ग्रहण - Zee मराठीवर, १९ मार्च पासुन १०.३० वाजता, सोम-शनि.

Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22

हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.

Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother

mqdefault_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

काल रात्री उपवन तलावा जवळ शुटिंग सुरू होते, पल्लवी जोशी दिसली, इतर कलाकार ओळखता आले नाही.
मर्यादित भागाची असली तर उत्तम.

हे विनोदी लेखनात का आहे? नंतर इथे विनोद करायचेच आहेत म्हणून की काय?
उपग्रह वाहिनी मराठी या ग्रुपात हवं ना? >>>>>> हो ...... सहि पकडे है. उपग्रह वाहिनी मराठी तच हे टन्कायचे होते पण करायला गेले एक .......

दक्षिणा.+100000 .
सस्मित काय ऐकत नाहीये आजकाल

सस्मित आज काय सिक्सर वर सिक्सर Rofl
तिकडे भैताड वर पण मस्त कमेन्ट टाकलियेस>>>>>>>>>> Lol

सस्मित काय ऐकत नाहीये आजकाल>>>>>>>>> Happy

वर" ग्रहण बघु नये अस म्हणतात " अस वाक्य आहे म्हणजे सिरियलची निगेटिव्ह पब्लिसिटी पहिल्या प्रोमोपासुन

सीरिअल प्रोमो पासुनच गंडलीऐ.. सावली नेहमीच पायापासून सुरू होते. हे सुद्धा यांना शिकवायला हवे का >>>>> तेच तर त्याना गुढ दाखवायचे आहे.

सावली नेहमीच पायापासून सुरू होते.
>>>
तो हवेत तरंगणारा जीव दाखवलाय.

काल रात्री उपवन तलावा जवळ शुटिंग सुरू होते,
>>>>
उपवन म्हणजे ठाणे प्रेमी युगुलांचा अड्डा का..
बरंय, तिथे अशी शूटींग करून लोकांना घाबरवाल तर प्रेमी जीवांना आणखी एकांत मिळेल

येनीवेज, सध्या आमची आई डेंजर झाली आहे. म्हणजे आमच्याकडे ही सिरीअल बघितली जाईल असे वाटते.

सावलीवाला प्रोमो कुठला??
मी एक बघितला परवा त्यात पल्लवी जोशी आरशासमोर उभी राहून ग्रहणाबद्दल बोलत असते मग ती आरशासमोरुन निघून जाते तरी आरशातील तिची प्रतिमा तशीच असते. आणि ती प्रतिमा "ग्रहण पाहू नये" वगैरे काहीतरी गुढपणे बोलत असते.

थरार??? Uhoh
पण ती स्वतःच सांगतेय ना ग्रहण बघु नये म्हणतात. मग कशाला बघायचं आपण Lol

सध्याचा प्रोमो ति सिलिंगवर चालत बोलताना दाखवली आहे म्हणजे उलटी पन्ख्यासारखी
नक्की काय आहे?
एकट्याने पहावी का नाही?

दक्षिणा तुम्हाला साष्टांग नमस्कार
रात्रीस खेळ चाले ..... १०० डेज नंतर अजुनही तुम्हाला विश्वास वाटतो की झी घाबरवू शकेल.

पण ती स्वतःच सांगतेय ना ग्रहण बघु नये म्हणतात. मग कशाला बघायचं आपण >>> Lol सेम पिंच. मी बघुया का विचार करत होते पण ती पल्लवी म्हणाली बघू नये Wink

एकट्याने पहावी का नाही?> >>>>>हो म्हणजे काय दक्षिणा. एकटं असताना ह्यापेक्षा जास्त मनोरण्जन कशानेही होणार नाही. मला तर झी ही सब सारखी फक्त विनोदी मालिका असणारी वाहिनी वाटते.
रात्रीस खेळ चाले तल्या भुतानी जेवढं घाबरवलं आणि १०० डेज नी जेवढा सस्पेन्स राखला तेवढीच झी ची कुवत.

गुग्गु काय माहिती मी १०० डेज पाहिली होती पण राखेचा नव्हती पाहिली.
पल्लवी जोशी आहे म्हणून माझ्या अपेक्षा उंच झाल्या आहेत थोड्या Proud

@ दक्षिणा >> आहो झी चा आत्ताच दर्जा पहिला तर त्यांना लहानमुलांचे कार्टून प्रोग्रॅम तरी नीट करतां येतील कि नाही हि शंका आहे आणि तुम्ही काय घाबरता आहात ... पहा बिनधास्त आणि कसा वाटलं पहिला भाग ते पण सांगा ..

"झी चा आत्ताच दर्जा पहिला तर त्यांना लहानमुलांचे कार्टून प्रोग्रॅम तरी नीट करतां येतील कि नाही हि शंका आहे आणि तुम्ही काय घाबरता आहात" ~~~~~ +10000000000 Lol

Pages