ग्रहण - Zee मराठीवर, १९ मार्च पासुन १०.३० वाजता, सोम-शनि.

Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22

हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.

Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother

mqdefault_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

त्या आधीच्या एपि मधल्या साठेकाकूंच्या घरी चर्चा करत बसलेल्या बायका कसल्या डायलॉग पढवलेल्या होत्या... Lol
साठेकाकांना आता वेड लागले का?

ही नवी मंगल आहे??
वा! मस्तच की.
निरोबा मला वेड लागले प्रेमाचे गायचा?? Lol
त्याने
मंगला ग मंगला
अगं मंगला ग मंगला
तुझ्यासाठी चंद्रावर मी बांधलाय बंगला ग बंगला
गायला हवं Happy

तुझ्यासाठी चंद्रावर मी बांधलाय बंगला ग बंगला
गायला हवं Happy >>>>>>>>> तुझ्यासाठी रमाच्या घरावर बांधिला बंगला ग बंगला

अरे वर कोणीतरी म्हणलं त्याप्रमाणे खरंच १०० भागांची मालिका आहे का ही?
सध्या ज्या निरंजन वेगाने चाललीये त्यावरुन वाटत पण नाहीये १०० भागांत संपेल. Uhoh

सस्मित , अपर्णा Lol काल निरोबा आणी मंगलने दंगल केली. निरोबाचा सिद्धार्थला संशेव आला, कारण एकटाच हातवारे करुन बोलत होता हवेतल्या मंगुशी. निरुआईला बेसिन मधून काळे गहिरे पाणी बुडबुडतांना दिसले, आणी साठेकाकांना रमाला बघुन अ‍ॅटेक आला.

ते साठेकाका बिचारे भ्रमिष्ट झाले तरी त्यांच्या बायकोला त्याचे काहीच वाटत नव्हते! काहीच न झाल्यासारखे वागत होती इतके दिवस. त्या रमा आणि मंगल च्याच पांचायती जास्त तिला. Happy तशीच ती मोनूची आई. मोनू ऊठसूट गायब व्हायचा तेव्हा ही आपली थयथयाट करून इतरांवरच ओर्‍रडायची ' आधी शोधा! बघा माझा मोनू कुठे गेला, लवकर!' अरे तुझा मुलगा आहे ना तू जा अन बघ की Happy कॉमेडी झाली आहे ही सिरियल. मी पाहिले तर आठवड्यातून १-२ भाग पहातेय सध्या. बस होतात.

काल रमा उपाशि, उन्हा-तान्हात राहिल्यामुले (भूत उपास करत) चक्कर येउन पड्लि आणि त्या multi specialist doctor Siddharth (eye specialist पण आहे म्हणे) च्या multi specialist Hospital (staff suddha multi-task) मध्ये भरती झालि. बाई फारच चावट आहेत Happy जो भेटेल त्याच्यावर हात फिरवतात, आज ति Siddharth च्या खाद्यावर हात फिरवत काहि-बाहि डायलाग मारणार आणि ति सोडा वाट्र्र्र्रर सारखि फसफसणारि girlfriend मध्येच काहि बोलणार मग आपल्या रमाबेन अशि काहि खुन्नस कम कुत्स्किक नजर तिच्यावर टाकणार आहेत.

मालिकेत नक्की काय चाललंय ते मला जरा कुणितरी समजावून सांगा प्लिज.
मंगल मध्येच कशी आणि कुठून उगवली? Uhoh
रमा घरातून हाकलल्याशी तिथेच बसून आहे का? Uhoh
पडलेली सापडली ती पण बरोब्बर निरूच्या भावाच्या गफ्रे ला? Uhoh
त्याच खोलित अ‍ॅडमिटली जिथे मंगल अ‍ॅडमिट होती. Uhoh
किती योगायोग? Uhoh

मी हल्ली मन लावून नाही बघते ... एक तर slow चाललंय .. काल तर केसांचा गुंता बेसिन मधून काढलेला दाखवला तेव्हा मला उलटी च यायची बाकी होती
Sad मला पण काळत नाहीये मंगल येते म्हणजे काय होतंय ,त्याला अति प्रेमापोटी भास होतायत कि रमा हे घडवून आणते का अजून काही (का मी भिरभिरलेय
Lol )

आणि हल्ली मी यात काहीही होऊ शकतंय हेच डोक्यात ठेऊन किंवा डोकं बाजूला ठेऊन बघते

पण थोडक्यात रमा सध्या एकटी पडलीये ना मोनू ना लक्ष्मी ना संथ निरंजन बाबा
आणि तसाही संथ निरंजन बाबा भिरभिरल्यागत वागतोय तो हि एकटाच पडलाय ..
सो आता त्याला मंगल हीच रमा असणार हे वाटायला आणि पटायला लागलंय आणि आता तो तिला आणणार घरी ...

हे बेसिन मधून पाणी वर येणं, केसांचा गुंता हे सग्ळं मरून नावाच्या नेटफ्लिक्स वर पाहिलेल्ल्या मुव्हीत सेम टू सेम होतं... त्यात मानव कौल आहे त्याची बायको हरवली असते.

बिग बॉसमुळे झी मराठीचा TRP पार गडगडलाय.. किमान बिग बॉस स्लॉटपुरता तरी.. त्यामुळेही इकडे कोणी फिरकत नसतील

सगळेजण इतके कंटाळ्लेत की काहीही लिहीत नाहीत इथे. एक किंवा दोन पोस्ट असतात दिवसभरात.>>>>> मी अजीबात कंटाळले नाहीये, फक्त्त घरात तुफान कामे काढल्याने मला पहाता पण नाही आले. आज शनीवारचा भाग पाहीला. रमा बै, त्या नर्स सुमन ला गायब करतात वाटते, कारण सुमन सी सी टिव्हीत एकदाच दिसते, नंतर गायब होते.

मला आता रमा विषयी काडीची सहानूभुती उरलेली नाहीये. विक्षीप्त बाई कुठली, आधी म्हणते घर हरवले , नंतर म्हणते मुले आणी नवरा हरवलाय. मग सगळा शोध थांबवुन आधी निरु मग सिद्धुच्या मागे लागते. पुढच्या भागात खी खी खी हसून म्हणते ( एक मोठे सायकीअ‍ॅट्रिस्ट तिला चेक करायला येतात तेव्हा ती तिचे नाव रमा नसुन चंदी सांगते ) की ती चंदी आहे.

आत्ता! ही भुताळीण नक्की किती जन्म फिरणारे?Fearful

मी सुद्दा अजीबात कंटाळले नाहीये, एवढेच काय उन लागतलय त्यामुळे भिरभिरल्या सारखे झालेय टायपायचा कन्टाळा येतो.

निरुचं पण काही कळेना. रमा शुद्धीवर आल्याचं त्याला कळलं नाहीए का? अजून भेटायला नाही गेला.

त्या चपला कशाला शोधल्या?(रमाला हुंगवायला?)
निरूची आई खूप कटकटी आहे. ती दिसली की टीव्ही म्यूट करावासा वाटतो.
बाळ आणि नर्स दोघांना गायब केलं?
अशानं हॉस्पिटल बंद पडेल. आता तो बोअर इन्स्पेक्टर परत येईल.

निरूची आई खूप कटकटी आहे. ती दिसली की टीव्ही म्यूट करावासा वाटतो. >>> तिला माणूसघानी म्हणु शकत नाहि, हेरवि अख्ख गाव गोळा करुन बसलेलि अस्ते, पण स्वताच्या मुलाच्या आणि सुनेच्या (मन्गल) बाबतित अशि का वागते काय माहित ??

( एक मोठे सायकीअ‍ॅट्रिस्ट तिला चेक करायला येतात तेव्हा ती तिचे नाव रमा नसुन चंदी सांगते ) की ती चंदी आहे. >>> हि चंदी कोण ??? निरोबाचि ex, कि रमाच्या हरवलेल्या नवर्याचि ex, कि निरुमा चि सवत, ....................

ढच्या भागात खी खी खी हसून म्हणते ( एक मोठे सायकीअ‍ॅट्रिस्ट तिला चेक करायला येतात तेव्हा ती तिचे नाव रमा नसुन चंदी सांगते ) की ती चंदी आहे.>>>>>>>>>>> Uhoh
आता झी, दिग्द, निर्माते, पजो, कथालेखक वैगेरे सगळ्यांनाच डोकं ठिकाणावर आहे का? असं विचारावं वाटतंय. Angry

संथ निरूबाबा ने खोदून खोदून चप्पल काढली ती मंगल ची असावी का ?ती गेल्यावर तिच्या गोष्टी(त्यात फक्त चप्पलच का सापडली / आणि वर काढली काय माहित ) पुरून ठेवल्या असतील का त्याने?
बरं ते झालं ,.. घरी आल्यावर निरूच्या चिखलाच्या पायांचे ठसे कसे काय उठले बॉ ?सगळं तर कोरडंच खणत होता चप्पल पण कोरडी ... आणि
आता ती चप्पल रमा ला घालायला देऊन तिला ती परफेक्ट बसणार आणि मग हीच माझी मंगल असा निरूबाबा सिद्ध करणार असेल तर मग धन्य तो काऊ आणि धन्य आपण सगळे प्रेक्षक भाऊ !!! (निळ्या रंगाची डोळे फिरवणारी बाहुली .. ती कशी काढायची ते सांगा बर मला एकदा plz )

आता ती चप्पल रमा ला घालायला देऊन तिला ती परफेक्ट बसणार आणि मग हीच माझी मंगल असा निरूबाबा सिद्ध करणार >>>>>>> जणुकाहि Cinderella च.......
images.png

रमा बै गाणे म्हणत असतात , गुमनाम है कोई! ( रमाबई आधी सारेगामा व अंताक्षरीला असल्याने पूर्व जन्माची आठवण गेलेली दिसत नाहीये)

मी म्हणले भुताळीण है कोई!! ( आधीच्या भागात रमा बाई या डोळ्यांची दोन पाखरे असे निरुच्या घरात गात असतात. )

सुमन नर्स गायब व्हायच्या आधी तो महेश तिला चिडवत असतो की रमा बहुतेक मंगल आहे. मग सुमन रमाच्या खोलीत येऊन म्हणते की भूत असेल तर उठेल ही. पण रमा उठत नाही, पण तिथली रक्ताची बाटली मात्र पडुन फुटते. मग सुमन घाबरते. मग ती वॉशरुममध्ये गेल्यावर जातांना दरवाजा उघडत नाही, ती घाबरते, महेश, व बाकी लोकांना हाका मारते, कुणी येतच नाही. इकडे रमा बाई भुत् उठावे तशा उठतात.

प जो ला रामसे ब्रदर्स, झी हॉरर शो, आहट अशा दर्जेदार लोकांकडुन बोलावणे येण्याची दाट शक्यता आहे.

Pages