Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22
हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.
Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother

विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
रमा..... अत्यंत तडफदार,
रमा..... अत्यंत तडफदार, मायाळू, प्रेमाळु आई, कर्तव्यदक्ष, संसारी पत्नी, विश्वासु सुन, मुलगी इत्यादी...
एक दिवस अचानक रमाला साक्षात्कार घडतो की तिचा पती व मुले ही भलत्याच दुनियेत गेली असुन ती पण एका वेगळ्या विश्वात पोहोचली आहे. मग तिची दया येऊन परम शक्तीशाली ईश्वर तिची भेट संथ निरंजन बाबांशी घडवुन आणतो.
निरंजन बाबांची पहिली पत्नी अपघातात गेली असल्याने ते स्वतःला संसारातुन विरक्त समज्त असतात. पण योगायोग बघा, ज्या दिवशी मंगल ( बाबां ची पत्नी ) वायू मार्गाने आकाशात जाते, त्याच्या शेजारच्या एस्केलेटरवरुन रमा खाली येते व बाबांची भेट होते. संथ बाबा कृपाळु नजरेने तिला घरात आणतात, तिथे बाबांची आई ( जी कायम होसुमीयाघची शशीकलाला आपले दैवत मानायची) तिला म्हणजे रमाला स्वीकारत नाही. मग हळुहळु त्या सोसायटीत अनेक अपघात होऊन ती मंगलच आहे असे जाहीर होते. मग अशा पद्धतीने रमा सोसायटीतुन बाहेर येते.
ती त्या मार्गावर निपचीत अवस्थेत डॉ सिद्धार्थ च्या वाग्दत्त वधुला सापडते, मग ती तिला दवाखान्यात आणते, तिथे पण रमा ताई स्वस्थ न बसता आपले चमत्कार दाखवतात. त्यातुन त्या रमा नसुन चंदी आहेत असे दर्शवतात. त्यातुन हा भला मोठा गोंधळ निर्माण होऊन त्यांची पाळेमुळे खणल्याशिवाय मी तुझ्याशी बोलणार नाही असे डॉ ची वाव सांगते.
आता पुढे शरीरात व मनात त्राण उरले असल्यास ही कथा बघावी, ऐकावी व बाकी सकल जनास त्याचा यथाशक्ती प्रसाद द्यावा ही भाविकांना नम्र इनंती.
रश्मी.. >>>>
रश्मी.. >>>>

@ रश्मी.
@ रश्मी.
मी कधीच सोडलंय ही सिरीयल बघणं. त्यापेक्षा जास्त मनोरंजन तर हा धागा करतो. दक्षिणा ताईचे प्रतिसाद तर फुल अॉन धमाल
time traveler Rama & Kavu n
time traveler Rama & Kavu, Chivu.
संथ निरंजन बाबां बायको
संथ निरंजन बाबां बायको गेल्यापासुन (एक ढगात आणि एक ईस्पितळात) सायको झालेत. काल येल्लो कलर ची हूडि घालुन 'City Hospital' (आमच्या येथे Multi Task Doctor Sidharth याच्याकडुन सर्व प्रकारच्या आजारावर उपचार केले जातिल) मध्ये गस्त घालत होते बहुदा चमाला kidnap करायचा किन्वा भेटायचा प्लान होता.
काल नविन पात्राची entry झालि,
काल नविन पात्राची entry झालि, Soda Water ची friend/sister. आज ती मुम्बईला येयिल.
चमा >>>
चमा >>>
Soda Water ची friend/sister. >>> कोण Soda Water?
च्यायला आधीच काय घोळ कमी होता
च्यायला आधीच काय घोळ कमी होता? जे नवीन पात्रं आणलं आहे? कोण आहे नवं पात्रं?
मी पण अनेक दिवसात पाहिली नाहीये सिरीयल.
कोण Soda Water? Uhoh>>> डॉकची
कोण Soda Water? Uhoh>>> डॉकची गफ्रे
निरूबाबा पण भिरभिरला आता. तसा आधीपासून होताच तसा आता जास्त. ३-४ वर्षापूर्वीचा मंगलचा चष्मा शोधून आणला दुकानातून. आता काय प्रदर्शन मांडणार बहुतेक चप्पल, चष्मा, कपडे.
त्या रमाचंदीमंगल च्या डॉकने शोध लावला की तिच्या पापण्या बंद होत नाहीत.
माझा नवरा आज ह्या सिरीयलची
माझा नवरा आज ह्या सिरीयलची आठवण काढत होता की ही सुरु आहे का सिरीयल. म्हटलं सुरु आहे पण मी bb बघते ना त्यावेळी आणि मायबोलीवर वाचून कळते फालतूपणा सुरु आहे, त्यामुळे नेट वर पण बघत नाही. तसंही फार कमी जण बघतात बहुतेक, कारण कमी जण लिहितात तिथे.
निरू रमंगलला परत आणणार आहे.
निरू रमंगलला परत आणणार आहे. म्हणून तिच्या सगळ्या वस्तू आणून ठेवतोय.
निरू रमंगलला परत आणणार आहे.
निरू रमंगलला परत आणणार आहे. म्हणून तिच्या सगळ्या वस्तू आणून ठेवतोय.
नवीन Submitted by भरत. on 8 May, 2018 - 09:20 >>>>>>> प्लनचेट करुन का?
सिद्धुचे डोके काल कोणी तरि
सिद्धुचे डोके काल कोणी तरि फोडले, आज कळेल.
प्लँचेटची काय गरज..ती
प्लँचेटची काय गरज..ती स्वतःहूनच दिसत/भेटत असते की त्याला..
मी तर बंद केले पाहणे, नक्की
मी तर बंद केले पाहणे, नक्की काय सुरू आहे? टोट्ल सांगा जरा.
प्रिय दक्षिणाताई,
प्रिय दक्षिणाताई,
चमा (चन्दी+रमा) सध्याचे मुककाम पोस्ट 'City Hospital' (आमच्या येथे Multi Task Doctor Sidharth याच्याकडुन सर्व प्रकारच्या आजारावर उपचार केले जातिल) मध्ये खुपच काड्या करुन राहिलिय, आता ति स्वतः करतेय कि घड्वुन आणतेय ते फक्त भुतालाच (देवालाच ठावुक या धर्तिवर) माहित. त्या एका नर्स ला गायब केली, सदोबाला घाबरवले, पण हा सदा सुद्धा बारा वडगावचे (बारा गावचे) पाणी प्यायला असल्याने सध्यातरी तो ताळ्यावर आहे (पक्का आतल्या गाठिचा दिसतोय). चमामुळे Soda Water chi bottle (सिद्धुची गफ्रे)स्वताला खुपच असुरक्षित समजतेय (उस्को अपने प्यार पर भरोसा नही). इकडे संथ निरंजन बाबांनि वेगळेच channel पकडलेय (बहुदा Ramse TV) ते सध्यातरी उत्खननात busy आहेत. मन्गल माताचे जोडे, चष्मा, कपडे, मन्गळसुत्र अश्या विविध वस्तु जमा करत आहेत. मधुनच City Hospital मध्ये चक्कर मारुन येतात.
इस्पितळातिल एक अन्ध आजि(might be चन्दिची आई = Mrs. Sharangpaani) जी पढवल्यागत डायलाग मारत चमाला (आपल्या मनचक्शु तुन बघुन) आपली मुलगी समजतेय.
सिद्धु वडगावला गेलाय.
अपर्णा मी हसून मेले
अपर्णा
मी हसून मेले
इकडे संथ निरंजन बाबांनि वेगळेच channel पकडलेय >>
हे तर लय खास
मी तर पाहणे केव्हाच सोडून
मी तर पाहणे केव्हाच सोडून दिले आहे ..
@अपर्णा. -- > तुमच्या चटपटीत वर्णनाबद्द्दल आभार .. आणि ते वाचून हे हि कळले कि आता डायरेक्ट शेवटचा भाग पाहायचा ... कारण इथे कुणाचीच कुणाला टोटल लागत नाही ... नारायण धारप रडत असतील वरती
कधी संपणार आहे ही मालिका?
कधी संपणार आहे ही मालिका? झाले का ९९ भाग?
एक ना धड भाराभर चिंध्या
एक ना धड भाराभर चिंध्या झाल्यात या ग्रहणाच्या
पण मंगला च्या सगळ्या वस्तु
पण मंगला च्या सगळ्या वस्तु पुरुन का ठेवलेल्या??
काल सिद्धु वड्गाव ला prof.
काल सिद्धु वड्गाव ला prof. sharangpani च्या घराचा शोध लावतो, त्या पडक्या घराचे निरीक्शन करत असताना त्याच्या डोक्यावर मागुन कोणितरी काठिने प्रहार करतो. इथे संथाच्या घरी soda water आनि निरुमा काळजी करत असतात. मेट्रन आणि ward boy सम्पत कडे चमाचा काटा काढ्न्याचा उपाय मागायला गेले असतात.
इथे मार खल्लेला सिद्धु झाडाला खाली डोके वर पाय या अवस्थेत लटकत असतो (त्याने zee चा बालविशेषान्क फारच मनावर घेवुन advt. छान केलि)
Hospital मध्ये अचानक cell phone/landline बन्द असतानाहि (अचानक एकसाथ सगल्यान्च्याच ) रिन्ग वाजु लागतात, सगळे परेशान असताना, त्यामागे चमाचा हात असल्याचे निश्पन्न होते(चमाचे १०१ चमत्कार यावर पुस्तक प्रकाशित होण्याची दाट शक्यता).
सिद्धु ला एक विक्शिप्त गावकरी वाचवतो आणि लवकरात लवकर वड्गाव सोडुन जायचा सल्ला देतो, त्याचि बन्द पडलेली गाडी त्या विक्शिप्त गावकरीच्या सागन्यावरुन तिथेच सोडुन वरुन १०० रुपये (त्याने मागितले म्हणुन) देतो.
बस पकडुन मुम्बइला परतत असताना सहप्रवासि आजोबा news paper मधुन राशिभविष्य वाचत सिद्धुला पिडतात. बसला छोटासा अपघात होणार आहे बहुदा आज.
बिलिव्ह मी , कालचा एपिसोड मी
बिलिव्ह मी , कालचा एपिसोड मी समोर बसून पाहिला तरिही मला झेपला नाही.
माझ्यावर रमाने करणी केली आहे.
असं वाटतय ह्या मालिकेमध्ये
असं वाटतय ह्या मालिकेमध्ये आता उर्मिला मातोंडकरच्या "नैना" ह्या भयपटातील कथेचा आधार घेत आहेत. नैना चित्रपटाचा प्लॉट खाली इंग्रजीत कॉपी केला आहे विकिपीडीयावरुन. बहुतेक हि मालिका त्याच वळणावरुन चालू आहे.
During a solar eclipse in 1986, young Naina Shah, while traveling in the backseat of her England-based dad's car, is struck by glass from the shattered windshield during an accident, and loses her eyesight. Her parents do not survive, and she is brought up by her paternal grandmother. Years later, Naina gets a successful corneal transplant, and is able to see. She complains of vision problems, seeing hooded persons, and people dying, which a psychiatrist, Samir Patel, diagnoses as hallucinations. But when Naina reports seeing someone else in her mirror reflection, Sameer decides to investigate who the original cornea actually belonged to. This investigation will lead them to an impoverished village in New Bhuj, Gujarat, where she will find her life endangered by hostile villagers who believe that the donor of her cornea was cursed.
साकेता.. बाप रे.. गोष्ट
साकेता.. बाप रे.. गोष्ट नक्कीच इंटरेस्टींग आहे पण झी वाले बोर्या वाजवतात.
काल च्या एपि मध्ये थोडीतरी
काल च्या एपि मध्ये थोडीतरी भिति वाटलि , मेट्र्न रमाला (विषारी) injection द्यायला जाते आणि पाठिमागे मन्गल पेशन्ट च्या वेषात (डोक्याला पट्टी वैगरे, हाताला सलाइन). मेट्र्न मागे वळ्ते तर मागे हि बया सोलिड तन्तरते तिची. तिच्यासकट थोडे मला हि दचकायला झाले. सोलिड खुन्नस देते मन्गल मेट्र्नला बर एवढ थोड नाहि तर ति घाबरुन चमाच्या बेडकडे पहान्यासाठी तर मागे चमा उभि. मस्त शोट होता तो. पण हि मेट्र्न त्यान्च्या कचाट्यातुन पळायला यशस्वि होते.
आजच्या एपि मध्ये सोडा वॉटर ची घाबरायचि बारी.
मंगलच्या मरणाशी हॉस्पिटल
मंगलच्या मरणाशी हॉस्पिटल स्टाफचाही संबंध आहे.
निरुमाता, साठे दांपत्य आणि मोनूच्या आईचाही.
तो सम्पत म्हणाला ना त्या
तो सम्पत म्हणाला ना त्या मेट्र्न ला कि ज्याने ज्याने मन्गल ला गायब करण्यात सहभाग घेतला होता, त्याला पापाचि फळे भोगावि लागणार,
ही सिरियल म्हणजे नक्की काय
ही सिरियल म्हणजे नक्की काय गौडबंगाल आहे काही कळेचना झालेय
दक्षिणा, मलातबैकैकळतचनै
दक्षिणा, मलातबैकैकळतचनै
Pages