प्रियकर निवडताना अनेक मुलींची अक्कल गहाण का पडते?

Submitted by एक मित्र on 25 March, 2018 - 02:22

परवाच घटना घडली. मागचे बरेच महिने त्या दोघांना ऑफिसच्या आसपास एकत्र पाहत होतो. लंच अवर मध्ये किंवा ऑफिस सुटायच्या नंतर हा कुठूनसा यायचा तिथे तिला घ्यायला. आणि जायचे दोघे कुठेतरी. शंका पण अनेकदा आली होती कि इतका फालतू पोरगा आहे. सडकछाप एकदम. आणि हि इतकी हुशार आणि सुंदर. कसे काय याच्याबरोबर फिरते? शेवटी व्हायचे तेच झाले. त्याने तिला ज्यासाठी मैत्री केली होती ते करायचे ते केले आणि आता गेलाय म्हणे निघून. सापडली दुसरी कोणी एक त्याला. आणि हि इकडे गेली आहे आता डिप्रेशन मध्ये. कित्येक दिवस ऑफिसला पण येत नाही. ह्या सायकोलॉजीस्टला भेट त्याचा सल्ला घे सुरु आहे म्हणे. काही बरेवाईट करू नये म्हणजे मिळवली.

पण ह्या नुमित्ताने डोक्यात तोच विषय आला जो पूर्वीही अनेकदा आला होता. मी अनेकदा पाहिले आहे. अनेक चांगल्या मुली (दिसायला आणि कौटुंबिक स्थिती सुद्धा) जे सिन्सियर असतात, प्रामाणिक असतात, वस्तुनिष्ठ विचार करणारे असतात अशा तरुणांना फार भाव न देता कोणतरी छपरी, थापाड्या, पुढे खूप काही करणार असल्याचा खोटा आव आणणारे भोंदू, कॉनम्यान टाईप, लफडेबाज इत्यादी अशा प्रकारच्या मुलांच्याच नादी लागतात. अशा अनेकींच्या आयुष्याची पुढे होरपळ होताना मी स्वत: पाहिले आहे. माझ्या कॉलेजमध्येच अशी दोन तीन उदाहरणे झाली आहेत. अगदी चांगल्या घरातल्या चांगल्या करियरच्या मुली आहा फालतू कोणाबरोबर पळून गेल्या. त्यातली एक आज भेळपुरीच्या हातगाड्यावर नवऱ्याबरोबर काम करत आहे (तो भेटला नसता तर जी इंग्लड अमेरिकेला गेली असती), एकीने आत्महत्या केली, एकीच्या लग्नानंतर तिचे वडील त्या धक्क्याने ह्रदयविकाराच्या झटक्याने जाग्यावरच गेले. नंतर तिच्या नवर्याने पण रंग दाखवायला सुरु केले आणि तिचा सुद्धा घटस्फोट झाला व आता ती काय करते माहित नाही. कुणाच्याही संपर्कात नाही.

मला खूप खूप आश्चर्य वाटते. हि काय मानसिकता असेल? काय शेण खातात काय मुली कि जे सेन्सिबल असलेल्या कुणालाही ढळढळीत नजरेला दिसतेय जाणवतेय लक्षात येतेय ते यांना का कळू नये?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सडकछाप लोकांना एमनसी मध्ये जॉब मिळतात, त्यांचे इंग्लिश चांगले नसूनही आणि निशाचर असूनही जॉब सुखात चालतो हे वाचून सगळे सडकछाप मंत्रालयावर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत असे समजते.
>>>>>>>>>>>>

१) सडकछाप लोकांना जॉब मिळतोय याच्या विरोधात सडकछापच मोर्चा काढणार? का बरं?

२) निशाचर असणे पर्सनल बाब आहे. जो पर्यंत मी कामाच्या वेळेत डुलक्या काढत नाही कोणाला काही पडले नाही. उद्या आपल्या कंपनीतील कर्मचार्‍यांनी सिंगल असावे असा फतवा काढतील., मग काय गर्लफ्रेंडला सोडावे का?

३) ईंग्लिश म्हणाल तर कामानिमित्त ज्या एकेक फॉरेनर लोकांशी संबंध येतो ते देखील बरेचदा अश्या एकेका देशातील असतात की त्यांना ईंग्लिशचा ई देखील येत नसतो. हे आपल्याच देशात ईंग्रंजी भाषेची अजून गुलामी केली जाते. जगात सर्व देशात अशी परिस्थिती नाहीये. आज मी भारतीय आहे म्हणून मला ईंग्लिश कच्चे असण्यावरून कमी लेखले जाते. उद्या जर ईंग्रजांचा गुलाम नसलेल्या देशात गेलो तर तिथे कोणाला काही पडले नसणार. ते फक्त माझे टॅलेंट आणि टेक्निकल नॉलेज बघतील. ज्यात मी बाप आहे Happy

"हम आपके है कौन" प्रदर्शित झाल्यानंतरच्या काळात, केवळ त्या सिनेमाचा प्रभाव म्हणून अनेक मुलामुलीनी आपल्या थोरल्या भावंडाच्या लग्नात तिच्या/त्याच्या होणाऱ्या जोडीदाराच्या भावंडाबरोबर सुत जुळवून लग्ने केल्याची कैक उदाहरणे घडली होती
>>>>>

सिनेमांच्या प्रभावाखाली प्रेमप्रकरण घडत असतील तर त्या मुलामुलींची स्वत:ची अक्कल गहाण ठेवली जाते हा धागाकर्त्याचा मुद्दा योग्य म्हणायला हवे.

बाकी सिनेमांचा प्रभाव एका मर्यादेपर्यंत घडतो, घडायला हवा. त्यावरून टोक गाठणारे मग तर कुठल्याही चित्रपटांवरून काहीही बोध घेतील. मागेही डर चित्रपटातील शाहरूखचे अनुकरण करून बरेच मुलांनी मुलींना त्रास दिला असा मुद्दा एका धाग्यावर उपस्थित झालेला. पण मुळातच ती मुलेच मवाली असणार म्हणूनच त्यांनी हिरोचा आदर्श न घेता व्हिलनचा घेतला. अश्याने तर रामायणावर देखील बंदी टाकावी लागेल. काय तर म्हणे रावणाचे अनुकरण करून आमच्या बंड्याने तुमच्या बबलीला पळवले. शेवटी कथेचा नायक आपल्याला प्रभावित करतो की व्हिलन हे आपल्याच संस्कारांवर आहे. असे मला वाटते.

त्याचा बाप पिताड, शिवाय काम करायचे नाही,,,
भाऊ १०__ पासून देशी पिणारा , चोरी, जुगार, टपोरी गिरी करणे,
आणि रितेश शाळेतले नळ पासून ते सायकल पर्यंत सगळं काही चोरण्याची सवय....
घरात फक्त एक त्याची आई मात्र घर नीट चालावे म्हणून काम करत होती...
शेजारी हि तसेच वातावरण गल्लीत हि तसेच लोक.....
आणि हि मात्र चांगल्या घरातून तिथे गेलेली..... बापाने नाते तोडून दूर केले म्हणून मजबुरीत पडली होती तिथे.....आणि आपला निणर्य चुकला आहे हे तिला माहिती असून हि ती त्या काहीच करू शकत नव्हती...
उदय तूच सांग आता तिथल्या त्या घरात मुले काय शिकतील आणि संस्कार मिळतील ???

आता ह्या असल्या कौटुंबिक पाश्वभूमी असलेल्या आणि स्वतःही तसाच असलेल्या मुलाशी पळुन लग्न करुन गेली म्हणजे ह्या मुलीला तिच्या चांगल्या संस्कारी घरातुन (तुमच्यामते) काय संस्कार मिळाले होते म्हणे?? असंही म्हणु शकता. तसेच संस्कार तिच्या मुलांनाही देईल ती.

सस्मित, मुद्दा वॅलिड आहे. चर्चा करण्याजोगा आहे. घरातून पळून लग्न करणारया मुलीवर संस्कार कमी पडले म्हणावे का?

तसं काही नसतं रे. कसले संस्कार आणि कसलं काय?
गरीबी श्रीमंती, बंगला झोपडपट्टी, सडकछाप, असं काहीही नसतं ह्या केसेस मधे.
काही सो कॉल्ड चांगल्या घरातल्या मुली सो कॉल्ड वाईट परीस्थितल्या मुलाशी प्रेम करुन लग्न करतात. त्यातल्या बर्‍याच मुलींनी अगदी संसार उत्तम रीतीने सांभाळुन, स्वतः कष्ट करुन, स्वतः बरोबरच त्या वाईट्ट परीस्थितीतल्या घरालाही उत्तम स्थितीत आणलेलं, मुलांना उत्तम शिक्षण दिलेलं बघितलंय.
तसंच चांगल्या घरातल्या मुलीचं घरच्यांनी त्यांच्या मते उच्च्शिक्षित, घरंदाज चांगले संस्कार असलेल्या मुलाशी लग्न लावुन दिलं. मुलगी सहा महिन्यात नवरा गलिच्छ शिव्या देतो, मारहाण करतो म्हणुन माहेरी आली. हे ही बघितलंय.
तसंच एका चांगल्या घरातल्या मुलानं एका वाईट परीस्थितल्या मुलीशी लग्न केलं. तिने भांडण करुन त्याला व त्याच्या घराला बेजार करुन सोडलंय.

वर सारखं संस्कार, सडकछाप मुलं चांगल्या घरच्या मुलींना फसवतात असा सुर दिसत होता म्हणून मी तशी पोस्ट लिहिली होती. हे तुला सांगायला नकोच.

"सेन्सिबल असलेल्या कुणालाही ढळढळीत नजरेला दिसतेय जाणवतेय लक्षात येतेय ते यांना का कळू नये?"
==>>> पूर्वग्रहदूषित मानसिकता. सगळे पाहून सर्वानुमते समजून उमजून केलेले विवाह सुद्धा अनेकदा अपयशी ठरतात त्याचे काय? कोणताही विवाह कसा होतो त्यापेक्षा ते कोण करताहेत त्यावर त्याचे यशापयश अवलंबून आहे.

"प्रस्तुत लेखक एक highly sexually frustrated male chauvinist pig आहे."
==>>> याला व्यक्तिगत हल्ला म्हणतात. कुणाचे विचार आपल्याला आवडले नाहीत किंवा प्रतिवाद करता आला नाही कि मानसिक चिडचिड होऊन त्याच्यावर वैयक्तिक हल्ला करायचा. २०१४ पासून हि वृत्ती जास्त बोकाळली आहे या देशात.

पळून जाऊन लग्न कार्याला हरकत नाही आणि पळून गेलेले संस्कारी नसतात हे मात्र चुकीचे आहे...जोडीदार बरोबरीचा हवा .पैसे नाहीत चालेल पण कुटुंब कसे आहे, शिक्षण, आणि लग्न नंतर हा आपल्याला सांभाळू शकतो का नाही याचा तरी विचार करावा..
उदा.विनायक आहिरे आणि त्याची बायको दोन्ही हि बरोबरीचे, पैसे, शिक्षण ,घर ,सगळं सारखं... पण जातीचा लोचा होता..... गेले पळून १ वर्षांनी आले परत आता कोणालाही काही तक्रार नाही... आणि खऱ्या अर्थाने ते सुखाने संसार करत आहेत...त्याचा मुलगा चांगल्या शाळेत जातो.. वगैरे वगैरे....

पळून जाऊन लग्न कार्याला हरकत नाही आणि पळून गेलेले संस्कारी नसतात हे मात्र चुकीचे आहे>>>>>>> काय सांगता??
हरकती ना हरकती विचारत घेत नाहीत ओ प्यार मे अंधे लोगा Happy

जयवंत देसाई बहुतेक ह्यांची एक कथा आहे जुनी. एक भामटा मुलींना पटवतो. त्यांच्याशी अफेअर करतो गोड गोड बोलुन भुलवतो. लग्न करून दूर गावी जातो मुलीबरोबर. हनीमून साजरा करून मग गायब होतो तो पुढे पकडला जातो वगैरे. तर त्याची एक व्हिक्टीम मुम्बई तली तिशीच्या पुढची वर्किंग लेडी असते. हे सर्व वाचून तिची मैत्रीण तिला म्हणते की आता तुला बरे वाटले असेल. त्याला अद्दल घडली. तर ती म्हणते त्याच्याबरोबर घालवलेले ते दहाबारा दिवस माझ्याआयुष्यातले बेस्ट दिवस व रात्री होत्या. अजूनही मी त्या आ ठवणी काढत असते.

मूळ कथा चांगली विस्त्रुत आहे. तात्पर्य काय तर सद्गुणी श्रीमंत सुरेख हुषार असणे व स्त्रीला शारीरिक दृ ष्ट्या सुखी करू न समाधानी करण्याचे स्किल असणे ह्या दोन वेग्ळ्या बाबी आहेत. त्या क्षणी त्या स्त्रीला नक्की काय हवे आहे त्याव् र तिचा चॉइस ठरेल. अफेअर्स करून मग उत्तम संसार यशस्वी करणार्‍या मुली ही असतात. ती एक फेज जीवनातली संपते व मग मोह पडत नाही. संसारातले सूख कंपॅनिअ न शिप, मुले, स्टॅबिलिटी हे आवश्यक वाटू शकते. त्या क्षणी तिच्या मनात काय कॉन्फिगरेशन आहे आपल्या मेट विशयी हे कोणी डिक्टेट करू शकत नाही की
फोर्स करू शकत नाही. समजून मात्र घेउ शकतो आपण.

माझ्या मेडची मुलगी सोळा वर्शाची दहावीतच वस्तीतल्या मेकॅनिकचे काम करणार्‍या मुलाबरोबर पळून गेली. कसे तरी लग्न केले. पण आठ नौ दिवसात त्याने बेदम मारहाण केल्यावर माहेरी परत आली. तिथून सुटका म्हणून मी तिला बरोबर घेउन आले मुंबईला. परत गेल्यावर तिने शिक्षण पुढे करून, फिजिओथेरपी शिकून वगैरे नात्यातल्या मुलाशी लग्न केले संसार आहे एक मूल आहे. देअर आर सेकंड चान्सेस अँड चॉइसेस.

माझे निरीक्षण आहे.
रेल्वे,समुद्र किनारे., गार्डन्स .
जिथे ही प्रेमाची उनाड पाखरे असतात त्या ठिकाणचं.

लहान वयातील मुली ह्या लायक नसलेल्या मुलांबरोबर चाळे करत असतात.
(, लायक नसलेले म्हणजे.
दिसण्यात काही त्या मुलींच्या मानाने हँडसम नसतात,दिसताना च टपोरी दिसतात,शिक्षण घेत असतील असे पण वाटत नाही.इत्यादी इत्यादी)
पण २६/२७वर्षांची we'll educated मुली मात्र वेगळे वागतात.
त्यांचा चॉईस उत्तम असतो,प्रेमाचे नको ते चाळे त्या करत नाहीत.
त्यांचा जोडीदार पण सभ्य म्हणावा असावा च मुलगा असतो.
कोवळ्या वयात खूप मोठा मोकळा वेळ असणे,त्या वयात पालकांचे अती लाड.
कोणताच छंद किंवा आवड किंवा ध्येय नसणे .
हीच करणे आहेत ह्याला
त्या नंतर ३५ ते ४५ पर्यंत च्या स्त्रिया .
फसलेल्या दिसतात.

त्यांचा चॉईस उत्तम असतो,प्रेमाचे नको ते चाळे त्या करत नाहीत.>>>
तुम्हाला कसे माहित?

या धाग्याच्या निमित्ताने आठवले. सध्या माध्यमातून चर्चा होत असलेले प्रकरण.
मुलगी: जे. जे. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकणारी
मुलगा: एक फूडस्टॉल चालक आणि उरल्या वेळेत लाईफगार्डचे वगैरे काम करणारा

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-crime-n...

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/police-claim-that-t...

<< लहान वयातील मुली ह्या लायक नसलेल्या मुलांबरोबर चाळे करत असतात.
(, लायक नसलेले म्हणजे.
दिसण्यात काही त्या मुलींच्या मानाने हँडसम नसतात,दिसताना च टपोरी दिसतात,शिक्षण घेत असतील असे पण वाटत नाही.इत्यादी इत्यादी) >>

------ तिसर्‍या व्यक्तीस कोण लायक/ नालायक हे ठरविणारे आपण कोण असतो? प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो.
दिसण्यातला हँडसमपणा, शिक्षण ( आर्थिक स्थिती...) याला कुणी किती महत्व द्यायचे हे व्यक्ती परत्वे बदलते.

प्रेम आंधळे असते असे म्हणतात ना? Happy

तुम्हाला कसे माहित?

मला जे दिसते विविध ठिकाणी फिरताना त्या वरून .
तसा उल्लेख मी केला आहे पोस्ट मध्ये

मला जे दिसते विविध ठिकाणी फिरताना त्या वरून .>>>
तुम्हाला दिसतील अशा ठिकाणी बसून कोणी चाळे का करेल बरे?

वरून .>>>
तुम्हाला दिसतील अशा ठिकाणी बसून कोणी चाळे का करेल बरे?
भरलेल्या ट्रेन मध्ये हजारो लोकांच्या समोर चाळे करतात.
आहात कुठे.

त्या चाळ्यातून काय साध्य होते, कोणते सुख मिळते.
सेक्स ची भावना चेतवून तो अपूर्ण ठेवणे .
हा कोणता प्रेमाचा प्रकार आहे.
हा मात्र गहन प्रश्न खूप दिवस अनुत्तरीत आहे.

रोजच्या फिरायच्या वाटेवर दुष्ट कपल्स मुद्दाम चाळे करत असतील म्हणजे काका डोळे मिटून चालतील आणि पडतील..

किंवा रस्ताच वळत असेल चाळा म्हणून.

रघु.
मी तरुणच आहे ,
पण विचाराने परिपक्व..
प्रेमाचे खेळ खूप खेळलो आणि खेळत पण आहे.
मला पुरुषांची आणि स्त्रियांची मानसिकता उत्तम पने माहीत आहे.
ती पण ऐकीव नाही..
अनुभव आहेत

त्या चाळ्यातून काय साध्य होते, कोणते सुख मिळते>>>>

जेव्हा बघत फिरता तेव्हा विचारा त्यांनाच व इथेही लिहा. आम्हालाही कळेल.

अनुभव आहेत>>>
ह्या वर स्वतंत्र धागा काढुन आम्हास उपकृत करावे

जेव्हा बघत फिरता तेव्हा विचारा त्यांनाच व इथेही लिहा. आम्हालाही कळेल.

वेळ कडून अशा कपल च अभ्यास कोणी केला तर खरेच एक गोष्ट स्पष्ट होईल.
जेवण ना अगोदर starter असतो.
आणि दारू पिताना चकणा असतो.
का असतो ह्याचा अर्थ कळेल.
दोघे ही एकमेकाला फसवत आहेत हे स्पष्ट होईल.
तासोंतास रोमान्स without सेक्स.
हा प्रकार निसर्गात अस्तित्वात च नाही.
साध आणि सरळ आहे.
माणूस काही वेगळा नाही.

Pages