वरच्या दर्जाची होती हे फारसं कुणी लक्षातच घेतलं नाही.
माधुरीच्या बाबतीतही थोडेफार तसेच! दुसर्या अर्थानी!
नृत्यकौशल्य आणि विविध अँगल्सनी खुलणारं स्वतःचं सौंदर्य हेच सिनेमाभर भरुन राहिल याची माधुरीनी , तिच्या दिग्दर्शकानी आणि तिच्या प्रोड्युसरनी इतकी काळजी घेतली की तिच्या अभिनयातली कमतरता कधी अधोरेखित झालीच नाही.
हा सिनेमाही अपवाद नसावा असं दिसतंय.
'आपली मराठी' वर आला की नक्की बघणार.
अमा छान परीक्षण, फटकेबाजीत
अमा छान परीक्षण, फटकेबाजीत अमा टच जाणवला.
बाकी माधुरीकडून अभिनयाची अपेक्षा कधी नव्हतीच. कधी कस लागावा अश्या भुमिकाही तिने केल्या नाहीत की एखाददुसरे तसे असले तरी प्रभाव पाडू शकली नाही. कधी तिची कोण्या समकालीन हिरोईनीशी जुगलबंदीही झाली नाही. नाही म्हणायला दिल तो पागल है मध्ये त्याच लेव्हलच्या करिष्मा कपूर सोबत एक आठवते. देवदासमध्येही तेच. दोन्हीकडे नाचले कोण जास्त चांगले आणि दिसले कोण जास्त चांगले याचीच चर्चा. लज्जामध्ये होती. पण तो चित्रपट स्त्रीप्रधान असला तरी हिने तिच्या पार्टमध्ये काही तडफदार कॅरेक्टर साकारले नाही. अंजाम एक स्त्रीप्रधान आणि हिचा रोलही तसाच होता, पण तो चित्रपटही आधी छोटी भुमिका असलेल्या शाहरूखचा म्हणूनच ओळखला जातो. तिचे काही लक्षात राहते ते चन्ने के खेत मे गाणे.. आणि त्यातील तिची सिग्नेचर स्टेप !
येनीवेज, आमच्या घरचे बघून आले. तरुणाई बोर झाली. आणि म्हातारी आई माधुरीला बघून खुश झाली. तिच्यात एक आपलेपणा जाणवतो नव्वदीतल्या मराठमोळ्या पिढीला हे मात्र एक खरेय .. जे लोकं सचिनचा खेळ बघत मोठे झाले तेच त्यावेळी आपली माधुरी बॉलीवूडची सुपर्रस्टार हिरोईन म्हणूनही अभिमान बाळगून होती.
अर्धे आयु ष्य अतिशय सुखात,
अर्धे आयु ष्य अतिशय सुखात, आईबाबांकडून प्रेमळ नव र्या कडे अलगद ट्रान्सफर झालेली ही सान्यांची सून चार लोकांसाठी एकच भाजी चार प्रकारे करण्यात धन्यता मानते. सगळंच फार गोड गोड. प्रभात रोड वर प्रशस्त लॉरी बेकर स्टा इलचा बंगला( पण ह्याची गल्ली कुठली ते नेम प्लेट वर लिहीलेले नाही.) टॉलरेबल सासू( वंदना गुप्ते स्लीप वॉकिंग थ्रू द रोल!!) कोणी तरी नि ष्प्रभ सासरा, ओके टाइप किड्स , सुमीत राघवन सक्सेसफुल नवर्याच्या हुकमी भूमिकेत अनेकाव्यांदा, मुलीशी माफक जनरेशन गॅप..... असे सर्व सुखद चित्र
>> ohh yess we know THE TYPE!! :0=
मस्त लिहिलं आहे.
मस्त लिहिलं आहे.
ट्रेलर मधलं तिचं दिव्य मराठी ऐकूनच गीवप मारला. शिनेमा पहायचं त्राण नाहीये माझ्यात.
एखादी स्मिता - बाबौ !! कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभट्टाची तट्टाणी !
माधुरी खर्या आयुश्तात पण
माधुरी खर्या आयुश्तात पण नशीबवान आहे
सिनेमातल्या नटीला स्वजातीय शिकलेला नवरा मिलने सोपे नसते. पुधे तिच्या आइ वदिलांखातर तिथले सुखासीन आयुष्य सोडुन परत भारतात आला. आनखी काय पहिजे?....माझी मावशी
सिनेमा टीवी वर बघु.
मस्तच लिहिलंय अमा!
मस्तच लिहिलंय अमा!
आनखी काय पहिजे?..>> दयावान
आनखी काय पहिजे?..>> दयावान बघितला नाहीये त्याने . सुखी दिसतो जेव्हा दिसतो. आपण वयक्तिक बाबीत पडू नये
चित्रपट कसा वाटला ते लिहा.
राझी ने १०० कोटी कमावले. झिंदाबाद. आणि रेस थ्री इज ऑन द वे पीप्स.
राझी खरंच सुरेख आहे. चुकवू
राझी खरंच सुरेख आहे. चुकवू नये असा. दोन्हीं केजो चेच!
दोन्हीं केजो चेच> धर्मा
दोन्हीं केजो चेच> धर्मा प्रॉडक्षन हे चित्रपट डिस्ट्रि ब्युशन सुद्धा करतात. दिग्दर्शकीय इन्पुट काही नसेल. वितरण हा प्युअर बिझनेस आहे. बाहुबली २ पण त्याने वितरीत केला होता
अरेरे, पैसे आणि वेळ दोन्ही
अरेरे, पैसे आणि वेळ दोन्ही अक्कलखाती जमा करून येत्या शुक्रवारी आमच्या ममं ने लावलेल्या शोला जाणार. तेव्हढीच ममं ला मदत होईल!
काल you tube वर casting couch with Amey and Nipun मध्ये ती येऊन गेल्याचं ओझरतं बघितलं. बकेट लिस्टचं प्रमोशन करायला आली असावी. मधुरीवर खरंच एव्हढी वाईट परिस्थिती आली आहे का की तिने इयत्ता दुसरी ड मधल्या मुलांनी केलेल्या उथळ कार्यक्रमात हजेरी लावावी? कीव आली तिची!
<< असे सर्व सुखद चित्र >> -
<< असे सर्व सुखद चित्र >> --
ताई, आणखी एक-दोन जरी लादी पुसायची कांमं गावली, तरी

माझंबी ' बकेट लिस्ट ' फुल्ल व्हईलच कीं !!!
भाउ इस ब्याक !!!!
भाउ इज ब्याक !!!!
कोणीतरी मला सांगितलं की
कोणीतरी मला सांगितलं की हीरोचं नाव बिपीन आहे (खरं तर हीरोचं नाहीच म्हणा.. सिनेमात हिरॉईनच्या आणि प्रत्यक्षात सिनेमातल्या हीरोच्या बापाचं होतं ते) म्हणून मोठ्या उत्सुकतेने "शानदार" सिनेमा बघितला आणि "अरविंद देसाई की अजीब दास्तान" पेक्षा भिकार चित्रपट बनू शकत नाही या माझ्या आजवरच्या विश्वासाला तडा गेला.
धर्मा प्रॉडक्षन्सचे सिनेमे बघणार्यांना स्युसाईड अॅटेम्प्टचा चार्ज लावून आत टाकायला पाहिजे असं वाटतंय.
बेक्कार सिनेमा. मला अजिबात
बेक्कार सिनेमा. मला अजिबात आवडला नाही, अतिशय वरवरचा.

तो मुलगा एका डान्स रिअॅलिटी शो मधुन पुढे आला आहे (बहुधा पुण्याचाच आहे)
* माधुरी संपुर्ण स्क्रिनभर दिसते. घर इतकं सुखासिन की ओकारी येते इतकं गोड पाहून. एकही इश्यू नाही?
* सईची मैत्रिण झालेली (दापोलित ग्रीन टि शर्ट घातलेली) अत्यंत ओव्हर अॅक्टिंग. सेम केस भावाची. त्याला नक्की राग का आलाय्/आला होता तेच कळलं नाही मला. आपल्या घरी कुणितरी आलं आहे, (माधुरी) जी सांगते की सई देशपांडे माझी डोनर होती तर याला इतकं राग वायला नक्की काय झालं असावं?
* रेस चा प्रसंग अतिशय हास्यास्पद.
* एकूण च तुकडे जोडल्यासारखा वाटला.
* सुमित चा वावर अतिशय सुसह्य , दिसतो पण खूप छान.
* बर्याच प्रसंगात सर्व कलाकारांना माधुरी दिक्षित (एके काळची हिंदितली सुपरस्टार) बरोबर अभिनय करताना अवघडलेपण आल्यासारखं जाणवलं.
* प्रदिप वेलणकर आणि दिलिप प्रभावळकरांना अगदीच वाया घालवलेय.
* काही पात्रं सिनेमात नसती तरी चालली असती अगदी. संपूर्ण सिनेमाभर माधुरी एके माधुरीच दाखवायची होती तर.
* मलेशिया ट्रिप चा प्रसंग आणि सुमित आणि माधुरीचं गाणं अक्षरश: ठिगळ लावल्यासारखं घुसडलं आहे सिनेमात.
* रेशमचं काम तिला दिलेल्या रोलप्रमाणे तिने परफेक्ट केले. मला तरी आवडलं तिचं काम.
बालिशपणा सगळा.
बालिशपणा सगळा.
दक्षिणा +१.भाऊ का रागावलाय हेच कळलं नाही शेवटपर्यंत. बहिण गेल्याचं त्याला जितकं वाईट वाटलेलं दाखवलय तितके आई वडिल बर्यापैकी सावरलेले व boyfriend तर एकदम कुल.दापोलीली तिची एक आठवण सांगतो तेवढच. नंतर एकदाही तिच्याबद्दल बोलताना,तिला आठवुन ईमोशनल होताना दाखवला नाहीये.मधुराच्या निमित्ताने मस्त enjoy करुन घेतो.
भावाच्या ऐवजी त्याला दाखवयला पाहिजे होतं डायरी फेकताना,मधुरा तिची लिस्ट का पुर्ण करतीये म्हणून रागवताना.
मधुरावर आधी रागावलेला तिचा भाऊ नंतर एकदम कसा बदलतो? सई कुठेच दिसत नाहीये म्हणणारा ..अचानक त्याला मधुरामधे सईचा साक्षातकार कसा होतो..!!
सईच्या अगदी सोप्या विशेष ती पुुर्ण करते,घर सांभाळुन करते..तरी तिची मुलगी तिला तू आमच्यापासुन लांब गेलीयेस हे ऐकवते..!
मुलगी स्वतः सतत मोबाईल मधे डोकं घालुन बसलेली असते.मग लांब तर तू आहेस आधीपासुनच.
आणि आजची ईंग्रजाळळेली पिढी दाखवण्याकरता सगळी तरुण मंडळी १ वाक्यात ४ ईंग्रजी शब्द बोलतात.chuck off, ya ya,पपज(पर्पज नाही) of my life..wowwww.. c she is there..
सिनेमा कुठेही बांधून ठेवत
सिनेमा कुठेही बांधून ठेवत नाही.
गाडी बाहेर उभी असताना मारे हजारो गोष्टी सांगते. शिवाय माधुरी म्हणते इतक्यांचं केलं माझं मला झेपणार नाही? तिचं तिला कुठे, फक्त नवरा आणि मुलंच जात होती की, बाकिची धेन्डं होतीच की मागे.
आणि मुलगी अचानक अमेरिकेला का नाही जात म्हणे?
आणि घर प्रभात रोड ला, हा व्हिपी मग आई उगिचच पापड वगैरे का लाटत होती?
मला पण पाठ झालं की आईबाबा बिन तिखटाची भाजी, मुलिला नारळ वाली, नवर्याला बिन नारळाची आणि चौथ्या भांड्यात सर्वाची. मग इतका प्रपंच कशाला? मुलिला वरून नारळ घालून द्यायचा, आणि तिखट घालण्या अगोदर साबासाबुची काढायची. त्यासाठी जवळ जवळ ५ मिनिटाचा प्रसंग घ्यायचा सिनेमात? 
जेवणाच्या दोन्ही प्रसंगात टेबल, ताट वाट्या, आणि चक्क भाज्या सुद्धा सेम
{{{ सिनेमा कुठेही बांधून ठेवत
{{{ सिनेमा कुठेही बांधून ठेवत नाही.}}}
असं लिहू नका हो! करण जोहरनं वाचलं तर पुढच्या वेळी सिनेमा थेटरात दोर्या देखील सप्लाय करेल. आला प्रेक्षक की बांध खुर्चीला.. बघूच कसा उठतोय सिनेमा संपेपर्यंत ... असा प्रकार घडेल.
पापड वगैरे का लाटत होती?..
पापड वगैरे का लाटत होती?.. मराठी फॅमिली म्हणुन ते दाखवलच पाहिजे अस काहीतरी डायरेक्टर्च्या डोक्यात असेल.
माधुरी मला फक्त एक मॉडेल वाटत होती. सामान्य गृहीणी कुठेही वाटली नाही.सतत लहान मोठे होणारे केस, वेव्ज स्टाईलने सेट केलेले, चापुनचोपुन नेसलेली साडी,सतत गोड बोलणे.
सु.रा मलेशिया ला गेल्यावर कॉन्फरन्स कॅन्सल करतो,फक्त नाच गाणी करतो.मग परत आल्यावर माझी काँफरन्स हिट झाली मला प्रमोशन मिळालं सांगतो.पण कुठलया बेसिस वर? काँफरन्स ला तर हा गेलाच नाही ना?
चक्क भाज्या सुद्धा सेम Uhoh
चक्क भाज्या सुद्धा सेम Uhoh मला पण पाठ झालं की आईबाबा बिन तिखटाची भाजी, मुलिला नारळ वाली, नवर्याला बिन नारळाची आणि चौथ्या भांड्यात सर्वाची. मग इतका प्रपंच कशाला? मुलिला वरून नारळ घालून द्यायचा, आणि तिखट घालण्या अगोदर साबासाबुची काढायची. त्यासाठी जवळ जवळ ५ मिनिटाचा प्रसंग घ्यायचा सिनेमात? > वाइट अशाचं वा टतं की ही सुरुवात होती तिच्या जीवनातला एक बिंदू तिथून पुढे ती येते बकेट लिस्ट पूर्ण करते पण शेवटीही तेच. काही वैचारिक वाढ झालीच नाही. फक्त एक डाय् वर्जन लाइफ मध्ये. मग परत मी तुपातली मधातली माशी बनून सुखी आहे. मग एव्ढ्या कथाप्रपंचाचे फलित काय? ती चौक टीत राहते एक प्रकारे बंदी आहे तिला कल्टिव्हेट केले जाते आहे हेच तिला कळत नसेल तर दुसृयाचे जीवन जगून पाहून काय उपयोग.
मोबाईक शिकताना रेस करताना असे दाखवता आले असते. की ती रेस घाबरत सुरू करते पण तिला अचानक आपण अॅक्सिलरेटर वापरू शकतो व स्पीड वाढवू शकतो हे कळते. मग ती एकदम केस मोकळे झटकून हाय स्पीड मध्ये एक राइड घेते सर्व विसरून मागे टाकून. मागे एक आज फिर जीने की तमन्ना है. टाइप गाणे. दिग्दर्शक काय बालवाडीतला आहे कि काय कोण जाणे. आय हॅव हॅड बिगर फन ऑन अ बजाज चेतक !!
छान परिक्षण.
छान परिक्षण.
जेवणाच्या दोन्ही प्रसंगात टेबल, ताट वाट्या, आणि चक्क भाज्या सुद्धा सेम Uhoh मला पण पाठ झालं की आईबाबा बिन तिखटाची भाजी, मुलिला नारळ वाली, नवर्याला बिन नारळाची आणि चौथ्या भांड्यात सर्वाची. मग इतका प्रपंच कशाला? मुलिला वरून नारळ घालून द्यायचा, आणि तिखट घालण्या अगोदर साबासाबुची काढायची. >>>
अश्या युक्त्या तिला कश्या सुचणार? तीला सुपरवुमन दाखवायची असेल ना! सामन्य दाखवायची असती तर लेकीला आज हिच भाजी आहे गपपणे खा, उद्या तुझ्या आवडीची भाजी करेन असे म्हणाली असती. 
आईबाबा बिन तिखटाची भाजी,
आईबाबा बिन तिखटाची भाजी, मुलिला नारळ वाली, नवर्याला बिन नारळाची आणि चौथ्या भांड्यात सर्वाची >>> किती माणसं असतात तिच्या घरी?
, उद्या तुझ्या आवडीची भाजी
, उद्या तुझ्या आवडीची भाजी करेन असे म्हणाली असती. >> मुळात गाजर फ्लावर च्या भाजीत खोबरे कोण घालते बरे....
आ णि असले शिर्मंत लोक्स चांगल्या नाजूक सिरेमिक डिनर सेट मधून खातात. ते बघून मी पण एक घेतला आहे.
हे पितळेच्या ताटात. फोर्स्ड ट्रेडिशनल.
भाऊकाका खूप दिवसांनी आलात
भाऊकाका खूप दिवसांनी आलात व्यंगचित्र मेजवानी घेऊन, मस्तच आहे.
मी अजून बादली यादी बघितला
मी अजून बादली यादी बघितला नाही.......मला हे जणून घ्यायच आहे की यामध्ये रेशम टिपनीस च काय काम आहे???? :O
रे माधुरीची खास मैत्रीण +
रे माधुरीची खास मैत्रीण + ओवरअॅक्टिंग. जी तिला सतत प्रोत्साहन देत असते,तू काही चुकीचं करत नाहियेस हे सांगत असते.
मी अजून बादली यादी बघितला
मी अजून बादली यादी बघितला नाही.......मला हे जणून घ्यायच आहे की यामध्ये रेशम टिपनीस च काय काम आहे???? :O>>+१
मुळात गाजर फ्लावर च्या भाजीत खोबरे कोण घालते बरे....>>>ती भाजी होती? ही भाजी ४ प्रकारे
नाही सोनाली एकच भाजी फक्त ४
नाही सोनाली एकच भाजी फक्त ४ इन्ग्रेडियंट्स बदलून :नामुबा:
मला सर्वात मोठा पडलेला प्रश्न...
सई तिच्या आई वडिलांच्या वर्णनातून एक अत्यंत मॅच्युअर मुलगी म्हणून समोर येते, पण तेच तिच्या बकेट लिस्ट मध्ये इतक्या बालिश इच्छा पाहून ती हिच सई का, जिने २१ वर्ष पुर्ण होण्या अगोदर ऑर्गन डोनेशन चा फॉर्म तर भरलाच शिवाय इतरांना ही उद्युक्त केले
शिट्टी मारायला शिकणे, अरेस्ट होणे, दारू पिऊन झिंगणे, बॉयफ्रेंड् ला किस करणे, हे बकेट लिस्ट मधले आयटम्स असू शकतात?
काहितरी मोठं विश असतं एकच आणि त्यासाठी मा धुरी झटलेली दाखवली असती तरिही ओके होतं.
सिनेमा चालू आहे तो फक्त माधुरिच्या दिसण्यावर आणि तिने मराठीत काम केलं या कौतुका पोटी. करण जोहर ने एक मराठी सिनेमा केला हे आपलं भाग्य असं मानून लोक तो सिनेमा पाहतायत. त्याने त्याचा गल्ला भरतो आहे.
माझ्या मते एकूणात सिनेमा टोटल फेल आहे.
ना कथा, ना गाणी. फक्त तगडी स्टारकास्ट ( खिशाला परवडतेय प्रॉड्क्शन हाऊस ला म्हणून)
थोडक्यात समर्थाघरचे श्वान आहे हा सिनेमा म्हणजे...
Pages