प्रियकर निवडताना अनेक मुलींची अक्कल गहाण का पडते?

Submitted by एक मित्र on 25 March, 2018 - 02:22

परवाच घटना घडली. मागचे बरेच महिने त्या दोघांना ऑफिसच्या आसपास एकत्र पाहत होतो. लंच अवर मध्ये किंवा ऑफिस सुटायच्या नंतर हा कुठूनसा यायचा तिथे तिला घ्यायला. आणि जायचे दोघे कुठेतरी. शंका पण अनेकदा आली होती कि इतका फालतू पोरगा आहे. सडकछाप एकदम. आणि हि इतकी हुशार आणि सुंदर. कसे काय याच्याबरोबर फिरते? शेवटी व्हायचे तेच झाले. त्याने तिला ज्यासाठी मैत्री केली होती ते करायचे ते केले आणि आता गेलाय म्हणे निघून. सापडली दुसरी कोणी एक त्याला. आणि हि इकडे गेली आहे आता डिप्रेशन मध्ये. कित्येक दिवस ऑफिसला पण येत नाही. ह्या सायकोलॉजीस्टला भेट त्याचा सल्ला घे सुरु आहे म्हणे. काही बरेवाईट करू नये म्हणजे मिळवली.

पण ह्या नुमित्ताने डोक्यात तोच विषय आला जो पूर्वीही अनेकदा आला होता. मी अनेकदा पाहिले आहे. अनेक चांगल्या मुली (दिसायला आणि कौटुंबिक स्थिती सुद्धा) जे सिन्सियर असतात, प्रामाणिक असतात, वस्तुनिष्ठ विचार करणारे असतात अशा तरुणांना फार भाव न देता कोणतरी छपरी, थापाड्या, पुढे खूप काही करणार असल्याचा खोटा आव आणणारे भोंदू, कॉनम्यान टाईप, लफडेबाज इत्यादी अशा प्रकारच्या मुलांच्याच नादी लागतात. अशा अनेकींच्या आयुष्याची पुढे होरपळ होताना मी स्वत: पाहिले आहे. माझ्या कॉलेजमध्येच अशी दोन तीन उदाहरणे झाली आहेत. अगदी चांगल्या घरातल्या चांगल्या करियरच्या मुली आहा फालतू कोणाबरोबर पळून गेल्या. त्यातली एक आज भेळपुरीच्या हातगाड्यावर नवऱ्याबरोबर काम करत आहे (तो भेटला नसता तर जी इंग्लड अमेरिकेला गेली असती), एकीने आत्महत्या केली, एकीच्या लग्नानंतर तिचे वडील त्या धक्क्याने ह्रदयविकाराच्या झटक्याने जाग्यावरच गेले. नंतर तिच्या नवर्याने पण रंग दाखवायला सुरु केले आणि तिचा सुद्धा घटस्फोट झाला व आता ती काय करते माहित नाही. कुणाच्याही संपर्कात नाही.

मला खूप खूप आश्चर्य वाटते. हि काय मानसिकता असेल? काय शेण खातात काय मुली कि जे सेन्सिबल असलेल्या कुणालाही ढळढळीत नजरेला दिसतेय जाणवतेय लक्षात येतेय ते यांना का कळू नये?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वंदन यांच्याशी पुर्णत: सहमत नानाकळांची आठवण झाली. Happy
असो धागाकर्त्याची लेखनशैली पाहता त्यांना खुपच फ्रस्ट्रेशन आल्यासारखे वाटते.

समजा एखाद्या मुलीचा निर्णय चुकला आणि ती ने एखाद्या टुकार मुलाशी लग्न केले, आणि कालांतराने तिला पश्चतप झाला तरी सध्याची घटस्फोट घेण्याची प्रक्रिया इतकी किचकट वेळखाऊ आहे की पूर्ण आयुष्य उध्वस्त होऊन जाते, त्यापेक्षा लवकर घटस्पोट मिळणं आणि पुनर्विवाह लगेचच होणे गरजेचे आहे म्हणजे आयुष्य उध्वस्त झाले याचा बोच कमी होईल

वंदन मस्त प्रतिसाद!
मी_ अनु, घरचे प्रॉब्लेम हा अॅंगल लक्षात नव्हता आला कधी! बरोबर आहे पण!

@संपादक, अ‍ॅडमिन: विषय किंवा मुद्दा सोडून धागा लेखकावर किंवा अन्य प्रतिसाद देणाऱ्यांवर व्यक्तिगत हल्ले करणारे सडके प्रतिसाद तसेच त्याला अनुमोदन देणाऱ्या प्रतिक्रिया डिलीट करण्यात याव्यात हि नम्र विनंती,

अन्यथा अशा प्रतिक्रिया देणाऱ्यांना प्रत्युत्तरादाखल थेट कानाखाली हाणले जाईल अशी प्रतिक्रिया माझ्याकडून येईल. तेंव्हा कृपया त्यावर आक्षेप घेतला जाऊ नये.

असंस्कृत व असभ्य कृत्यांचे समर्थन करत माझ्यावर व्यक्तिगत हल्ले झाले तर मी इग्नोर करत नसतो तर उलटे हाणत असतो.

प्रियकर निवडताना गहाण पडलेली अक्कल नंतर शुद्धी वर आल्यावर, त्या अयोग्य प्रियकर किंवा योग्य आप्रियकर ह्याला छळण्यासाठी वापरली तरी बरे

एक मित्र. हा आक्रमकपणा इथेच का? पोरींसमोर वापरायचा. एखादी तरी पटेल बघ.... तिथे तुझी फाटत असेल म्हणून इथे येऊन चिडचिड करतो. तुझा आधीचा रोडरेजवाला धागा वाचला. तिथेही तू फक्त फडफड करतो. ज्याला कानाखाली मारायचे त्याला तर मारु शकत नाही, नुसत्या बाता मारतो इथे जालावर एका फोरम वर धागा काढून.,.... फ्रस्टेटेड एमसीपी.

एक मित्र तुमचे आधीचे धागे पाहता, किंवा तुमची विचारसरणी पाहता तुमच्या प्रेयसीने तुमच्याबरोबर योग्यच केले असे वाटते. मित्र सध्या तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. थोडी विश्रांती घ्या. आणि हो शक्यतो संगत चांगली ठेवा. माझा आपला मैत्रीत सल्ला. पटल तर घ्या. Happy

पण अधिक विचार करता असे जाणवते की हा आयक्यूचा नसून ईक्यूचा दोष असावा. महिलांची भावनिक गरज हा त्यांचा वीक पॉईंट असतो. तेव्हा आपल्या कुटुंबातील महिला जर अविवाहित / विधवा / घटस्फोटित असतील तर त्यांना कुटुंबातील इतर सदस्यांनी एकटेपणा वाटणार नाही याची काळजी़ घ्यायला हवी. कुटुंबातील किमान एक तरी व्यक्ती त्या महिलेच्या इतकी जवळची असावी की ती महिला त्या व्यक्तिपाशी आपल्या मनातील सर्व नाजूक भावना मोकळेपंणी आंणि विश्वासाने व्यक्त करेल. जिच्यापाशी आपल्या आयुष्यातील सर्व रहस्ये उघड करता येतील अशी "हमराज" व्यक्ति जर एखाद्या महिलेच्या आयुष्यात नसेल तर तिची भावनिक वाताहात अगदी सहजपणे होऊ शकते. >>> +१११, This, Very Important But extremely rare. I would even say, this applies to men too. They do need someone like this as well.

>> एक मित्र तुमचे आधीचे धागे पाहता, किंवा तुमची विचारसरणी पाहता तुमच्या प्रेयसीने तुमच्याबरोबर योग्यच केले असे वाटते.

विषय काय इथे? माझी प्रेयसी??? कोण होती काय मलाच माहित नाही. कोठून शोध लावला? काय माहीत आहे तुम्हाला या आयडी विषयी? कुठून येतात राव एकेक... या आयडी चे धागे आणि त्या मागच्या व्यक्तीचे (किंवा कदाचित व्यक्तींचे?) आयुष्य यावर वेगळा धागा काढा हवे तर. इथे विषय काय?

एक मित्र.. विषयाकडे वळून तुम्हाला एक प्रश्न..
समजा तुम्हाला 2 ऑपशन्स आहेत.
1. साधीशी बहेनजी टाईप्स बोरिंग मुलगी, टिपिकल काकू. तुम्हाला माहीत आहे मनाने खूप चांगली आहे पण बोरिंग आहे.पण तुम्हाला माहीत आहे की लॉंग टर्म जाईल रिलेशन.
2. एक मॉडर्न मुलगी- मस्त एन्जॉय करणारी, इनतेरेस्टिंग conversation स्किल्स वली.. दिसायला प्रचंड सुंदर आणि तुम्हाला माहीत आहे की आपला चान्स कमी आहे लॉंग टर्म चा maybe 1% , पण सौन्दर्य असे की सगळे फिदा आहेत.

तुम्ही कोणता ऑपशन एक्सप्लोर कराल?

मला हे बोलायचा अधिकार नाही, पण जमल्यास हे भांडण विचारपुसअध्ये कॅरी ऑन करू शकाल का?
एक मित्र यांच्या धाग्यावर मुद्दे आणि चर्चा चांगली चालू आहे.बरेच वेगळे मुद्दे येतायत.त्या मुलगा वाल्या समांतर धाग्यावर पण.

एक मित्र,
रात्रि 9 10 नंतर वेमा गस्तीवर असतात,
तुम्ही काही काळासाठी थांबलात तर तुमच्यासाठीच बरे होईल असे वाटते.

अरे वातावरण फार पेटलेय. मजा जाते चर्चेची एवढ्या टोकाच्या वादांनी.
येनीवेज, खालील दोन धाग्यांचा जरूर लाभ घ्या Happy

१) नकारात्मक प्रतिसादांना सामोरे जाताना ......
https://www.maayboli.com/node/64747

२) सोशलसाईटवरच्या चर्चेत / वादात आपले डोके शांत कसे ठेवावे?
https://www.maayboli.com/node/64047

मजा जाते चर्चेची एवढ्या टोकाच्या वादांनी >>>

खूप खरं आहे. माझी इच्छाच राहिली नाही खरेतर आता इथे अजून काय या विषयावर बोलायची. घाण झाला धागा. नीच हलकट वृत्तींचा तोच छुपा उद्देश असतो आणि मी त्याला बळी पडलो याचे वाईट वाटते. आता सहज पाहिले तर इतर अनेक धाग्यांवर सुद्धा घाण केलीय याने. ट्रोल इथे पण आहेत म्हणायचे. आधी माहित असते तर बरे झाले असते.

खालील दोन धाग्यांचा जरूर लाभ घ्या >>>

हे मी अवश्य वाचेन. खूप खूप धन्यवाद मित्रा. अगदी मनापासून आभारी आहे _/\_ . इतर वाचकांची पण माझ्याकडून माफी मागतो कि हिणकस वृतींच्या डावपेचाना बळी पडून मी वाहवत गेलो आणि अन्यथा जी एक चांगली चर्चा झाली असती तीची मजा घालवण्यात माझाही हातभार लागला. Sad Sad Sad

आता काही काळ हा धागा आणि मायबोलीपासून रजा घेत आहे.

अरे वा, ईथे तर मुलांचीच आपसात भांडणे लागली आहेत.
मुलींबाबतही प्रत्यक्षात मुलांचे असेच होते, एका मुलीवरून मुलांनी आपापसात भांडायची कित्येक उदाहरणे आहेत ईतिहासात.
रामायण महाभारतही त्यावरूनच घडले आहे. गेला बाजार पद्मावत देखील Happy

<< मुली शिकायला वा करियरसाठी बाहेर पडायला लागल्या त्याला काळ उलटला. पण अनेक मुलींची वैचारिक पोहोच अजून घरगुतीच आहे असे माझे स्पष्ट मत आहे. >>
----------- शिक्षण आणि करिअर करणे या मागच्या काही दशकान्च्या काळातली प्रगती आहे. शेकडो वर्षे हात-पाय-मेन्दू करकच्च बान्धुन त्यान्ना घरातच कोम्बुन ठेवल्यावर काही दशकात त्यान्ची वैचारिक प्रगतीच्या अपेक्षा करणे अयोग्य आहे, अजुन काही दशके थाम्बा तुम्हाला त्या विडी काडीचा आस्वाद घेत, शिट्या वाजवत मुलान्ना भुरळ पाडताना दिसतील.

अमा यान्ची पोस्ट आवडली, विचार करायला लावणारी आहे.

लेखकाचा जो मूळ प्रश्न होता की मुली अशा छपरी गावगुंड मुलांना कशा वश होतात, त्यावर साधे उत्तर होते की मुलींना समजून घ्या, त्यांना प्रेम सन्मान स्वतःची ओळख द्या. ते न केल्यास काय होते हे वरच्या एका प्रतिसादात सविस्तर दिले.

टीनेजमध्ये मुलींना भिन्नलिंगी मित्र (व मुलांना मैत्रिण) हवाच असतो हे नैसर्गिक आहे. ते मान्य केलेच पाहिजे. पण तो भिन्नलिंगी मित्र कोणी प्रियकरच असला पाहिजे असे नसते. भाऊ, वडील, काका, मामा असे कोणीही मित्र होऊ शकतात. निखळ मैत्री व विश्वास जपला म्हणजे झाले. अशी मैत्री करणे जवळच्या नातेवाईकांना कठीण जाते कारण त्या विशिष्ट नात्यांच्या समाजमान्यता आड येतात. कर्तव्ये आणि भूमिका आड येतात. त्या दूर सारून आपला निर्मळ मैत्रीचा हात मुलींकडे वाढवणे, त्यांना विश्वास वाटेल असे वर्तन ठेवणे, नात्यांचा दबाव-मालकीहक्क न गाजवणे हे करावे लागते.

मी माझ्या बहिणीला बाईकवर बॅकसीटला बसवून गावभर हिंडतो, तिच्यासोबत शॉपींग ला जातो, हॉटेलींगला जातो, तिचे प्रत्येक काम करतो ही तिच्या मैत्रिणींसाठी आश्चर्याची गोष्ट होती, कारण त्यांच्यापैकी कोणाच्याही भावाला असे करणे पसंत नव्हते. (पण कोणी त्यांच्या बहिणीला प्रपोज केली की पोरं गोळा करुन त्याचे हातपाय तोडायला ते एका पायावर तयार असायचे)

नात्यांच्या बाहेरचा कोणी मित्र होत असेल तरी हरकत नसते, पण मित्र पारखून निवडण्याचीही मानसिकता विकसीत झालेली असली पाहिजे.

त्यासाठीच मुलींना लहानपणापासून स्वतःचे निर्णय घेऊ देणे, त्या निर्णयांचा फायदातोटा काय झाला हे अनुभवाने शिकू देणे हे करावे लागते. अशी सवय लागली की दोन गोष्टी होतात. एक म्हणजे मुलींना स्वतःचे निर्णय सहज घेता येतात, दुसरे म्हणजे निर्णय घेतल्यानंतर काही परिणाम होती व ती जबाबदारी आपलीच असेल ह्याची जाणीवही येते. त्यामुळे निर्णयांमधला धोका कमी होत जातो.

भावनेआधी बुद्धीने विचार करण्याची सवय लावावीच लागते. एक दिवस उठून "तुला इतकीही अक्कल नाही का, बावळट?" असा प्रश्न विचारणे चुकीचे आहे. तीने स्वतःची अक्कल चालवावी अशी परिस्थितीच तुम्ही दिलेली नसेल तर हा प्रश्न विचारण्याचा अधिकारही तुम्हाला नसतो.

नाजूक मने निगुतीने जपावी लागतात, त्यात हेळसांड, धाकदपटशा कामास येत नाही.

<<< मला खूप खूप आश्चर्य वाटते. हि काय मानसिकता असेल? काय शेण खातात काय मुली असे काय होते या मुलींबाबत कि जे सेन्सिबल असलेल्या कुणालाही ढळढळीत नजरेला दिसतेय जाणवतेय लक्षात येतेय ते यांना का कळू नये? >>>
हे जर असे लिहिले असते तर बरे झाले असते आणि प्रतिसाद पण जरा संयमित आले असते, असे वाटते.

लेखकाच्या एकंदर भावनेशी सहमत आहे, पण अशा परिस्थितीत आपण फार काही करू शकतो असे वाटत नाही. शेवटी प्रत्येकाचे नशीब.

>>लेखकाच्या एकंदर भावनेशी सहमत आहे, पण अशा परिस्थितीत आपण फार काही करू शकतो असे वाटत नाही. शेवटी प्रत्येकाचे नशीब.
सत्यवचन श्रीमान !

< त्यातली एक आज भेळपुरीच्या हातगाड्यावर नवऱ्याबरोबर काम करत आहे (तो भेटला नसता तर जी इंग्लड अमेरिकेला गेली असती), एकीने आत्महत्या केली, एकीच्या लग्नानंतर तिचे वडील त्या धक्क्याने ह्रदयविकाराच्या झटक्याने जाग्यावरच गेले. नंतर तिच्या नवर्याने पण रंग दाखवायला सुरु केले आणि तिचा सुद्धा घटस्फोट झाला व आता ती काय करते माहित नाही. कुणाच्याही संपर्कात नाही.>
ही बनवलेली उदाहरणे वाटतात.

Pages