बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिथे कंटीन्युईटी होती ना पण.. असो.
नळा चा टास्क म्हणजे राजेश साठी खुले रान होते. मला वाटलं सनी देओल स्टाईल हा आता हातानेच नळ ऊखडतो का काय? घरात पुरते 'गदर' माजले आहे. Happy
राडा टास्क देऊन झाले असले तर थोडे कारागिरी चे टास्क देऊन पहावेत बि बॉ ने:
१. एखादे मॉडेल बिल्ड करणे- IKEA style कीट पाठवून द्या, मात्र अर्धे सामान विरुध्द टीम मध्ये मिसळून द्यायचे.. कॅप्टन फक्त सूचना देऊ शकतो मॉडेल कसे बनवायचे वगैरे.. त्यातील मिसींग पार्ट्स विरुध्द टीम च्या पॅकेज मधून बरोब्बर हुडकून संपूर्ण मॉडेल दिलेल्या वेळेत पूर्ण करायचे. नाटक व सिनेमा चे सेट ऊभारणार्‍या लोकांच्या मेहेनतीची व गुणांची थोडी जाणीव होऊ देत पब्लिक ला.
२. एखादा पदार्थ बेकींग स्पर्धा.. थीम केक विथ आइसींग वगैरे.. झेपेल का पोरींन्न? आऊ आणि मेघा असे कॅप्टन करा वेगळ्या टीम चे.. फीर आयेगा मजा!
३. कब्बडी का नाही ठेवत राव? किंवा स्विमींग ची स्पर्धा? एव्हडं मस्त ग्राऊंड व पूल आहे.. कबड्डी मध्ये तर आपल्या नावडत्या स्पर्धकाला ऑफिशीयली लाथा घालता येईल.. Wink आणि स्विमींग मध्ये 'कौन कितने पानी मे'... पता चल जायेगा.. स्मिता व सई कडून विशेष अपेक्षा. Wink
४. ट्रेजर हंट.. सर्वात कमी वेळात जी टीं सर्व वस्तू शोधून काढेल ते जिंकले..

वरील प्रत्येक टास्क मध्ये थोडा राडा फॅक्टर घालता येईल..

५. अगदीच काहीच झेपत नसेल या मठ्ठ गँग ला तर चमचा लिंबू, पोत्याची शर्यत वगैरे ठेवा...

इतके नाविन्यपुर्ण खेळ आहेत घेण्याजोगे. पाण्याचा आणि खेळणी होण्याचा टास्क अगदीच बेअकली टास्क होता. Sad

पाणी भरणे टास्क बेस्ट झाला की! रडकी सई, पाय तुटकी मेघा, पेशंट आऊ आणि बिनकामाची ऋ एकत्र आलेत. त्यांच्यातील आस्ताद आणि पुष्की भरपूर प्रयत्न करत होते पण रा, रे, स्मि, भू, सु पुढे अगदीच फिके पडले. राजेशनी पळता भुई केली पुष्कीला.
उद्या सु आणि छपरी क्वीन भांडणारेत. सु मला वाटतं छक्वी चा ड्रम उलटा करतोय >>>> अमितव, तुम्ही रे रा टिमचे Fan आहात का?

पाय तुटकी मेघा, पेशंट आऊ >>> असे शब्दप्रयोग नको प्लि़झ!

बिनकामाची ऋ >>> ऋजूता बिनकामाची कशी?

अरे देवा, हा टास्क होता का कुस्ती? Lol बादल्या काय तोडतायत, नळ काय तोडतायत, ड्रम्स काय खाली पाडतायत. पाणी वाचवतायत का वाया घालवतायत?

राजेशने जेव्हा पुष्करला आणि रेशमने सईला धरल तेव्हा मला हिन्दी सिनेमातला, व्हिलन हिरोला आणि खलनायिका हिरवीणीला मारतात तो सीन आठवत होता.

स्मिता आपले कराटेचे स्किल्स दाखवत होती.

ते ड्र्म्स सुद्दा नळाला लावत होते हे मठ्ठ लोक. Uhoh हे नियमात बसत होत का?

उना छान खेळल्या काल, पण कालच्या प्रकाराने त्या खुप घाबरल्या होत्या.

पण हा टास्क काही पटला नाही.

बिगबाॅसमधे रूम एस्केप सारखे मस्त एंजाॅएबल आणि क्रिएटिव खेळ हवेत. नुसतेच लठ्ठालठ्ठीचे खेळ बघून माबोवरचे काही विशिष्ट बाफ वाचल्याचं फील येतं.>> मामी +१११

बिनकामाची ऋ >>> ऋजूता बिनकामाची कशी?>> हो काल ती काहीच करताना दिसली नाही. उनाच्या शेजरी फक्त बघत उभी होती. सकाळीच माझा पाय दुखतोय म्हणत होती त्यामुळे असेल.

एक दिवस सर्व खेळाडूंना अभय द्या, आणि एकमेकाम्च्या अन्गावर सोडा.. मज्जा बघा अंगावर सोडा म्हणजे फक्त शाब्दिक...>> त्यासाठीच 'व्यक्त व्हा मुक्त व्हा!!!' Proud

राजेश एकांतवासात राहून काहीच शिकलेला दिसत नाही
नळावर शोभेल अशी भाषा पुन्हा सुरू झालेली आहे त्याची. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच.>> मला नाही तास वाटलं आधी तुम्हीं आधी पाणी भरा नंतर आम्ही भरू असाच चाललं होत . बिग बॉसने सई आणि रेशम ला कंफेश रूम मध्ये बोलावून इतकं असं गोडीगुलाबीत टास्क चालणार नाही सांगितल्या वर त्यांची दोन्ही टीमची मी आधी नळाखाली बादली लावणार का तू आधी लावणार यात भांडं भांडी झाली / विरुद्ध टीम मेंबर्स ना बाजूला खेचून हे प्रकार सुरु झाले नंतर सईने पाणी ओतलं म्हटल्यावर त्यानेही ओतलं . व्यवस्थित चाललं होत त्याच . तुम्ही केलं म्हणून आम्ही केलं Happy

मेघाच्या मुलीने तिला सांगितलंय तिला घाबरू नकोस म्हणून तुला बाहेर खूप सपोर्ट आहे . त्यातून बिग बॉस चा हि तिला सपोर्ट आहेच . बिग बॉस ला तिलाच शेवटपर्यत ठेऊन जिंकवायच आहे . म्हणून पहिल्यापासूनच ती नॉमिनेट होणार नाही याची व्यवस्था करताहेत . बिग बॉस ला पहिल्या दिवसांपासून पासून थत्ते ना काढायचा होत ( कारण ते इंडस्ट्रीतले नाहीत ) म्हणून त्यांनी गेम सुरु झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशी त्यांना स्वतःच्या अखत्यारीत नॉमिनेट केलं . एनीवे बिग बोस ला मेघालाच जिंकावायचं आहे सो एक एंटरटेनमेंट म्हणून ज्यांना बघायचा आहे ते बघतीलच आणि सगळं आधीच ठरलेल असल्यामुळे फक्त टास्क कसे खेळतात तेवढाच बघायचं आपण Happy

दक्षे, ऋतुजा पटवर्धन नाही धर्माधिकारी >> आसा .. बदल केला आहे. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

ऋतुजा खुप हुशार मुलगी आहे असे वाटते. आपण बलवान ग्रुप का निवडला नाही याचे जे कारण तिने मांजरेकरांना दिले ते खुप रिलेट झाले. ज्या ग्रुपची शक्ती जास्त आहे तिथे सगळ्यांच्या बरोबर अल्सो रॅन राहून जिंकल्याचा आभास निर्माण करण्यापेक्षा मायनॉरिटीबरोबर राहून पूर्ण जिद्दीने प्रयत्न करणे योग्य हे तिला कळले आहे. स्मिताला कळेल तो सुदिन. बिचारी राजाबाबू आणी रे ह्यांची कामे करत बसली आहे.
सध्या माझे फेव्हरीट लोक ऋतुजा, सै, पुष्कर आणी स्मिता.
<बिग बॉस ला तिलाच शेवटपर्यत ठेऊन जिंकवायच आहे >
आजिबात नाही. उलट राजेशसारख्या अनपॉप्युलर, लोकांनी नाकारलेल्या खेळाडूला माघारी आणणं गेममध्ये याचाच अर्थ असा की बिबॉ राजेशला फेव्हर करते. तसंच म्हटलं तर, भूषण, उना यांची पण नावं त्यांना फेव्हरेबल असणार्‍याच लोकांकडे आली होती की. केवळ मेघालाच फेव्हरेबल चान्स मिळाला असे आजिबात नव्हे. सुशांतला सुद्धा आस्ताद आलेला, पन त्या लूझरला तिथून हालायचं आहे लवकरात लवकर त्यामुळे त्यानेच आस्तादला गळ घालून नॉमिनेट करायला लावलं स्वतःला.

कसला फाल्तु टास्क. पाणी वाचवा ऐवजी वाया घालवा अशी अपेक्षा होती वाटतं बिबॉ ची. खास रानरेड्यासाठी व मा म्ह साठी बनवल्यासारखा टास्क.

सुशांतला सुद्धा आस्ताद आलेला, पन त्या लूझरला तिथून हालायचं आहे लवकरात लवकर त्यामुळे त्यानेच आस्तादला गळ घालून नॉमिनेट करायला लावलं स्वतःला.>> तरी आस्तादने सौम्या शब्दात कारण दिले. 'हा सारखा रडत असतो' हे एकच वाक्य बोलला असता तरी चालले असते.

ऋतुजा खुप हुशार मुलगी आहे असे वाटते. आपण बलवान ग्रुप का निवडला नाही याचे जे कारण तिने मांजरेकरांना दिले ते खुप रिलेट झाले. ज्या ग्रुपची शक्ती जास्त आहे तिथे सगळ्यांच्या बरोबर अल्सो रॅन राहून जिंकल्याचा आभास निर्माण करण्यापेक्षा मायनॉरिटीबरोबर राहून पूर्ण जिद्दीने प्रयत्न करणे योग्य हे तिला कळले आहे. स्मिताला कळेल तो सुदिन. बिचारी राजाबाबू आणी रे ह्यांची कामे करत बसली आहे.>>> अगदी अगदी. ऋतुजा जेव्हा 'मला मेजॉरिटीच्या मागे राहून जिंकण्याचा आव आणायचा नाही' असं सांगत होती तेव्हा कॅमेरा फोकस तिच्यावर २-३ सेकंद होता. चेहरा बघण्यासारखा झाला होता तिचा. Happy
<<त्यामुळे त्यानेच आस्तादला गळ घालून नॉमिनेट करायला लावलं स्वतःला.>> तसं नाही वाटत...कारण आस्त्याने नॉमिनेट केल्यावर रुसला होता तो आस्त्यावर.

>>राजेश एकांतवासात राहून काहीच शिकलेला दिसत नाही
काल तर सर्वांना 'अजपा जप' वगैरे काही तरी अध्यात्मिक फंडे देत होता. पण तो काळ्या कोठडीत होता वगैरे कहाणी सांगून ऊगाच घाबरवलय पब्लिक ला आणि स्वतःबद्दल सहानुभूती आणि भिती वाढवून घेतली आहे.
>>उना छान खेळल्या काल, पण कालच्या प्रकाराने त्या खुप घाबरल्या होत्या.
बरोबर आहे... त्यांच्या अनुभवातील नळाची भांडणे 'थोबाड फोडीन' एव्हडं बोलण्यापर्यंतच जात असतील... ईथे मात्र फूल टू धक्का बुक्की सुरू आहे. Happy
मला शंका आहे शनिवारी या नळा च्या टास्क वरून ममां सर्वांना ऊगाच डोस देतील- चाळीत व झोपड पट्टीत लोकं कसे राहतात वगैरे... आणि त्यावर मग राजा बाबू, भूषण, सुशांत यांचा गहिवर.. सिंपथी वगैरे... असा प्लान दिसतोय. या सर्वापेक्षा बेक्कार तर सकाळची फास्ट ट्रेन पकडून मुंबईला कामावर जाण्याचा अनुभव असायचा (अजूनही असेल!).. पुणेकरांना अर्थातच ही अनुभव सम्रुध्दी ऊपलब्ध नव्हती. Wink

जुई गडकरी मांजरेकरांशी थोडी चढ्या आवाजात आणि उर्मट (डिरेक्टिव्ह) भाषेत बोलते असं कुणाला वाटतं का?
मला वाटतं.

>>जुई गडकरी मांजरेकरांशी थोडी चढ्या आवाजात आणि उर्मट (डिरेक्टिव्ह) भाषेत बोलते असं कुणाला वाटतं का?
मला वाटतं.
+१००..जाम अंगावर येते.. टिपीकल शाळेत लहान मुले अर्ग्यू करतात तसे.. आणि बरेच वेळा ममां चं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच ही सुरू होते. कायम 'माझ्यावर अन्याय होतोय... आणि तुम्ही म्हणता आहात तसे अजीबातच नाहीये..' असा सूर असतो तीचा शनीवारी. Wink

जुईचे माहीती नाही पण रेशम बोलते उर्मटपणे..... निदान तिचा आविर्भाव तरी तसा असतो!
परवा ती ममांबद्दल बोलताना नुसते महेश म्हणाली आणि राजेशने पण त्यांचा काहीतरी एकेरी उल्लेख केला आपापसात बोलताना!

जुई मध्ये कसला attitude आहे आणि का... ती इतकी किरकिर करते....
ऋतुजा मला खरंच आवडायला लागलीय. मस्त आहे , टास्क मस्त करते, शिवाय बाकीच्यांच्या तुलनेत एखाद्याला नॉमीनेट करणे किंवा प्रश्नांची उत्तरे देताना हुशारीने उत्तरं देते. बाकी चे काहींच्या काही बोलत असतात...

काल सई ला लागलं बिचारीला... राजेश आणि अस्ताद ला उचलायला जमत नव्हतं तिला.... आणि मेधा सारखं तिचं रडणं नाटकी पण वाटत नव्हतं... कालच्या टास्क मध्ये मेधा खूप शांत होती....

+१००..जाम अंगावर येते.. टिपीकल शाळेत लहान मुले अर्ग्यू करतात तसे.. आणि बरेच वेळा ममां चं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच ही सुरू होते. कायम 'माझ्यावर अन्याय होतोय... आणि तुम्ही म्हणता आहात तसे अजीबातच नाहीये..' असा सूर असतो तीचा शनीवारी.>>+१ खूप वैताग आणते.

परवा ती ममांबद्दल बोलताना नुसते महेश म्हणाली >> बरेचवेळा ती महेश असेच बोलते.

Pages