Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162
या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे
"शर्मिष्ठा राऊत"
'नन्दकिशोर चौघुले'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पण चॅनलने सोनाराला पाठवलं
पण चॅनलने सोनाराला पाठवलं असेल का कान टोचायला असं तुमच्या सगळ्यांच्या कमेंटस वरून वाटलं.

<<
नाही, तिच्या २० वर्षापासूनच्या मैत्रीणीला योग्य दिशा द्यायला आणि मेघाला मिसगाइड करायला आली आहे
अगदीच व्हिलन दिसत होती सध्याची रेशम, जो चॅनलचा प्लॅन नसावा आधी पण आता डॅमेज कंट्रोल साठी हर्षदा.. रेशमची इमेज सुधारायला आली आहे बहुदा
काही असो, मला रेशमने तिला दिलेली उत्तरं आवडली.
आता दुसरी वाइल्ड कार्ड कोणी अजुन एक बाई कि फायनली एखादा एलिजिबल बॅचलर येणार ते बघु !
दुसरा वाइल्ड कार्ड स्पर्धक
दुसरा वाइल्ड कार्ड स्पर्धक अनंत जोगांसारखा कोणीतरी रोखठोक-खमका पुरुष आला तरी आवडेल...
अरे त्याच्यावर ध्यानीमनी
अरे त्याच्यावर ध्यानीमनी नसताना अचानक हल्ला झाला म्हणून तो भांबावला.... रेशमला वेळ मिळाला त्यामुळे ती जेंव्हा हर्षदासमोर आली तेंव्हा ठरवून आली होती की काय बोलायच ते! >>> मलाही असेच वाटले. पण राजेशने सांगितलेले ही पटलं मला...!!
हर्षदा राजेशला तू माणूस म्हणून मनातून उतरलास असे म्हणाली. पण हिचे वागणे पहिल्याच दिवशी कसे होते. उगाचच त्या भुषणची जबरदस्तीने पप्पी घेत होती. त्यावेळी नाही का नॅशनल टेलिव्हीजनवर असे करायचे नाही हे वाटत?
बाकी हर्षदा अजिबात आवडली नाही. तिचा बोलण्याचा टोन दादागिरीचाच होता. लवकरच तिचे आणि घरातील बर्याच जणांचे वाजण्याची शक्यता आहे.
एक शक्यता अशीही की हर्षदाच्या रे-रा यांच्यावरील टिप्पणी मुळे मेधा आणि सई तिला आपल्या ग्रुपमध्ये ओढतील. ही सुद्दा त्यांच्याबरोबर जाईल आणि त्यांचीच वाट लावेल.
सई हखा च्या येण्याने थोडी
सई हखा च्या येण्याने थोडी खचल्यासारखी वाटली.
उनाच्या चेहर्यावर असे भाव होते की " अरे ही बया कुठून आणली आता बिबॉ ने आमच्या बोडक्यावर बसवायला"
पुष्कर पण पुरा खचल्यासारखा वाटला.
एकूण घरात नवा स्ट्रॉन्ग दहशतवादी घुसल्याचे भाव आहेत प्रत्येकाच्या चेहर्यावर.
रेशम जेव्हा राजेशला सांगत होती की मी आणि ह खा डोळ्यानी बोलतो, किंवा ती माझी रेप्लिका आहे. एक क्षण मला वाटलं राजेश आता रेशम सोडून तिला धरतो की काय
तिचं नाव अॅड करा वरच्या
तिचं नाव अॅड करा वरच्या लिस्टमध्ये.
हो, ती बरीच उलथापालथ करणार आहे घरात. दोन्ही ग्रूप्स ती तोडणार आहे. रेराच्या ग्रुपची हालत आणखीच खराब होणार आहे.
आजच्या टास्कमध्ये परत पुष्कर, मेघा, ऋतुजा जायबंदी होणार आहेत. रा-सु ला शिक्षा. हखा काय करते पहायला हवंय आता.
काल हखा चे रे रा बरोबरचे
काल हखा चे रे रा बरोबरचे बिंब प्रतीबींब सेशन बघून सर्व संस्कृतीरक्षक सुखाने झोपले असतील..
तेव्हडाच काय तो फायदा.
अन्यथा ते अख्ख सेशन विशेषतः रे रा बरोबरचे म्हणजे मूर्खपणाचा अतीरेक होता. quite misplaced and poorly handled by hakha.
मला तर गंमतच वाटली: स्वतःला रेशमची २० वर्षाची जीवाभावाची मैत्रीण म्हणवणारी आणि स्वतः सिंगल वुमन चा टॅग बाळगणारी एक स्त्री जेव्हा रेशम लाच ऊलट 'डिग्निटी' 'होमे ब्रेकर' वगैरे सुनावते तेव्हा प्रश्ण असा पडतो, की जर अशी व्यक्तीच रेशम ला समजू शकत नसेल तर बाकीच्या ईतर व बाहेरच्यांकडून काय अपेक्षा? हखा लहान मुलांची शाळा घेतल्याचा माज असल्यागत बोलत होती ते खूपच खटकलं. एकही दिवस बि बॉ च्या घरात न राहता कुठल्या आधारवार व हक्काने ती डोस देत होती देव जाणे. [तीच्या तोंडून ऊलट हे ऐकायला आवडलं असतं: रेशम कुणी काहिही म्हणो, माझा तुझ्यावर पूर्ण विशवास आहे.. आणि मी तुझ्या 'बरोबर' आहे.]
तर त्याच वेळी हखा रेशम ला म्हणते- मल तर माहिती आहे गं तू १०० नंबरी सोनं आहेस.. आणि मग राजेश काय 'भंगार' आहे का? आणि रेशम १०० नंबरी सोनं असेल तर निवडू देत ना तिला तिचा दागिना.. शेवटी हखा ने हेच दाखवून दिले की she is nothing more than one of the cultutural protectionist mass mentality.. big boss had given her 'opportunity' to share plus and minus... she used it as her right and power to deliver the monologue!
शेवटी, तुज आहे तुजपाशी आणि मी परग्रहावरून आल्याने माझे विचार कैच्याकै आहेत असे मान्य करून आम्ही सुखाने झोपी गेलो] 
ईथे राजेश ला MCP म्हणायची स्पर्धा आहे..
ऊद्या कुणी असा आक्षेप नोंदवला: स्वतः सींगल वूमन असून जोडीदार कसा हवा असा कार्यक्रम ही बाई कुठल्या तोंडाने चालवते? तर?
असो.
i would rather lose such friend who riding on high dose of money and ego is doubting my character and dignity.
I found HKHA disgusting yesterday over Rajesh and Resham.
राजेश ला तीने जे 'सुनावले' ते तर सर्व मर्यादा गाठण्याचा कळस होता.. ही कुणाची कोण? राजेश च्या बाय्कोचे व कुटूंबाचे अलिखीत वकीलपत्र सर्वांनी घेतलय बहुतेक.. we are not talking about one night stand, infatuation, flirting, or theaterics.. We are talking about two quite grown up individuals who have made their decision and are honest to their decision- whether it is wright or wrong can be debated. But to already pronounce them guilty and accusing them 'on camera' and on mere basis of so called moral code of conduct was quite distrubing to see. वाईट नाहीच वाटले ऊलत भयंकर संताप आला. राजेश ने जे ऊत्तर दिले ते खूपच स्पष्ट व प्रामाणीक होते. ज्यांना राजेश च पटत नाही त्यांना अर्थातच त्याच्या ऊतरात काहीच स्पष्ट दिसणार नाही..
I am in awe of Rajesh for standing up to his thinking and his action. And making no excuse or false premises and not being judgemental either... this truly requires exceptional mental strength!
The only folks who have any right to question him are his immediate family and same goes for Resham.
चीड एकाच गोष्टीची आली. की रेशम राजेश ला हेच सर्व सुनवायचं होत तर ममां नी होस्ट म्हणून करायला हवं होतं.. खेरीज कन्फेशन रूम मध्ये किंवा खाजगीतही करता आले असते. गेला बाजार रेशम ला सिक्रेट रूम अम्ध्ये पाठवून तिला देखिल ईंट्रोस्पेक्शन्/पर्सनल स्पेस संधी देता आली असती नाही का? पण सगळीकडे ईतकी राळ ऊठलीये आणि ईतकी बोंबाबोंब सुरू आहे की अशी शाळा भरवून हखा च्या खांद्यावरून बंदूक्/तोफा डागून निव्वळ लोकक्षोभ रोखण्याचा व कार्यक्रम व स्वतः साठी गुडविल मिळवण्याचा प्रयत्न हा अत्यंत खालच्या दर्जाचा व मानहानीकारक वाटला. हखा चा टोन, देहबोली, व मांडण्याची पध्दत अत्यंत आक्षेपार्ह व अंगावर येणारी होती. रजत शर्मा आपकी अदालत चे थोडे धडे गिरवून आली असती तर आवश्यक संदेश योग्य प्रकारे पोचवता आला असता. A golden opportunity lost!
शेवटी मराठी माणसाची ऊडी फक्त कुंपणापर्यंतच! very unfortunate! speak of 'intolerance'.. we have plenty to deal with!
have lost interest in this program now.. mainly because the script, handling, and projection has lost the 'focus'..
[कालच्या राजेश रेशम च्या बिंब प्रतीबींब सेशन नंतर, आमच्याकडे सौ. कोंढाणा जिंकाल्यागत खूष झाली होती.
Remembered an intersting quote read somewhere re Morals: Never look down on anyone unless you are admiring their shoes!
>>रेशम जेव्हा राजेशला सांगत
>>रेशम जेव्हा राजेशला सांगत होती की मी आणि ह खा डोळ्यानी बोलतो, किंवा ती माझी रेप्लिका आहे. एक क्षण मला वाटलं राजेश आता रेशम सोडून तिला धरतो की काय


but hakhaa proved it wrong in just 15 minutes!! So Rajesh knows he has made the right choice.
योग तुझी पोस्ट इतकी आवडली की
योग तुझी पोस्ट इतकी आवडली की बस. फक्त मनात विचार होते माझ्या, पण तुझ्या इतके सुस्पष्ट नव्हते आणि इथे तर शब्दात मांडताच नसते आले.
>> have lost interest in this program now.. >> प्लिज तु बघणं थांबवू नको, तुझ्या पोस्ट्स वाचायला मजा येते आणि मला आवडतात.
हर्षदा खानविलकर ने पावर ट्रिप केली हे नक्की, आणि आक्कासाहेबांचे बेअरिंग अजूनही सोडले नाहिये.
सतत डोळे वटारून "कळ्ळं?" मोड मध्येच..
सई वगैरे तर तिला घाबरण्यापेक्षा तिला कंटाळतील असे वाटतेय. ( भिक नको पण कुत्रा आवर च्या चालित)
रेशम ला सांगत होती की तुला आणि मला फिनालेला उभं रहायचं आहे, हा कसला फाजिल आत्मविश्वास?
Never look down on anyone
Never look down on anyone unless you are admiring their shoes! >> एकच नंबर
रच्याकने: बि बॉ च्या घरात
रच्याकने: बि बॉ च्या घरात एंट्री घेतलेली हखा आणी नंतर बिंब प्रतिबींब मध्ये दिसलेली हखा या एकच व्यक्ती होत्या यावर विश्वास बसला नाही.
ईथे 'दिसतं' तसच असतं यात सगळे पुरूष नक्कीच फिट्ट बसतात..
MCP म्हणजे काय?
MCP म्हणजे काय?
MCP म्हणजे काय? >> Male
MCP म्हणजे काय? >> Male Chauvinist Pig >> पुरूषप्रधान संस्कृतीचा पुरस्कर्ता...
मला तर काल रेशम जाम आवडली..
मला तर काल रेशम जाम आवडली.. ऊर्मट वाटत असेल ईतरांना.. but she is never seen back stabbing or bitching.. thats for Megha, Sai, and Aau..

She can be a good action movie lead character..! she carries that body language really well.
Same with Rutuja: suprised package! quite in control of what she wants and how she wants it.. brilliant find!
पंचिंग बॅग खेळात भूषण मारतोय का ती बॅग त्याला मागे ढकलते आहे कळत नव्हते.. लोकल मध्ये चढता ऊतरताना देखिल लोक जास्त हात मारत असतील.
आस्ताद ची खरेच हवेची बॅग झालीये.. चांगली धडधाकट माणसे धुरांड्याच्या नादात आपली तब्येत गमावून बसतात तेव्हा बघायला त्रास होतो.
स्मिता पुन्हा एकदा कंफ्यूज्ड वाटली.. एकदा स्वतःला तर कधी दुसर्यांना मारत होती.
ऋतूजा चे मारणे बघून काचेपलिकडे पब्लिक घाबरले होते.. मराठी चित्रपट सॄष्टीला सनी देओल सापडलाय!
बाकींच्यांचे पाहिले नाही..
सई ने बहुतेक निव्वळ तोंडाची वाफ दवडली.. राजेश रेशम किती चीप आहेत यावर बराच वेळ खर्ची केला तिने. comes across as typical so called high class spoiled and self obsessed girl.. who belives that she is center of attraction! typical! won't last long in Big Boss..
ऊर्मट वाटत असेल ईतरांना.. but
ऊर्मट वाटत असेल ईतरांना.. but she is never seen back stabbing or bitching.. thats for Megha, Sai, and Aau.. >> हे मात्र बरोबर आहे
हखा आणि तिचे सेशन मुळीच पटले
हखा आणि तिचे सेशन मुळीच पटले नाही. ही कोण लागून गेली इतरांना ऐकवणारी, मॉरल धडे देणारी, हिलाच का तो अधिकार असंच फीलिंग आले. तिला असा येताक्षणी अप्पर हँड का दिला?
या सगळ्यात स्मिताची काय स्ट्रॅटेजी सुरु आहे त्याक्डे लोकांचे दुर्लक्ष झाले का? तिने काल मेघा- पुष्कर - सई शी तहाची बोलणी सुरु केली आहेत ती फेक असावी का? तिला रेरा ग्रुप ने पंचिंग बॅग मधे का टार्गेट केले? तिचा फोटो लावला पण तिला शिव्या घातल्या नाहीत त्या कुणी. ते दाखवायला होतं का फक्त? पण या सगळ्या डावांची गरज च नाही आहे. बिबॉची टास्क मधे ग्रुप विभागणी बघता रेरा ग्रुप ला ऑल्रेडी प्रचंड फेवर करतात ते स्पष्ट आहे.
राजेश आणि रेशम ला जाब विचारणे - तेही कोण कुठल्या हखाकडून करून घेणे हे मॉरल पोलिसिंग आणि स्लिपरी स्लोप आहे. झेपले नाही. ठीक आहे लोकांना त्यांचे अफेअर आवडले नाही तर असे हखाच्या पदरामागे लपून का सांगायचे? सांगू देत की ममांना. नाहेतर बिबॉने स्वतः कन्व्हे करावे ! राजेश फाफलला पण रेशमने उत्तर दिले ते आवडले. तिच्या बोलण्यावरून पुन्हा एकदा हे प्रकरण फेक चॅनल पुरस्कृत आहे असेच वाटले.
सई- मेघा ला ते ग्रिलिंग बघून हसू येत होते त्यामुळे हखा त्यांना स्वतःला बोलली तेव्हा त्यांनी ते हसून सोडुन दिले. कपड्यावरची कमेन्ट पण टोटली अनकॉल्ड फॉर!
हे सगळे नाटक झाल्यावर पुन्हा बिबॉ ने रेरा च्या ग्रुप मधे तिचा भरणा केला असेल तर जोक च आहे सगळा.
उना ने हखाला कोल्ड लूक दिला एकदम
The only folks who have any
The only folks who have any right to question him are his immediate family and same goes for Resham. >>>>>
सगळीकडे ईतकी राळ ऊठलीये आणि ईतकी बोंबाबोंब सुरू आहे की अशी शाळा भरवून हखा च्या खांद्यावरून बंदूक्/तोफा डागून निव्वळ लोकक्षोभ रोखण्याचा व कार्यक्रम व स्वतः साठी गुडविल मिळवण्याचा प्रयत्न हा अत्यंत खालच्या दर्जाचा व मानहानीकारक वाटला. हखा चा टोन, देहबोली, व मांडण्याची पध्दत अत्यंत आक्षेपार्ह व अंगावर येणारी होती. >>>> या सगळ्याला +१११
योग, प्रतिसाद आवडलाच.
योग, प्रतिसाद आवडलाच.
रा रे त्यांच्या जबाबदारीवर जे करतायत त्यावर सांस्कृतिक पोलिसिंग अजिबात आवडलं नाही. मांजरेकर टीम ला काहीही झेपत नाहीये. मेंगळट लोक आहेत बिग बॉस.
मैत्रेयी +1
मैत्रेयी +1
हखा च्या विरुद्ध बोललेले खपवून घेणार नाही ती. भयंकर वाटली मला. आणि सिनियर कॉम्प्लेक्स आहेच.
Juniors ला दाब दाब दाबेल ही बया.
योग, प्रतिसाद आवडलाच.....अगदी
योग, प्रतिसाद आवडलाच.....अगदी आमच्या मनातले बोललात. मला असे कधीच लिहीता आले नसते.
हे पोस्ट वाचून ५ मते राजेशला दिली.
अरे चिल्ल गाइज!
अरे चिल्ल गाइज!
तुम्हाला खरच असे वाटतेय का की हर्षदा स्वताच्या अखत्यारीत हे सगळे करतीय आणि रारे ला सुनावतीय?
(जरा हिंदी बिग बॉसचे काही सीझन बघून या बरे!)
ममांनी सांगणे म्हणजे तो चॅनेलचा ऑफिशियल स्टॅंड होईल.... जो कदाचित पुढेमागे अडचणीचा पण ठरु शकतो!
आणि मी मागे पण इथे लिहलय बहुतेक की एखादी गोष्ट ममांनी सांगणे आणि तीच गोष्ट घरातल्या एखाद्या सदस्याने बोलून दाखवणे यात फरक आहे.... आपापसात भांडणे लावल्याने (परत एकदा सलमान बेमालूमपणे करायचा हे) जास्त मसाला मिळतो!
तेंव्हा हर्षदावर खार खाण्यापेक्षा हे ट्वीस्ट एंजॉय करा!
मला रारे बाबत काही बोलावसं
मला रारे बाबत काही बोलावसं वाटत नाही आणि बघाव तर अज्जिब्बात वाट्त नाही पण हखा ज्या प्रकारे त्यांना ग्रिल करत होती ते नाही आवडल..
राच माहिती नाही तो मला निर्बुद्ध आणि बाईलवेडा वाटतो कधी कधी पण रे स्वतःच्या चुका जेवढ्या आत्मविश्वासाने त्या बरोबरच आहे अस म्हणते त्यावर भगवान बचाये..
येणार्या भागात हखा ज्या पद्धतीने ऋतुजाला ओरडली त्यावरुन ऋतुजाच्या पंचिग बॅगवर अजुन एक फोटो लवकरच जाऊन बसेल असं दिसतय.
मुळात या सो कॉल्ड सिनिअर्सला तिने सतत त्यांना मान द्यावा (अगदी त्या जुईलापन) आणि छान छाण बोलावं, स्वतःच मत पटकन बोलुन दाखवू नए,वा रिअॅक्ट होऊ नये (आठवा पंचिंग बॅग टास्क मधे जुईचे बोलणे) अशी अपेक्षा का असते ते कळेना...
शॉर्ट्स मधे उनाला इतक्या पोटतिडकिने रडताना पाहुन मला फार वाईट वाटल मात्र..
त्या कितीही फट्कळ असो पण एखाद्याचं वाईट पाहवत नाही त्यांना..
रेड्या आणि रड्याला शिक्षा केली हे बरच झालं..
डी जे ने जो task व्हिडिओ
डी जे ने जो task व्हिडिओ टाकलाय त्यात हर्षदा ला बाजूला ठेवायचं होतं की किंवा पुष्कर grp द्यायचा होता, bb कायम अनफेअर असतात, आता तो रा होणार कॅप्टन.
बिग बॉस अनफेअर ग्रुप्स करतात
बिग बॉस अनफेअर ग्रुप्स करतात, विचित्र गेम्स ठेवतात. डिव्हाईड अॅन्ड रूल करतात.
but people understand, this is all about Big Boss. if there is nothing of anything said above, then you and i wont be enjoying this reality show and filling 2 -2 bulletin boards here within 1 month's time.
अॅग्री?
डी जे ने जो task व्हिडिओ
डी जे ने जो task व्हिडिओ टाकलाय त्यात हर्षदा ला बाजूला ठेवायचं होतं की किंवा पुष्कर grp द्यायचा होता, bb कायम अनफेअर असतात, आता तो रा होणार कॅप्टन.>> कॅप्टनसीच्या टास्क मधे सपोर्टर्स असतात गं.. ग्रुप नाही पाडत बिबॉ त्यात.. आणि कॅप्टनसीकरता पुष्करबरोबर सुशांत उभा आहे.. कमाल म्हणजे आस्ताद पुष्करचा सपोर्टर आहे.. मनापासुन सपोर्ट करतोय कि हि पन त्याची पुढची स्ट्रॅटेजी आहे ते न कळे.. विडिओ मधे तरी तो व्यवस्थित मन लावून पाठिंबा देतोय..

पुष्कर परत इंज्युअर्ड झालेला दिसतोय..
डॉक्टरांच भविष्य अंधारात आहे खरच.. लोकं सतत मारहाण करतात..
>>राच माहिती नाही तो मला
>>राच माहिती नाही तो मला निर्बुद्ध आणि बाईलवेडा वाटतो
बहुतांशी स्त्री कं चे राजेश बद्दल फारच टोकाचे मत दिसते... काही अपवाद वगळता.. आपणही जजमेंटल होतोय का? वेगळ्या बाफ चा विषय ठरेल, तेव्हा ईथे थांबतो.
हेच ते...
[टाळी एका हाताने वाजत नाही वगैरे वगैरे.. ]
असो. अजून एका 'काकू' बाईला घरात का आणले बिग बॉस? निषेध! पेक्षा एखादी एलीजीबल, सुंदर, डॅशिंग (किती माफक अपेक्षा आहेत बघा) तरूणी आणायला हवी होतीत. सगळे 'डायनामिक्स' रातोरात बदलतील.
तसेच एखादा हँडसम हंक च्या येण्याने देखिल सर्व डायनामिक्स बदलतील तर ही अजून एक संधी ऊपलब्ध आहे.
सर्व छान सुरू असताना हखा च्या निमित्ताने बि बॉ ने अक्षरशः आगीवर गरम पाणी ओतले.. आता वरील दोघांना आणून पापक्षालन करावे.
हरी ओम!..
रच्याकने: हखा च्या प्रवचनावर आऊं नी निव्वळ माशी ऊडवल्याचा जो हावभाव केला तो लय भारी होता. अनुल्लेखाने मारणे किंवा थोबाड फोडणे (धमकी) ही दोन अस्त्रे त्या मस्त वापरतात. आता मात्रा हखा च्या येण्याने त्यांना ईकडे आड तिकडे विहीर असे होणारे. एकंदरीत हखा चे प्रोजेक्शन बघता रेशम ही नरम वाटायला लागेल बहुदा थोडेच दिवसात.
>>तसेच एखादा हँडसम हंक च्या
>>तसेच एखादा हँडसम हंक च्या येण्याने देखिल सर्व डायनामिक्स बदलतील
आयेगा आयेगा.... वोहभी आयेगा!
सब्र रख्ख!
पुष्कर किती लढतोय!! एकतर
पुष्कर किती लढतोय!! एकतर दिवसभर न आवडणार्या लोकांबरोबर रहायचे, त्यांची तोंडे बघायची. अन त्याबरोबर त्याच्या गटातल्या बायका सतत दुसर्यांविषयी नकारात्मक बोलणार्या. हा मानसीक लढा आहेच. सतत +ve ऊर्जा कुठून आणणार? दुसरे म्हणजे प्रत्येक कार्याच्या वेळी २-३ बैल त्याच्यावर तुटून पडतात. आता हखा आली ती पण विरुद्ध गटात आणि मानसीक खच्चीकरण करण्यात पटाईत. एखाद्या मजबूत माणसाला पाठवा त्याच्या गटात, मगच कार्य दोन बरोबरीच्या गटात झाले असे म्हणता येईल.
मांजरेकरांनी आत्तापर्यंत रेशम
मांजरेकरांनी आत्तापर्यंत रेशम-राजेश जोडिला त्यांचे चाळे थांबवायला दिलेल्या हिंट्स आणि कालचा हर्षदाचा बिंब-प्रतिबिंब एपिसोड ला मी एकाच वाक्यात डिस्क्राय्ब करेन - सौ सोनार कि एक लोहार कि...
आय्ला, त्या रेशमचं वागणं लोकांना कोणत्या अँगलेने डिग्नीफाय्ड वाटतं? काल तिने केलेल्या आर्ग्युमेंटवरुन मला तर ती स्मितापेक्षा बावळट वाटली. सिंगल मदर, रेझ्ड टु किड्स विदाउट एनिबडिज सपोर्ट वगैरे वगैरे. अरे, त्याचा संबंध काय इथे, ते सगळं केलं म्हणुन नॅशनल टिवीवर स्वैराचार करायला तुम्ही मोकळे? काल हर्षदाने तिला डिग्निटीची व्याख्या विचारायला हवी होती. पुरुषांच्या डॉर्ममधे एका (विवाहित?) परपुरुषाबरोबर बेड शेअर करणं हे तिच्या डिग्निटीत बसंत असेल तर शिवाजी पार्कात तिचा जाहिर सत्कार करण्यात यावा...
राजेशने तर तत-फफ करायचं बाकि ठेवलेलं. अगदिच भिगी बिल्ली झालेली त्याची ग्रिलिंग नंतर...
आपल्याला तर कालची खानविलकरगिरी आवडली. विकेंडच्या डावाची ती नांदि ठरावी हि अपेक्षा...
>> ममांनी सांगणे म्हणजे तो
>> ममांनी सांगणे म्हणजे तो चॅनेलचा ऑफिशियल स्टॅंड होईल.... जो कदाचित पुढेमागे अडचणीचा पण ठरु शकतो!
कुणासाठी? काही नीट कळले नाही...
>>आणि मी मागे पण इथे लिहलय बहुतेक की एखादी गोष्ट ममांनी सांगणे आणि तीच गोष्ट घरातल्या एखाद्या सदस्याने बोलून दाखवणे यात फरक आहे....
हखा 'घरातील' कधीपासून झाली? कैच्याकै!
अगदी घरातील सदस्यांना एकमेका समोर आणून असे काही केले असते तरी चालले असते की. असेही एकमेका पाठीमागे शिव्या शाप सुरूच असतात. रे रा वगळता बाकीच्या सर्वांना हखा ने जवळ जवळ स्ट्रॅटेजिक टीप्स दिल्या की.. ममां ना त्यात नक्कीच देता आल्या असत्या शनी रवि च्या भागात?
थत्ते मस्त बोलायचे कॅमेरा समोर.. बाकीचे कुणी विशेष बोलताना दिसत नाही... खरे तर थत्त्यांनी कॅमेराचा वापर अतीशय चालाखपणे केला होता.. पण ह्या मठ्ठ कं ने विशेष काही शिकले नाही त्यांच्येकडून. फक्त गॉसिप, आणि चढा ओढीत मग्न असतात.. एकंदरीत सर्वांचा दिनक्रम काहिसा असा चालतो (जो दाखवतात तो तरी):
सई: माझी अवस्था, पुष्की ची अवस्था आणि ईतर सर्वांची कटकट
मेघा: मी आणि फक्त मी
जुई: मी आणि दादा लोक
स्मिता: नुसत्याच फेर्या
रेशमः मी आणि कॉफी
आऊ: मी सोडून ईतर सर्वांच्या बद्दल बडबड
ॠतूजा: कामाशी काम
भूषणः ऊगाच नाक्यावर टाईमपास
आस्तादः स्टोअर रूम किंवा स्मोक रूम
सुशांतः रडीचा डाव
पुष्करः गृहपाठ, पाढे, पर्वचा..
राजेशः प्रोटीन, कॉफी आणि रेशम
सगळं केलं म्हणुन नॅशनल टिवीवर
सगळं केलं म्हणुन नॅशनल टिवीवर स्वैराचार करायला तुम्ही मोकळे?>>>>> बरोबर तुमच... आता बेड सिनच बाकी आहे दाखवायचा तो पण दाखवा म्हणजे बोलायला मोकळे मराठी पाऊल पडते पुढे
Pages