प्रियकर निवडताना अनेक मुलींची अक्कल गहाण का पडते?

Submitted by एक मित्र on 25 March, 2018 - 02:22

परवाच घटना घडली. मागचे बरेच महिने त्या दोघांना ऑफिसच्या आसपास एकत्र पाहत होतो. लंच अवर मध्ये किंवा ऑफिस सुटायच्या नंतर हा कुठूनसा यायचा तिथे तिला घ्यायला. आणि जायचे दोघे कुठेतरी. शंका पण अनेकदा आली होती कि इतका फालतू पोरगा आहे. सडकछाप एकदम. आणि हि इतकी हुशार आणि सुंदर. कसे काय याच्याबरोबर फिरते? शेवटी व्हायचे तेच झाले. त्याने तिला ज्यासाठी मैत्री केली होती ते करायचे ते केले आणि आता गेलाय म्हणे निघून. सापडली दुसरी कोणी एक त्याला. आणि हि इकडे गेली आहे आता डिप्रेशन मध्ये. कित्येक दिवस ऑफिसला पण येत नाही. ह्या सायकोलॉजीस्टला भेट त्याचा सल्ला घे सुरु आहे म्हणे. काही बरेवाईट करू नये म्हणजे मिळवली.

पण ह्या नुमित्ताने डोक्यात तोच विषय आला जो पूर्वीही अनेकदा आला होता. मी अनेकदा पाहिले आहे. अनेक चांगल्या मुली (दिसायला आणि कौटुंबिक स्थिती सुद्धा) जे सिन्सियर असतात, प्रामाणिक असतात, वस्तुनिष्ठ विचार करणारे असतात अशा तरुणांना फार भाव न देता कोणतरी छपरी, थापाड्या, पुढे खूप काही करणार असल्याचा खोटा आव आणणारे भोंदू, कॉनम्यान टाईप, लफडेबाज इत्यादी अशा प्रकारच्या मुलांच्याच नादी लागतात. अशा अनेकींच्या आयुष्याची पुढे होरपळ होताना मी स्वत: पाहिले आहे. माझ्या कॉलेजमध्येच अशी दोन तीन उदाहरणे झाली आहेत. अगदी चांगल्या घरातल्या चांगल्या करियरच्या मुली आहा फालतू कोणाबरोबर पळून गेल्या. त्यातली एक आज भेळपुरीच्या हातगाड्यावर नवऱ्याबरोबर काम करत आहे (तो भेटला नसता तर जी इंग्लड अमेरिकेला गेली असती), एकीने आत्महत्या केली, एकीच्या लग्नानंतर तिचे वडील त्या धक्क्याने ह्रदयविकाराच्या झटक्याने जाग्यावरच गेले. नंतर तिच्या नवर्याने पण रंग दाखवायला सुरु केले आणि तिचा सुद्धा घटस्फोट झाला व आता ती काय करते माहित नाही. कुणाच्याही संपर्कात नाही.

मला खूप खूप आश्चर्य वाटते. हि काय मानसिकता असेल? काय शेण खातात काय मुली कि जे सेन्सिबल असलेल्या कुणालाही ढळढळीत नजरेला दिसतेय जाणवतेय लक्षात येतेय ते यांना का कळू नये?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वंदन यांनी लेखकाला ज्या उपमा दिल्यात त्या कदाचित वंदन यांच्या तिर्थरूपांना लागू असतील असे वाटून गेले.

धागाकर्त्याने एकंदर लिखाण अशा आविर्भावात केलंय, की जणू आत्तापर्यंत ज्या ज्या पोरीवर यांनी लायनी मारल्या, त्या त्या सगळ्या एकजात गावगुंडांना पटल्या.

खरोखर, तुम्ही असे कितीसे प्रयत्न‌ केलेतं, ज्याच्या आधारावर तुम्ही असे मुलींबद्दल तिरपागडे निष्कर्ष काढताय?

कैच्याकै बावळट लेख आहे
अशी इमपल्स मध्ये येऊन आयुष्याची वाताहत करून घेणारी उदाहरणे आहेत, नाही असे नाही पण त्याचे जे जनरलीज्ड स्टेटमेंट केले आहे ते भयानक आहे
मुली व्यवस्थित त्यांचे शिक्षण, करियर, घरची परिस्थिती या सगळ्याचा साधक बाधक विचार करून निर्णय घेताना दिसतात.

>> पण प्रत्यक्षात यापेक्षाही वाईट घडतात

+१ सहमत. शक्यतो मुली-मुलांच्या अपरिपक्व वयात (शाळा-कॉलेजचे वय. सामान्यतः आठवी ते बारावी) अशा घटना घडलेल्या पाहिल्या आहेत. वैचारिक परिपक्वता आल्यानंतर जॉब/करियर सुरु असताना असे सहसा होत नाही. त्यामुळे व्यक्तिश: मला ऑफिसमधले उदाहरण न पटण्यासारखे वाटते. बाकी चुभूदेघे.

वैचारिक परिपक्वता आल्यानंतर जॉब/करियर सुरु असताना असे सहसा होत नाही.
>>>>

याच्याशी सहमत.
पण तुम्हीही सहसा हा शब्द वापरला आहेच.
एखादी मुलगी एकलकोंडी असेल आणि तिच्यावर कोणी फोकस करून तिला भाव देऊन स्पेशल बनवले तर तेव्हाही फसू शकते. वेळीच वाचवायला अश्यावेळी फ्रेंडसर्कलही नसते.

मुळात तुम्ही म्हणाला तसे ते किस्से रचलेले असतीलही. मला फक्त एवढेच म्हणायचे होते की तरी समस्या जेन्युईन आहे. एकूण एक मुली अश्या फसणार नाहीतच. पण ज्या एक टक्का फसत असतील तर प्रमाण एकच टक्के आहे म्हणून इग्नोर तर करू शकत नाही ना एवढेच.

वर फॅमिलीकडून मिळणारया वागणुकीचा मुद्दा बरेच जणांनी उचलला आहे. तर तो ध्यानात घेऊन आपल्यातर्फे आपण आपल्या घरात असे होऊ नये याची काळजी घेऊ शकतो. माझी मुलगी वा बहिण असे करूच शकणार नाही हा गैरसमज तर कदापि नसावा..

वर उदाहरणे भंपक वाटतात असे वाचले.
अशी उदाहरणे माहित आहेत. पीचडी मुलीने ड्रायवर मुलाशी लग्न केलेले, नवरा सहकार नगर झोपडपट्टीत रहायचा. ही वेगळ्या स्ट्रॅटा मधून आलेली. लग्न केल्या वर जेव्हा दोन दिवस तिथे राहिली त्यानंतर खूप पैसे दे ऊन डिवोर्स.

अशी उदाहरणे ज्यात फसगत झाली, डिवोर्स झाले, मुलीने आयष्य्भभर सोसले, आ त्महत्या केली - माहित आहेत.
प्रेमविवाहातील सक्सेस स्टोरीज जास्त माहित आहेत पण. Happy

ले खाबद्दल काहीच बोलत नाहिये.

आजच्या तिन्देर काळात हे कॉमन आहे, आणि कोणी ब्रेकअप मुळे देवदास बनून फिरत नाही,( मुलगा असो वा मुलगी)
थोडा टाईम रडतील, लगेच मोव ऑन होतील.
कारण डेटिंग आणि रेलशांशीप साठी दुसरी ओपोर्तुनिटी लगेच available असते.

वंदन यांनी लेखकाला ज्या उपमा दिल्यात त्या कदाचित वंदन यांच्या तिर्थरूपांना लागू असतील असे वाटून गेले.
नवीन Submitted by संत तुकाराम on 29 March, 2018 - 23:15

संतु, तुझ्या बापासाठी आहेत रे त्या उपमा.

लव जिहाद, नाम तो सुना ही होगा.. समोरचा फसवायच्याच हेतूने आला आहे. फसणारे फसणारच.. >>

हे काय नवीनच ?

सडकछाप , गुंडागर्दी करणारा असला म्हणजे पोरीला फसवणारच, असला जावईशोध कुठून लावला आपण? आणि बाकीचे व्हाईट कॉलर वाले जणू धुतल्या तांदळासारखे असतात की काय?

सडकछाप , गुंडागर्दी करणारा असला म्हणजे पोरीला फसवणारच, असला जावईशोध कुठून लावला आपण?
>>>

अर्थ काढण्यात गल्लय होतेय. माझ्या विधानाचा सडकछाप वा व्हाईट कॉलरशी काहीच संबंध नाही. तर समोरच्याच्याच्या हेतूशी आहे. समोरच्याचा हेतू प्रेम न शोधता निव्वळ टाईमपास बघत सावज हेरायचा असेल तर तो त्या हिशोबानेच जाळे टाकणार आणि फसणारे फसणारच.

बाकी मी स्वतःच सडकछाप आहे, मी कश्याला त्यांना काही बोलतोय Happy

ऋन्मेष , भावना पोचल्या.

बाकी केवळ मुलाची परिस्थिती हलाखीची असली म्हणजे त्याने मुलीला प्रेमात फसवले, या समजात बरेच जण असतात. धागाकर्ता सुद्धा त्याला अपवाद नाही.

त्यातली एक आज भेळपुरीच्या हातगाड्यावर नवऱ्याबरोबर काम करत आहे (तो भेटला नसता तर जी इंग्लड अमेरिकेला गेली असती) >>
वरचे ही मुक्ताफळे म्हणजे कहर आहे. केवळ घरची गरिबी आली म्हणजे तिची जिंदगी बरबाद झाली, असे कोणीही छातीठोकपणे कसे म्हणू शकतो ?
तो कसाही असला तरी मुलीची निवड आहे, ती त्याच्याबरोबर राजीखुशी आहे ना? मग प्रश्न मिटला .
पैसा , प्रतिष्ठा काय, एका घडीचे पाहुणे. आजचा रंक बघता बघता उद्याचा राजा होऊ शकतो.

उद्या हाच मुलगा मोठ्या हॉटेलचा मालक झाला, तेव्हाही धागाकर्ता मुलीची निवड चुकली असंच म्हणणार का ?

धागाकर्ता ची तळमळ पोहोचली. भाषा नाही आवडली म्हणणार्याची गम्मत वाटली, म्हणजे अगदी अलन्कारीक वगैरे भाषा येत असेल तरच बोला आणि मनात येतय तस बोलाल तर लोकाना आवडेल असच बोला असा काय नियम आहे काय? मी अनू च्या पोस्ट्स पटल्या , अशा २ केसेस माहितीत आहे त्यमुळे ह्या चर्चेतून काही जणीना आपल्या मैत्रिण , बहिण कि.न्वा मुली ला सावरायला किन्वा योग्य निर्णय घ्यायला मदत करता आली तर बरेच आहे की.

उगीचच काय?
महालात आश्रयाला आलेल्या, भटारखान्यात झोपणार्या आणि कुठलेही स्किल नसणाऱ्या पण हँडसम शिवू ला पाहून देवसेनेला कुछ कुछ झाले आणि तिने महिश्मती च्या राजकुमाराचे चालून आलेले स्थळ नाकारले,
हे पाहून टाळ्या वाजवल्यात ना?

बऱ्याच बॉलिवूड पिक्चरची बडे बाप की बेटी आणि सडकछाप/गरीब हिरो ही थीम असते ना? हे पिक्चर तिकीट काढून हिट कोण करते? आपणच ना?
मग रिअल लाईफ रील लाईफ सारखी व्हायला लागली की गळे कशाला काढायचे?
*आशु हे इन जनरल धाग्याबद्दल आहे, तुमच्या नंतर लगेच प्रतिसाद असला तरी तुम्हाला उद्देशून नाही.

टाळ्या तर मी सर्कसमध्ये ह्या झोक्यावरून त्या झोक्यावर उड्या मारणार्‍या लवलवत्या आर्टिस्ट्सना बघूनही वाजवेन. पण मुंबई लोकलमध्ये कोणी असे अंगविक्षेप करून ह्या हँडलवरून त्या हँडलवर जाऊन धक्के मारायला लागला, तर चिडेनच. Wink

भास्कराचार्य Lol

आणि हो, प्लीज कोणी गरीब आणि टपोरी मवाली यात गल्लत करू नका..

बाकी काही नाही, अश्याने आम्हा गरीबांना पोरी पटायच्या बंद होतील Happy

राम राम
कॉलेज ला मित्र होता माझा रितेश, वडील काही हि काम करत नसे शिवाय दारू पिण्याच्या,, आई धुनी भांडी ,झाडू अशी काही मोट्या घरात कामे करायची..लहान भाऊ आणि हा कधी कधी लग्नात जेवण वाढणे ( वेटर ), घराला पेंट/पुट्टी/चुना. अशी कामे करायची कधी कधी......जुगार, भंगार चोरी, शाळा कॉलेज मधले नळ चोरणे, दारू, सगळे गुण अंगी, जागेचे नाव नाही सांगत पण नाशिक मधील एक झोपडपट्टी मध्ये राहणार तो त्याच्या गल्लीत भाई होता.... श्रीमंत घरातील सोनार ची लेक ह्या कुत्र्याने कशी काय पटवली तेच कळेना...त्यात कळस म्हणजे पळून गेले आणि ६-७ महिने कुठे तरी बाहेर गावी होते.....परत आल्या नंतर मुलीच्या बापाने तर तुझा माझा काही संबंध नाही असे सांगत कन्नी कट केली,,भाई च्या घरच्यांना तर बिना खर्च सून आणि मुलगा परत भेटल्याने काही हरकत नसावी म्हणून त्यांनी घरात घेतले......दोन वर्षांनी नंतर नाशिक ला गेलो होतो, जुन्या मित्रांना भेटलो त्यात रितेश चा विषय निघाला म्हणून संघ्याकाळी त्याच्या हि घरी गेलो एकटाच.घर कसले तेच गंज लागलेले पत्रे, वरती आणि तश्याच पत्र्याचा भिंती, खाली शेणाने सारवलेले घर, घरात मात्र ३२ इंची टीव्ही, सोफा, फॅन,असे सगळे सामान,,,आणि मनीषा दिसली तिने ओळखेल पण मी थोड्यावेळ हँग झालो होतो कॉलेज ची मनीषा आणि आता ची मनीषा फार बदल झाला होता.....चहा बनवत बनवत असताना मनीष सांगत होती रितेश जॉब ला गेला आहे.. ती पण काही तरी पार्ट टाइम करते मस्त चालाय म्हणे आमचं.....ती खुश होती का नाटक करत होती तेच कळेना मला....रितेश च नंबर घेऊन घरातून निघालो तर समोरून मनीषाचे सासरे झोखंड्या देत देत येताना दिसले,, आणि मी मनात लय मनात हिरो हिरोईन दोन्ही कसे सुखी राहतात हा अनुभव घेऊन घरी गेलो... पैसा गरजेचं नाही पण मुलांचे काय भविष्य असणार, आपण त्या झोपडपट्टी मध्ये काय संस्कार देऊ आणि मुले कशी मोठी होतील त्या घरात...ती खुश होती कि नाटक???
००७ अ

अरे संतु, मी धागालेखकला बोल्लो. ते तुझ्या बापाला बोलल्यासारखा प्रतिसाद दिलाय तु. आता मिर्ची कोणाला लागली असेल ते तुच बघ.

घर कसले तेच गंज लागलेले पत्रे, वरती आणि तश्याच पत्र्याचा भिंती, खाली शेणाने सारवलेले घर, घरात मात्र ३२ इंची टीव्ही, सोफा, फॅन,असे सगळे सामान
>>>>>>>
हल्ली झोपड्या अश्याच असतात. मुली मुलाच्या घरी जात नाही, तो नेत नाही. पण त्याचे मोबाईल, गाडी, गॉगल, घरात टिव्ही जमल्यास कॉम्प्युटर असणे या गोष्टीने मुलींना तो बरेपैकी खात्यापित्या घरचा वाटतो. आणि फसतात. जेव्हा नळाला पाणी पहाटेचे तासभर येते आणि संध्याकाळ ते रात्र वीज जाते. मच्छर रात्री झोपू देत नाहीत आणि त्या एका घरात दोनतीन कुटुंब आणि दहाबारा जण राहत असल्याने तंगड्या पसरून झोपताही येत नाहीत तिथे प्रायव्हसी तर दूरच राहिली... वगैरे वगैरे हे अनुभव घेतल्यावरच झोपडीतली गरीबी काय चीज आहे हे समजते.

<< पैसा गरजेचं नाही पण मुलांचे काय भविष्य असणार, आपण त्या झोपडपट्टी मध्ये काय संस्कार देऊ आणि मुले कशी मोठी होतील त्या घरात... >>
-------- सन्स्कार कशाला म्हणायचे ? झोपडपट्टीत रहाणार्‍यान्वर सस्कार नसतातच असा तुमचा भ्रम आहे का?

<< ती खुश होती कि नाटक??? पैसा गरजेचं नाही पण मुलांचे काय भविष्य असणार, आपण त्या झोपडपट्टी मध्ये काय संस्कार देऊ आणि मुले कशी मोठी होतील त्या घरात...ती खुश होती कि नाटक??? >>
-------- तिचे मस्त चालले आहे असे तिने सान्गितले आहे तरी तिच्यावर अविश्वास दाखवण्याचे सन्स्कार तुमच्यावर कुठे घडलेत ?

सडकछाप लोकांना एमनसी मध्ये जॉब मिळतात, त्यांचे इंग्लिश चांगले नसूनही आणि निशाचर असूनही जॉब सुखात चालतो हे वाचून सगळे सडकछाप मंत्रालयावर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत असे समजते.

>> मुळात तुम्ही म्हणाला तसे ते किस्से रचलेले असतीलही. मला फक्त एवढेच म्हणायचे होते की तरी समस्या जेन्युईन आहे.

ऑफिसमधला किस्सा बनवलेला असावा असे वाटले होते. पण नंतरच्या काही प्रतिसादांमध्ये जी उदाहरणे दिली आहेत ते वाचून स्तंभित झालो. समस्या जेन्युईन आहेच. अनेक घरांमध्ये आसपासचे ठराविक नातेवाईक वगळता मुलींना इतर जग फारसे माहित नसते. वरती अनेक प्रतिसादांमध्ये लिहिले आहे तसे घरातील वातावरण सुद्धा त्यांना फार फेवरेबल नसते. त्यातून सिनेमा/सिरीयल मध्ये दाखवतात त्याचे अनुकरण करण्यात त्यांना थ्रिल वाटते. "मै गलियोंका राजा, तू महलोंकी राणी" गाणे म्हणत नाचणारा हिरो त्यांना आपलासा वाटू लागतो. प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा तसा कोणी भेटेल असे त्यांना वाटत असते. त्यातून अनेकदा अशी लग्ने होतात.

गरीबी वा श्रीमंती याचा प्रश्न नाही. पण बऱ्याचदा सिनेमा/सिरीयल मध्ये दाखवतात त्याचे केवळ अंधानुकरण केले जाते व शेवटी भ्रमनिरास होतो. ("हम आपके है कौन" प्रदर्शित झाल्यानंतरच्या काळात, केवळ त्या सिनेमाचा प्रभाव म्हणून अनेक मुलामुलीनी आपल्या थोरल्या भावंडाच्या लग्नात तिच्या/त्याच्या होणाऱ्या जोडीदाराच्या भावंडाबरोबर सुत जुळवून लग्ने केल्याची कैक उदाहरणे घडली होती)

Pages