ग्रहण - Zee मराठीवर, १९ मार्च पासुन १०.३० वाजता, सोम-शनि.

Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22

हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.

Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother

mqdefault_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

@ दक्षिणा >>> आता डायरेक्टरला बी कळेना कुठे आणि काय दावायचे ते ... म्हणून म्हणतो डोक्याचा भुगा करू नगा

ठिक तर चाललिय मालिका. यात कोणिहि जास्त overacting करत नाहि आहे का उगीच ओढुन ताणुन प्रसन्ग घुसवत नाहि. आत्ता director काय पत्रकार परिषद घेउन सगळि स्टोरि सान्गायला पाहिजे.

ठिक तर चाललिय मालिका. यात कोणिहि जास्त overacting करत नाहि आहे का उगीच ओढुन ताणुन प्रसन्ग घुसवत नाहि. आत्ता director काय पत्रकार परिषद घेउन सगळि स्टोरि सान्गायला पाहिजे. >>> अपर्णा, तुला अस मध्येच काय झाल ग? अस कस बोलून राहयलीस तु? Uhoh

उगीच ओढुन ताणुन प्रसन्ग घुसवत नाहि>>> पण पात्रे तर ओढुन ताणुन घुसवतायत ना. आधी मन्गल, नन्तर चन्दी, सोडा Water , आणि कोण कोण.
आत्ता director काय पत्रकार परिषद घेउन सगळि स्टोरि सान्गायला पाहिजे. >>> मान्य की हि सस्पेन्स स्टोरी आहे. पण ती स्टोरी तरी निदान ढ्न्गाची असावी ना.

काल निरू रमाशी बोलता बोलता अचानक दुसरीकडेच मंगल मी येतोय असं म्हणत चालायला लागला. पजो पण सैरभैर आता Lol

पजोचा अभिनय उच्च! चेहेर्‍यावरची माशी तसुभरही हलत नाही. समोरचा आला काय नी गेला काय, ही आपली विस्कटलेल्या अवतारात तशीच ढिम्म बसुन असते. तो डॉक पण येडाच आहे. कालचा भाग पुढे जाणारा होता. पण समहाऊ पचनी नाही पडला. इन्स्पेक्टर दुसर्‍या इन ला म्हणतो की बॉडीजवळ पिशवी होती, मग ती आता कुठे आहे? ती पिशवी इकडे रमाबै डॉकला दाखवतात. नंतर तो महेश ( वॉर्डबॉय) ऑपरेशन थिएटर मध्ये रमाला बघुन बेशुद्ध होतो, आणी त्याच अवस्थेत असतो. डॉ. सिद्धार्थला त्याच्या बेड मागे भिंतीवर वाळवी दिसते.

अरे कै चाल्लंय कै?? मी पण खूप दिवसांत पाहिलीच नाहीये. मध्ये एकदा zee5 वर पाहायला सुरुवात केली पण पाच मिनिटे पण पाहू नाही शकले. फार स्लो एकदम कंटाळवाणी आहे सिरियल.

लोकप्रभाच्या 18 मेच्या अंकात, मालिका लेखक अभिजीत गुरु म्हणतो की प्रेक्षकांकडे संयम नाही आहे, त्यांना लगेच सगळे हवे असते.

आता कोण याला सांगणार की जर 2 महिन्यानंतर मालिकेचा शेंडा बुडखा कळत नसेल तर उलट प्रेक्षक खुप संयमी आहेत, नशीब मालिका बंद करा म्हणून ऑनलाईन मोहीम सुरू झाली नाही त्या सोनी च्या मालिकेसारखी.

जुदाई मधला परेश रावल मोड ऑन

ती बाथरूम मधे बंद झालेली नर्स तिचं काय झालं ?
ती वरिष्ठ नर्स तिचे काय?
रमा आता मंगल नाहिये का? चंदी पण नाहीये का?
तिच्या हरवलेल्या घर आणि मुलांना कंप्लीटली विसरलीये का?
वडगाव चे काय?
रमाच्या पापण्या बंद होत नाहीत त्याचे काय?
एवढे दिवस हॉस्पिटल मधे रमा कोणत्या आजाराच्या बेसीसवर राहतेय? मधेच सलाईन लावतात मधेच नाही?

Lol परेश रावल मोड ऑफ

अंजली_१२>>> हे सगळे प्रश्न वर तोंड करुन 'पब्लिकला पेशन्स नाही' म्हणणार्या अभिजीत गुरुच्या तोंडावर मारायला पाहिजेत. Angry

अंजली Rofl

अगदी परेश रावळ डोळ्यासमोर आला.

काल फ्लॅशबॅक दाखवल्याने बर्‍यापैकी उलगडा झाला. पण तो संपत काय मेट्रनचा प्रेमी होता की नवरा? की ज्याच्या बोल्यावण्यावरुन महत्वाची केस सोडुन मेट्रन २ तासांकरता सिरीयस पेशंटला नवख्या नर्सवर सोडुन जाते? Uhoh चूकीचे इंजेक्शन दिल्याने स्टेबल असलेली मंगल ढगात पोहोचते. बहुदा जिथे मंगल गेली तिथुनच रमा जात असेल मग मंगल तिच्यात शिरली असेल.

city hospital madhye Guru bharti jhalay, ramaachya najrechaa aanikhi ek saavaj.

>>लोकप्रभाच्या 18 मेच्या अंकात, मालिका लेखक अभिजीत गुरु म्हणतो की प्रेक्षकांकडे संयम नाही आहे, त्यांना लगेच सगळे हवे असते.

मानबा २ वर्षे बघणार्‍या प्रेक्षकांना संयम नाही? कैच्याकै... Rofl
त्याला माबो वर लिहायला सांगा .. त्याच्या संयमाच्या एक्स्पेकटेशन्स जरा रियालिस्टीक होतील. Proud

काल फ्लॅशबॅक दाखवल्याने बर्‍यापैकी उलगडा झाला. >>> काय दाखवले फ्लॅशबॅकमध्ये?

city hospital madhye Guru bharti jhalay, ramaachya najrechaa aanikhi ek saavaj >>> आ? मानबाचा गुरु तिकडे कुठे गेलाय? पण गुरुला सगळ 'चालतय की' म्हणा. Proud आता रमाने एक कराव, गुरुला आपल्याबरोबर घेऊन जाव, म्हणजे राधिकाही सुटेल.

>>आता रमाने एक कराव, गुरुला आपल्याबरोबर घेऊन जाव, म्हणजे राधिकाही सुटेल.
[तुमचा 'गुरू' वरून गोंधळ झालाय..]
पण दोन्हीही बिंडोक मालिका बंद होण्याचा हाच एकमेव मार्ग आहे! Proud

पण तो संपत काय मेट्रनचा प्रेमी होता की नवरा>>>>>>>>>> ते काय कळलंच नाही तो कशाला तिला ये ये म्हणतोय सारखा.

काल मेट्रन ढगात गेली. ती खरे सांगणार असे म्हणत होती त्या नंतर ( संपत गेल्या नंतर ) कुणीतरी दार वाजवले म्हणून उघडायला गेली. तिथे कुणी नाही म्हणून दार बंद केले तर तिचा गळा दाबुन मृत्यु होतो. तो ढोल्या जाड्या पोलीस इनस्पेक्टर प्रियंका व तिच्या मैत्रिणीवर संशय घेतो. त्या आधी रमा बै भयानक कंटाळवाणी अ‍ॅक्टिंग करत डॉ च्या गळ्यात पडतात मला सोडु नको म्हणून. काय लोचट बाई आहे ही ! नवर्‍याला शोधणे तर दूर, बाकीच उद्योग जास्त करते. आता १०० एपिची म्हणल्यावर जून मध्ये संपेल.

रमाच्या पापण्या बंद होत नाहीत त्याचे काय?>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

हे प्रकरण पण एकाच भागाकरता घुसडले होते त्या गर्दुल्ल्या लेखकाने बरं त्याही एपिसोड मध्ये अगदी निरखून बघाल तर किमान डझनावारी वेळा डोळ्यांची उघडझाप केली होती रमाने .
जर तिला खरोखरच असा आजार असेल तर पापण्या लवायलाच नको कुठल्याच एपिसोड मध्ये .पण ती बिनधास्त करतेय उघडझाप.अर्थात ही जबाबदारी लेखकाची आणि दिग्दर्शकाची कंटिन्यूटी राखण्याची पण तो गर्दुल्ल्या नशेत जर एपिसोड लिहीत असेल तर त्याला काय आठवणार मालिकेत मागे आपण काय लिहून ठेवलेय ते.

Pages