प्रियकर निवडताना अनेक मुलींची अक्कल गहाण का पडते?

Submitted by एक मित्र on 25 March, 2018 - 02:22

परवाच घटना घडली. मागचे बरेच महिने त्या दोघांना ऑफिसच्या आसपास एकत्र पाहत होतो. लंच अवर मध्ये किंवा ऑफिस सुटायच्या नंतर हा कुठूनसा यायचा तिथे तिला घ्यायला. आणि जायचे दोघे कुठेतरी. शंका पण अनेकदा आली होती कि इतका फालतू पोरगा आहे. सडकछाप एकदम. आणि हि इतकी हुशार आणि सुंदर. कसे काय याच्याबरोबर फिरते? शेवटी व्हायचे तेच झाले. त्याने तिला ज्यासाठी मैत्री केली होती ते करायचे ते केले आणि आता गेलाय म्हणे निघून. सापडली दुसरी कोणी एक त्याला. आणि हि इकडे गेली आहे आता डिप्रेशन मध्ये. कित्येक दिवस ऑफिसला पण येत नाही. ह्या सायकोलॉजीस्टला भेट त्याचा सल्ला घे सुरु आहे म्हणे. काही बरेवाईट करू नये म्हणजे मिळवली.

पण ह्या नुमित्ताने डोक्यात तोच विषय आला जो पूर्वीही अनेकदा आला होता. मी अनेकदा पाहिले आहे. अनेक चांगल्या मुली (दिसायला आणि कौटुंबिक स्थिती सुद्धा) जे सिन्सियर असतात, प्रामाणिक असतात, वस्तुनिष्ठ विचार करणारे असतात अशा तरुणांना फार भाव न देता कोणतरी छपरी, थापाड्या, पुढे खूप काही करणार असल्याचा खोटा आव आणणारे भोंदू, कॉनम्यान टाईप, लफडेबाज इत्यादी अशा प्रकारच्या मुलांच्याच नादी लागतात. अशा अनेकींच्या आयुष्याची पुढे होरपळ होताना मी स्वत: पाहिले आहे. माझ्या कॉलेजमध्येच अशी दोन तीन उदाहरणे झाली आहेत. अगदी चांगल्या घरातल्या चांगल्या करियरच्या मुली आहा फालतू कोणाबरोबर पळून गेल्या. त्यातली एक आज भेळपुरीच्या हातगाड्यावर नवऱ्याबरोबर काम करत आहे (तो भेटला नसता तर जी इंग्लड अमेरिकेला गेली असती), एकीने आत्महत्या केली, एकीच्या लग्नानंतर तिचे वडील त्या धक्क्याने ह्रदयविकाराच्या झटक्याने जाग्यावरच गेले. नंतर तिच्या नवर्याने पण रंग दाखवायला सुरु केले आणि तिचा सुद्धा घटस्फोट झाला व आता ती काय करते माहित नाही. कुणाच्याही संपर्कात नाही.

मला खूप खूप आश्चर्य वाटते. हि काय मानसिकता असेल? काय शेण खातात काय मुली कि जे सेन्सिबल असलेल्या कुणालाही ढळढळीत नजरेला दिसतेय जाणवतेय लक्षात येतेय ते यांना का कळू नये?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तसे नाही. दोन मुद्दे आहेत:

१. जेंव्हा मुलगी "दुसर्या कुणाची" आहे तोवर "आपल्याला काय करायचे" अशी भूमिका. पण आपल्याच नात्यातल्या कोणी मुलगी (मुलगी, बहिण, कझिन, चांगली मैत्रीण इत्यादी) असे केले तरच आपल्याला फील होणार का?

२. मी सांगणार नव्हतो पण आता सांगतो: कॉलेजमध्ये एक मुलगी माझी खूप जवळची मैत्रीण होती. प्रेम वगैरे नवहते. पण मला का कुणास ठावूक वाटत होते मला ती विचारेल वगैरे. पण प्रत्यक्षात एका सडकछाप फालतू मुलाबरोबर तिचे जमले व पळून जाऊन त्यांनी लग्न केले. म्हणजे माझ्यापेक्षा तो तिला जास्त पसंद पडला. तेंव्हापासून हि बोच मला आयुष्यभर सतत जाणवते. जेंव्हा जेंव्हा अशा घटना घडतात किंवा अशी Odd कपल्स आडबाजूला कुठतरी बोलत जरी बसलेली दिसली तरी मला त्या वेदना होतात. हे कारण आहे.

शेवटच्या पॅरामधली भाषा नाही आवडली. >>> +१
मुळात प्रॊब्लेम मुलींच्या मानसिकतेचा नाही. सडकछाप मुलांच्या मानसिकतेचा आहे.

अशी मुलं बोलबच्चन असतात.
बोलतो त्याचाच माल विकतो.
मग प्रेमप्रकरण असो वा बॉलीवूड वा राजकारण.. ढांचे देता आले पाहिजेत मोठाले. स्वत:चे मार्केटींग जमायला हवे.

आता प्रतिसादातच तुम्ही तुमच्या प्रकरणाबद्दल लिहिलेय बघा...

<<< पण मला का कुणास ठावूक वाटत होते मला ती विचारेल वगैरे. >>>>

मुलगी आपल्याला विचारेल याची तुम्ही वाट बघता.. धन्य आहात..
अहो तुम्ही स्टॅन्डर्ड असा वा सडकछाप ..
पण पुढाकार घ्या आणि त्या मुलीला असे फिल करून द्या कि ती तुमच्यासाठी या जगातली सर्वात स्पेशल व्यक्ती आहे, आणि तुम्ही तिच्यासाठी काहीही करू शकता..
हा आणि हाच मुलीचे मन जिंकायचा बेसिक फॉर्म्युला आहे. जे त्यांना समजले असते पण तुम्हा लोकांना समजले नसते.

बाकी मलाही अश्या फॉर्म्युलांना भुलणारया मुलींबद्दल वाईट वाटते.

ज्याचा त्याचा चॉइस.
कधी कधी घरात अति शिस्त, ट्रबलड़ चाइल्डहुड किंवा आईबापाची भांडणे, लैंगिक शोषण असेल तर लग्न/ अफेयर है ' जस्ट वांट टू गेट अवे, आताचे, लाइफ बकवास आहे, नवे वाले मिळते ते पटकन घ्यावे आणि बाहेर पडावे, चांगले/वाइट नंतर बघता येईल असा काहीसा विचार असतो.बऱ्याच मुलींच्या तोंडून 'माझी आईच इतकी स्ट्रिक्ट आणि कटकटी आहे की सासू काहीच वाटणर नाही' अशी वाक्यं मजेत बोललेली ऐकलेली असतील.अश्या वातावरणात असल्यास अगदी छोटे ग्राटिफिकेशन/अटेंशन देऊन कोणीही मुलगा मनात जागा मिळवू शकतो.

आमचा एक सरकास्टिक मित्र नेहमी म्हणत असतो.बघा आम्ही लाईन मारणाऱ्या मुलांनी प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवायची किती मोठी ड्यूटी केलिय.आम्ही नसतो तर या पोरिंचा आत्मविश्वास, सुधारलेले ड्रेसिंग हे सर्व बदल कसे झाले असते?

खरं तर आयुष्याची २५ वर्ष मनासारखी गेलेली नाहीत म्हणून ४५ किंवा ५० वर्षाचे कॉन्ट्रेक्ट असलेले ब्लाईंड डील पहिल्या झटक्यात स्वीकारणाऱ्या मुलींचे काउंसेलिंग नक्की व्हायला हवे. इश्क पर जोर नहीं, पण आपल्या साठी योग्य अयोग्य, सभोवताल चे वातावरण याचा पूर्ण विचार न करता जो चॉइस आपण फक्त कश्यापासुन तरी लांब पळायला डोळे झाकुन स्वीकारलाय तो आयुष्याच्या उतरत्या वर्षाना रिग्रेट नक्की देणार.

शेवटच्या पॅरामधली भाषा नाही आवडली. >>>
थोडी स्त्रोंग भाषा झाली आहे पण घरची माणसे, नातेवाईक इतरांना असल्या मुलींमुळे जो त्रास होतो त्याचा पण विचार करावा. तोंड दाखवायला जागा राहत नाही अनेकदा.

मुळात प्रॊब्लेम मुलींच्या मानसिकतेचा नाही. सडकछाप मुलांच्या मानसिकतेचा आहे.>>>
हे कसे काय. त्या मुलांची ती वृत्ती ते तसेच वागणार. दे आर लाईक दयाट. निर्णय घेणारीला अक्कल हवी ना.

हा आणि हाच मुलीचे मन जिंकायचा बेसिक फॉर्म्युला आहे>>>
उशिरा भेटलात. पण धन्यवाद. पटले मला. लक्षात ठेवेन फॉर्म्युला. _/\_

@mi_anu आपला मुद्दा अतिशय योग्य आहे. चांगल्या चांगल्या म्हणवल्या गेलेल्या कुटुंबात आत काय सुरु असते कसे वातावरण असते हे आपण सांगू शकत नाही. कदाचित त्यामुळे मुली असे करत असतील. घाईने बाहेर पडायचे पण ज्याबरोबर जातोय त्याची काय लायकी आहे त्याबाबत विचार पण नाही इतकी यांची मती कुंठीत झालेली असते. पण अनेकदा मुलींची काहीतरी विचित्र फॅंटसी असते असे पण एक मत ऐकले आहे. कि त्यांना असलीच मुले आवडतात. म्हणजे केवळ नाईलाजाने नव्हे तर विचित्र फॅंटसीमुळे त्या अशा मुलांकडे आकर्षित होतात. मी शाळेत असताना एका प्रसिद्ध डॉक्टरच्या मुलीने केस कापायचा व्यवसाय करणाऱ्या मुलाबरोबर पळून जाऊन लग्न केले होते ते प्रकरण तेंव्हा खूप चर्चेत होते. हिच्या कॉलेजला जायच्या यायच्या वाटेवर केस वाढवून गॉगल घालून स्टाईलमध्ये सिगारेट फुंकत उभारणे हेच साहेबांचे कर्तृत्व. काय बोलणार आता यावर.

दरेक ठराविक कालावधीनंतर पेपरात बातमी येते फेसबुक नाहीतर मॅट्रिमॉनियल साईटवरुन ओळख झाली आणि महिलेने / तरुणीने मोठी रक्कम अज्ञात इसमास दिली. बरे ही रक्कम देखील लाखोंंच्या घरात असते आणि देणार्‍या महिलाही इंजिनीअर / डॉक्टर / एम्बीए अशा उच्चशिक्षीत असतात. त्याउलट त्यांना उल्लू बनविणारे पुरुष अनेकदा साधे पदवीधरदेखील नसतात. खरेच मलाही अनेकदा प्रश्न पडतो की मोठमोठ्या अवघड परीक्षा पास करंणार्‍या या मुलींचा आय्क्यू याबाबतीत एकदम इतका कसा काय घसरतो? पण अधिक विचार करता असे जाणवते की हा आयक्यूचा नसून ईक्यूचा दोष असावा. महिलांची भावनिक गरज हा त्यांचा वीक पॉईंट असतो. तेव्हा आपल्या कुटुंबातील महिला जर अविवाहित / विधवा / घटस्फोटित असतील तर त्यांना कुटुंबातील इतर सदस्यांनी एकटेपणा वाटणार नाही याची काळजी़ घ्यायला हवी. कुटुंबातील किमान एक तरी व्यक्ती त्या महिलेच्या इतकी जवळची असावी की ती महिला त्या व्यक्तिपाशी आपल्या मनातील सर्व नाजूक भावना मोकळेपंणी आंणि विश्वासाने व्यक्त करेल. जिच्यापाशी आपल्या आयुष्यातील सर्व रहस्ये उघड करता येतील अशी "हमराज" व्यक्ति जर एखाद्या महिलेच्या आयुष्यात नसेल तर तिची भावनिक वाताहात अगदी सहजपणे होऊ शकते. अगदी विवाहित महिलादेखील पतीला स्वतःचा हमराज समजत नसेल तर काय होते ते बी आर चोप्रांनी त्यांच्या चित्रपटात फार परिणामकारकरीत्या दाखविले आहे.

Opposite poles attract each other.....
जो उनाड मुलगा इतर कोणालाच जुमानत नाही तो माझ्याच भोवती फिरतोय ही भावना भल्या भल्या मुलींच्या अकलेवर पडदा पाडते. अशा मुलांना आपण प्रेमाने सुधारू शकतो असे त्यांना वाटू लागते पण बिचाऱ्या स्वतःचे आयुष्य बरबाद करून ठेवतात.
उदाहरणे आहेत पाहण्यात.
खूप वाईट वाटते त्यांच्याबद्दल.

<< काय शेण खातात काय मुली कि जे सेन्सिबल असलेल्या कुणालाही ढळढळीत नजरेला दिसतेय जाणवतेय लक्षात येतेय ते यांना का कळू नये? >>
-------- हे कशासाठी ? अजिबात आवडले नाही.

तुमच्या ढळढळीत नजरेला जे दिसते आहे, जाणवते आहे तसेच जग असायला पाहिजे असे नाही. तुमच्या नजरेला, जाणतेपणाला मर्यादा आहेत किव्वा त्या अपरिपक्व आहेत.

कायद्याने सज्ञान मुलीन्ना त्यान्चा जिवनसाथी निवडण्याचा १०० % अधिकार आहे.

<< म्हणजे माझ्यापेक्षा तो तिला जास्त पसंद पडला. >>
----- हे असे माझ्यापेक्षा असे काही नसते, प्रत्येक व्यक्तीजवळ काही तरी चान्गले अस्ते, किव्वा कुठेतरी कमी असते. आपण कुठे, किती पातळी पर्यन्त तडजोड करु शकतो याचा प्रत्येकाने आपापल्या परिने विचार करावा.

तुमची भाषा बिल्कुल नाही आवडली अन विचारही नाही पटले.

काही मुलींचे निर्णय चुकत असतीलही पण म्हणून असे बोलणे योग्य नाही. अन निर्णयांचे म्हणाल तर ते कोणाचेही चुकू शकतात , म्हणून तर सर्व काही नीट पारखून केलेली लग्न सुद्धा तुटतात, अन इतरांना जे चुकीचे वाटते , आवडत नाही अशी जोडपी सुद्धा सुखाने संसार करतात.

माझी एक मैत्रीण आहे, खूप सुंदर , संस्कारित , तिनेही अश्याच एका मुलाशी लग्न केले, ज्याच्या सुधारणेची आशा त्याच्या आईवडील यांनी सुद्धा सोडली होती. अन तिला सगळे माहित असून सुद्धा फक्त त्याच्यावरच्या प्रेमाखातर तिने त्याच्याशी लग्न केले, तेही पळून जाऊन, सर्वांचा विरोध पत्करून. आणि आज ते दोघेही सुखाने संसार करतायेत.

तुमची भाषा बिल्कुल नाही आवडली अन विचारही नाही पटले. > +१००००००००००००००००००००००

प्रस्तुत लेखक एक highly sexually frustrated male chauvinist pig आहे.

तुमच्या नजरेला, जाणतेपणाला मर्यादा आहेत किव्वा त्या अपरिपक्व आहेत. >>>

सडकछाप मुलाशी लग्न करणे ह्याला तुमच्या दृष्टीने वैचारिक परिपक्वता म्हणतात का? तसे असेल तर मुली जाण्यायेण्याच्या रस्त्यावर टिंगलटवाळी करत उभे राहणे म्हणजे सभ्यपणाचे मानत असाल.

तुमची भाषा बिल्कुल नाही आवडली अन विचारही नाही पटले. >>>

मी भाषा सौंदर्य दाखवण्यासाठी लिहिलेले नाही जे मी ललित लिखाण खाली लिहू शकलो असतो. माझ्याच पाहण्यात इतक्या मुलींची वाट लागली आहे तर प्रत्यक्षात कितीतरी मुली अशा बळी पडल्या असतील. भाषा चांगली किंवा वाईट वापरल्याने ह्या समस्येचे गंभीर स्वरूप बदलणार नाही. विचार करून घेतलेले निर्णय चुकतात हे मान्य आहे पण ते "विचार करून" घेतलेले असतात. अविचाराने नव्हे. मुली शिकायला वा करियरसाठी बाहेर पडायला लागल्या त्याला काळ उलटला. पण वैचारिक पोहोच अजून घरगुतीच आहे. रस्त्यावर शिट्ट्या मारत फिरणारी मुले काय काय धंदे करत असतात यांच्या गावीही नसते. त्यांचे काय उद्देश असतात ते हि यांना कळत नाही कारण घरी ते विषय चर्चिले जात नाहीत आणि यांचे जग मर्यादितच राहते. त्याच नजरेने सर्वाना मापायला सुरु करतात. मग तो करियर च्या मागे लागलेला होतकरू मुलगा असो किंवा सिगारेट फुकट आणि गुटखा थुंकत रस्त्याकडेला उभारलेला भम्पक कोणी असो, या एकाच नजरेने बघतात. कारण दुसरे जगच माहित नसते.

प्रस्तुत लेखक एक highly sexually frustrated male chauvinist pig आहे. >>>

हि प्रतिक्रिया रात्री बारा पंचेचाळीसच्या आसपास लिहिलेली आहे त्यामुळे समजू शकतो. उतरली असली तर सांगा मग आपण बोलू पुढे. अन्यथा असंबंध बडबड करण्यासाठी एखादा वेगळा धागा काढा आणि रात्रीबेरात्री टाकून आलात कि तिकडे बरळा काय बरळायचे ते.

या आणि मुलांनी मुले निवडण्याच्या दोन्ही धाग्यात थोडे तथ्य आहे.

आत्मविश्वासाने आपल्याला आवडलेल्या कर्तबगार मुलावर प्रेम करणे, प्रेम शेवटपर्यंत न्यायला फायनान्शियल आणि बिहेव्हियरल प्लॅन्स असणे वेगळे आणि फक्त डिप्राइव्ह्ड फॉर अटेन्शन, लव्ह, काईंडनेस म्हणून प्रपोज आणि शो ऑफ करणार्‍या पहिल्या मुलाला हो म्हणून लग्नाच्या वेळी कोणताही प्लॅन जवळ नसल्याने घरच्यांना दुखावून पळून जाणे/नंतर जवळ पैसे नसणे/घरच्यांची मर्जी राखायला कोणत्यातरी चांगल्या पंटर शी लग्न करुन त्याला सतत दुखावत राहणे/पूर्ण जगाला रिजेक्ट मारून दोघांनी विष खाणे वेगळे.

सध्याची पिढी बरीच विचारी आहे, व्हॉटसप फेसबुक मिडीया मुळे वेगवेगळ्या विचारांचे वाचन आहे. दे विल चूज वाइजली. कोणाही पपलू ला त्याने प्रेम व्यक्त केले म्हणून लगेच मनोमन जीवनसाथी मानणार नाहीत. दे विल कीप ५ पीपल इन फ्रेंडझोन, नॉट कमिट,अँड देन गेट मॅरीड टू गुड वेल सेटल्ड ६थ बॉय.

पहिली : फोनवर खुप वेळ 'माझ्या शोन्याने breakfast काय केला, माझं पिलु किती वाजता झोपलं?' इ इ झाल्या वर फोन ठेवला
दुसरी: अय्या नविन बॉयफ्रेंड वाटत.
पहिली: हो, हे बघ लवासाचे पिक्स,
दुसरी : हा तर तोच आहे ना टपरीवर गुटख्याच्या पुड्या घेताना शिटी मरणारा:
पहिली : हो, पण त्याला एकदा BMW ची काच खाली करुन थुंकताना पहिला, मग आवडला. गुंठा मंत्रीये तो.

अहो हे जास्त करून हार्मोन्स व अवेलेबिलिटीवर अवलंबून आहे. हार्मोन्स अ‍ॅक्टि व असताना जो समोरुन मी उपलब्ध आहे असा प्रतिसाद देइल त्याला ती वश होणार. तुमचे सिग्नल कमी पडले असतील दुसृयाचे त्या परिस्थितीत त्या क्षणाला स्ट्रॉन्ग असतील. त्यामध्ये सुद्धा. खरा दणकट बळकट मुलगा व आर्थिक बाबीत सुस्थितीत असलेला व गोड मनाचा सेन्सिटिव इत्यादि मुलगा ह्यात फार फरक आहे. नॅचरल सिलेक्षन मध्ये ती पाप्याच्या पितर शरीर व्यक्ती कडे आक र्षि त होणार नाही. प्रत्येक स्पेशीत नराला काही वेगळे दिलेले असते जे ह्या सिलेक्षन कालावधीत वापरून नर बेस्ट पॉसिबल फीमेल आपल्याला वश करून घेतात. मुंबईत असलात तर फक्त कबुतरांकडे पंधरा मिनिटे बघितलेत तरी लक्षात येइल प्रियाराधन काळात नर कायम मान फुगवून फीमेलच्या मागे मागे फिरत असतात.

एक् मोठे नैसर्गिक जाते आहे त्यात सर्व भरडले जातात तुमचा व तिचा काहीच दोष नाही. पण तुम्ही मुलीने शेण खाल्ले असे जजमेंटल बोलायला नाही पाहिजे. तिला ते हवे असेल तेव्हा तर सिलेक्ट करायचा तिला पूर्ण हक्क आहे.
श्रिखंड बोअर होउ शकते.

शारिरिक आकर्ष्न्ण हा भाग काहि मुलिंमध्ये जास्त असू शकतो मराठिइत चेमिस्त्री म्हनतात. शिवाय घरात आइला सतत मिलणारि दुय्य्म वगणूक, भावापेक्शा मिलणारि दुय्य्म वागणूक, boyfriend ने दिलेला अति-भाव, तेव्ध्या लहान कालासथि का होइना पन राणि वातल असेल, I owe him something for treating me with such a respect, importance for my opinion अशि भावना एक्दा मुलिच्या मनात आलि कि झाल लग्न / कोफि जे काहि तिला परतफेड म्हनून करावस वातेल ते. शिवाय कुठेत्री अन्धूक / मोठि आशा असेल कि लग्नानंतर पन अस्च राणिइसारखे ठेवेल. शेवटि लग्न म्हन्जे gamble मग ते त्यात्ल्यत्यत जो वर्तमानात तिच्यशि चन्गाला वागतोय ति best bait नाहि का?
sometimes or most times its not really about a boy, its about her family.

As you can see I am learning to speak on laptop (without google indic) on chrome. Please excuse. Editing is making it worst. If can't read, ignore.

sometimes or most times its not really about a boy, its about her family.

हो माझा हाच मुद्दा आहे.

sometimes or most times its not really about a boy, its about her family>>>>>

हे प्रत्यक्ष होताना पाहिलेय जवळच्या नात्यात. एक उमलते आयुष्य वाया गेले, आज आईवडीलांच्या आधाराने जगतेय कशीबशी. तो आधार 25 वर्षापूर्वी याच आईबाबांनी दिला असता तर आज ती मुलगी अतिशय वेगळे आयुष्य जगताना दिसली असती.

most times its not really about a boy, its about her family.

--- कॉलेजात असतांना जेवढ्या काही मुली प्रेमात पडतांना पाहिल्या त्यांच्या घरी प्रॉब्लेम्स होते. राजसी म्हणतात त्याच्याशी पूर्ण सहमत आहे.

माझं ऑब्झर्वेशनः
१. मुलींच्या घरी समस्या असतात. कोणी कोणाला महत्त्व आदर देत नसतं. घरी आईवडीलांत बेबनाव असतो. भांडणे असतात. मुली टिनेजमध्ये असतांना आईवडील चाळीशी क्रॉस केलेले असतात. त्यांच्यातही नैसर्गिक हार्मोनल बदल झाल्याने संबंधात एक अघोषित तुटकेपणा असतो. अनेक केसेस मध्ये वडिलांची बाहेरख्यालीसुद्धा प्रामुख्याने आढळली आहे.

२. मुलीच्या घरी आईला व एकूणच स्त्रीजातीला दुय्यम कस्पटासमान वागणूक. त्यांची कोनतीही मते विचारात न घेणे. कोणत्याही निर्णयात त्यांना सहभागी न करणे. किमान साधं काय आवडतं हेही न विचारणे. त्यामुळे बाहेरता कोणी आपल्यासाठी इतकं झुरतो, मरतो हे स्पेशल होऊन जातं.

३. टिनेजमध्ये नैसर्गिकरित्याच बंडखोरी रक्तात असते. प्रचलित प्रथा, मान्यता मोडून नवीन पायवाट धुंडाळणे हे नैसर्गिक अस्ते. त्याचमुळे आईवडिलांशी (जे आधीच्या पिढीतले) बेबनाव होणे सामान्य असते. त्याचमुळे समवयस्क बंडखोर मुलांकडे ओढले जाणे सामान्य असते.

३. नैसर्गिक ओढ. नैसर्गिकपणे शामळू नरांपेक्षा आक्रमक नर प्रेफर केले जातात. सामाजिक संकेत हे नैसर्गिक प्रेरणेला दाबू शकत नाहीत. त्यामुळे बिन्धास्त, बेफिकीर मुलांकडे मुली आकर्षित होतात. एक मित्र सारखे शामळू लाजाळू मुले मुलींच्या रडारमध्येही दिसत नसतात.

४. ज्या मुलींच्या घरी त्यांना आदर सन्मान दिला जातो, त्यांच्या हक्कांची पूर्ण काळजी घेतली जाते. स्वतंत्र व्यक्ती म्हणून वागवले जाते त्या घरच्या मुली पटणे कठीण असते. त्या मुलीसुद्धा प्रेमविवाह करतात पण क्षणिक आकर्षणात वाहून न जाता आपल्या साठी काय योग्य अयोग्य हे त्या ठरवू शकतात, कारण त्याची त्यांना आयुष्यभर सवय असते.

आता निर्णय चुकतात, काही काळाने काही जणांचे एकमेकांशी फाटते.

स्वतःला संस्कारी, पापभिरु समजणारी व त्यामुळे मुलींना स्वतःहून प्रपोजही न करु शकणारी मुले (व ज्यांना कोण्याही मुलीने कधी स्वतःहून प्रपोज केलेलाही नसतो) ही कळपातले ते प्राणी असतात ज्यांना नॅचुरल सिलेक्शनच्या नावाखाली बळी जाणे अपेक्षित असते. अशांची संतती वाढूच नये अशी निसर्गाने स्वतः व्यवस्था केली होती. पण नालायक मनुष्याने सामाजिक व्यवस्था व अरेंज मॅरेज नावाची अनैसर्गिक व्यवस्था तयार केल्याने ह्यांच्यासारखे लग्न करुन पोरं काढू शकतात.

मला विचारले तर म्हणेन की फक्त सरकारी नोकरी आहे, रग्गड दोन नंबरची कमाई आहे, घराणं पैसेवालं(पण मुलगा निकम्मा) म्हणून काळ्या ढुस्स, बेढब आणि थोराड, बावळट आणि मंद नरांच्या गळ्यात सोज्वळ सुंदर नाजुक २०-२२ वर्षीय कोवळ्या हुशार देखण्या पोरी बांधतांना असले लेखात प्रसवलेले विचार प्रसवतांना कोणाला कधीच बघितले नाही. त्याचे काय?

-स्वतः मोजून सतरा प्रेमप्रकरणे केलेला वंदन -
सोळा प्रकरणे घरचे तयार होणार नाहीत म्हणून फिस्कटली - सतरावे प्रकरण चौथ्या मुद्द्यातले होते म्हणून जमले Happy

तर वरच्या दिर्घ प्रतिसादाचे सार असे: की मुलींनी काय निर्णय घ्यायला हवेत हे ठरवण्याआधी मुलींना लहानपणापासून कसे वागवले पाहिजे हे बघा. आपल्यात खोट असते, आपण दुसर्‍याला दोष देण्यात अर्थ नसतो. मुलीने मर्जीबाहेर लग्न केले म्हणून हार्ट अटॅकने मरणारा बाप व तिचा मर्डर करणारा बाप एकाच लेवलचे आहेत. त्यांना मुलीच्या सुखापेक्षा स्वतःची खोटी प्रतिष्ठा जास्त प्रिय असते.

की मुलींनी काय निर्णय घ्यायला हवेत हे ठरवण्याआधी मुलींना लहानपणापासून कसे वागवले पाहिजे हे बघा.

या वाक्याशी एकदम ११०% सहमत आहे.

Pages