शिस्त, लाड आणि उन्माद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 January, 2018 - 05:21

हल्ली बर्ड्डे पार्टी म्हटले की मजा असते. पोरं पाच, दहा, पंधरा अशी राऊंड फिगर वयाची झाली की आपल्या ऐपतीनुसार मोठा बड्डे सेलिब्रेट केला जातो. एक छानसे गेट टू गेदर होते. त्यातही मोठ्यांपेक्षा लहानग्यांचा मान जास्त असल्याने एकंदरीत धमाल वातावरण असते. त्यामुळे लग्नावर लाखो उधळण्यापेक्षा अश्या बड्डेजवर हजारो उधळलेले मला जास्त वसूल वाटतात. येनीवेज, ज्याची त्याची आवड..

तर रविवारी अश्याच एका बड्डे पार्टीला गेलो होतो. एका क्लबच्या हॉलमध्ये शंभरेक जण बागडतील ईतक्या जागेत दंगा चालू होता. गेम्स, जादूचे प्रयोग, सेल्फीज, केक कटींग, जेवण वगैरे ऊरकले आणि अचानक स्टेजच्या ईथून फाट फाट् फाट् असा आवाज येऊ लागला. आधी वाटले शॉर्ट सर्किट झाले की काय. मग लक्षात आले की सर्व मुले फुगे फोडत होते. प्रत्येकाच्या हातात सुई सारखी अणुकुचीदार वस्तू होती, फुग्याला स्पर्श करतात फट् करत तो फुटत होता. एकाच वेळी आठदहा मुले. नुसते फटाक्यांची माळ लावल्यासारखा आवाज येत होता. धमाल चालू होती. खालच्या लेव्हलवरचे फुगे पाचच मिनिटांत संपले तसे त्यांनी वर लटकावलेल्या फुग्यांच्या माळा खेचायला सुरुवात केली. ते पाहून डेकोरेशनवाली मंडळी ते फुगे वाचवण्याचा व्यर्थ प्रयत्न करू लागले. मग माझ्या लक्षात आले की हेच फुगे ते पुढच्या पार्टीला वापरत असतील. आता या फुग्यांचे पैसे लावतात की भाडे लावतात याची कल्पना नाही. पण त्यांच्या प्रॉफिट मार्जिनमध्ये नक्कीच असा फुग्यांचा पुनर्वापर गृहीत धरला असणार. त्यामुळे असे वाटले की आता कोणीतरी वडिलधार्‍या माणसाने हे थांबवायला हवे, पुरेशी मजा झाली आहे. पण बहुधा वडिलधारी मंडळींना लहान मुलांच्या मस्तीत खोडा घालायचा नसावा, किंवा डेकोरेशनचे मोजलेले पैसे वसूल करायला म्हणून त्यांनाही ते फुगे फुटू देण्यात रस असावा. बघता बघता हॉलमधील एकूण एक फुगा वेचून वेचून फुटला गेला.

खेळ ईतक्यातच संपणार नव्हता. थोड्यावेळाने तसाच फटाक्यांची माळ फुटल्याचा आवाज बाहेरून येऊ लागला. कदाचित गेटवरचे फुगे फुटत असावेत. तिथेही बरेच फुग्यांच्या माळा लटकत होत्या. मी बड्डेबॉयला पुन्हा एकदा विश करून बाहेर पडलो आणि तेच दृश्य नजरेस पडले. डेकोरेशनवाल्या मंडळींनी आता फुगे वाचवायचे प्रयत्न सोडले होते. फुग्यांच्या माळा संपल्या तसे काही मुलांनी गेटवर बनवलेल्या थर्माकोलच्या कट आऊटसना हात घातला. गेटची कमान आणि काही मोठाले कार्टून कॅरेक्टर्स थर्माकोलच्या शीटने बनवले होते. थोडीफार चमकी आणि छोटाले फुगे लाऊन ते सुद्धा सजवले होते. या दंग्याचा नादात बघता बघता ते देखील आडवे झाले आणि थर्माकोलच्या तुकड्यांचा खच पडला. ते वाचवण्यासाठी मात्र डेकोरेशनवाल्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण असे बड्या मंडळींच्या लहानग्या मुलांना आवरणे त्यांच्या आवाक्याबाहेरचे आणि कदाचित ऐपतीपलीकडचे होते.

आता हे कटआऊटसचे नुकसान देखील फुग्यांसारखेच एकूण हिशोबात पकडले जाणार की याची वेगळी नुकसान भरपाई घेतली जाणार याची कल्पना नाही. तसेच ती दिली जाणार की यावरून वाद होणार हे देखील वेगळेच.
पण कुठेतरी हे खटकले. कुठेतरी वेळीच आवर घालायला हवा होता. मजा, मस्करी, लहान मुलांना मोकळीक द्यायची एक लिमिट असते ती ईथे क्रॉस झाली असे वाटले. अति शिस्तीचा बडगा मलाही आवडत नाही. मुलांचे लाड झालेच पाहिजेत. पण त्याची पातळी ओलांडली की त्याचे परीणाम उन्मादात दिसायला वेळ लागत नाही.

अवांतर - बंद, निषेध, प्रदर्शनाच्या निमित्ताने जी बेछूट तोडफोड, जाळपोळ दिसते त्यामागेही अशीच कोणाच्या बापाची भिती नसणे हेच कारण असते. मग काय फरक उरला आपल्या लहान पोरांमध्ये आणि समाजकंटकांमध्ये? की ईथे त्या मुलांच्या पालकांनाच समाजकंटक म्हणावे?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) पाफा, रात्री बारा वाजता कोणाच्या घरी जाऊन कनफर्म करायचे नव्हते. व्हॉट्सप खोलो दिल की बात बोलो. संबंधित ग्रूपवर विचारले उत्तर मिळाले.

२) अनिश्का, संबंधित व्हॉटसपे ग्रूपवर या धाग्याची लिंक चिकटवली आहे. त्या सर्व पोरांचे बाप आता हा धागा वाचतील याची खात्री बाळगा. कोणाला त्यांच्यासाठी काही निरोप सोडायचा असेल तर सोडू शकता.

३) प्लास्टीक पिशवीच्या टिकल्या फोडणे हा माझाही आवडीचा खेळ आहे. मी स्वत:ही फोडतो. पिंट्यालाही बोलावतो. जणू कोण जास्त टिकल्या फोडतेय याची स्पर्धाच लागते आमच्यात., पण आजवर कधी या खेळाने उन्मादाचे रूप धारण केले नाही.

४) पाफा, खाल्ल्या कोंबडीला जागूनच धागा काढतोय. ते देखील रात्री दोन तीन पर्यंत जागून. कारण चुकी लक्षात आणून देणे हेच खरे मित्राचे कर्तव्य.

५) राजसी >>> उद्या म्हणाल अमका @@@मध्ये जाऊन आल्यावर मला खूप वास आला >>> यातील @@@ चा अर्थ सांगितल्याशिवाय आपली पोस्ट व्यर्थ आहे. चावट शब्द असेल तर प्लीज विपू करा.

ओक्के.
पण ती चापटी कोणी मारली तेवढे सांगायला विसरलात बहूतेक.

अनिश्का, संबंधित व्हॉटसपे ग्रूपवर या धाग्याची लिंक चिकटवली आहे. त्या सर्व पोरांचे बाप आता हा धागा वाचतील याची खात्री बाळगा. कोणाला त्यांच्यासाठी काही निरोप सोडायचा असेल तर सोडू शकता.
>>>
भाऊ असे करून रिस्क घेताय तुम्ही. त्यांना कळेल ना ????= ऋ

Packing material असलेल्या bubble bag चे फुगे फोडणे, किंवा (स्वताच्या घरात) थर्माकोलचा चुरा करणे वेगळे आणि सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने नासधूस करणे वेगळे. मग भलेही ती लहान मुलांनी केलेली असेल. त्यांच्या पालकांनी त्यांना त्याचवेळी आवर घालणे आवश्यक होते. हीच मुले मग मोठी झाल्यावर निरोप समारंभाच्या वेळी शाळेतील ट्युबलाईट फोडणे, पंख्याच्या पाती वाकवणे असे प्रकार करतात. थोडक्यात काय तर 'गरज सरो नि वैद्य मरो' हा प्रकार!

मी स्वतः हेडफोन लावून मोठ्या आवाजात गाणी ऐकणे आणि रस्त्याने जाताना गाडीत मोठ्याने गाणी लावणे यांची बरोबरी होऊ शकेल का???

मी गेलो होतो काल बड्डेला. होता तिथे नुसता धुमाकुळ. मि मग एका कोपर्‍यात बसुन ग्रहण बघत खाल्ले ६ चिकन लॉलीपाप, ४ पनिर टिक्के. डाव्या कानाजवळचे उपटले केस तिन. मान मुडपुन खाली बसलो आणि घेतला एक चावा लसणाचा केकचा. घेतला दिर्घ श्वास आनि भरला हुंकार. साडेसात वेळा मान उजवी कडोन डावी कडे फिरव्ली आणि दिली अतृप्ततेची दीर्घ उचकी. डाव्यापायाचे उजवीकडील बोटाचे तोडले एक अणकुचीदार नख आणि पुन्हा लसणाच्या केक चा घास घेऊन फोडले फुगे सत्तावीस..

ओळखा पाहू मी कोण Proud Proud Proud

ऋन्मेषचा समाजकंटक हा शब्द चुकला असेल, पण मूळ मुद्दा मला बरोबर वाटला. विध्वंसक वृत्तीला मुलांची मजा म्हणून सोडून देणं पटत नाही.
खेळताना मोडतोड होणं वेगळं आणि मोडतोड हाच खेळ होणं वेगळं! सुंदर सुंदर चित्रं असलेले, शोभेसाठीच लावलेले ( हो, नाही तर कुणी म्हणेल पॅकिंगपण सुंदर असतं गिफ्टचं, म्हणून ते फाडायचं नाही की काय Happy ) थर्मोकोलचे कट आऊट्स आपल्या मुलांना पायाने तुडवावेसे वाटतात, हे पालकांना गंभीर वाटत नाही? मुलांना नसेल समजा कळत, तर त्यांना सांगायला नको?

वावे,
थोडेसे धाग्याला धरून लिहितो Happy
इकडे कोणीच मुले गम्मत करत होती, मजा समजून सोडून देऊ असे काही म्हंटले नाहीये.
पण जसे मोठ्यांच्या गर्दीचे मानसशास्त्र असते , तसेच लहानांच्या गर्दीचे हि असते,
घरी अगदी आज्ञाधारक असणारे आपले मुल, त्याच्या वयाच्या झुंडीत मिसळले कि कसे चेकाळते ते आपण सगळ्यांनी पहिले असेल ( ऋण्मेश सोडून कारण तो अजून कु. ऋ आहे :)) त्यामुळे मुले अशी वागलीच का?? या प्रश्नाला "त्यांना माज आला आहे म्हणून " हे उत्तर नक्कीच नाही.
जस्ट एक आठवण म्हणून सांगतो, पब्लिक प्रोपार्ती बद्दल एरवी अतिशय जागरूक असणारे माझे मित्र आणि मी असेच चेकाळलो होतो डिप्लोमा १स्त यीअर ला असताना आणि कॉलेज मध्ये फुल on रंगपंचमी खेळून भिंती खराब केल्या होत्या, पण ते त्या मिनिटाला डोक्यात शिरलेले खूळ असते, त्यावरून कोणी आमचे इतर वेळचे वागणे जज करत असेल तर तो मुर्खपणा असेल.

मोठ्या माणसांनी हस्तक्षेप करायला हवा होता का? हो करायला हवा होता.

इवेन्ट मनेजर ने त्या मुलांच्या पालकांना, होस्ट ला इंवोल्व्ह करायचा प्रयत्न केला का? धागा त्याबद्दल माहिती देत नाही.
कदाचित त्यांच्या पालकांना हॉल च्या गेटवर नक्की काय चालले आहे (अजून फुगेच फोडणे चालू आहे कि मोर्चा अजून कुठे वळला आहे) याची कल्पना पण नसेल,
मोठ्या माणसाना इंवोल्व्ह करायचा प्रयत्न झाला आणि त्यांनी "बच्चे है, ऐसा करेन्गे ही" वगैरे सांगितले असते तर रुन्मेश्च्या आक्षेपांना काहीतरी आधार मिळतो, पण मग तो उन्माद, माज मुलांचा न राहता मोठ्यांचा होतो.

त्या event वाल्याने ते नुकसान नक्की होस्ट कडून वसुल केले असणार आणि होस्ट ने त्या मुलांना कानपिचक्या दिल्या असणार Happy
कु ऋ शेवटपर्यंत hall मध्ये थांबला असता तर पालकांची काय प्रतिक्रिया होती हे त्याला कळले असते, पण मग कदाचित त्याला धागा काढता आला नसता.

मागचे काही धागे पाहता (मुलांना ओरडणे, manners) काही मिनिटाच्या खिडकीतून लोकांचे आयुष्य जज करणारा हा धागा आहे म्हणून लोक पकलेत आणि कोणी सिरीअसली घेत नाहीये.

सो peace

मोठ्या माणसांनी हस्तक्षेप करायला हवा होता का? हो करायला हवा होता.>> एक्झॅक्टली, मलाही हेच म्हणायचे आहे.

ओ च्रप्स रागावता कशाला .... सध्यातरी भांडणं बिंडणं जमत नाही( टायपून...... खरी मजा घरातल्यांशी, फ्रेण्डससोबत आमनेसामने भांडण्यात आहे. ).... Happy

. आणि हो घरातलं फ्रस्ट्रेशन ब्रिस्ट्रेशन काही नाही.

आपलं उगाच गंमत म्हणून .... Happy

काही मिनिटाच्या खिडकीतून लोकांचे आयुष्य जज करणारा हा धागा आहे म्हणून लोक पकलेत आणि कोणी सिरीअसली घेत नाहीये. >> यु सेड इट.

<<निदान खाल्ल्या कोंबडीला (मीठाला) तरी जागून धागा नव्हता काढायचा.>>
----- अरे मीठ गरजेपेक्षा कमी असेल. Happy

अमितव - बड्डे पार्टीला लहान मुले असुनही त्यान्नी फुगे फोडली नाहीत असा पण धागा विणवता येतो.

लहान्यान्ना निखळ आनन्द देणारी फुगे फोडण्यातली मस्ती आणि रस्त्यावरच्या सार्वजनिक मालमत्तेची हानी करणारा जमाव यान्ची तुलनाच करता येणार नाही. लहान मुलान्नी मस्ती करायला हवी, मला आवडेल.

<< कृपया स्फुट वेगळा धागा काढून लिहावे, इग्नोरायला बरे पडते,
प्रतिसादात स्फुट लिहू नये Happy >>

---- सिम्बा त्यान्चा उद्देश वाचकान्नी स्फुट वाचावे हा आहे. वेगळा धागा निघाला तर स्फुट दुर्लक्षीले जाण्याची शक्यता आहे, तसे होणे त्यान्ना टाळायचे असेल. Happy

Happy उदय

रच्याक,
एक टोटल धागा मोमेन्ट,
काल सुपर मार्केट मध्ये गेलो होतो (आमच्या पुण्यात किराणा दुकानाला सुपर मार्केटच म्हणतात)
एक बाप आपल्या 5 6 वर्षाच्या मुलीसोबत खरेदी करायला आला होता, खरेदी झाल्यावर त्याने आपले डेबिट कार्ड पुढे केले, PIN विचारल्यावर त्याने मुलीला पिन टाकायला सांगितला , पोरीने पुढे होऊन PiN टाकला आणि व्यवहार पूर्ण केला.
ऋन्मेष तिकडे असता तर नक्की उभ्या उभ्या धागावला ( गाय पान्हावते, ऋन्मेष धागावतो) असता.
उभ्या उभ्या त्याने,
1) 6 वर्षाच्या मुलीला PiN सारखी सेन्सेटीव्ही माहिती द्यावी का? आजकाल सगळे पालक आपल्या मुलाला टेक्नो savy बनवत आहेत का?
2) लहान मुले जास्त जास्त स्मार्ट बनत चालली आहेत, अनेक जबाबदाऱ्या ते लीलया पेलतात, आणि त्यांना तसे बनवणारे पालक पण स्मार्ट आणि भविष्यवेधी आहेत.

असा एकतरी धागा काढला असता,

मी मेला अजून ठरवू शकलो नाहीये ते चांगले की वाईट,

या अशा टोटल धागा मोमेंट्स (टोधामो) तुम्हाला जागोजागी दिसू लागल्या की तुमचे ऋन्मेशिकरण (नाही हा शिकरणीचा नवीन प्रकार नाही) पूर्ण झाले असे समजावे

काही मिनिटाच्या खिडकीतून लोकांचे आयुष्य जज करणारा हा धागा आहे म्हणून लोक पकलेत आणि कोणी सिरीअसली घेत नाहीये. >> Plus 1

लहान्यान्ना निखळ आनन्द देणारी फुगे फोडण्यातली मस्ती आणि रस्त्यावरच्या सार्वजनिक मालमत्तेची हानी करणारा जमाव यान्ची तुलनाच करता येणार नाही. लहान मुलान्नी मस्ती करायला हवी, मला आवडेल. -----+1 आवडते

१) लहान मुलांना समाजकंटक म्हटले नसून समाजकंटकांना कशी कोणाच्या बापाची भिती नसते किंवा त्यांच्यावर कसा कोणाचा अंकुश नसतो त्या अनुषंगाने एक साम्य दाखवले आहे.

२) चापटी कोणीच मारली नाही, ती उपमा होती.

३) सिंबा,
<<<<< त्यामुळे मुले अशी वागलीच का?? या प्रश्नाला "त्यांना माज आला आहे म्हणून " हे उत्तर नक्कीच नाही. >>>> हे ईथे कोणी म्हटलेही नाही. आपण अर्थ काढण्यात चुकला आहात हे मला समजत होते. फक्त तुमच्या ईतर अवांतर पोस्टवरून ते कन्फर्म होत नव्हते Happy

४) सिंबा अगेन,
<<<<<<
पब्लिक प्रोपार्ती बद्दल एरवी अतिशय जागरूक असणारे माझे मित्र आणि मी असेच चेकाळलो होतो डिप्लोमा १स्त यीअर ला असताना आणि कॉलेज मध्ये फुल on रंगपंचमी खेळून भिंती खराब केल्या होत्या, पण ते त्या मिनिटाला डोक्यात शिरलेले खूळ असते, त्यावरून कोणी आमचे इतर वेळचे वागणे जज करत असेल तर तो मुर्खपणा असेल.
>>>>>>
तुमची चूक तुम्हाला स्वत:हून समजली. अभिनंदन !
ज्या लहान मुलांना ती समजत नाही त्यांच्या ती लक्षात आणून देणे हे एक पालक म्हणून आपले कर्तव्य आहे असे तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा अजून एकदा अभिनंदन करेन Happy

५) सिंबा >>> काही मिनिटाच्या खिडकीतून लोकांचे आयुष्य जज करणारा हा धागा आहे >>>> हा अजून एक गैसरमज. ईथे कोणाचेही आयुष्य जज केले गेले नाहीये. मला त्यातील कोणत्या मुलाला माझा जावई करून घ्यायचे नव्हते जे मी त्यांना एका छोट्या खिडकीतून जज करेन. माझ्या डोळ्यासमोर घडलेले काही मला खटकले. ते मी ईथे मांडले. हेतू ईतकाच की यात काही चुकीचे आहे याची ज्यांना कल्पना नसेल त्यांनी यावर एकदा विचार जरूर करावा.

छोटीशी खिडकी, मजेदार आहे हे Happy
उद्या मी एखाद्या मुलाला दारू पिऊन धिंगाणा घालताना, पोरींची छेड काढताना पाहिले तरी मी त्याच्या वर्तनाला चुकीचे म्हणून नये कारण दारू उतरल्यावर तो किती गुणी बाळ आहे हे मला त्या छोट्याश्या खिडकीतून कधी कळणारच नसते.. नाही का Happy

६) विक्षिप्त मुलगा, आपली पोस्ट फार बोलकी आहे. आपल्याला नेमका मुद्दा समजला आहे हे यावरून समजते. सर्वांनी त्यांची पोस्ट पुन्हा एकदा वाचावी अशी मी विनंती करतो. त्यांची पोस्ट कॉपीपेस्ट करतो.
<<<<<<
Packing material असलेल्या bubble bag चे फुगे फोडणे, किंवा (स्वताच्या घरात) थर्माकोलचा चुरा करणे वेगळे आणि सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने नासधूस करणे वेगळे. मग भलेही ती लहान मुलांनी केलेली असेल. त्यांच्या पालकांनी त्यांना त्याचवेळी आवर घालणे आवश्यक होते. हीच मुले मग मोठी झाल्यावर निरोप समारंभाच्या वेळी शाळेतील ट्युबलाईट फोडणे, पंख्याच्या पाती वाकवणे असे प्रकार करतात. थोडक्यात काय तर 'गरज सरो नि वैद्य मरो' हा प्रकार!
>>>>
+७८६ Happy

लहान्यान्ना निखळ आनन्द देणारी फुगे फोडण्यातली मस्ती आणि रस्त्यावरच्या सार्वजनिक मालमत्तेची हानी करणारा जमाव यान्ची तुलनाच करता येणार नाही.
>>>>
जर तो जमाव निखळ आनंद मिळवत असेल तरीही? Happy

आणि हो, वर फक्त फुगे लिहू नका. कटआऊट्सची नासधूस सुद्धा लिहा. फुग्यांची मस्ती सुरुवातीला मलाही आवडतच होती. लेखात तसे नमूद केले आहे.
आणो हो, दोष मुलांना दिलेला नाहीयेच मुळात. आक्षेप पालकांच्या मूकसंमतीवर आहे !

>>>होस्ट ला इंवोल्व्ह करायचा प्रयत्न केला का? धागा त्याबद्दल माहिती देत नाही.
कदाचित त्यांच्या पालकांना हॉल च्या गेटवर नक्की काय चालले आहे (अजून फुगेच फोडणे चालू आहे कि मोर्चा अजून कुठे वळला आहे) याची कल्पना पण नसेल,
मोठ्या माणसाना इंवोल्व्ह करायचा प्रयत्न झाला आणि त्यांनी "बच्चे है, ऐसा करेन्गे ही" वगैरे सांगितले असते तर रुन्मेश्च्या आक्षेपांना काहीतरी आधार मिळतो, पण मग तो उन्माद, माज मुलांचा न राहता मोठ्यांचा होतो.

त्या event वाल्याने ते नुकसान नक्की होस्ट कडून वसुल केले असणार आणि होस्ट ने त्या मुलांना कानपिचक्या दिल्या असणार Happy
कु ऋ शेवटपर्यंत hall मध्ये थांबला असता तर पालकांची काय प्रतिक्रिया होती हे त्याला कळले असते,
>>>>>>>
कळीच्या मुद्द्यांचा अनुल्लेख, Happy

सिंबा, जर ते खरेच कळीचे मुद्दे होते तर ते तुमच्याकडून सुरुवातीच्या प्रतिसादांतच येणे अपेक्षित होते. तेव्हाच ते महत्वाचे आहेत समजून क्लीअर केले असते Happy
तरी मला वाटते ते छोट्या खिडकीच्या उत्तरात आलेय बहुधा.
असो, तरीही स्पेसिफिक रिप्लाय देतो.

<< होस्ट ला इंवोल्व्ह करायचा प्रयत्न केला का? धागा त्याबद्दल माहिती देत नाही. >>
होस्ट म्हणजे यजमान ना? म्हणजे ज्यांच्या पोराचा बड्डे होता ते? त्यांना ईनवॉल्व्ह करायचा काय संबंध हे समजले नाही! त्यांचे त्यावेळी पोरासोबत आणि फॅमिलीसोबत फोटोसेशन चालू होते.

<< कदाचित त्यांच्या पालकांना हॉल च्या गेटवर नक्की काय चालले आहे (अजून फुगेच फोडणे चालू आहे कि मोर्चा अजून कुठे वळला आहे) याची कल्पना पण नसेल >>
कभी खुशी कभी गम मध्ये शाहरूखचे हेलिकॉप्टर एक किलोमीटर अंतरावर उतरते आणि ईथे जया बच्चनला आपला सौतेला पोरगा आला आहे हे समजते. तर मग आपला सख्खा पोरगा पन्नास पावलांवर काय गोंधळ घालतोय ते त्याच्या आईबापांना समजणार नाही होय Happy
जोक्स द अपार्ट, हॉलमध्येच गोंधळ सुरू झालेला आणि लिमिटच्या बाहेर गेलेला. माझ्या आणि पालकांच्या डोळ्यासमोरच हे घडत होते. त्यानंतर गेटवरचे फुगे फुटायचा आवाज मलाही आतच ऐकू आलेला. कारण गेट म्हणजे बिल्डिंगचा दूरवरचा गेट नव्हता तर त्या फ्लोअरवरच हॉलच्या बाहेर पॅसेजच्या सुरुवातीला गेट बनवले होते. सर्वांचे आईबाप जवळपासच होते. जसे मुले एकत्र मिळून मजा करत होते तसे हे एकत्र मिळून आपल्य पोरांची मजा बघत होते.

<<< मोठ्या माणसाना इंवोल्व्ह करायचा प्रयत्न झाला आणि त्यांनी "बच्चे है, ऐसा करेन्गे ही" वगैरे सांगितले असते तर रुन्मेश्च्या आक्षेपांना काहीतरी आधार मिळतो, पण मग तो उन्माद, माज मुलांचा न राहता मोठ्यांचा होतो. >>>
इन्व्हॉल्व्ह करायचा प्रयत्न? हा कोणी करायचा होता? मोठ्या माणसांना स्वत:ला समोर दिसतेय की आपली पोरं गोंधळ घालत आहेत तर त्यांना काय या इन्व्हॉल्व्ह व्हा असे आमंत्रण द्यायची गरज होती का?

<<< त्या event वाल्याने ते नुकसान नक्की होस्ट कडून वसुल केले असणार आणि होस्ट ने त्या मुलांना कानपिचक्या दिल्या असणार Happy >>>
जर ते नुकसान वसूल करण्याजोगे असते तर बिचार्‍यांचे ते डेकोरेशन वाचवायचे शर्थीचे प्रयत्न बघायला मिळाले नसते.
पण ते देखील सोडा,
पालकांनी पैश्याचे नुकसान भरून देणे म्हणजे ही कृती योग्य ठरते का?
याला मग खरा पैश्याचा माज म्हणायला हवे. नाही का ..

कु ऋ शेवटपर्यंत hall मध्ये थांबला असता तर पालकांची काय प्रतिक्रिया होती हे त्याला कळले असते,
>>>
क्या बात है !
म्हणजे द्रौपदीचे वस्त्रहरण दरबारातील ज्या वडिलधार्‍यांनी मूकपणे बघितले त्यांनी नंतर कोपच्यात जाऊन दुर्योधन आणि दुशासनाला राग दिला असावा. त्यामुळे ते व्यासांना कळले नाही आणि त्यांनी महाभारतात ते लिहिले नाही.
आता ईथे मी मुलांनी फुगे फोडण्याची तुलना द्रौपदीच्या वस्त्रहरणासारख्या नीच कामाशी करतोय असा अर्थ काढून धाग्यावरच्या दहा प्रतिक्रिया वाढवू नका Happy
सांगायचा उद्देश ईतकाच की ज्यांनी हे सारे समोर घडताना घडू दिले त्यांना नंतर अचानक कशी काय उपरती होणार होती ते नाही समजले. झाल्यास लाडीक राग दिला असावा. मला तो थांबून बघण्यात काहीही रस नव्हता Happy

Pages