बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण महानौटंकी जुई ने आपल्याला स्पोंडेलेसिस कि तत्सम आजार आहे जाहीर केलय ना ?

नवीन Submitted by morpankhis on 17 May, 2018 - 13:34

त्या नौटंकी आणि डबलढोलकी मेघाने पण पायात रॉड आहे -थायरॉईड आहे वगैरे आजार जाहीर केले आहेत म्हणून ती धूर्त बाई जपून जपून खेळते जुई मात्र आजार जाहीर करूनही टास्क करायची जेव्हा वेळ येते तेव्हा व्यवस्थित सगळे आजार विसरून टास्क मध्ये भाग घेते. ती मेघासारखी धूर्त नाहीये . मेघाला बरोबर समजलंय किती प्रमाणात भाग घायचा . सई पण जुई सारखी आहे "जी तोडके" भाग घेणारी . त्या धूर्त मेघा साऱख्या स्वतःला वाचवत वाचवत खेळत नाहीत दोघी

उलट तोंडावर थेरडा नाही म्हंटली, ती टेक्निकली योग्य भाषेतच बोलली त्यांच्यापुढे.>> पण मागून तरी का म्हणाली ? हे तर जास्त डेंजर म्हणूनच ती डब्लढोलकी आहे
बाकी बिग बोस ने आधीच कोणाला कुठल्या वेळेला बाहेर काढायचे/ कोणाला नॉमिनेशन पासून सतत वाचवायचं / कोणाला खोट प्रेमाची नाटक करण्याची परवानगी द्यायची / कोणाला कितीही काहीही कसेही बोललं तरी वाचवायचं हे आधीपासून ठरवलेल आहे . सो त्यांना विनर पण ठरलेला आहे तो म्हणजे मेघा . बाकी चॅनल बंद असल्याने कालचा च भाग आज सकाळी ११ वाजता बघायला मिळेल तेव्हा बघेन हर्षदाने काय झापलं ते

काहीही म्हणा..पण मेघा irritate करते..ज्यांना ती आवडते त्यांना तिच्या सोबत रहायला पाठवला पाहिजे..किती तो मीपणा.. अन त्या सई पेक्षा आमच्या गल्लीतल्या पोरी चांगल्या दिसतात..

मेघा मला जाम इरिटेट होते. >>>> मलाही बिल्कुल नाही आवडत ती. , अन तिच्या जोडीला तो भुषण पण डोक्यात जातो

सई खरेच सगळ्यांन्ना खुन्नसने बघत असते, अन दिसायला बरी वाटते, सुंदर नाही.

बाकी काल हर्षदाचे आरसा सेशन मस्त झाले, त्या बैलाचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.
रेशमची उत्तरे पटण्यासारखी होती पण माज मात्र चांगलाच जाणवत होता तिच्या देहबोलीतुन

अस्तादचे पंचींग अन ईतर टास्क बघताना असे वाटले की नुसताच फुगलाय, फिट नाहीये, लगेच दमतो तो
मला खुप आवडतो तो, पण त्याने त्या बैलाची साथ नाही सोडली तर वाया जाईल

पंचिंग बॅग टास्क मधे ऋतुजा जाम आवडली..
काल हखा ची एंट्रीच एकदम धमाकेदार ! माबो वाचून गेली तिकडे असं वाटलं. समोर येईल त्याला बिनधास्त बोलत गेली ! पुष्कीला उद्देशून I love young boys बोलल्यावर पब्लिक पडायचं बाकी होतं !
बिंब - प्रतिबिंब मधे ममां ने तिच्या खांद्यावर बंदूक ठेऊन बेछूट गोळीबार केला की काय असं वाटलं. रेरा ची शाळा घेतली ती आवडली.
हखा आल्यावर सईचा आविर्भाव ही कोण ? काय कौतुक हिचं ? असा वाटला. पण बिंब प्रतिबिंब मधे तिने रेरा, जुई आणि स्वत: सई यांना ज्यापद्धतीने ग्रील केलं, ते पाहून एकदम इंप्रेस झाल्यासारखी वाटली.
अब आएगा मजा !
आज झाडे लावा वगैरे टाइपचा टास्क दिसतोय, ज्यात हखा सकट परत एकदा लठ्ठालठ्ठी !

रे ला कळत नाहिये का हखा तिला प्रेक्षकांचं मत सांगतीय पण एका क्षणी दोघीपण पाणावल्या होत्या तेव्हा असं वाटत होतं की रे ला हखाला ओरडून सांगाव​ वाटत होतं की मला हे करावं लागतंय. ती म्हणाली की मी असं का वागतेय हे एक दिवस कळेल त्यावरून असं वाटत होतं की bb भाग पाडतायत तीला.
पण रा हललेला वाटला हखा च्या बोलण्याने त्याचा नूरच गेला होता.
बाकी एक प्रश्न पडलाय रे आज कुठे झोपणार हखा समोर ती राजेशच्या शेजारीच​ झोपणार की हखा ला सोबत करणार​. देखना मंगता...

रे आज कुठे झोपणार हखा समोर ती राजेशच्या शेजारीच​ झोपणार की हखा ला सोबत करणार​. देखना मंगता... >>> हो आज कळेल ते, अन मला ती अस्तादची शाळा कशी घेते हे बघण्याचीही खुप उत्सुकता आहे

हर्षदा आता मेघाला टफ फाईट असेल असे वाटतेय, मटा मध्ये खुप कौतुक झालेय तीचे

https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/marathi-bigg-boss/...

रेशम अँड राजेश अर नॉट माय फेवरेट पण मला प्रश्नं पडला आणि हसुही आलं ज्या अधिकाराने हर्षदा आल्या आल्याच त्यांना रागवत होती, कुठल्या अधिकारानी ?
हर्षदाचं येणं बहुदा सिक्रेट टास्क आहे, दंगेखोर दहावी फ च्या विद्यार्थ्यांवर मॉनिटर करायला मॉनिटर पाठवलीये बिग बॉसने Proud
नाहीतर ही ऑथॉरिटी तिला का दिली असती ? कुठल्या हक्काने बिग बॉसने पहिल्याच एपिसोडला तिला डायरेक्ट सगळ्यांना रोस्टच करायला दिलं असतं ? मला वाटतय पब्लिक फीडबॅक तिच्या खान्द्यावर बन्दुक चालवायची होती म्हणून बिग बॉसने हे सोपवलं तिच्याकडे.
बाकी राजेशच तोंड व्हरचुअल चपला पडलेला चेहरा दिसत होता, कुठल्याही क्षणी कोसळेल रडून असा.
रेशम मला स्पर्धक म्हणून आवडत नाही पण का माहित नाही तिचं ताडताड कॉन्फिडन्ट्ली हर्षदाला उत्तरं देणं मला आवडलं, रेशमचं मत पटो न पटो , क्लिअर अँड लाउड स्वतःच मत एक्स्प्रेस करणारी कॉन्फिड्स्न्ट रेशम विदाउट राजेशचा खान्दा मला आवडली.
मेघाला हर्षदा जे बोलली ते फक्तं मेघाचा कॉन्फिडन्स कमी करायला असा अंदाज , कारण हर्षदाला माहितेय, या घरातली सर्वात स्ट्राँग आणि एकमेव काँपिटिशन मेघा आहे, ती तसं म्हंटलीही Happy ,मेघाच्या कपड्यावर कशाला रिमार्क मारला हर्षदानी ? ती स्वतः पण वन पिस शॉर्ट ड्रेस घालून आली होती, ही लोक एवढे एंटरटेन्मेन्ट इंडस्ट्रीत असून मुलींच्या कपड्यांवरून जज करायला तयार !
सईला पुष्किची सारखी गरज नाही , तू स्ट्रॉंग आहेस बरोबर सांगितलं हर्षदाने.
राजेश आता बाकी हर्षदाशी कसा स्कोअर सेट्ल करतो पहाय्ला हवं , जखमी वळू झाला असणार त्याचा :).
बाकी ही कोणाच्या गँगमधे शिरणार नाही, स्वतःची गँग तरी बनवेल नाहीतर मध्यस्थ असेल , किंवा ती सगळ्यांशी विरोधात गेल्याने सगळे घरवाले एक होतील , ती स्वतः टास्क कितपत करणार माहित नाही.
आज ऋतुजाचं पंच अँड व्हेंटींग सेशन बाकी बेस्ट , तिचं हे अ‍ॅग्रेशन टास्क मधे दिसलं तर मज्जा येईल !

हर्षदा यावेळी जिंकली तर पुढच्या सीझनला मांजरेकरांना रिप्लेस करु शकेल Wink

ती एकदम आ गयी और छा गयी!

राजेश तर आपटलाच फुल्ल तिच्यासमोर.... काय बोलावे सुचतच नव्हते त्याला!
रेशमने पण तिच्या अश्या वागण्याचे 'सिंगल वूमन असणे आणि लोकांनी अव्हेलेबल चा टॅग लावणे' म्हणून I dont care for others वगैरे टाइप्सचे जे काही युक्तिवाद केले ते पटले नाहीत
एका बाजूने ती म्हणत होती की डिग्निटी वगैरे असे काही नसते तर पुढच्याच वाक्यात म्हणत होती की माझी डिग्निटी मी सांभाळतीय वगैरे.... थोडक्यात हर्षदा म्हणाली तशी पुरती हललेली वाटत होती रेशम!
तिच्या स्वभावानुसार ती लगेच कबूल करणार नाही हे सगळे आणि आपण कुणाला भीत नाही हे दाखवण्यासाठी जे करत होती ते अधिक जोमाने चालू ठेवेल.... किंवा मग आपली मैत्री लोकांना बघवत नाही टाइप्स स्टॅंड घेउन राजेश पासून लांब राहील आणि सहानभूती मिळवेल.... पण आपला मीच्च बरोबर हा ॲटीट्यूड सोडणार नाही!

मेघा, सई, गडकरी वगैरेला अगदी योग्य आणि थोडक्यात सल्ले दिले तिने (अर्थात ते चॅनेलने दिलेले scripted च असणार) पण तिची पर्सनॅलिटिच अशी आहे की ते पटले असतील त्या त्या स्पर्धकाला!

तिच्या एकंदर अश्या 'ऑरा' मुळे आणि मोकळ्याढाकळ्या इमेजमुळेही तिचे ते भूषणला किस करणे किंवा पुष्करला उद्देशून 'I love young boys' म्हणणे फारसे खटकले नाही!

तिच्या येण्याने घरातले डायनॅमिक्स चेंज होणार हे नक्की!
कसे ते बघायला मजा येईल!

पंचींग बॅग टास्कमध्ये सगळ्यात ऋतुजा आवडली!

हर्षदा यावेळी जिंकली तर पुढच्या सीझनला मांजरेकरांना रिप्लेस करु
<<
मांजरेकरांना रिप्लेस करायची नक्कीच क्षमता आहे आणि अ‍ॅटीट्युडमधेही मांजरेकरांपेक्षा जरब नक्कीच आहे पण आजच वाचलं कि वाइल्ड कार्ड एंट्री नेव्हर विन्स, इतिहास गवाह है.

हर्षदा यावेळी जिंकली तर पुढच्या सीझनला मांजरेकरांना रिप्लेस करु शकेल >>> जिंको वा हारो, पण त्याच्यापेक्षा ही नक्कीच सरस आहे,

मेघाच्या कपड्यावर कशाला रिमार्क मारला हर्षदानी ? ती स्वतः पण वन पिस शॉर्ट ड्रेस घालून आली होती, ही लोक एवढे एंटरटेन्मेन्ट इंडस्ट्रीत असून मुलींच्या कपड्यांवरून जज करायला तयार ! >> हो ना.

आणि मेघाला एकटीलाच का बोलतात सगळे ती मी मी करते यावरून? बाकी पण सगळे करत असतात की. आणि तिला सगळं कळतं म्हणून तिची टर उडवतात पण खरंच मेघाचं ऑब्झरवेशन, तर्क बरोबर असतात. ती धूर्त, धोरणी असेल तर ते चांगलंय की. ते तिचे दुर्गुण आहेत असं इतरांना वाटतं कारण ते तिचे स्ट्राँग पॉइंटस आहेत. बिग बॉस करता मेघा बेस्ट आहे. बाकीचे बुळे आहेत. आणि उगाच पाण्यात हात पाय हलवतायत. मेघा सूर मारून पुढे निघालीये.

Next task YouTube वर व्हिडिओ पाहिला आता इथे पण पाणी टास्क सारखे अनफेयर ग्रुप केलेत. हखा रारे ग्रुप मध्ये दिसली.
https://youtu.be/vud8IXqI4_w
<
<
पुन्हा एकदा अत्यंत अनफेअर सगळं प्रकरण दिसतय, हर्षदा खानविलकर रेशमच्या गृपमधे जाऊन ऋतुजाला धमकी देतेय कि राग आवर ??
कोण ही बया ऋतुजाला शिकवायला ? वन मोअर माजोरडी सिनियर बाई टार्गेटींग ऋतुजा ?
पुष्करसाठी भयंकर वाइट वाट्तय, बिचारा सगळ्या सांड लोकांमधे आता ही एक अजुन लेडी पैलवान आली अंगावर धाऊन यायला, आउ म्हणतायेत ७ विरुध्द २ , किती अनफॉरच्युनेट , सई अनफिट झाली आहे त्यामुळे ती सुध्दा नाही , उ.ना असून नसल्यासारख्या, पुष्करच्या बाजुने फक्त मेघा आणि ऋतुजा, सो सॅड, उ.ना जेन्युइनली रडताना दिसल्या पुष्करची अवस्था पाहून Sad
माला काय माहित का वाटतय कि सई स्वतःहून जाणार अनफिट होण्याचं रिझन देऊन, गिव्हप करणारे ती असं वाटायला लागलय, काल बिग बॉसशी बोलताना फार निराश वाटली.
पुष्कीसुध्दा दादागिरी पाहून निराश होऊन जाणार असं वाटतय !

मामी,
एग्झॅक्ट्ली , मेघाचा कॉन्फिडन्स ढळावा म्हणून पुरेपुर प्रयत्न करतायेत सगळे , ती बोलते, ती अभ्यास करून आली आहे हे चूक आणि बाकी मेजॉरीटी पब्लिक डंब आहे हे चांगले ?
मेघाला शब्दात पकडून स्वतःच्या वाक्चातुर्याने तिची बडबड थांबवाना पण तितके स्मार्ट कोणीच नाही म्हणून मग ती किती बोलते, तिला किती माज आहे वर चर्चा !

दिपांजली +१

अगदी या सेम सिच्युएशन मधून काही वर्षे गेले आहे जिथे मला आधीपासून काही नॉलेज/ माहिती असण्यावरून हिणवलं जायचं. I can totally relate to it.

रेशम मस्त बोलली. हर्षदाच्या रेशमवर केलेल्या कमेंटवर सई, मेघा हसत होते जे चीप दिसत होतं. पण रेशम पाय घट्ट रोवून व्यवस्थित शांतपणे उत्तरे देत होती आणि हे तेव्हाच शक्य हाऊ शकतं जेव्हा माणूस जेन्यूईनली क्लीन असतो. राजेश तसा न्हवता आणि त्याची बोलती बंद झाली, शब्द सापडेना. रेशम स्वच्छ मनाने सुंदर बोलली.
शी इज टोटली डिग्निफाईड.

मेघा किती बोलते... अस सगळे म्हणतात पण मग तिने गप्प रहायच का? पण का? हुषार आहे ती अन सगळं अचुक जाणते माझी तर खुप आवडती आहे ती. छानच खेळतेय.. सईने बरं व्हाव लवकर अन सक्रिय व्हाव.

मेघाला गोष्टी माहीत वगैरे अजिबात नसतात. खोटं सांगते आणि पकडली गेली तरी सारवासारव संपत नाही. म्हणून लोकं उखडतात.
मेघाशी प्रतिबिंब बोलताना ती अत्यंत उर्मट छद्मी हसत होती, ते तिच्या फॅन्स ना जाणवलं का?

मेघाशी प्रतिबिंब बोलताना ती अत्यंत उर्मट छद्मी हसत होती, ते तिच्या फॅन्स ना जाणवलं का?
<<
कोण हर्षदा छदमी हस्स्त होती का ?
मेघा बद्दल म्हणत असशील तर तिने अजून डबल अ‍ॅटीट्युड द्यायला हवा होता हर्षदाला Happy
इतरांना बोलु दिलं पण मेघाला ऑफिशिअली हर्षदान स्वतः बिग बॉस बनून तू गप्प रहा डिक्लेअर केल्यावर अजुन काय करणं अपेक्षित आहे , मेघाने?

टु ऑल ऋतुजा फॅन्स , वाघीण मोमेंट्स पुट टुगेदर Happy
https://youtu.be/gDVwuTWYBJ8

>>राजेश तसा न्हवता आणि त्याची बोलती बंद झाली, शब्द सापडेना. रेशम स्वच्छ मनाने सुंदर बोलली
अरे त्याच्यावर ध्यानीमनी नसताना अचानक हल्ला झाला म्हणून तो भांबावला.... रेशमला वेळ मिळाला त्यामुळे ती जेंव्हा हर्षदासमोर आली तेंव्हा ठरवून आली होती की काय बोलायच ते!

ऋतुजाचं फॅन फॉलोविंग जेवढं वाढलंय तेवढं कुणाचंच वाढलं नसावं. ती अचानक जस्ट अनदर पार्टिसिपंट पासून फॉर्मिडेबल स्पर्धक झालीये.
ती जिंकलेलं आवडेल.

Lol गप्प रहा म्हणजे मधे मधे टॅव टॅव करू नको.
मेधा फॅनना हखा आवडणार नसेल तर मजा येईल मात्र.
>>> रेशमला वेळ मिळाला त्यामुळे ती जेंव्हा हर्षदासमोर आली तेंव्हा ठरवून आली होती की काय बोलायच ते!>> हो शक्य आहे. पण समहाऊ ती पोटतिडकीने बोलताना वाटली मला.

रेशमचा माजोर्डेपणा काही उतरेना.पब्लिकने वोट नाही दिले तरी बिग बॉसने ठरवलच आहे तिला विनर करायच तर ही गुर्मी दाखवुनही ती जिंकेल.

मेघा किंवा सई जिंकल्या पाहिजेत यार. They both r only deserving. बाकी सगळे फक्त सिनीयॉरिटीचा माज दाखवाय्ला आलेत.
रा चे वैयक्तिक आयुष्यातले मित्र पोस्टी टाकताय्त फेबु वर तो असा नाहीच तसा नाहीच. हे सगळ स्क्रिपटेड आहे,नाहीतर त्याच्यासारखा परस्त्रीकडे ढुंकुनही न बघणारा सुसंस्क्रुत माणुस दुसरा नाही, म्हणून हा पोस्टी टाकायचा प्रपंच म्हणे... Lol

पण त्या सुसंस्कॄत माणसाने ते स्क्रिप्टेड असलेलं कराय्ला मान्यता दिलीच ना?

>>ते स्क्रिप्टेड असलेलं कराय्ला मान्यता दिलीच ना?
ते जर चॅनेल पुरस्कृत स्क्रीप्टेड असत तर राजेश शो मध्ये आल्यानंतर रेशमला म्हणाला नसता की "चल अफेअर करुया, ते लोकांना बघायला आवडत!"..... चॅनेलने हे अजुन जरा बरे स्क्रीप्ट केले असते!
मला वाटतय की हे स्ट्रॅटेजी म्हणून चालू झालय आणि गमतीगमतीत थोड पुढ गेलय!
TRP वाढल्यामुळे चॅनेलने हवा दिली आणि आता टिका वाढल्यामुळे चॅनेल या ना त्या मार्गाने त्या दोघांना हिंट देतय!

पण हर्षदा कालच्या गेट अप मधे चांगली दिसत होती.त्या अक्कासाहेबांच्या हेवी मेकपपेक्षा हे बर दिसत होतं

पण चॅनलने सोनाराला पाठवलं असेल का कान टोचायला असं तुमच्या सगळ्यांच्या कमेंटस वरून वाटलं. मांजरेकरांनी पीसी, गुड बॉय राहायचं
असेल मग हे सव्यापसव्य! +१

Pages