परवाच घटना घडली. मागचे बरेच महिने त्या दोघांना ऑफिसच्या आसपास एकत्र पाहत होतो. लंच अवर मध्ये किंवा ऑफिस सुटायच्या नंतर हा कुठूनसा यायचा तिथे तिला घ्यायला. आणि जायचे दोघे कुठेतरी. शंका पण अनेकदा आली होती कि इतका फालतू पोरगा आहे. सडकछाप एकदम. आणि हि इतकी हुशार आणि सुंदर. कसे काय याच्याबरोबर फिरते? शेवटी व्हायचे तेच झाले. त्याने तिला ज्यासाठी मैत्री केली होती ते करायचे ते केले आणि आता गेलाय म्हणे निघून. सापडली दुसरी कोणी एक त्याला. आणि हि इकडे गेली आहे आता डिप्रेशन मध्ये. कित्येक दिवस ऑफिसला पण येत नाही. ह्या सायकोलॉजीस्टला भेट त्याचा सल्ला घे सुरु आहे म्हणे. काही बरेवाईट करू नये म्हणजे मिळवली.
पण ह्या नुमित्ताने डोक्यात तोच विषय आला जो पूर्वीही अनेकदा आला होता. मी अनेकदा पाहिले आहे. अनेक चांगल्या मुली (दिसायला आणि कौटुंबिक स्थिती सुद्धा) जे सिन्सियर असतात, प्रामाणिक असतात, वस्तुनिष्ठ विचार करणारे असतात अशा तरुणांना फार भाव न देता कोणतरी छपरी, थापाड्या, पुढे खूप काही करणार असल्याचा खोटा आव आणणारे भोंदू, कॉनम्यान टाईप, लफडेबाज इत्यादी अशा प्रकारच्या मुलांच्याच नादी लागतात. अशा अनेकींच्या आयुष्याची पुढे होरपळ होताना मी स्वत: पाहिले आहे. माझ्या कॉलेजमध्येच अशी दोन तीन उदाहरणे झाली आहेत. अगदी चांगल्या घरातल्या चांगल्या करियरच्या मुली आहा फालतू कोणाबरोबर पळून गेल्या. त्यातली एक आज भेळपुरीच्या हातगाड्यावर नवऱ्याबरोबर काम करत आहे (तो भेटला नसता तर जी इंग्लड अमेरिकेला गेली असती), एकीने आत्महत्या केली, एकीच्या लग्नानंतर तिचे वडील त्या धक्क्याने ह्रदयविकाराच्या झटक्याने जाग्यावरच गेले. नंतर तिच्या नवर्याने पण रंग दाखवायला सुरु केले आणि तिचा सुद्धा घटस्फोट झाला व आता ती काय करते माहित नाही. कुणाच्याही संपर्कात नाही.
मला खूप खूप आश्चर्य वाटते. हि काय मानसिकता असेल? काय शेण खातात काय मुली कि जे सेन्सिबल असलेल्या कुणालाही ढळढळीत नजरेला दिसतेय जाणवतेय लक्षात येतेय ते यांना का कळू नये?
खेळपट्टीवर रोलर फिरवून झाला
खेळपट्टीवर रोलर फिरवून झाला आहे. प्रमुख फलंदाजांच्या प्रतिक्षेत !
खूप्प हसू आले अर्रे काय
खूप्प हसू आले
अर्रे काय चाल्लय?
दुसरे सर का मागे राहिलेत?
चित्रपट गृह ही बंदिस्त जागा
चित्रपट गृह ही बंदिस्त जागा असते.
तिथे लोक एकाच हेतू नी आलेली असतात.
चाळे बघणारे शोकिन च तिथे जमा झालेले असतात.
प्रतेक सिनेमाचा प्रेक्षक वर्ग वेगळा असतो. >> तुम्ही जाता का चित्रपटगृहात? जात असाल तर कुठल्या हेतूने जाता? आणि जाता तेव्हा प्रेक्षक म्हणून तुमचा 'वर्ग' कोणता असतो? तो वर्ग तुम्ही कसा ठरवता?
जात असाल तर कुठल्या हेतूने
जात असाल तर कुठल्या हेतूने जाता? >>> तरूणपणीच नाठीच्या वयाची परिपक्वता असलेला इसम अभ्यास, निरीक्षण आणि संशोधन याच हेतूंनी जाणार हे उघड आहे.
अभ्यास, निरीक्षण आणि संशोधन
अभ्यास, निरीक्षण आणि संशोधन याच हेतूंनी जाणार हे उघड आहे.> सध्या निरीक्षण, चिंतन, मनन सुरु असावे. या अभ्यासातून जे निष्कर्षरुपी लोणी वर येईल त्याचा प्रसाद सर्वांना मिळेलच. चिंता नसावी.
इतका ४-५ वर्षांपुर्वीचाजुना
इतका ४-५ वर्षांपुर्वीचाजुना धागा एकदम ओसंडताना दिसला म्हणून सहज डोकावले तर इथे महा हास्य जत्रा सुरु आहे!
धागा एकदम ओसंडताना दिसला
धागा एकदम ओसंडताना दिसला म्हणून सहज डोकावले तर इथे महा हास्य जत्रा सुरु आहे! Lol >>>>> हो ना. प्रचंड विनोदी प्रतिसाद !
खरं तर मुळ धाग्याचा विषय गंभीर आहे, पण मुद्दा ज्याप्रकारे मांडला आहे, त्यामुळे विषय बाजुलाच राहिला आणि नेहमीची ओचकारे चिमकुटे झालेले दिसतात. आता तर विनोदी वळण मिळालं आहे.
धागा कोतबो मधून विरंगुळा /
धागा कोतबो मधून विरंगुळा / विनोदी लेखन मध्ये हलवावा लागेल अश्या प्रकारे घोडदौड सुरूच राहिली तर !!
प्रियकर निवडताना मुली चुकतात
प्रियकर निवडताना मुली चुकतात का?
हा प्रश्न बदलून.
प्रियकर,प्रेयसी निवडताना मुल , मुली चुकतात का?
असा प्रश्न हवा.
प्रियकर /नवरा
ह्यांची निवड वेगळ्या अपेक्षा वर केली जाते .
असे मला वाटत
तसेच
प्रेयसी आणि बायको ह्यांची निवड करताना वेगळे निकष असतात.
असे पण मला वाटतं.
प्रेयसी किंवा प्रियकर शब्द वापरण्या पेक्षा जोडीदार असे संबोधने अती योग्य होईल.
कारण एका पेक्षा जास्त .
प्रियकर किंवा प्रेयसी असणारी लोक कमी नाहीत.
हे ह्या साठी सांगितले .प्रियकर हा नवरा म्हणून स्वीकारायचा च नाही तर उगाच पारख करण्यात का वेळ वाया घालवू द्यायचा.
तेच वाक्य प्रेयसी बद्धल पण same
नवरा आणि बायको यांची निवड
नवरा आणि बायको यांची निवड करताना वेगळे निकष असतात हे पटले.
प्रेयसी आणि प्रियकर (हे फारच रेट्रो किंवा लो मिडल क्लास होतंय) यांच्या साठी पण वेगळे निकष असतात हे सुद्धा पटेल.
एका पेक्षा जास्त प्रियकर/ प्रेयसी + प्रियकर वेगळा नवरा वेगळा हे खूपच क्रांतिकारी तंत्रज्ञान झाले. प्रियकर पारखून कशाला घ्यावा? कडीपत्ताच कि तो.
मायबोलीतर्फे शनिवार वाड्यावर जाहीर प्रवचन ठेवावे अशी सूचना याठिकाणी करत आहे.
प्रत्येक प्रयोगात पायलट
प्रत्येक प्रयोगात पायलट रीडिंग म्हणून एक प्रकार असतो नंतर अजुन ३+ रीडिंग घेतली जातातच. त्याप्रमाणे प्रियकर प्रियसी पारखुन घेण्याची प्रोसेस सुद्धा पूर्णपणे शास्त्रीय आधार असलेली आहे ऐसा निष्कर्ष काढण्यास येथील विवेचनात भरपूर वाव ठेवलेला आहे.
प्रियकर प्रियसी पारखुन
प्रियकर प्रियसी पारखुन घेण्याची प्रोसेस सुद्धा पूर्णपणे शास्त्रीय आधार असलेली आहे > +१
नक्किच ती शास्त्रीय पद्धत आहे
नक्किच ती शास्त्रीय पद्धत आहे.
भावनेचा हिस्सा 100%,,कधीच relation मध्ये असू नये.
कारण भावनिक नात दोन्ही बाजू नी असण्याची काहीच शास्वती नाही .किंवा सुरवातीला त्याची काही लक्षण पण दिसत नाहीत.
एकत्र राहू लागल्यावर च भावनिक गोष्टी ल जीवनात जास्त किंमत नाही हे लक्षात येते.
स्वभावाचे बाकी angle pan budhhi नी तपासून घेतले पाहिजेत.
म्हणजे वादाच्या मुध्यात कोण किती माग सरकते ह्याचा अभ्यास हवा.
ज्याला नात टिकवायचे असते तो माघार घेण्यात लाजत नाही.
शारीरिक मारहाण पर्यंत कोणाची मजल जावू शकते ह्याचा पण अभ्यास हवा.
जिथे मुध्दे संपतात तिथेच हिंसा चालू होते.
खूप सार आहे ह्या मध्ये
असंच प्लस वन दिलं होतं पोस्ट
असंच प्लस वन दिलं होतं पोस्ट वर काढण्यासाठी.
मी अशीच पोस्ट टाकली तुमच्या
मी अशीच पोस्ट टाकली तुमच्या प्रयत्नांना यश मिळावे म्हणून
धागा वर काढण्यासाठी थोडा हातभार
धागा वर काढू नका रे सारखा..
धागा वर काढू नका रे सारखा..
या अक्कल गहाण ठेवलेल्या मुली माझ्या आयुष्यात का आल्या नाहीत हा विचार करून त्रास होतो..
मी अशीच पोस्ट टाकली तुमच्या
मी अशीच पोस्ट टाकली तुमच्या प्रयत्नांना यश मिळावे म्हणून >> तुम्हाला काही नाही हो म्हटलेले. धागा वर आला कि तुम्ही तोंडाला पाणी सुटल्यासारखे सारखे सारखे प्रतिसाद देणार यात नवीन काय ?
>> प्रियकर निवडताना मुली
>> प्रियकर निवडताना मुली चुकतात का?
>> हा प्रश्न बदलून.
>> प्रियकर,प्रेयसी निवडताना मुल , मुली चुकतात का?
>> असा प्रश्न हवा.
Point to be noted!
"बायको चांगली न मिळाल्याने करीयर/आयुष्याची वाट लागली" असे अनेकदा ऐकायला मिळते. ते कितपत योग्य आहे? याबाबत व्यक्तिपरत्वे मते बदलू शकतात. विशेषत: पुरुषप्रधान व्यवस्थेत.
तुम्हाला काही नाही हो
तुम्हाला काही नाही हो म्हटलेले. धागा वर आला कि तुम्ही तोंडाला पाणी सुटल्यासारखे सारखे सारखे प्रतिसाद देणार यात नवीन काय ?>>
OMG
OMG
महाराष्ट्राची हास्यजत्रा फिकी पडेल.
इस धागे मे एक्शन है, इमोशन है, रोमान्स है, कॉमेडी है ट्रॅजेडी है
कहर म्हणजे संत सुद्धा पायधूळ झाडून गेले इथे.
चांगल्या विषयाचं मातेरं केलं
चांगल्या विषयाचं मातेरं केलं..... या धाग्यावरचे फक्त अमा यांनी निर्देश केलेले मुद्दे हे Profound वाटले.कारण त्या अशा आदिम प्रेरणेवर बोट ठेवायचा प्रयत्न करत होत्या जीआपल्यात आपण माणूस ही प्रजाती बनण्यापूर्वीपासून हार्ड वायर्ड आहे.... त्या तुलनेत आपल्या संस्कृत्या / सभ्यता आणि वेगवेगळ्या प्रदेशातील त्या संदर्भातील कंगोरे ( संस्कार, शिक्षण, इ. इ.) या केवळ काही हजार वर्षांपूर्वीच्या इम्प्रिन्ट गोष्टी आहेत. त्या जे काही बोलत होत्या that was very much aligned with Desmond Morris's book, The Human Sexes.
काय रद्दी, बत्थड धागा आहे.
काय रद्दी, बत्थड धागा आहे. 'शेण खाणे' वगैरे वाक्प्रचार वापरलेत. याईक्स!!! कोणाच्या निर्णयाचा आदर करणं इतकं अवघड जावं?
Pages