बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिल... लाईफ मजेत घ्या! हे शिकवायची खरतर गरज आहे असंच दिसतंय मला! Wink Proud >> रे रा टीम फॅन्स ना त्यंच्या अ‍ॅटीट्युड ची लागण झालेली दिसतेय . स्वतःला लैच भारी समजायेत आणि इतरांना ...
जाऊ द्या , अशा लोकांशी वाद वाढवण्यात अर्थ नाही.

शो मधे , अता लवकर या दांडगोबांची आणि जुई बाळाची गच्छंती झालेली बघायला आवडेल.

रा ने जेव्हा विचारलेलं भूषणला उचलू का रे ला तेव्हा भूषण तुमचीच प्रॉपर्टी असं म्हणाला तेव्हा रा ला तो शब्द खटकला नाही, त्याने एन्जॉय केलं ते. मला राग आला होता, त्यामुळे आदर वगैरे रा ला किती कोणाबद्दल आहे हे प्रश्नचिन्हं आहे आणि म मां ने पण दोघांची या बद्दल शाळा नाही घेतली.

सुशांत आणि राजेश खरंच एमसीपीज आहेत. सुशांत मेघा सतत ट्यँव ट्यँव करते म्हणून कावतो, पण राजा तू सतत भोकाड पसरतो आणि भ्यां भ्यां करत रडतोस त्याचं काय? तुला त्याबद्दल बॉक्स करावं का?

मेघानं उलट त्यांचा हा वीकपॉइंट ओळखून अजून बोलून त्यांना इरिटेट करायला पाहिजे. सतत त्यांच्याजवळ जाऊन बकबक सुरू करायची. पळापळ झालीच पाहिजे त्यांची. इतकं पीडायचं की त्यांना दहशतच बसली पाहिजे. स्वीट रिव्हेंज!

राजेश - सुशांत अति माजोरडे आहेत.. शिक्षा झाल्यावरसुद्धा जणू सत्याग्रह केल्याबद्दलच शिक्षा झालीय असा आविर्भाव होता. नाक्यावरचा मवालीपणा ठासून भरलाय अंगात

सई कदाचित retired hurt होईल आज.

दक्षे हर्षदा चा फोटो छान लावला आहेस. Happy
काल ॠतुजा ला लागलं.. पुष्की तिला जा घुसुन कर काम तमाम फुलांच म्हटल्यावर तिने उडी घेतली तीच तिला नडली. पण त्या दोघांना छान शिक्षा दिली बि बॉ ने. Happy काल कळलं मेघा ला सुशांत कसा आहे तो.. माझा मित्र आहे म्हणत होती.

>>सई कदाचित retired hurt होईल आज.

हो का? श्या!
बिग बॉसच्या घरात सध्याच्या घडीला सगळ्यात आवडती स्पर्धक होती माझी ती!
बाहेर गेली तर परत Wild card entry मधून यायला पाहिजेल!
कालचा भाग बघितला नाही अजून so no comments!

सगळ्यांनी जिंकण्यासाठीच खेळायचं आहे . तसच अपेक्षित आहे . इथे गेम मध्ये कोणी कोणाचं मित्र मैत्रीण नाहीये . पण हि गोष्ट फक्त आणि फक्त मेघालाच कळलेय . बाकीचे सगळे या बाबतीत डोकं वापरात नाहीयेत ( किव्वा बिनडोक आहेत ) म्हणून सगळे फुल घुसून गेम खेळतात . अरे बाबानो तस खेळायचं नसत. गेम मध्ये दिसलं तर पाहिजे पण इतकं नाही कि इन्जुर्ड होऊ आणि पुढच्या राहिलेल्या भागात भागच घेऊ शकणार नाही . स्वतःची काळजी घेत घेत / स्वतःला सांभाळत सांभाळत बेता बेताने कस खेळायचं ते मेघाला बरोबर समजलंय म्हणून या पहिल्या सिझन ची विनर मेघाच असणार आहे Happy

मेघा आणि पुष्कर अजून झुंज मराठमोळी मधून बाहेर पडले नाहीयेत अस वाटतं Proud .
राजेश काल ह खा बद्दल राग व्यक्त करताना दुर्योधन सारखा मांड्या थोपटत होता.

हिंसा , हिंसा आणि फक्त हिंसा Uhoh
सगळे सांड मिळून पुष्करचा खून पाडणार एक दिवस Sad , अतिशय वाइट वाटलं पुष्कीसाठी, immediate eviction was needed, ही कसली फालतु शिक्षा दिली आहे दोघांना , २ लोकांचे हात, एकीची पाठ फोडली आहे यांनी, हाफ मर्डर चार्जेस लावा !
आस्ताद असून नसल्या सारखा आहे बाकी, तो या टिममधे का येतो त्यानेच सांगितलय ना त्या डिव्हाइड अँड रुल पॉलिसीच्या दिबशी,
डबल ढोलकी म्हणजे काय हे आता दाखवतोच असं तोच म्हंटलाय, बेसिकली तिकडे जाऊन स्वखुषीने राजेशकडून लॉक करून घ्ययचे !
पुष्कर एकदा चुकून म्हणून गेला १ विरुध्द ११ आहेत, बिचार्या मेघा ऋतुजा झटत होत्या त्याच्यासाठी, अतिशय लॉयल फ्रेण्ड्स आहेत त्या.
दोष सगळा बिग बॉसचा.. आधी अशी हिंसात्मक टास्क्स द्यायची आणि मग हिंसा केली म्हणून ओरडायचं .
सईची लाथ लागली म्हणून ड्रामा आणि इथे हे लोक डायरेक्ट हातपाय तोडतात, फरफटवतायेत.
समोरच्या टिममधे आहेतच पैलवान, इथल्या किंवा सोशल मिडीयावरच्या कॉमेंट्स वाचून बिग बॉस शब्दही चोरतात आपले, कुस्तीचा आखाडा नाही वगैरे !
अत्यंत थर्ड क्लास , लो मेंटॅलिटी माणस आहेत सुशान्त, राजेश आणि हो भुषणही, शिक्षेचं काहीच नाही त्यांना, भुषण अत्यंत चीप बोलत होता इन्ज्युरीज झालेल्या सदस्यांच्या फिजिकल इन्ज्युरीज बद्दल चेष्टा करून !
स्वतः सुशान्त खेकसा खेकशी करतो आउ आणि सगळ्यांवरच आणि मेघाला ट्यँव ट्यॅम्व म्हणतो, टिपिकल MCP.
या माणसांना जास्त बोलणार्या बायका जाऊच दे, मुळात बायकांना आवाज अस्लेलाच आवडत नाही, सेक्स अँड द सिटी मधे मिरँडा म्हणते हे , जे अगदी युनुव्हर्सली अ‍ॅप्लिकेबल आहे !
मेघाच्या बोलण्याने इरिटेट होतात तर मेघाने अजुनच केले पाहिजे बडबड :), मुळात या जनावराला मित्रं म्हणणे बन्द केले पाहिजे.
यातल्या कोणी मुली बाहेर गेल्यावर पोलिस कंप्लेंट केली पाहिजे यांच्या विरुध्द , बायकांना अतिशय वाइट् प्रकारे टच करतात, हाडं तोडतात, molestation charges लागले पाहिजेत त्यांच्याविरुद्ध.
हर्षदाही कमी नाही, पुष्करच्या पोटावरच बस्स्ली, पुष्करनेही हे चार्जेस लावले पाहिजेत पण बिचारा परफेक्ट जंट्ल्मॅन, तोच हर्षदाला लागल असेल तर सॉरी म्हंटला.
बाकी हर्षदाने काल इतरांची शाळा नाही घेतली का ?
त्या राजेशला आधीच कापीन फोडीन भाषा जमते, आता तर काय हर्षदानेच खोडी काढली, म्हणून हा म्हणे हिचा माज उतरवणार,
त्याचा अर्थ काय होता माहित नाही , he sounded like a rapist Uhoh
फक्त मेघा आणि ऋतुजा कित्ती हुषार लग्गेच सकाळी मेघा म्हंटली एक बाई या घरात आपले मोरल्स डाउन करायला आली आहे , मेघाने माझा किबोर्ड वाचला का Proud
बाकी पूर्ण प्रेडीक्टेबल भंपक बाई निघाली हर्षदा.
सई खूप फ्रस्ट्रेटेड दिसतेय, आय जस्ट होप तिला किंवा ऋतुजाला अनफिट म्हणून काढणार नाहीत Sad
जुई एलिमिनेट झाल्याची चर्चा दिसतेय सोशल मिडीयावर पण मला वाटत नाही हर्षदा आल्यावर जुई आस्तादला इतक्यात काढतील !
वीकेन्डला मांजरेकरला सुध्दा काय यांची शाळा वगैरे घ्यायला जमेल असं वाटत नाही, हे लोक त्यालाच शब्दात पकडतील, मांजरेकरनेच सांगितल होतं ना नो सिंपथी, जे खरच आहे , मग काय आहेतच फोडायला हे जंगली लोक !

https://youtu.be/Sp5gdqZNQPE
आरती सोलंकीने फेक लव्ह स्टोरी बद्दल सांगितलय , जुईनेही आज सांगितलच हर्षदा ताईच्या कंपुत गेल्यावर !
तसा राजेशच म्हंटला पहिल्याच आठवड्यात रेशमला , चल खोटं अफेअर करु, पब्लिकला बघायला आवडतं !
लोक उगीच पोलिस केस अन काय एनर्जी घालवातात Proud

त्या राजेशला आधीच कापीन फोडीन भाषा जमते, आता तर काय हर्षदानेच खोडी काढली, म्हणून हा म्हणे हिचा माज उतरवणार,
त्याचा अर्थ काय होता माहित नाही , he sounded like a rapist Uhoh>> डिजे, मलापन डिट्टो फिलींग आलं.. किती घाणेरडा टोन होता त्याचा..
कधी कधी वाटते या मे, स, पु, ऋ, उना टिमने जुईसारखं मला लागलं मला लागलं अस म्हणत त्याच भांडवल करायला पाहिजे..
दोन चांगले शब्द तर बोला वर ती जुई कशी बोलत होती टास्क संपल्यावर उना आणि पुष्करशी..
या लोकांना माणुसकी नाही म्हणतात हे रे रा आणि स्वतः जेव्हा या लोकांना लागत वगैरे तर आसपासपन फिरकत नाही..

मेघा खुप खुप बोलते इथवर ठिक पण म्हणुन तिने ते बोलु नए असे दुसरे कंटेस्टंट म्हणतात ते मला पटत नाही अज्जिब्बात..तिचं तोंड ती बोलेल ना..

आणि तो सुशांत किती घाणेरडा ओरडतो लोकांवर.. उनाने कानशीलात भडकवायला पाहीजे होती त्याच्या..युझलेस लेकाचा..
आणि म्हणे हा राजकारणात घुसणार..आणि लोकं लगे याला निवडून पन देणार नक्कीच.. निकड आहे आपल्याला तशी..

फार कोत्या मेंट्यालिटीचे लोकं आहे राजेश आणि सुशांत..
भूषण बरा वाटायला लागतो आणि दुसर्‍याच दिवशी काहीतरी बिनडोक सारखं रिअ‍ॅक्ट करुन %$# देतो..

स्मिता त्यामानाने फार दिसली नाही काल.. ती नक्कीच तिच्या स्ट्रॅटेजीवर काम करत असणार..असु दे..या लोकांशी सख्य केल्यामुळे ती स्ट्राँग प्लेयर असुन बिनकामी शिव्या देतय पब्लिक तिला..

बाकी काल ट्रेलर मधे पाहिलं ते एपिसोड मधुन कापलं का?
ऋतुजाला हखा ओरडते कि राग नको काढू, टास्क खेळ म्हणुन.. आस्ताद पुष्करला उठ उठ म्हणतो ते नाही दिसलं..
देव करो अन त्या आस्तादचा हा प्लॅन नसो.. तसा जर सरतेशेवटी दाखवला ना तर आईशप्पथ लोकं बाहेर येऊन पन जी छी थू करेल त्याची त्याला माप राहणार नाही..

मलाहि काल पुष्करबद्दल खुप वाईट वाटत होतं अरे त्याला खेळुच देत न्हवते झोपवुनच ठेवलं. आऊंना किती रडु येत होतं त्याला लागलय ते पाहुन.. खरच तो भुषण चीप बोलत होता जखमी झालेल्या ॠ अन सई बद्दल... मला तो पहिल्या दिवसापासुनच नाहि आवडलाय... शेपुट आहे त्या कंपुच

आरती सोलंकीने फेक लव्ह स्टोरी बद्दल सांगितलय>> हो हे तर एपिसोडमधे दाखवलच ना.. त्या दोघांनी तिला कॅप्टनरुममधे नेऊन विचारलं कि आम्ही कसे दिसतोय, लोकांना आवडतय का? पटतय का? आरतीने ते उडवून लावल्यावर रा रेला म्हणालापन कि अरे लोकं इंटरेस्ट नाही घेत आहे, चर्चा नाही करताय म्हणजे आपली मेहनत कमी पडतेय..

बाथरूम मध्ये मेघा सईशी बोलताना रेशम ला "कुत्री" म्हणाली . सई का रडते ? हा गेम आहे . तो आपापल्या आकलनानुसार सगळे खेळतात. ज्यांचं ज्यांचं गेम समजायला चुकलंय त्यांना शिक्षा मिळाली . तेव्हा सर्व सदस्यनों मेघासारखं स्वतःला वाचवत युक्तीने खेळा आणि इतरांना कुत्री / थेरडा म्हणून शाब्दिक हिंसा करायला हरकत नसावी . इंटेलेजींशीया मध्ये राजेशला जास्त उत्तर माहिती होती असं दिसलं . सई -मेघा आणि उना इतर सदस्यांबद्दल फार पाठीमागून बोलतात . मेघा म्हणते "घेईन एखादा रॉड आणि फ़ोडुनच टाकीन एकेकाचं डोकं ". थोडक्यात शाब्दिक हिंसा बिग बॉस च्या घरात चालते . त्याबातीत काही शिक्षा होत नाही . फक्त शारीरिक हिंसा ( सद्स्यांच म्हणण आहे ते बचाव करताहेत पण नियमानुसार ती शारीरिक हिंसा ठरते ) त्यामुळे ती करू नये हे आता इतक्या दिवसांनी इतर सदस्यांना समजायला पाहिजे Happy

त्या राजेशला आधीच कापीन फोडीन भाषा जमते, आता तर काय हर्षदानेच खोडी काढली, म्हणून हा म्हणे हिचा माज उतरवणार,
त्याचा अर्थ काय होता माहित नाही , he sounded like a rapist Uhoh>> डिजे, मलापन डिट्टो फिलींग आलं.. किती घाणेरडा टोन होता त्याचा.. >++++११११११११

देव करो अन त्या आस्तादचा हा प्लॅन नसो >>> नसावा कदाचित, मलातरी काल तो खुप जेनुईन वाटला, अन त्याला तरी कुठे सोडले त्या बैलाने, त्यालाही खुप लागलेय असे वाटत होते, कालचा भाग बघुन वाटले की तो बैल अन रड्या दोघाना लगेच बाहेर काढायला हवे होते
पण नाही फक्त शिक्शा दिली अन काय ती शिक्शापन दिलीये ... फक्त घरकाम ... काय अर्थ आहे याला , या पेक्षा जर शिक्षाच द्यायची होती तर सै, रु, अस्ताद अन पुष्करचे पर्सनल नोकर म्हणुन ठेवायचे होते त्यांना जोवर ते घराबाहेर जात नाहीत

मलाहि काल पुष्करबद्दल खुप वाईट वाटत होतं अरे त्याला खेळुच देत न्हवते झोपवुनच ठेवलं. आऊंना किती रडु येत होतं त्याला लागलय ते पाहुन.
<<<
अगदी, त्याच्या फॅमिलीला तर कित्ती वाइट वाटलं असेल !

देव करो अन त्या आस्तादचा हा प्लॅन नसो
<<
मुळात रेशम टिम फिजिकली इतकी स्ट्रांग आहे , गरजच नाही काहीच प्लॅन करायची, तसेच जिंकतात ते शक्तीशाली आणि संख्येनेही जास्तं असल्यामुळे.
राजेश आज क्विझ च्या वेळी काही डंब वाटला नाही, हा माणुस खरच एक चांगला स्पर्धक होऊ शकला असता जर अशी भयंकर लो लेव्हल भाषा, डॉन तोडफोड इमेज बनवली नसती तर !

सई का रडते ? हा गेम आहे .>> तिला टॉयलेट युझ करताना त्रास होत होता म्हणुन तिला रडू आलं.. पाठिमुळे ती कमोड युज करायची आणि कमोड हे कॅप्टन रुममधे असलेल्या टॉ बा मधे आहे जी खोली बिग बॉसने लॉक करुन ठेवली.. तिचं रडण स्वाभाविक होतं.. एकतर तिला जबर दुखापत झालेली दिसते पाठिला कारण टास्क सुरु असताना दुखण्याचं कारण सांगुन सपोर्ट न करणार्‍यांमधली ती नाहीए, त्यात तिला रा सु मुळे आता इंडियन स्टाईल टॉयलेटचा वापर करावा लागतोय ज्यामुळे तिच्या दुखण्याचा त्रास होतोय.

बाकी एकेकाचे शब्दच पकडायचे म्हटल तर कठिणे..

बापरे इंडीयन टॉयलेट्स आहेत तिथे ? Uhoh
सध्याचा सीन बघता अनेक पेश्न्ट्स आहेत , घर कमी हॉस्पिटल जास्तय , लोअर बॅक सिव्हिअर पेन, फिल सॅड फॉर सई !

बाकी एकेकाचे शब्दच पकडायचे म्हटल तर कठिणे..>> कठीण काय आहे ?. हा गेम कसा आहे त्याच्या वर आपण चर्चा करतोय . या गेम यामध्ये शाब्दिक हिंसेला हरकत नसावी हे यावरून काढलेलं अनुमान . त्यात कठीण काहीच नाही . उलटपक्षी दुसर्यांना कुत्री / थेरडा म्हटल्यामुळे तिला शिक्षा होत नाही हेच कठीण आहे . हे असे असभ्य शब्द बिग बॉस खपवून घेत ? ऊना थत्तेंना म्हणतात मला "काऊ" म्हणून तुम्ही मला नॅशनल टीव्ही वरून " जलील" करता त्यावर तुम्हाला थोबडावून काढेन हे उना यांचं विधान बिग बॉस ला जलील नाही वाटत? हेच कठीण आहे

बिग बॉस च्या घरात शाब्दिक हिंसा व असभ्य शब्द चालत नसते तर सुशांत आणि राजेश दुसर्या आठवड्यात च बाहेर गेले असते खुर्ची सम्राट टास्क वेळीच

Pages