बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुलू अगं sorry काय? गम्मत चाललीये. मी आनंदाने बघायला गेले लिंक ऊ ना व ह खा चं काहीतरी वाजलेलं दिसतय म्हणून.हिरमोड झाला ना म्हशीला बघून..
big boss आदेश देत आहेत की... योग..आवडलं. . Lol

कोण ही ह.खा.? आणि काय विशेष क्रेडेंशियल्स आहेत म्हणे जे बि बॉ साठी ऊपयोगी आहेत?>>> वाद घालण्यात पटाईत असेल ती Happy

तिची 'आभाळमाया' मालिका आठवली.

नळावरच्या भांडणात ते चूळा भरलेले पाणी .....यक्क!!! तेच पाणी वापरायला द्यायला हवे होते.
ममां नी फक्त पाणी वाया घालविल्याबद्दल झापू नये तर ते काय चालाखी करून भरायला हवे होते तेही सांगावे.

जुईला सई नकारात्मक ऊर्जा घेऊन वावरते असे वाटते. हिचेच सतत लक्ष्य असते तिच्याकडे, कार्याच्यावेळीही सगळ्या दादांकडे तिची तक्रार घेऊन रडत जाते.

म्हणून तर ती डबलढोलकी मेघा त्यांना सांगत होती ना काका तुम्ही तोंडावर ताबा ठेवा -

नवीन Submitted by सुजा
>>>>>>

डबलढोलकी आणि मेघा..... ? काही पण काय...!!
अहो डबलढोलकी तर आस्ताद आहे.. आणि ममा पासुन सगळे त्याला तेच म्हणतात... व तो स्व :ता ही कुठे तरी अ‍ॅक्सेप्ट करतो ते...

{पैसे देऊन कॉन्ट्रॅक्ट केल्यास एका बेड वरही झोपणार्‍या }
हे लोक अभिनेते आहेत आणि त्यांनी असे सीन्स करणं हा त्यांच्या कामाचा भागच नाही का? >>> बरोबर आहे. मी तरी अजिबात संस्कृतीरक्षक नसल्याने त्यांनी तस कॉन्ट्रॅक्ट केले तर माझे काहीही म्हणणे नाही Happy
फक्त ऋतुजा त्या समीकरणात फिट नाही एवढेच म्हणणे ( अंदाज) आहे.

आधीच्या धाग्यांवरून :
रिअली ?आवडलं ?
बाकी मेघा आवडत नाही तुमचा चॉइस पण कुठ्ल्याही पुरुषाने मैत्रीणीवर किंवा प्रतिस्पर्धी स्त्री वर हात उगारणे , खेकस्णे हे असभ्य नाही ?
Submitted by दीपांजली on 17 May, 2018 - 03:55
बाकी मेघा आवडत नाही तुमचा चॉइस पण कुठ्ल्याही पुरुषाने मैत्रीणीवर किंवा प्रतिस्पर्धी स्त्री वर हात उगारणे , खेकस्णे हे असभ्य नाही ? >> इथे पुरुष स्त्री / वयाने लहान मोठे हा या शो मध्ये प्रश्न नसावा असं वाटत . नाहीतर मेघा आरती गेली तेव्हा थत्तेंवर कॅमेरासमोर ओरडली ( वयाचा मान न बाळगता ) नंतर त्यांना थेरडा म्हणून असभ्य भाषेत -संताप येण्याजोग्या भाषेत बोलली .( त्यांच्या तोंडावर नाही ) तेव्हा तिच वागणं असभ्य नव्हतं का ? सुशांत ओरडला तर त्याच वागणं असभ्य आणि मग हिच्या वागण्याला काय म्हणाल ? सुसंकृत ? इथे सुशांत आणि मेघा निदान एकाच वयोगटातले तरी आहेत . थत्ते तर हिच्या वडिलांच्या वयाचे आहेत तरी कॅमेरासमोर थेरडा ? . तेव्हा कुठे गेली होती हिची सभ्यता ?

Submitted by सुजा on 17 M
>>>>>>

मेघा जे बोलली ते नक्कीच आऊ ला तिच्या बाजुने वळवण्यासा ठी... (त्या वेळी तरी)
ति कोणावर हात उगारण्याच्या आविर्भावात दिसत नाही..

पण सुशांत हा, दीपांजली ने नमुद केल्या प्रमाणे, बायकांवर खेकसत असतो व अंगावर जाण्याच्या आविर्भावात दिसतो ....

>>अंगावर जाण्याच्या आविर्भावात दिसतो ....
जाऊ देत एव्हडं काय त्याचं मनावर घेताय? कुणी शिकंला तरी टिपं गाळतो तो.. असा काय मोठा कुणाला ईजा करणारे तो? Proud

>>पण सुशांत हा दीपांजली ने सांगितल्या प्रमाणे
या वाक्याचा मात्र भलताच अर्थ निघतो.. Wink

बाकी आत्ता या घडीला स्त्री पात्र कशाला आणले बि बॉ ने? थ्रीसम चा विचार आहे की काय?
>>> काय बोलताय योग. कंट्रोल उदय कंट्रोल !

भरपूर शिव्या देते- मूर्ख, ईडीयट, बेअक्कल, स्टुपीड वगैरे... खेरीज प्रचंड अशुध्द मराठी बोलते... दोन्ही पैकी कुठल्या गोष्टी साठी कोर्टात केस दाखल करता येईल?

Submitted by योग
>>>>>>

कृपया भाषा ही शुध्द वा अशुध्द असते हा गैरसमज पसरवु नका...
भाषाशात्राचे नियम हे लिपी व व्याकरणाचे असतात...
शब्द वा त्यांचे उच्चार यालाच भाषा समजुन त्याला अशुध्द संबोधने निंदनीय आहे...
त्या वर ढीग भर चर्चा झाली आहे. शब्द वा त्यांचे उच्चार हे dynamic असतात व ते बदलत जातात वा र्‍हास होतात.

(त.टी. मराठी भाषेची निर्मीती व उगम ( प्राकृत) समजावुन घेतल्यास गैरसमज नक्कीच दुर होण्यास मदत होईल हि आपेक्षा )

ह्यावेळी मांजा परत रेराला झापणार असे दिसते. अर्थात ते त्याला फाट्यावर मारणार. हखा आल्याने समिकरणे बदलतील पण कुणाच्या बाजूने हे सांगता येणार नाही.

>>पण सुशांत हा दीपांजली ने सांगितल्या प्रमाणे
या वाक्याचा मात्र भलताच अर्थ निघतो.. Wink

नवीन Submitted by योग
>>>>>

अरे हो की.... लक्षात आल नाही ... Lol .... (,) टाकलाय त्यात...

>>अजिबात संस्कृतीरक्षक नसल्याने<<
चांगली गोष्ट आहे. असाच "टॉलरंस" भारतात रहाणार्‍या जनतेने सगळ्या बाबतीत दाखवला तर रामराज्य यायला वेळ लागणार नाहि... Proud

डबलढोलकी आणि मेघा..... ? काही पण काय...!!
अहो डबलढोलकी तर आस्ताद आहे.. >> आस्ताद तर आहेच आहे पण मेघा पण आहे . तोन्डावर काका आम्ही तुम्हाला मिस करू वगैरे आणि पाठीमागून थेरडा . हि हिची सभ्य भाषा ? आत एक वागायचं आणि आणि बाहेर एक वागायचं यालाच डबलढोलकी म्हणतात

मेघा जे बोलली ते नक्कीच आऊ ला तिच्या बाजुने वळवण्यासा ठी... (त्या वेळी तरी)
ति कोणावर हात उगारण्याच्या आविर्भावात दिसत नाही..>> त्यावेळी सुशांत तिच्यावर नाही खेकसला . पाण्याच्या टास्क मध्ये

सुशांत हा सदा न कदा बायकांवर खेकसत असतो व अंगावर जाण्याच्या आविर्भावात दिसतो ....>>>+१
आस्तादही अंगावर ओरडत असतो. पण त्याच्या वादात मुद्दातरी असतो. तसेच इतरवेळी तो नॉर्मल वागतो. लागले-खुपले तर मदतीला धाऊन येतो.
राजेश नुसतीच गुंडगिरी!!
रेशमचा आरडाओरडा फक्त मेधा, सई आणि उना समोर असेल तर जास्तच होतो. त्या तिला अजिबात भाव देत नाहीत याचा वचपा काढते असे वाटते.
मेधा जाम पिर्पिर करुन वैताग आणते पण आपण खेळात आहोत हे तिच्या कायम लक्षात असते.
जुई एकाच टोन मधे बोलत उचकवते. एकटीने भांडायची ताकद नाही तिच्यात. कायम दुसर्‍याला बरोबर घेऊन वाद घालतान दिसते. कॅप्टन असतानाही फक्त दुसर्‍या गटावरची खुन्नस दिसली.
स्मिताला समोरच्या अरे ला कारे करता येते पण एका पॉईंटनंतर ती गप्प बसते. नेहमी दुसर्‍यांचे ऐकते. यावेळीही ती कॅप्टन कमी फॉलोअर जास्त वाटते.
सईला काहीही करायची गरज पडत नाही. तिच्या असण्याचाच काहींना जास्तच त्रास होतो.
ऋतुजा योग्यवेळी काटा काढते. तिथे समोरच्याला जास्त काही करता येत नाही.
उनाना आधि वचन दिले म्हणून गप्प बसते असे म्हणता येत होते पण आता तेही नाही करता येणार. मागे तरी किती मन मोकळे करणार?-- रेशम जेव्हा बोलली कि माझ्या आणि राजेश बद्दल मागे बोलतात, तेव्हाच स्पष्टपणे बोलायला हवे होते कि मी काही तुमच्या सारखा विचार करणारी बाई नाही. तुमचे आमच्या समोर जे काही चालू असते ते बघून मलाच लाज वाटते मग तुमच्या समोर येऊन लाजत बसू का?( रेराचा राग येणार्‍या लोकांना हे ऐकून बरे वाटले असते. पण आता चॅनेलवाल्यांनाच ते दाखवायचे असेल तर त्या तरी काय बोलणार?) आताशा दिलेल्या कार्यातही मागे पडतात. त्यांना उगाच इथे आले असे वाटायला लागले आहे असे वाटते.

पाणी भरण्याच्या टास्कपेक्षा दोन्ही टीमना एक एक पिंप भरून पाणी द्यायला हवं होतं.. जे कमीत कमी पाणी वापरतील ते जिंकतील असं काहीतरी ठेवायला हवं होतं..
यांनी पाणी कसं वाया घालवायचं याचेच धडे दिले काल..

>>कृपया भाषा ही शुध्द वा अशुध्द असते हा गैरसमज पसरवु नका...
तुमचा गैरसमज झालाय... मी ती अशुध्द 'बोलते' असे लिहीले आहे. असो. its irrelevant.. in the context of court case Wink

चुळा भरून व फडकी पिळून ड्रम मध्ये भरलेले पाणीच आजच्या स्वयंपाकाला वापरायचे आहे अशी काहितरी शिक्षा बि बॉ ने द्यायला हवी होती.. या ऊलट दोन तीन लोक घायाळ झालेले पाहून बि बॉ चीच तंतरली व टास्क थांबवला. आता बि बॉ ची शाळा घ्यायला हवी आहे.

आऊ असेही पहिल्या दिवसापासून अनफीट आहेत बिबॉ च्या घरात रहायला.. थत्ते बरे होते त्यापेक्षा. पण आऊ ममां च्या जवळच्या आहेत त्यामूळे एव्हड्यात काही बाहेर पडायच्या नाहीत.

>>बाकी आत्ता या घडीला स्त्री पात्र कशाला आणले बि बॉ ने? थ्रीसम चा विचार आहे की काय? >>> काय बोलताय योग. कंट्रोल उदय कंट्रोल !
त्या तीघांना चालणार असेल तर आपण का आक्षेप घ्यावा? ज्यांना आवडत नाही त्यांनी टीव्ही बघू नये मग. कंट्रोल रिमोट कंट्रोल.

पाणी भरण्याच्या टास्कपेक्षा दोन्ही टीमना एक एक पिंप भरून पाणी द्यायला हवं होतं.. जे कमीत कमी पाणी वापरतील ते जिंकतील असं काहीतरी ठेवायला हवं होतं..>>+१ पण त्यात काहीच हमरीतुमरी झाली नसती ना. इतर मोठ्या कार्यांबरोबर अशी कार्येही द्यायला हवेत बीबॉ मधे ज्यामधे कामाचे, वेळेचे नियोजन दिसेल, युक्त्या वापरता येतील.

हर्षदा खानविलकर ने ज्या पद्धतीने राजेश शृंगारपुरे ला ऐकवलं, हॅट्स ऑफ टू हर. कशाचीही भीडभाड ठेवली नाही तिने. मात्र त्यावर राजेश ने दिलेला उत्तर इतकं गुळमुळीत होत ना, चीड आली मला...
बघुयात ह खा यापुढे बॉम्ब ठरते, की फुसका आपटबार...

रेशम प्रचंड insecure झालीय हर्षदाला बघून.. चेहरा खर्रर्रकन उतरला तिचा.. आस्ताद, जुई आणि सुशांतची ताई बदलली आता

जुई टास्क मध्ये शिडशिडीत असल्याने बऱ्यापैकी धावू पळू शकते .
Submitted by सुजा
>>>>

पण महानौटंकी जुई ने आपल्याला स्पोंडेलेसिस कि तत्सम आजार आहे जाहीर केलय ना ?

मला एक लक्षात नाही आल...
जुई ला स्पोंडेलेसिस आहे पण तिने त्या नळा च्या कार्यात काय झोम्बाझोंबी केलिय... Lol

मला वाटत तो स्पोंडेलेसिस फक्त ठरावीक वेळी अ‍ॅक्टीव होत असावा... Lol Lol

अरे तशी सभ्यता नाहीच अपेक्षित, राडा आणि ड्रामा होणारच पण जे वर morpankhis नी लिहिलय, आला राग कि उगार हात , ते सुध्दा केवळ ती बाई तुझ्यापेक्षा चांगलं टास्क करते, क्लिअर अँड लाउड बोलु शकते म्हणून सहन न होऊन ही मेंटॅलिटी चुकीची आहे.
बाकी मेघानी थत्तेला थेरडा म्हंटलं तर त्यांनाही आश्चर्य वाटु नये, ते स्वतःलाच कळीचा नारद म्हणवतात, ते जे काही बोलले अ‍ॅज ऑडीयन्स आपल्याला आवडते पण ज्यांना बोलले ते होऊच शकतात रिअ‍ॅक्ट, उलट तोंडावर थेरडा नाही म्हंटली, ती टेक्निकली योग्य भाषेतच बोलली त्यांच्यापुढे.
या मुली टास्क चांगल करतात म्हणून त्यांना शिव्या देणे आणि हात उगारणे, आणि बायकांना टास्कच्या बहाण्यानी इनअ‍ॅप्रोप्रॅट टच करणे तर एकदमच निगेटीव बनवत सुशान्तला , या लोकांचे जे ओरिओजनल फॅन्स होते तेही त्यांना शिव्या घालत आहेत, म्हणून मला फक्त आश्स्चर्य वाटलं , पहिल्यांदाच कोणीतरी ते वागणं आवडलं म्हंटल म्हणून, असो बाकी ज्याचा त्याचा चॉइस.
टिपिकल MCP आहेत सुशान्त राजेश.
स्ट्राँग बायका (शरीराने/बोलण्याने/वागण्याने) सहन करु शकत नाहीत हे सत्त्य आहे , वेळोवेळी दिसतं.

कालचा भाग परत ते नळ आणि भांडणे बघुन सोडून दिला. इथे वाचून पंचिंग असेल तर फार मजा आली नसेल असं वाटलं.
आता भूषण आवडायला लागणारे. काल जेवढं बघितलं त्यात कसला चपळपणे बादल्या ओतत ओता. हातातून बादल्या गेल्या तर तोंडात पाणी भरून काम करत होता. ते जरा यक वाटलं तर जिंकायला स्मार्ट होतं आणि फडकी पिळा पेक्षा फास्ट आणि एफिशियंट होतं. तो पिंप त्या स्टुलावरून खाली काढत होता तेव्हा वाटलेलं झालं उपडं करणार हा! पण सावरलन.

हर्षदा खानविलकर येणारे आणि राजेशला बोलणारे का आज... देखना मंगता! तिने वेगळा ग्रुप काढला तर मजा येईल. राजेश, रेशम, मेधा, आऊचा जळफळाट बघायला आवडेल.
त्या जुई आणि सुशांतला एकदम बाय म्हणून टाका आता. बास झाली नौटंकी!

Pages