शिस्त, लाड आणि उन्माद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 January, 2018 - 05:21

हल्ली बर्ड्डे पार्टी म्हटले की मजा असते. पोरं पाच, दहा, पंधरा अशी राऊंड फिगर वयाची झाली की आपल्या ऐपतीनुसार मोठा बड्डे सेलिब्रेट केला जातो. एक छानसे गेट टू गेदर होते. त्यातही मोठ्यांपेक्षा लहानग्यांचा मान जास्त असल्याने एकंदरीत धमाल वातावरण असते. त्यामुळे लग्नावर लाखो उधळण्यापेक्षा अश्या बड्डेजवर हजारो उधळलेले मला जास्त वसूल वाटतात. येनीवेज, ज्याची त्याची आवड..

तर रविवारी अश्याच एका बड्डे पार्टीला गेलो होतो. एका क्लबच्या हॉलमध्ये शंभरेक जण बागडतील ईतक्या जागेत दंगा चालू होता. गेम्स, जादूचे प्रयोग, सेल्फीज, केक कटींग, जेवण वगैरे ऊरकले आणि अचानक स्टेजच्या ईथून फाट फाट् फाट् असा आवाज येऊ लागला. आधी वाटले शॉर्ट सर्किट झाले की काय. मग लक्षात आले की सर्व मुले फुगे फोडत होते. प्रत्येकाच्या हातात सुई सारखी अणुकुचीदार वस्तू होती, फुग्याला स्पर्श करतात फट् करत तो फुटत होता. एकाच वेळी आठदहा मुले. नुसते फटाक्यांची माळ लावल्यासारखा आवाज येत होता. धमाल चालू होती. खालच्या लेव्हलवरचे फुगे पाचच मिनिटांत संपले तसे त्यांनी वर लटकावलेल्या फुग्यांच्या माळा खेचायला सुरुवात केली. ते पाहून डेकोरेशनवाली मंडळी ते फुगे वाचवण्याचा व्यर्थ प्रयत्न करू लागले. मग माझ्या लक्षात आले की हेच फुगे ते पुढच्या पार्टीला वापरत असतील. आता या फुग्यांचे पैसे लावतात की भाडे लावतात याची कल्पना नाही. पण त्यांच्या प्रॉफिट मार्जिनमध्ये नक्कीच असा फुग्यांचा पुनर्वापर गृहीत धरला असणार. त्यामुळे असे वाटले की आता कोणीतरी वडिलधार्‍या माणसाने हे थांबवायला हवे, पुरेशी मजा झाली आहे. पण बहुधा वडिलधारी मंडळींना लहान मुलांच्या मस्तीत खोडा घालायचा नसावा, किंवा डेकोरेशनचे मोजलेले पैसे वसूल करायला म्हणून त्यांनाही ते फुगे फुटू देण्यात रस असावा. बघता बघता हॉलमधील एकूण एक फुगा वेचून वेचून फुटला गेला.

खेळ ईतक्यातच संपणार नव्हता. थोड्यावेळाने तसाच फटाक्यांची माळ फुटल्याचा आवाज बाहेरून येऊ लागला. कदाचित गेटवरचे फुगे फुटत असावेत. तिथेही बरेच फुग्यांच्या माळा लटकत होत्या. मी बड्डेबॉयला पुन्हा एकदा विश करून बाहेर पडलो आणि तेच दृश्य नजरेस पडले. डेकोरेशनवाल्या मंडळींनी आता फुगे वाचवायचे प्रयत्न सोडले होते. फुग्यांच्या माळा संपल्या तसे काही मुलांनी गेटवर बनवलेल्या थर्माकोलच्या कट आऊटसना हात घातला. गेटची कमान आणि काही मोठाले कार्टून कॅरेक्टर्स थर्माकोलच्या शीटने बनवले होते. थोडीफार चमकी आणि छोटाले फुगे लाऊन ते सुद्धा सजवले होते. या दंग्याचा नादात बघता बघता ते देखील आडवे झाले आणि थर्माकोलच्या तुकड्यांचा खच पडला. ते वाचवण्यासाठी मात्र डेकोरेशनवाल्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण असे बड्या मंडळींच्या लहानग्या मुलांना आवरणे त्यांच्या आवाक्याबाहेरचे आणि कदाचित ऐपतीपलीकडचे होते.

आता हे कटआऊटसचे नुकसान देखील फुग्यांसारखेच एकूण हिशोबात पकडले जाणार की याची वेगळी नुकसान भरपाई घेतली जाणार याची कल्पना नाही. तसेच ती दिली जाणार की यावरून वाद होणार हे देखील वेगळेच.
पण कुठेतरी हे खटकले. कुठेतरी वेळीच आवर घालायला हवा होता. मजा, मस्करी, लहान मुलांना मोकळीक द्यायची एक लिमिट असते ती ईथे क्रॉस झाली असे वाटले. अति शिस्तीचा बडगा मलाही आवडत नाही. मुलांचे लाड झालेच पाहिजेत. पण त्याची पातळी ओलांडली की त्याचे परीणाम उन्मादात दिसायला वेळ लागत नाही.

अवांतर - बंद, निषेध, प्रदर्शनाच्या निमित्ताने जी बेछूट तोडफोड, जाळपोळ दिसते त्यामागेही अशीच कोणाच्या बापाची भिती नसणे हेच कारण असते. मग काय फरक उरला आपल्या लहान पोरांमध्ये आणि समाजकंटकांमध्ये? की ईथे त्या मुलांच्या पालकांनाच समाजकंटक म्हणावे?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला त्यातील कोणत्या मुलाला माझा जावई करून घ्यायचे नव्हते जे मी त्यांना एका छोट्या खिडकीतून जज करेन.
Submitted by ऋन्मेऽऽष on 3 February, 2018 - 00:38
>>>>
पहिला मुद्दा : फारच धाडसी विधान आहे. कोणीही एका छोट्या खिडकीतून जावई जज करत नाही. इथे खिडकी हा शब्द प्रतिकात्मक असला तरी एवढा उताविळपणा कोणीही दाखवत नाही आणि ते अपेक्षित ही नाही. त्यामुळे तुमच्या भावना पोचल्या.
रच्याकने
दुसरा मुद्दा : तिथे लहान मुले / मुली दोन्ही असतील मग तुम्ही जावईच का म्हणालात? सुन का नाही? हे gender discrimination का?
बरे असो जावई असे म्हणालात तर ठिक आहे पण तुम्हाला मुलगा असेल (भविष्यात ) आणि मुलगा +मुलगा अशा लग्ना ची तुम्ही मानसिक तयारी केली आहे का? (गेल्या महीन्यात महाराष्ट्रातच असे लग्न लावले - पण धागा नाही आला) (ऋ भाऊ माझा असा (गैर) समज आहे की हा आपला ड्यु आयडी आहे. त्यामुळे सावध लिहा ही विनंती . जावई सारख्या उल्लेखाने तुमच्याकडे barbie/fairy/princess आहे हा उगाच संशय येईल )
Rofl

उद्या मी एखाद्या मुलाला दारू पिऊन धिंगाणा घालताना, पोरींची छेड काढताना पाहिले तरी मी त्याच्या वर्तनाला चुकीचे म्हणून नये कारण दारू उतरल्यावर तो किती गुणी बाळ आहे हे मला त्या छोट्याश्या खिडकीतून कधी कळणारच नसते.. नाही का Happy
>>> जबरा अर्ग्युमेंट ..

ऋ, प्रतिसाद आवडले.
केवळ विरोधासाठी विरोध करणार्यापुढे नाईलाज

काहीही धागा फोडले तर फोडले यात कुठे आला बेशिस्तपणा
ऋ इथे येऊन धागा काढण्यापेक्षा तिथे त्या मुलांना झिंगाट गाणे लावुन दिले असतेस तर फुग्यासारख्या अतिमहत्वाच्या मालमत्तेचे नुकसानही झाले नसते आणि मुलांसोबत तुझेही मनोरंजन झाले असते.

धन्यवाद Happy

मि. पंडित, येस्स झिंगाट. मी तर त्याच अपेक्षेत होतो की पार्टीची सांगता अश्या झिंगाट टाईप्स डान्सने होईल. आणि त्यासाठी उत्सुकही होतो. पण झाले हे ...... मी त्या पार्टीत फारच कमी जणांना ओळखत होतो, मुलांपैकी कोणाला तर जवळपास नाहीच. अन्यथा मी हस्तक्षेप जरूर केला असता. मुलांची मस्ती चुकीच्या वळणावर जात असेल तर त्यांना नुसते ओरडून थांबवायचे नसते, तर दुसरा पर्याय द्यायचा असतो. जसे आपण वर म्हणालात तसे झिंगाट गाण्याचा पर्यायही छान होता.

पाथ,
<<<तिथे लहान मुले / मुली दोन्ही असतील मग तुम्ही जावईच का म्हणालात? सुन का नाही? हे gender discrimination का?>>>>
हे gender discrimination झाले हा जावईशोध आपण कुठून लावलात Happy
अहो हे आपले प्रचलित वाक्यप्रचार आहेत हो.
अजून एक - जावयाचे पोरं, हरामखोर Happy
आता जावयाचेच का? सूनेचे का नाही? वेगळा धागा काढूया का ........

६) विक्षिप्त मुलगा, आपली पोस्ट फार बोलकी आहे. आपल्याला नेमका मुद्दा समजला आहे हे यावरून समजते. सर्वांनी त्यांची पोस्ट पुन्हा एकदा वाचावी अशी मी विनंती करतो. त्यांची पोस्ट कॉपीपेस्ट करतो.
<<<<<<
Submitted by ऋन्मेऽऽष on 3 February, 2018 - 00:38

मला असं 'अहो-जाओ' नको रे करूस, आपल्यात फक्त १-२ वर्षांचच अंतर असेल!
अवांतराबद्द्ल क्षमस्व!!!

@ऋ Happy
बिल्कूल नवीन धागा काढ. तशिही या धाग्याने शंभरी गाठली आहे

मला असं 'अहो-जाओ' नको रे करूस, आपल्यात फक्त १-२ वर्षांचच अंतर असेल!
>>> रूनमेश च वय माहीत आहे तुम्हाला.. क्या बात !

मला असं 'अहो-जाओ' नको रे करूस, आपल्यात फक्त १-२ वर्षांचच अंतर असेल!
>>> रूनमेश च वय माहीत आहे तुम्हाला.. क्या बात !
त्याचे खरे नाव, खरे वय माहित नाही म्हणूनच तर 'असेल' असं म्हटलं आहे. नाहीतर त्याचे सगळे डीटेल्स इथे टाकलेच असते!!!

{{{ लेखक स्वतःला गरीबांचा शाहरूख खान आणि मध्यमवर्गीयांचा स्वप्निल जोशी समजतो ! }}}

इथे अजून एक अ‍ॅडिशन टाका -

लेखक स्वतःला गरीबांचा शाहरूख खान, मध्यमवर्गीयांचा स्वप्निल जोशी आणि मायबोलीकरांचा व्यासमुनि समजतो !

तसंही व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् असे म्हंटले आहेच. त्याचप्रमाणे धागालेखकाने मायबोलीवर जवळपास सर्वच चालू विषयांना स्पर्ष करणारे धागे काढले आहेत.

वा बिपीन सर, मस्त नाव ठेवले... व्यासमुनी.. तसेही मी मायबोलीचा कोण आहे हा विचार गेले काही दिवस माझ्या मनात घोळत होताच. फक्त आधीच स्वस्तुतीने बदनाम असल्याने स्वतंत्र धागा काढायला मन धजावत नव्हते ईतकेच Happy

वि.मु, ओके यार.. मला कोणी एकेरी बोल रे असे बोल्ल्याशिवाय मी सहसा नाही बोलत कोणाला तसे. अगदी उद्या माझ्या मुलांनाही मी त्यांनी सांगेपर्यंत अहोजाहोच करेन अशी मला शंका आहे. याबाबत मला मॅनर्सचा ओवरडोस दिला गेलाय Happy

ते फुगे कोणीही घरीपण घेऊन जाऊ शकतो. परत वापरले जात नाहीत.decorator charge according to number of balloons. पार्टी संपल्यावर Usually मुलांनाच फोडायला देतात. कट आऊट मात्र तोडलेले नाही बघितले.

सर्व मुले सारखी नसतात.त्यांना एकाच मापाने मोजु नये. शिस्त ही हवीच. कितीते सापेक्श. मुले देवाघरची फुले हे सरसकट नाही. बालगुन्हेगार हे क्रुर असतातच की. सारवजनिक स्वच्छता,शांतता,शिस्त हे संस्कार करणे हे पालक शिक्शक यांचे कर्तव्य आहे. ते देशाचे भावी नागरिक आहेत.पालकांची संपत्ति नव्हे.

एक नवीन अ‍ॅंगल आज समजला. ईथली चर्चा बरेपैकी झाली असली तरी ईथे शेअर करणे गरजेचे वाटले.
मला असे समजलेय की या फुग्यांमधील हवा काही काळाने ढुस्स होत असल्याने आणि ते पुन्हा गुबगुबीत करणे किचकट असल्याने याच्या पुनर्वापरावर मर्यादा येतात.

@ भान,
<<< ते फुगे कोणीही घरीपण घेऊन जाऊ शकतो. परत वापरले जात नाहीत. >>> जर त्या फुग्यांच्या माळा कोणी घरी नेल्या नाहीत, कोणी फोडल्या नाहीत तर डेकोरेटर त्या पुन्हा न वापरता कचर्‍यात फेकून देत असेल हे पटत नाही. बाकी फुग्यांचे पैसे पुर्ण धरले असतात, ते फोडण्यात गैर नाही. याच्याशी सहमत आहेच.

फुगे डेकोरेटर घरी घेऊन गेला तरी त्याला दुसर्‍या फंक्शन ला रियुज होत नाही.
१. फुगे हाताळल्याने थोडे खराब दिसून (पांढरी निळी थीम असल्यास तर नक्कीच) दुसर्‍या साईट वर तो ईफेक्ट देत नाहीत.
२, अगदी एका रुम मध्ये ठेवले तरी पुढच्या २४ तासात हवा कमी होत जाऊन ते आपोआपच फुटतात.
फुगे फोडणे/वाटणे हाच उत्तम पर्याय.

हे माञ अगदी खरय, ते फूगे परत वापरले जात नाही. त्यामूळे बय्राचदा डेकोरेटर्स ते तिथेच सोडून जातात. नाहीतर कचय्रात फेकून देतात.

Pages