बेत काय करावा- ३

Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39

प्रश्न जुनेच, धागा नवीन Happy

आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602

२. http://www.maayboli.com/node/50024

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरळीच्या वड्या, पाट वड्या - रुम टेम्परेचरला सर्व्ह करता येतील.

साचा असल्यास मिनि इडल्या त्यावर मोळगा पोडी शिंपडून थोडी सुकि मिरची कडीपत्ता हिंग फोडणी घालून न्यायचे. मायक्रोवेव्ह मधे गरम करता येतील.

भेळ / पाणी पुरी नेल्यास गरम करायचा प्रश्नच नाही. सर्व साहित्य वेगवेगेळं न्यावं लागेल

१. ढोकळा - हिरवी चटणी (मिनि इडल्यांच्या स्टँड मधे पण करता येईल)
२. मिनी ईडल्या - वेगवेगळ्या कलरच्या मिक्स
३. कॉकटेल समोसे
४. व्हेज सँडविच - हे मी केले होते एका पार्टीसाठी... थोडी हिरवी चटणी (जरा तिखट), दुसर्‍या साईडला लोणी, चीज स्लाईस, मधे काकडी किंवा बटाटा असे लावून लहान लहान त्रिकोणी आकारात कापून फॉईल ट्रे मधे छान ओळीत मांडाले.. आणि क्लिंग फिल्म ने बंद करून फ्रीज मधे ठेवले. पार्टिला नेईपर्यंत चांगले राहिले. हॉट सॉस एका बाऊल मधे ठेवू शकाल.
५. आलू टिक्की - ऑफिस पॉटलक ला केले होते. पण जरासे गरम करावेच लागतात.
६. भेळ

रगडा-पॅटिस सुचलं, तर त्यासाठी किती वाटाणे लागतील? माझ्या अंदाजाप्रमाणे ६ वाट्या तरी भिजवावे लागतील.

पनीर टिक्का (मॅरिनेटेड पनीर क्युब्ज , कांदे, रंगीत मिर्च्याचे तुकडे टूथपिक वर लावून ग्रिल करणे, ऐन वेळी मायक्रोवेव्ह किंवा अवन मधे वॉर्म करणे) , चीज पायनॅपल ( हेही आधी तयार करून नेता येतील आणि चिल्ड सर्व करायचे असल्याने गरम करणे वगैरे भानगड नाही), हे दोन्ही दिसायला मस्त दिसत दिसतात. भराभर संपतातही.

chioo, सगळ्यात सोप्पे म्हणजे वेज-पफ्फ करा
घरून पफ्फ करून न्यायचे, तिथे गेले की
गरम गरम द्यायचे...नाहीतर वेळ असेल तर्र घरून स्ट्फ्फ करून न्यायचे , त्यान्च्या ओवन मध्ये बेक करायचे... १५- २५ मि. लागू शकतात बेक ह्यायला...सोबत केचप, मिन्ट चटणी

खूप धन्यवाद. Happy मस्त मस्त सुचंवलय.

इडली, पाणी पुरी ने पूर्ण जेवण करणारी मंडळी आहेत ही. स्टार्टरला नाही पुरणार. Happy भेळ पण आमच्या गृपमधे सततच असते. काही अ‍ॅलर्जीमुळे चीज नको म्हणून सांगितलंय.

पाटवडी, पनीर क्युब्ज, ढोकळा, पफ, दाबेली हे जमण्याजोगं आहे. सुंदल काय आहे?
प्लीज या सगळ्याला सामान किती लागेल अंदाज देणार का?
६ वाट्या म्हणजे किती किलो? मी मापाला 1 dl चं माप वापरते.

हे सुंदल विसरलेच होते.
तेव्हा काही कारणाने घरात कडधान्ये वर्ज्य होती. त्यामुळे बाजूला ठेवलं आणि विसरलेच.
आता नक्की करून बघेन.
मस्त आठवण करून दिली. थँक्स.

बटाटेवडे, नारळ-मिरची-कोथिंबीर हिरवी चटणी, पुलाव, टोमॅटो सार, खवा पोळी या मेनु मद्धे गोड पोळी जास्त न आवडणार्यांसाठी पोळी/पराठा प्रकारात काय करता येईल ?
अजुन काही लागेल का या मेनु साठी ? कोशिंबीर्/सॅलड प्रकारात काय करावं?
बटाटे वडे स्टार्टर प्रकारातले असतात तसे करणार नाहिये..मुख्य मेनु पैकीच एक आहे... Happy

Submitted by chioo on 5 April, 2018 - 17:18
बटाटेवडे, नारळ-मिरची-कोथिंबीर हिरवी चटणी, पुलाव, टोमॅटो सार, खवा पोळी या मेनु मद्धे गोड पोळी जास्त न आवडणार्यांसाठी पोळी/पराठा प्रकारात काय करता येईल ?
अजुन काही लागेल का या मेनु साठी ? कोशिंबीर्/सॅलड प्रकारात काय करावं?
बटाटे वडे स्टार्टर प्रकारातले असतात तसे करणार नाहिये..मुख्य मेनु पैकीच>> मला बोलवा न. प्लेन पराठा ओवा जिरे घालून करता येइल किंवा मलबार पराठा. किंवा खव्या ऐवजी मटाराचे सारण घालून करता येइल.

सलाड पैकी: डाळिम्बाचे दाणे, ओले खोबरे, हिरवी मिरची व कोथिंबीर बारीक चिरून, मीठ व साखर थोडा लिंबाचा रस. हे आयत्या वेली मिसळा खूप मस्त दिसते व लागते. सर्व मेन्यू पॉश आहे. आवड ला. खवा पोळी रेसीपी लिहा वेगळी.

भारी आहे मेनु.

गोड पोळी जास्त न आवडणार्यांसाठी पोळी/पराठा प्रकारात काय करता येईल ? >>> मेथीचे किंवा तांबड्या भोपळ्याचे पराठे/ठेपले.

सलाड पैकी: डाळिम्बाचे दाणे, ओले खोबरे, हिरवी मिरची व कोथिंबीर बारीक चिरून, मीठ व साखर थोडा लिंबाचा रस. हे आयत्या वेली मिसळा खूप मस्त दिसते व लागते >> वाह ..मस्त वाटतोय हा प्रकार.. नक्की करुन बघीन.
सर्व मेन्यू पॉश आहे. आवड ला. >> धन्यवाद अमा Happy
मेथीचे किंवा तांबड्या भोपळ्याचे पराठे/ठेपले. >> हा ऑप्शन पण मस्त आहे... भोपळ्याचे पराठे दिसायला पण छान दिसतील ... Happy

अमांनी लिहील्याप्रमाणे प्लेन पराठा ओवा जिरे घालून करता येइल किंवा मलबार पराठा. मस्त लागेल.

कोशिंबीर म्हणून खमंग काकडी करता येईल.

पुलाव + टोसा; नाच + बव; आणि गोडात खपो हे ३/४ लोक जेवायला असतील तर ठीक. पण जास्त असतील तर काहीतरी अजून हवे.
पोळी + भाजी किंवा भरवां पराठा + लोणचं किंवा पुरी + सुकी भाजी असं काहीसं.

सत्यनारायणाच्या प्रसादाला साधारण 40 मोठी आणि 18 लहं मंडळी आहेत. बेत काय करावा. साबुदाण्याची खिचडी नक्की आहे. मागच्या वर्षी सा. खी ., ढोकळा , सामोसे आणि गुलाबजाम असा. मेनू होता. ह्या वर्षी काय करू?

थँक यु देवकी आणि ममो ताई. मला घरी करायच आहे आणि जिलेबी / कचोरी दोन्ही शक्य नाही. सो बहुतेक, सा.खी., दाबेली, सुंदल (वरच रेसिपी मिळाली) आणि नारळाच्या वड्या असा मेनू फायनल करेन. धन्यवाद परत एकदा.

साबुदाण्याची खिचडी - दही/दह्याची एकदम लाईट्ली स्पाईस्ड चटणी
ओल्या नारळाची बर्फी/लाडू
बटाट्याचा सळी चिवडा
नंतर मसाला दूध/ कॉफी
आवडत असेल तर प्लेट मध्येच एका लहान बोल मध्ये ताजी कापलेली फळे

यामध्ये साखीची तयारी आधी करून ठेवता येइल.
प्रसादाचा शिरा तयार असेलच (तो वेळेप्रमाणे मावेत जरा गरम करून देता येइल)
नारळ लाडू/बर्फी आधी करून ठेवता येईल, पीस प्रमाणे असल्याने अंदाज घेऊन बनवता येईल/ बाहेरून मागवता येईल
मसाला दूधही आधीच करून ठेवता येईल
फळांची जरा चिराचिरी होईल खरी पण हे काम आऊट्सोर्स करता येइल.

साबुदाण्याच्या खिचडी सोबत, दाबेली, जिलबी, समोसा, ढोकळा इ. प्रकार प्लेटमध्ये जरा विसंगत वाटतील असं माझं मत.

गौरी च्या हळदीकुंकवाला साधारण ३०-४० बायका आणि मुले येणार आहेत.
तर त्यासाठी एखादा छान मेनु सुचवा ना...जो आधी करुन ठेवता येइल किंवा बाहेरुन ऑर्डर करता येइल.
त्या दिवशी सगळ्यांकडे दुपारी गौरी जेवणाची पुरणपोळी असते सो जुना अनुभव आसा आहे की काही पोटभरीचं ठेवलं तर बायका नको म्हनतात किंवा डीश घरी घेउन जातात.
सो घरी पण घेउन जाता येइल डीश असा मेनु हवाय.
गोड जेवणावर काहीतरी चटपटीच समोर आलं की खावंसं वाटेल सगळ्या बायकांना असं काही .
( एक विचार आला की एखादा पाणीपुरी वाला दारात उभा करावा...बायका खुश होतील Wink हा हा हा...पण असं शक्य नाहीये )

मग मिसळ ठेवा. कोरडी मिसळ आणि रस्सा वेगळा असं पार्सल येईल. वेळेवर हवा तेवढा रस्सा टाकून गट्टम.

बरेच जण दोन सामोसे आणि एखादा गोड पदार्थ ठेवतात, डिशमध्ये. नारळाची वडी किंवा लाडू सारखा. बरेच जण डिश घरी घेऊन जातात हे बरोबर आहे स्मिता. मी घरीच घेऊन येते.

स्मिता श्रीपाद>> यापैकी एक चालतंय का बघा
कोथिंबीर वडी किंवा सुरळीच्या वड्या ?किंवा हरभऱ्याच्या डाळीची तिखट भगर ?

- पाणीपुरीचा स्टॉल तुम्हीच लावा घरी, हवं तसं घेऊन खाता येईल सगळ्यांना. जरा कुटाणा असेल पण पाहा हेल्पिंग हॅन्ड्स असतील तर सगळ्यांनाच मजा येईल
- भेळ ओली/सुकी, रगडा पॅटीस इ
कॉर्न चाट
बाकरवडी चाट

हे चाट प्रकार

बाकी हलक्या-फुलक्या प्रकारांत
इडली-चटणी (नो सांबार),
कांचीपुरम इडली - थोक्कू (लोणचं) (काँबो बहुतेक बरोबर नसावं)
सँडविच ढोकळा - चटणी
मूगभजी (?) - पातळसर चटणी
फ्रँकी

सणावाराला काय ते ब्रेडबीड, ह्याSSS... अशांकरता-
वडापाव
व्हेज-चीज सँडविचेस (हे न भाजताही सुंदर लागतात)
मिनी पिझ्झा (ब्रेड स्लाईसवरही करता येतील)

यांतले बहुतेक प्रकार आधी करून ठेवता येतील (वेळेवर गरम करणे/तळणे/भाजणे हे करता येईल)

योकु, मेन्यू छान आहे पण उत्तर आणि दक्षिण भारतीय लोकांना एकाच वेळी आवडेल आणि पोटभरीचा पण होईल असा मेन्यू शक्यतो हवा आहे. शिवाय करायला सोपा म्हणजे आखुडशिंगी बहुदुधी वगैरे वगैरे.... पण विचार नक्की करते. फळं कापून ठेवायची आयडिया छान आहे. धन्यवाद!

साबुदाण्याच्या खिचडी बरोबर फ्रुट सॅलड आणि तळलेले बटाट्याचे पापड , हिर्वी मिरची बारीक चिरुन घातलेलं दही.
वरून हवी असेल तर कॉफी.

Please suggest menu for 20 ladies .. want to serve around 11 am for Ganpati darshan ..

Pages