खुर्ची : ५

Submitted by किल्ली on 14 May, 2018 - 06:49

भाग १ ची लिंक : https://www.maayboli.com/node/65732
भाग २ ची लिंक : https://www.maayboli.com/node/65789
भाग ३ ची लिंक: https://www.maayboli.com/node/65842
भाग ४ ची लिंक: https://www.maayboli.com/node/65889
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सगळी उर्जेवर चालणारी उपकरणे बंद असताना खोलीतला छतावरचा पंखा मात्र गरगर फिरत होता…………………………………...........
घड्याळाचा ठोका वाजला, घड्याळ १२ चे टोले देत होतं. तिघांचीही भीतीने गाळण उडाली होती.
ह्या सगळ्या विचित्र वातावरणामुळे जे व्हायचं तेच झालं. मुलं नामजप करायचा विसरले आणि नुसतेच स्तब्ध होऊन खुर्चीकडे आणि मयूरच्या अवताराकडे बघत बसले!! भारल्याप्रमाणे मयूर खुर्चीकडे झपाझप चालत जात होता.
इतर दोघांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण कोणालाही न जुमानता तो खुर्चीवर जाऊन बसला आणि जोरजोरात हसू लागला. ह्या वेळेस त्याच्या दोन्ही हातावरच नव्हे तर चेहेऱ्यावरही ती गुढ नक्षी उमटली होती. एकंदरीत मयूर अत्यंत भयावह दिसत होता. सगळीकडे अंधार आणि धूर ह्यामुळे कोंदट आणि कुबट वास भरून राहिला होता आणि विचारशक्ती कुंठित झाली होती. मयूर खुर्चीत बसून गडगडाटी हसत होता. तो स्वतः च्या नियंत्रणात राहिला नव्हताच. पण अजून त्याने कोणावर आक्रमण केले नव्हते आणि नुकसान पोचवण्याचा प्रयत्नही केला नव्हता.
शैलेश काहीतरी आठवल्यासारखं उठला आणि artwork चा अल्बम घेऊन आला. अल्बम पाहताक्षणी मयूरने हिसकावून घेतला आणि अधाशासारखं प्रत्येक पान निरखून पाहू लागला. अल्बम खोलीत येताच वातावरण अजून गडद झालं आणि कुणाचातरी मुळूमुळू रसण्याचा आवाज मयूरच्या हसण्यात मिसळू लागला. मयूर पूर्णपणे झपाटला गेला होता. त्याने आता अल्बमची पानं फाडायला सुरुवात केली.
मिलिंद भानावर आला. त्याची इच्छाशक्ती जबरदस्त होती. त्याने ओळखले की जी कोणती अमानवीय शक्ती आहे तिने मयूरच्या शरीरात प्रवेश केला आहे. त्याला हेही आठवले की आपण नामजपाने एकमेकांचं रक्षण करणार होतो. पण त्याला काही केल्या हनुमान चालीसेचे शब्द आठवेनात. जणू कोणीतरी मनावर बंधन घातले आहे असे वाटत होते त्याला!! त्याने प्रयत्न सुरु केले पण त्याची इच्छाशक्ती कमी पडत होती आणि त्याचा मेंदू काम करेनासा झाला होता. शैलेशची स्थिती ह्याहून वेगळी नव्हती. त्यालाही आपली प्रत्येक कृती कोणीतरी करवून घेत आहे असं वाटत होतं.
मिलिंदने बोलण्याचा प्रयत्न केला पण शब्द घशातच अडकले होते. आवाजच निघेना! त्याने शैलेशकडे पाहिले. शैलेश तर रडवेला झाला होता. मिलींदच्या मनात सकारात्मक शक्ती आणि नकारात्मक शक्ती ह्या दोघींचं द्वंद्व सुरु झालं होतं. दोघींचा समान प्रभाव असल्यामुळे तो काहीच करू शकत नव्हता. त्याने प्रयत्नपूर्वक स्वतःच्या मनोदेवतेला साद घालायला सुरुवात केली. एका नेमक्या क्षणी सकारात्मक शक्ती प्रभावी ठरली आणि मिलींद राम नाम उच्चारू शकला. त्यामुळे झालं असं की त्याची शक्ती वाढली आणि त्याने मयूररूपी भुताला प्रश्न केला.
“कोण आहेस तू? सोड आमच्या मित्राला! काय बिघडवलंय आम्ही तुझं? आम्ही इथे राहावं अशी तुझी इच्छा नसेल तर आम्ही लगेच निघून जातो पण हे सगळं थांबव.”
हे ऐकताच मयूर भेसूर हसला. अल्बमची फाडलेली पानं त्याने भिरकावुन दिली आणि ओरडला
“का आलात माझ्या जगात? ही नक्षी तुम्ही पाहिली आहे. आता तुमची सुटका नाही”
त्याचे ते कर्कश ओरडणे ऐकून दोघेही दचकले. धीर एकवटून मिलींद हनुमान चालीसा म्हणायला लागला. आता त्याने ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आटोकाट प्रयत्न सुरु केले. मिलींदला शैलेशने सुद्धा साथ द्यायला सुरुवात केली. ह्या मंगल पठणामुळे सावट मावळू लागलं आणि शेवटी सगळं वातावरण पूर्ववत सामान्य झालं. धोका मात्र अजूनही टळला नव्हता. कारण मयूरच्या संपूर्ण शरीरावर ती नक्षी कायम होती. तिथून निघून जाण्यासाठी आता कोणालाच आग्रह करण्याची गरज नव्हती. सगळे पटापट उठून हनुमान चालीसा पठण करतच घराबाहेर पडले. न जाणो, पुढे पुन्हा हल्ला झाला तर, म्हणून त्यांनी हनुमान चालीसेचं पुस्तक सोबत घेतलं होतं. बाहेर सगळीकडे अंधारच होता. मोबाईल फोनच्या बॅटरीचा वापर करत कसाबसे सगळे इमारतीच्या बाहेर जायला निघाले होते.
मयूरने हळूच artwork अल्बम खिशात टाकलेला मात्र कोणाच्याच लक्षात आलं नाही!
खाली पोचल्यानंतर त्यांना टपरीवाला भेटला. तो ह्या तिघांना पाहताच आनंदित झाला. ह्या तिघांनी सगळी इत्थंभूत हकीकत कथन केली. टपरीवाला भैया त्यांना त्याच्या घरी घेऊन गेला. त्याच नाव शाम होतं.
"शाम": तुम्ही जिवंत परत आलात हे तुमचं भाग्य! पण आता सुद्धा काहीही होऊ शकतं. मयूरच्या शरीरावर नक्षी मला पण दिसते आहे. म्हणजे आज नक्कीच कुठलीतरी विशेष तिथी असणार!
“शैलेश”: तुम्हाला काय म्हणायचं आहे ते आम्ही समजलो नाही. ह्या घरात काय झालं होत हे तुम्हाला माहित आहे का? ही दुष्ट शक्ती मयूर च्या मनाचा ताबा घेऊ पाहते आहे. नक्षीचा, घराचा आणि मयूरला पछाडण्याचा काय संबंध आहे? आम्हाला ही नक्षी एका अल्बम मध्ये सुद्धा दिसली. पण आम्ही त्याचा छडा लावू शकलो नाही.
"शाम": ह्या जन्मात तरी ते तुम्हाला जमणार नाही! मी प्रयत्न केला होता पण त्या नक्षीने माझाही घात केला. एक डोळा गमावून बसलो. त्यानंतर आजतागायत त्या घरात पाऊल टाकले नाही.
“शैलेश”: पण तिथे असं घडलं काय होतं की ज्यामुळे ते घर शापित झालं? आम्हाला आधी कोणीच काही कसं बोललं नाही ह्या बाबतीत?
"शाम": “सांगतो. अगदी २-३ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. साधना नावाची एक स्त्री त्या घरात राहत असे. ती मनस्वी जगणारी आणि कलेला प्रमाण मानणारी होती. एकटीच राहताना त्या घरात तिला कविता सुचत, ती लिहून ठेवी आणि गुणगुणत असे. चित्र काढणे हा तिचा छंद होता. त्यातही विविध पानेफुले, प्राणी ह्यांना abstract रूपात कल्पून साधना designs काढत असे. तिचं त्याबाबतीत कसब वाखाणण्याजोगं होतं. माझी designs शस्त्र आहेत असं ती म्हणत असे. आपली कला नावारूपाला यावी असं तिला खूप वाटत असे. अनेक स्वप्ने रंगवली होती तिने!! पण तिचा स्वभाव स्वार्थी होता. तिच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे छळत असे. तिच्या ह्या अवगुणांमुळे ती माणसे जोडू शकली नाही. लोकांच्या मनातून उतरली आणि त्यामुळे कलेला फारसा वाव मिळाला नाही. नंतर हेही कळालं की ही साधना एका काळ्या शक्तीची साधना करत असे. की ज्यायोगे तिला लोकांना वश करता येईल. पण साधना पूर्ण होण्यापूर्वीच साधनाचा त्या घरातल्या आरामखुर्चीवर बसलेल्या अवस्थेत गूढ मृत्यू झाला. जुन्या, जाणत्या लोकांचं असं म्हणणं आहे की, तिचा दुष्ट हेतूमुळे साधना पूर्ण न होता तिच्यावरच उलटली. त्यानंतर तिच्या घरात कोणीच राहायला गेलं नाही. मूळ मालकाने कोणालातरी ती इस्टेट विकून टाकली. लोकांना तिच्या आत्म्याचा वावर जाणवला होता. पण प्रथमच तिने तिचे प्रयोग तुमच्यावर केलेत असं दिसतंय. हे गाव सोडून निघून जा. हाच उपाय आहे.”
“मिलिंद”: “तुमच्यावर तिने कधी हल्ला केला? आणि मयूरचं काय? तो कसा सुटेल ह्यातून?”
"शाम": “तुम्ही तिघे राहायला आल्यावर मला तिचा वावर जाणवला होता. तेव्हाच एकदा तुमच्या नकळत मी एका साधू बाबाने दिलेला अंगारा घेऊन आलो होतो. तो तुमच्या वस्तूवर आणि घरात पाण्यात मिसळून शिंपडला. हे कार्य करताना माझया चेहेऱ्यावर नक्षी उमटली आणि डोळा अधू झाला. पण त्या अंगाऱ्याच्या आणि हनुमान चालीसा पठण ह्या एकत्रित परिणामामुळे तुम्ही आज जिवंत आहात.आपण त्या साधू कडे जाऊ. तेच मयूरच्या सुटकेचा उपाय सांगतील.”
“मिलिंद”: “तुमच्याकडे तो अंगारा शिल्लक आहे का? आपण तो मयूरच्या अंगाला चोळू आणि त्याच्या खिशात मी हनुमान चालीसा ठेवलीये. त्याला काही होणार नाही.”
“पण आता माझ्या खिशात अल्बम आहे पोरा!! माझी शक्ती!! सगळे मरणार!”
असं म्हणून डोळ्यातून आग ओकत मयूर भेसूर हसू लागला !!!
-------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
--------------------------------------------------------------------------------------------------------
(क्रमशः )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान आहे...एका भागात उल्लेख आहे की तो चहाचा टापरिवाला त्यांच्याकडे बघून भयाण हसला मग आता कशी मदत करतोय...अगदी डोळा गमवे पर्यंत...लिंक लागली नाही

धन्यवाद अधराजी! Happy
एका भागात उल्लेख आहे की तो चहाचा टापरिवाला त्यांच्याकडे बघून भयाण हसला मग आता कशी मदत करतोय...अगदी डोळा गमवे पर्यंत...लिंक लागली नाही>>>>>>> पुढच्या भागात समजेल Lol

मस्त! छान गुंतवुन ठेवलस. गावाला गेल्याने आल्यावर आधी तुझी कथा शोधत होते, आता नवीन भाग आल्याने आनंद झाला. लिही अजून, उत्सुकता वाढलीय. द्वादशांगुला, आदिसिद्धी आणी तू मस्त कथा लिहीताय.

धन्यवाद आनंदजी Happy
गावाला गेल्याने आल्यावर आधी तुझी कथा शोधत होते, आता नवीन भाग आल्याने आनंद झाला. लिही अजून, उत्सुकता वाढलीय. द्वादशांगुला, आदिसिद्धी आणी तू मस्त कथा लिहीताय.>>>> अरे वा, खरंच का.. खूप आभार रश्मीजी Happy नक्की लिहीन. तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादामुळे हुरूप वाढला आहे Happy

टपरीवाल्याने डोळा कसा काय गमावला ? आणि तो तर हसत होता ना यांना मग अचानक एकदम मदत कसा काय करायला लागला? थोडा विस्कळीत वाटला हा भाग

खूप प्रतिक्षेत होते खुर्चीच्या पुढल्या भागाच्या! भारी जमलाय हा भाग. पुढे काय होईल उत्सुकता लागलीय. पुभाप्र. Happy

सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील भुत्याभाउ..
सगळं sort होईल पुढच्या भागात..
कृपया धीर धरा.. Happy धन्यवाद Happy

अरे बापरे इकडे कील्ली आणी तिकडे आदीसिद्धी, पळायला जागाच सापडत नाहीये, झपाटुन काढलंय तुमच्या लेखनाने मला हातात सकाळची काँफी आणि मोबाईलवर तुमच लिखाण व्वा.
पुलेशु & पुभाप्र

सगळे भाग वाचले आताच... भारीच लिहीलय.... पुढच्या काय होणार याची उत्सुकता लागलीये..ताई लवकर टाक पुढचा भाग .. Happy