शिस्त, लाड आणि उन्माद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 January, 2018 - 05:21

हल्ली बर्ड्डे पार्टी म्हटले की मजा असते. पोरं पाच, दहा, पंधरा अशी राऊंड फिगर वयाची झाली की आपल्या ऐपतीनुसार मोठा बड्डे सेलिब्रेट केला जातो. एक छानसे गेट टू गेदर होते. त्यातही मोठ्यांपेक्षा लहानग्यांचा मान जास्त असल्याने एकंदरीत धमाल वातावरण असते. त्यामुळे लग्नावर लाखो उधळण्यापेक्षा अश्या बड्डेजवर हजारो उधळलेले मला जास्त वसूल वाटतात. येनीवेज, ज्याची त्याची आवड..

तर रविवारी अश्याच एका बड्डे पार्टीला गेलो होतो. एका क्लबच्या हॉलमध्ये शंभरेक जण बागडतील ईतक्या जागेत दंगा चालू होता. गेम्स, जादूचे प्रयोग, सेल्फीज, केक कटींग, जेवण वगैरे ऊरकले आणि अचानक स्टेजच्या ईथून फाट फाट् फाट् असा आवाज येऊ लागला. आधी वाटले शॉर्ट सर्किट झाले की काय. मग लक्षात आले की सर्व मुले फुगे फोडत होते. प्रत्येकाच्या हातात सुई सारखी अणुकुचीदार वस्तू होती, फुग्याला स्पर्श करतात फट् करत तो फुटत होता. एकाच वेळी आठदहा मुले. नुसते फटाक्यांची माळ लावल्यासारखा आवाज येत होता. धमाल चालू होती. खालच्या लेव्हलवरचे फुगे पाचच मिनिटांत संपले तसे त्यांनी वर लटकावलेल्या फुग्यांच्या माळा खेचायला सुरुवात केली. ते पाहून डेकोरेशनवाली मंडळी ते फुगे वाचवण्याचा व्यर्थ प्रयत्न करू लागले. मग माझ्या लक्षात आले की हेच फुगे ते पुढच्या पार्टीला वापरत असतील. आता या फुग्यांचे पैसे लावतात की भाडे लावतात याची कल्पना नाही. पण त्यांच्या प्रॉफिट मार्जिनमध्ये नक्कीच असा फुग्यांचा पुनर्वापर गृहीत धरला असणार. त्यामुळे असे वाटले की आता कोणीतरी वडिलधार्‍या माणसाने हे थांबवायला हवे, पुरेशी मजा झाली आहे. पण बहुधा वडिलधारी मंडळींना लहान मुलांच्या मस्तीत खोडा घालायचा नसावा, किंवा डेकोरेशनचे मोजलेले पैसे वसूल करायला म्हणून त्यांनाही ते फुगे फुटू देण्यात रस असावा. बघता बघता हॉलमधील एकूण एक फुगा वेचून वेचून फुटला गेला.

खेळ ईतक्यातच संपणार नव्हता. थोड्यावेळाने तसाच फटाक्यांची माळ फुटल्याचा आवाज बाहेरून येऊ लागला. कदाचित गेटवरचे फुगे फुटत असावेत. तिथेही बरेच फुग्यांच्या माळा लटकत होत्या. मी बड्डेबॉयला पुन्हा एकदा विश करून बाहेर पडलो आणि तेच दृश्य नजरेस पडले. डेकोरेशनवाल्या मंडळींनी आता फुगे वाचवायचे प्रयत्न सोडले होते. फुग्यांच्या माळा संपल्या तसे काही मुलांनी गेटवर बनवलेल्या थर्माकोलच्या कट आऊटसना हात घातला. गेटची कमान आणि काही मोठाले कार्टून कॅरेक्टर्स थर्माकोलच्या शीटने बनवले होते. थोडीफार चमकी आणि छोटाले फुगे लाऊन ते सुद्धा सजवले होते. या दंग्याचा नादात बघता बघता ते देखील आडवे झाले आणि थर्माकोलच्या तुकड्यांचा खच पडला. ते वाचवण्यासाठी मात्र डेकोरेशनवाल्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण असे बड्या मंडळींच्या लहानग्या मुलांना आवरणे त्यांच्या आवाक्याबाहेरचे आणि कदाचित ऐपतीपलीकडचे होते.

आता हे कटआऊटसचे नुकसान देखील फुग्यांसारखेच एकूण हिशोबात पकडले जाणार की याची वेगळी नुकसान भरपाई घेतली जाणार याची कल्पना नाही. तसेच ती दिली जाणार की यावरून वाद होणार हे देखील वेगळेच.
पण कुठेतरी हे खटकले. कुठेतरी वेळीच आवर घालायला हवा होता. मजा, मस्करी, लहान मुलांना मोकळीक द्यायची एक लिमिट असते ती ईथे क्रॉस झाली असे वाटले. अति शिस्तीचा बडगा मलाही आवडत नाही. मुलांचे लाड झालेच पाहिजेत. पण त्याची पातळी ओलांडली की त्याचे परीणाम उन्मादात दिसायला वेळ लागत नाही.

अवांतर - बंद, निषेध, प्रदर्शनाच्या निमित्ताने जी बेछूट तोडफोड, जाळपोळ दिसते त्यामागेही अशीच कोणाच्या बापाची भिती नसणे हेच कारण असते. मग काय फरक उरला आपल्या लहान पोरांमध्ये आणि समाजकंटकांमध्ये? की ईथे त्या मुलांच्या पालकांनाच समाजकंटक म्हणावे?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लगेच नाही सस्मित, मान्य आहे स्केल वेगळी, परीणाम वेगळे, कारणं वेगळी...
पण मुळात ते करायला जी किमान हिंमत गरजेची असते त्यामागची कारणमीमांसा करता साम्य आढळेल. फक्त तिथे पालक म्हणजे मायबाप सरकार बोलू शकतो.
असो त्यावर चर्चा गेल्यास अवांतर पोस्टच जास्त येतील. विषय पॅरेंटींग पर्यंतच राहिलेला बरे..

बाकी मला कल्पना आहे की मी यावर काही बोलणे म्हणजे सलमान खानने सुखी संसाराची सूत्रे सांगण्यासारखे आहे. तरी जे निरीक्षण असते त्यावरून मत मांडतो .. आणि आपले मत तपासून घेतो Happy

धाग्याचा विषय आवडला. बहुतेक यावर नीट चर्चा होईल. Happy
रच्याकने, एक कुतुहल म्हणून विचारतोय ही मुले एखाद्या विशिष्ट समाजातली/भाषिकांची होती का?

ही मुले एखाद्या विशिष्ट समाजातली/भाषिकांची होती का?>>>> राहुल, नीट चर्चा करण्यासाठी अगदी उत्तम प्रश्न विचारलात.
लहान मुलं होती. ज्यांना फुगे फोडणं थोडं हायपर होत मज्जा करणं आवड्तं हे एवढेच डीटेल्स नीट चर्चा होण्यासाठी नाही चालणार का?

ऋन्मेष, एक्झॅक्टली हाच प्रकार १०/१२ वर्षांपूर्वी एका वाढदिवसाच्या पार्टीत पाहिला होता. अक्षरशः बघवत नव्हतं ते छान छान मिकी माऊस पायदळी तुडवले जाताना! चिडचिड झाली होती. पण मुलांचे आई-बाप गप्प.
पण आता मुलांच्या मित्रमैत्रिणींच्या वाढदिवसांना मात्र असला प्रकार नाही पाहिला. थोडे फुगे फुटतात, पण तोच एककलमी कार्यक्रम असल्यासारखा पद्धतशीर विध्वंस नसतो.

बाकी मला कल्पना आहे की मी यावर काही बोलणे म्हणजे सलमान खानने सुखी संसाराची सूत्रे सांगण्यासारखे आहे. ----. +1 धागा delete करा. तुमचा दुरानव्येही संबंध नाही.

राहुल, नीट चर्चा करण्यासाठी अगदी उत्तम प्रश्न विचारलात.
लहान मुलं होती. ज्यांना फुगे फोडणं थोडं हायपर होत मज्जा करणं आवड्तं हे एवढेच डीटेल्स नीट चर्चा होण्यासाठी नाही चालणार का?
>>
मुलांवर संस्कार करणारे त्यांचे पालक असतात. (असे मी तरी गृहित धरतो).
असो. असे आडून आडून बोलायला काही जमत नाही.
पण माझ्या अनुभवानुसार गुजराती समाजातले लोक मुलांना असेच मोकळे सोडून देतात, मग ती मुले डेकोरेशनचे फुगे फोडोत की बागेतली फुले तोडोत की बरोबर खेळणार्‍या मुलांची खेळणी तोडोत.
त्यांच्या पालकांना सांगायला गेले की आपल्यालाच सांगतात "मुले आहेत हो. असे खेळ तर करणारच ना?". त्यांच्या चुक वागणार्‍या मुलांना अजिबात दम देत नाहीत की असे करु नको म्हणून सांगत नाहीत.
पण आपल्या मुलाने जर त्यांच्या मुलांचे खेळणे/पुस्तक तोडले/फाडले की वचावचा करत राहतात. झक मारुन त्यांचे नुकसान भरुन द्यावे लागते.

माझ्या वरील प्रश्नाला मला आलेल्या अश्या अनेक अनुभवांचा संदर्भ होता. डायरेक्टली सांगता आला असता पण सांगितला नाही कारण ऋ कधीही कशीही पलटी मारतो.

आपल्या मुळे इतरांना त्रास/नुकसान होत नाही ना याची काळजी घेण्याची सवय पालकांनी लावायला हवी.पण मला काय त्याचं ही वृत्ती वाढत चालली आहे.

Btw ऋन्मेष नुकताच तुझा मुलांना मँनर्सचा ओवरडोस दिला जात आहे का असा धागा वाचल्याचे स्मरते.

आम्हि फुगे घरी घेउन येतो Happy .
आम्ही जातो त्या पार्टीजना सहसा ," मला 'रेड बलून' पाहिजे होता . त्याने का घेतला . " अशी चिकचिक असते.
नाहीतर मग रडणार्या कोणाला तरी आपल्याकडचा फुगा देउन , भाव खायचा . किन्वा फुगे हाताने मारून हवेत उडवत , ईकडे तिकडे फिरायचा एक सामुदायिक खेळ असतो .
थोडे फुगे फुटतात, पण तोच एककलमी कार्यक्रम असल्यासारखा पद्धतशीर विध्वंस नसतो. >>> + १००० .

पण , असे फटाफटा फुगे फोडणे मला ही आवडले नसते आणि कट आउट्स तोडणे तर स्ट्रीक्टली नो नो !

हे एखादे रुपक आहे का ऋन्मेष ? वाढदिवस म्हणजे मायबोली, फुगे म्हणजे बाफ, संस्कार म्हणजे अ‍ॅडमिन ने अ‍ॅक्शन घेणे वगैरे Wink

बापरे! !!!
असामी कुठे पोहचलात.
Rofl

अश्या स्वरूपाची चर्चा (अगदी महाचर्चा म्हणावी इतकी) माबोवर झालेली आहे. कोणाला वाचण्यात इंटेरेस्ट असेल तर लिंक देते शोधून.

बापरे काहीतरीच काय.......... समाजकंटक -बिंटक काही नाही हो..... उद्या दुसर्या धाग्यात सहा- सात दिवसांच्या बाळाने तुमचे बोट आपल्या बाळमुठीत पकडल्यास त्याला आक्रमकतेचं नाव द्याल..

छोट्या मुलांमध्ये जन्मजातच कुतूहल भरलेलं असतं. आणि त्यांना मोठ्यांसारखं इतरांकडून आनंदाची अपेक्षा नसते. त्यापेक्षा त्यांना स्वतःहून आनंद शोधायला आवडतो. त्यामुळे त्यांना याचा चुरा कर, त्याचे तुकडे कर, हे कात्रीने कराकरा काप, हे भिजव, हे इथे ठेव, ते चिकटव, हे उचल असे प्रयोग करायला आवडतात.आणि एखादी गोष्ट आवडली की ती सातत्याने करून मजा घेण्यात त्यांना आनंद मिळतो. तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे थर्माकोलचा चुरा कर , फुगे फोड; तसेच कागदाचे तुकडे कर, नळ चालू करून पाणी ओंजळीत घे, लाईटची बटणं चालू बंद कर, स्केचपेनने भिंती रंगवत सुट, अशा गोष्टी तर मोठ्या माणसांकडून रट्टे मिळेपर्यंत सुरूच राहतात....!
( थर्माकोलचा चुरा करणं हे कोणत्याही वयोगटातील व्यक्तीसाठी आनंददायी आहे ,हा स्वानुभव आहे
....)

तरी ती फार निरागस असतात. त्यांच्यात द्वेष, असूया, सूडाच्या भावनेचा लवलेशही नसतो. केवळ जिज्ञासेपोटीच ती कर्म- आपल्या भाषेत कांड करत असतात. त्यामुळे ती कुठेही काही नावीन्यपूर्ण दिसले की त्या गोष्टीला हाताळतात. याला सोप्या भाषेत सांगायचे झाले तर सर्जनशीलता.

यामुळे कित्येकदा नुकसान होते. ते भरून द्यावे लागते. काही जवळच्या, महत्त्वाच्या वस्तूंची हानी होते. त्यामुळे त्यांना याबाबत समजावून सांगितलेले केव्हाही चांगले. पण त्यांना याबाबत वारंवार दटावणे, मारणे, सर्वांसमोर टोचून बोलणे म्हणजे त्यांच्यातल्या सर्जनशीलतेचा गळाच घोटणे होय. समजावताना वेळ लागेलच त्यांना आपल्या म्हणण्याप्रमाणे वागताना; पण हे का करू नये हे डोक्यात बसेल, इतरांना आपल्यामुळे त्रास होऊ न देण्याची भावना आपोआप व्यक्तिमत्त्वात कोरली जाईल.

त्यांनी हे जाणूनबुजून न केल्याने यात त्यांची काही चूक नसते. आणि याचं खापर पालकांवर फोडणे तसे गैरच. त्यांची काय चूक?आणि संस्कारांचं म्हणाल तर लहान मुलांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे मातीचे गोळेच. त्यांना त्यांच्या कलानं समजवावं. अन्यथा सर्जनशीलताच संपते त्यांच्यातली. आणि हे खूप वाईट. मग पुढे आयुष्यात चाकोरीबद्ध जगण्याशिवाय काही उरत नाही.

प्रत्येकाच्या आत एक खोडकर मुल दडलेले असते. (आठवा आपले लहानपणातले प्रताप) त्यामुळे लोकहो अपने अंदर झाकके देखो.
"मी शेंगा खाल्या नाहीत म्हणून मी टरफले उचलणार नाही " असा स्टॅन्ड घेता येणार नाही. Wink

>>>>>. पण त्यांना याबाबत वारंवार दटावणे, मारणे, सर्वांसमोर टोचून बोलणे म्हणजे त्यांच्यातल्या सर्जनशीलतेचा गळाच घोटणे होय>>>
आणि समाजा त्या बर्थडे ला पालकांनी आपापल्या मुलांना दटाऊन, एखादा फटका देऊन हे करण्यापासून परावृत्त केले असते तर ऋन्मेष ने इकडे येऊन " मुलांची सर्जनशीलता /कुतूहल दाबून टाकणे योग्य आहे का?" म्हणून धागा काढला असता.
किंवा स्वतः च्याच " लहान मुलांना मारणे...." धाग्यांवर प्रसंग रंगवून टाकला असता.

थोडक्यात काय, ऋन्मेष ला कुठ्ठे बोलवायची सोय नाही, कोणी कसे वागतो, ऋन्मेष एक धागा तरी काढणार.

तरी ती फार निरागस असतात. त्यांच्यात द्वेष, असूया, सूडाच्या भावनेचा लवलेशही नसतो.
>>> तुम्ही फार लहान मुलांबद्दल बोलताय.. लेखातली मुले त्या वयोगटातील नसावीत.

कोणी कसे वागतो, ऋन्मेष एक धागा तरी काढणार. >> वेल्कम टू क्लब Wink Proud
मुलं चांगली वागली, मॅनर्स वापरले धागा, फुगे फोडले धागा, फुग्याला बलून म्हटलं धागा, मग हा लहानपणी कॉन्डोम कसे फुगवायचा याची एक कथा, पार्टीमध्ये रिटर्न गिफ्ट महाग दिलं धागा, रिटर्न गिफ्ट मिळालंच नाही आणि याच्या प्रेयसी/ मैत्रीण/ बायकोने त्यावर कमेंट केली धागा, काय गिफ्ट दिलं धागा, कोणी गिफ्ट रिसायकल करून दिलं धागा, कोणी गिफ्ट रिसायकल केलं नाही धागा, पार्टीत ज्ये. ना. ना बोलावलं नाही धागा, त्यांना बुफे मध्ये उभं राहावं लागलं धागा, ज्ये.ना. एका साईडला बसून होते आणि बड्डे किडने त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला नाही धागा, औक्षण केलं नाही धागा, त्या किडला मेणबत्ती विझवायला तीन फुंकरा मारायला लागल्या आणि हा लहानपणी कसा एका फुंकरीत बल्ब विझवायचा धागा.... ते काशीबाईची फुंकणी शारूकच्या हाती लागली असती तर? यावर कल्पनाविलास, मग शाळेत निबंधाला असे विषय का नसत? शिक्षण कसं दिलं पाहिजे यावरही उंदीर मारायच्या विभागाचा धागा, हा याच्या पोरा/ पोरीला घेऊन पब्लिक त्रांझीटने गेला आणि सगळे गाडी घेऊन आलेले धागा, हा गाडी घेऊन गेला आणि याला सगळ्यांनी गाडी आहे म्हणून भाव दिला आणि पूर्वी कसा भाव दिला न्हवता धागा. असे सोशल म्हणूनका, इकॉनॉमिकल म्हणूनका, रॅशनल म्हणूनका, इररॅशनल म्हणूनका काहीही घडलं की रंग देऊन धाग्यात रुपांतरीत करण्याचं मशीन आहे ते आमचं.
त्या पोरांनी साबणाचे फुगे फोडले असते तरी धागा निघाला असता.

आता यावर कमेंट काय असेल यावर बेटिंग करुया.

अमितव Lol

अहो त्यांना आत्मचरित्र लिहायचे आहे असे वाचल्याचे आठवते. वेगळे लिहायला बसण्यापेक्षा शेवटी सगळ्या धाग्यांचे एक पुस्तक करतील असा अंदाज. Happy Light 1

अमित, शि.सा.न.
आणि ऋन्मेष वि.वि
आधी मजा वाटायची कुठल्याही विषयावर चर्चा घडवून आणायचं तुझं कसब पाहून, आता थोडे बोअर लागलय रे,
बघ काय करतोस ते..

काही पोस्ट मजेशीर आल्या आहेत Happy

>>>>
तरी ती फार निरागस असतात. त्यांच्यात द्वेष, असूया, सूडाच्या भावनेचा लवलेशही नसतो.
>>> तुम्ही फार लहान मुलांबद्दल बोलताय.. लेखातली मुले त्या वयोगटातील नसावीत.
>>>>

च्रप्स यांनी मांडलेला
हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. आपण जी निरागस मुले बोलतो त्यांचे वय काय? द्वेष, असूया, सूड, अहंकार वगैरे भावना लहान मुलांच्या अंगी साधारणपणे कोणत्या वयात दिसू लागतात..? निर्भया प्रकरणानिमित्त याची चर्चा झाली असेलच. जर ईतके टोकाचे गुन्हे त्याच्या वयात होत असतील तर दहाबारा वर्षे वयाची मुले वर उल्लेखल्याप्रमाणे द्वेष, असूया, सूड अश्या भावनांपासून अलिप्त कशी समजावीत? उलट हेच तर वय जेव्हा ते निरागसतेकडून दुनियादारीकडे वळतात तेव्हाच जास्त कंट्रोल हवा.

असो...
द्वादशांगुला, छान पोस्ट Happy

लहान मुलांमधील सर्जनशीलता कधीच मारू नये या कट्टर मताचा मी देखील आहे. पण त्याचसोबत त्यांना सर्जनशीलता वापरून कन्स्ट्रक्टीव कार्य कसे करता येईल. किंवा डिस्ट्रक्टीव्ह कामासाठी ती सर्जनशीलता वापरली जाऊ नये हे बघणे पालकांचे कर्तव्य आहे. किमान त्यांना या दोघातील फरक सांगून तो पटावा यासाठीही प्रयत्न करणे गरजेचे नाही का?
अन्यथा बॉम्ब बनवणे हे देखील सर्जनशीलतेचेच लक्षण आहे.

जोपर्यण्त एका मर्यादेपर्यंत फुगे फुटत होते तो पर्यंत मलाही कौतुक वाटत होते.
जेव्हा कुठे कुठे लटकवलेले फुगे खेचून ओरबाडून ईतर वस्तूंची नासधूस होऊ लागली तेव्हा तो चिंतेचा विषय वाटला.

होय, मॅनर्सचा ओवर डोस धागा मीच काढला होता. पण तिथे आजीला म्हटले गेलेले थॅन्क्यू, आणि ईथे घातलेला धिंगाणा, यामध्ये काहीच येत नाही का? येते तर त्या मधल्या लेव्हलला आपण आपल्या पोरांना नाही ठेऊ शकत का? की शिस्त म्हणजे कडक शिस्त अन्यथा बेशिस्त असे आहे का?

अवांतर - सिंबा, आपली टिप्पणी नोंद केली गेली आहे. आपण त्यावर सविस्तर एका स्वतंत्र धाग्यात बोलूया. विषय माझ्यापुरता न ठेवता व्यापम करूया.

विषय माझ्यापुरता न ठेवता व्यापम करूया.
>>
Uhoh
सिंबांचा "व्यापम" होणार? हे राम! Light 1
संभाळुन रहा सिंबा... Wink

Pages