शिस्त, लाड आणि उन्माद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 January, 2018 - 05:21

हल्ली बर्ड्डे पार्टी म्हटले की मजा असते. पोरं पाच, दहा, पंधरा अशी राऊंड फिगर वयाची झाली की आपल्या ऐपतीनुसार मोठा बड्डे सेलिब्रेट केला जातो. एक छानसे गेट टू गेदर होते. त्यातही मोठ्यांपेक्षा लहानग्यांचा मान जास्त असल्याने एकंदरीत धमाल वातावरण असते. त्यामुळे लग्नावर लाखो उधळण्यापेक्षा अश्या बड्डेजवर हजारो उधळलेले मला जास्त वसूल वाटतात. येनीवेज, ज्याची त्याची आवड..

तर रविवारी अश्याच एका बड्डे पार्टीला गेलो होतो. एका क्लबच्या हॉलमध्ये शंभरेक जण बागडतील ईतक्या जागेत दंगा चालू होता. गेम्स, जादूचे प्रयोग, सेल्फीज, केक कटींग, जेवण वगैरे ऊरकले आणि अचानक स्टेजच्या ईथून फाट फाट् फाट् असा आवाज येऊ लागला. आधी वाटले शॉर्ट सर्किट झाले की काय. मग लक्षात आले की सर्व मुले फुगे फोडत होते. प्रत्येकाच्या हातात सुई सारखी अणुकुचीदार वस्तू होती, फुग्याला स्पर्श करतात फट् करत तो फुटत होता. एकाच वेळी आठदहा मुले. नुसते फटाक्यांची माळ लावल्यासारखा आवाज येत होता. धमाल चालू होती. खालच्या लेव्हलवरचे फुगे पाचच मिनिटांत संपले तसे त्यांनी वर लटकावलेल्या फुग्यांच्या माळा खेचायला सुरुवात केली. ते पाहून डेकोरेशनवाली मंडळी ते फुगे वाचवण्याचा व्यर्थ प्रयत्न करू लागले. मग माझ्या लक्षात आले की हेच फुगे ते पुढच्या पार्टीला वापरत असतील. आता या फुग्यांचे पैसे लावतात की भाडे लावतात याची कल्पना नाही. पण त्यांच्या प्रॉफिट मार्जिनमध्ये नक्कीच असा फुग्यांचा पुनर्वापर गृहीत धरला असणार. त्यामुळे असे वाटले की आता कोणीतरी वडिलधार्‍या माणसाने हे थांबवायला हवे, पुरेशी मजा झाली आहे. पण बहुधा वडिलधारी मंडळींना लहान मुलांच्या मस्तीत खोडा घालायचा नसावा, किंवा डेकोरेशनचे मोजलेले पैसे वसूल करायला म्हणून त्यांनाही ते फुगे फुटू देण्यात रस असावा. बघता बघता हॉलमधील एकूण एक फुगा वेचून वेचून फुटला गेला.

खेळ ईतक्यातच संपणार नव्हता. थोड्यावेळाने तसाच फटाक्यांची माळ फुटल्याचा आवाज बाहेरून येऊ लागला. कदाचित गेटवरचे फुगे फुटत असावेत. तिथेही बरेच फुग्यांच्या माळा लटकत होत्या. मी बड्डेबॉयला पुन्हा एकदा विश करून बाहेर पडलो आणि तेच दृश्य नजरेस पडले. डेकोरेशनवाल्या मंडळींनी आता फुगे वाचवायचे प्रयत्न सोडले होते. फुग्यांच्या माळा संपल्या तसे काही मुलांनी गेटवर बनवलेल्या थर्माकोलच्या कट आऊटसना हात घातला. गेटची कमान आणि काही मोठाले कार्टून कॅरेक्टर्स थर्माकोलच्या शीटने बनवले होते. थोडीफार चमकी आणि छोटाले फुगे लाऊन ते सुद्धा सजवले होते. या दंग्याचा नादात बघता बघता ते देखील आडवे झाले आणि थर्माकोलच्या तुकड्यांचा खच पडला. ते वाचवण्यासाठी मात्र डेकोरेशनवाल्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण असे बड्या मंडळींच्या लहानग्या मुलांना आवरणे त्यांच्या आवाक्याबाहेरचे आणि कदाचित ऐपतीपलीकडचे होते.

आता हे कटआऊटसचे नुकसान देखील फुग्यांसारखेच एकूण हिशोबात पकडले जाणार की याची वेगळी नुकसान भरपाई घेतली जाणार याची कल्पना नाही. तसेच ती दिली जाणार की यावरून वाद होणार हे देखील वेगळेच.
पण कुठेतरी हे खटकले. कुठेतरी वेळीच आवर घालायला हवा होता. मजा, मस्करी, लहान मुलांना मोकळीक द्यायची एक लिमिट असते ती ईथे क्रॉस झाली असे वाटले. अति शिस्तीचा बडगा मलाही आवडत नाही. मुलांचे लाड झालेच पाहिजेत. पण त्याची पातळी ओलांडली की त्याचे परीणाम उन्मादात दिसायला वेळ लागत नाही.

अवांतर - बंद, निषेध, प्रदर्शनाच्या निमित्ताने जी बेछूट तोडफोड, जाळपोळ दिसते त्यामागेही अशीच कोणाच्या बापाची भिती नसणे हेच कारण असते. मग काय फरक उरला आपल्या लहान पोरांमध्ये आणि समाजकंटकांमध्ये? की ईथे त्या मुलांच्या पालकांनाच समाजकंटक म्हणावे?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथलं कुणी माणूस तिथे होतं का ?? त्यांना ऐकवून वगैरे दाखवायचं आहे का???? नाही म्हणजे इकडे हे सर्व लिहायचं प्रयोजन समजलं नाही... म्हणजे तिकडे होणारी नासधूस बघवली नाही म्हणून इकडे धागा काढण्यात काय मतलब??? तिकडे च बोलून मोकळं व्हायचं न.....

बरोबर आहे.. पण पिना घेऊन फुगे फोडतायत म्हणजे इतकी लहान नहीयत कारण खूप लहान मुले स्वतःला किंवा इतराला इजा करू शकतात त्यामुळे पालक allow नाही करणार पिना हातात घ्यायला.

Toothpicks, softboard pin नी पण फुगे फोडता येतात. खानपानाच्या सोईबरोबर केटरर टूथपिक ठेवतात. क्लब हॉल / amphitheatre मध्ये नोटीस बोर्डवर पिन मिळू शकते.

इथलं कुणी माणूस तिथे होतं का ?? त्यांना ऐकवून वगैरे दाखवायचं आहे का???? नाही म्हणजे इकडे हे सर्व लिहायचं प्रयोजन समजलं नाही... म्हणजे तिकडे होणारी नासधूस बघवली नाही म्हणून इकडे धागा काढण्यात काय मतलब??? तिकडे च बोलून मोकळं व्हायचं न..... -------+1

हत्यार --- नाहीतरी धाग्याला काही अर्थ नाहीये Happy
Objection to the word गुन्हा Sad

Theme काय होती? Games कोणते होते? Birthday icon तुमचा कोण होता? खणपटीला लहान कोणी नसताना party मध्ये odd man out वाटलं का? Gift काय दिले, return gift तुम्हाला काय मिळालं

खणपटीला लहान कोणी नसताना party मध्ये odd man out वाटलं का? return gift तुम्हाला काय मिळालं >> बरोबर मुलं नसतील तरीही return gift मिळतं? घ्यायला हवं मागून यापुढे birthday party ला गेले की.

लोकहो नका पिडू त्याला. गफ्रेच्या धाकट्या भावाचा बड्डे असेल तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार.

खणपटीला लहान कोणी नसताना party मध्ये odd man out वाटलं का? return gift तुम्हाला काय मिळालं >>> हा प्रश्न मलाही पडला होता रे .
पण नंतर विचार केला , लहान मुलांच्या ब्ड्डेपार्टीला फक्त लहानांनाच बोलावतात अस काही नाही .
काका,मामा , शेजारी वगैरे वगैरे असतातच की .
Theme काय होती? Games कोणते होते? ऋन्मेष , बर्थडे ला मेनू काय होता? आणि केक कोणता होता? >> याला मात्र + १००० Happy

गफ्रेच्या धाकट्या भावाचा बड्डे असेल तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार.>>>≥>
अब्बो...
गफ्रे कमीतकमी 20 ची हवी,
भाऊ bday सेलेब्रेट करतोय म्हणजे 10 च्या आसपास..
2 भावंडात इतका वयातला फरक??
ऋन्मेष मध्ये कोणी मेम्बर आहे का?

माझा प्रतिसाद मी मागे घेतो. कारण लेखाच्या शेवटी ऋ ने अशा मुलांच्या पालकांना समाजकंटक असे संबोधले आहे. लग्न करायला त्याला आधीच बरीच विघ्ने आहेत (ब्लाब्लाब्लाब्ला) त्यात असे बोलून ऋ नवीन रिस्क घेणार नाही. Proud

च्रप्स ,
तुम्ही वारंवार ती मुलं मोठी होती हेच पटवून देण्याचा प्रयत्न का करताय ...?(नाही म्हणजे ती मुलं कोणत्याही वयोगटातली असू शकतात की)

त्यामुळे मला पडलेले प्रश्न-
1) ती बर्थडे पार्टी तुमच्याच कोणा व्यक्तीची तर नसावी....
2)त्या नासधूस करणार्यांत तुम्ही तर नसावेत...( मोठ्यांमध्येही बालमन असतं, असं वाचलंय कुठेतरी...)

पाफा नि प्रतिसाद मागे घेतल्याने माझा ही प्रतिसाद रद्द समजावा,
बाकी पाफा, तुमच्याकडे बड्डे ची तयारी कुठपर्यंत आली :p

पाफा, सुटलेला बाण असा मागे घेताय! तो ही श्री श्री कु. ऋ याच्या धाग्यावर!!!
१. समाजकंटकचा नवीन अर्थ कॉईन करणे
२. त्याचे-त्याच्या प्रेयसीचे--त्या मुलाचे/ मुलीचे सख्खे सावत्र पालक बालक असा एक सावळा गोंधळात गोंधळ नाटुकली रचणे
३. मी आजूबाजूच्या मोठ्या जवाबदार व्यक्तिना समाजकंटक म्हणालो सख्या पालकांना नाही काही,
४. मला समाजकंटकचा अर्थच माहित न्हवता
५. मी कॉन्डोम कॉन्डोम कॉन्डोम इंटरकोर्स इंटरकोर्स इंटरकोर्स सारखं समाजकंटक समाजकंटक समाजकंटक असं कुठेही म्हणू शकतो त्यात काय एवढं!!
६. आणि हल्ली काहीच सुचलं नाही की किती असंबद्ध बोलताय म्हणून विषय बदलणे
यातील काहीच का बरं वापरावंस वाटलं नाही तुम्हाला? याबद्दल आपण सविस्तर बोलू, पण ते इकडे नाही तर दुसऱ्या धाग्यात! तो पर्यंत शब्बाखैर! डोंबलाचं शब्बाखैर... काम करू आपण!

काही उत्तरे एकदमच,

१) सिंबा, व्यापक लिहायचे होते. व्यापम झाले. त्याला काही वेगळा अर्थ आहे का? चावट असेल तर विपू करा.

२) अनिश्का, ईथला कोणी माणूस तिथे नव्हते. पण तसे तर करणी सेनेचेही कोणी मायबोलीवर सभासद नाहीयेत. निदान अजूनपर्यंत पुढे तरी आले नाहीत. तरी देखील आपण त्यांनी घातलेल्या उत्पाताची चर्चा करतोच ना?

३) हातातील अनुकुचीदार वस्तू टाचणी होती. नुकतेच मी कन्फर्म केले आहे. मुले दहा ते बारा वयोगटातील होती. बड्डे बॉय दहाचा होता. तो धुडगूस घालत नव्हता. त्याचे फोटोसेशन पाहुण्यांना निरोप देणे चालू होते.

४) राजसी, खरेच या धाग्याला अर्थ नाहीये. असे तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच या धाग्याची गरज होती. कारण जे घडलेय ते काही चुकीचे घडलेय असेच कित्येकांना वाटत नसेल तर खरेच ही गंभीर गोष्ट आहे.

५) मागे माझ्या आजीला थॅन्क्यू बोलायच्या धाग्यावर काही लोकांना तो मॅनर्सचा ओवरडोस वाटला नव्हता. आज ईथे काही लोकांना हा गोंधळ नॉर्मल वाटतोय. लोकं फॅड म्हणून टोकाच्या विचारांनी वागू लागलेत. काही चुकीचे समज आज समाजात पसरले आहेत. एकतर मॅनर्स म्हणजे आजीला थॅन्क्यू बोलणे वगैरे आणि याने मुलांवर फार संस्कार होतात वगैरे. तर त्या उलट दुसरीकडे मुलांना मोकळीक देणे, त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करणे म्हणजे त्यांना असा मुक्त धुडगुस घालू देणे.
अर्थात ही माझे मते आहेत. चुकीची नक्कीच असू शकतात. समोरून मते पटली तर बदलायला तयार आहे.

६) बड्डेला केक कोणता होता कळले नाही. मला तसाही केक आवडत नाही. आणि काही पोरांच्या तोंडाला फासलेला बघून तो खायची इच्छा तशीही मेलेलीच.

७) बाकी जेवण मस्त होते. वेज नॉनवेज दोन्ही होते. चापून खाल्ले. अर्थातच नॉनवेज. त्याआधी लहान मुलांचे गेम्स चालू असताना मोठ्यांसाठी स्टार्टर फिरत होते. त्यात नॉनवेजचे चिकन लॉलीपॉप, कबाब, चिकन क्रिस्पी असे तीन प्रकार होते. तिन्हीही दाबून खाल्ले. एका मुलाचे आयुष्य एका वर्षाने वाढले होते, त्याच वेळी कित्येक कोंबड्यांची आयुष्ये कायमची संपली होती. याबद्दल वाटणारी खंत प्रत्येक घासागणिक कमी होत होती. थोडक्यात जेवण टेस्टी होते.

८) गिफ्ट काय दिले ते माहीत नाही. माझ्या गर्लफ्रेंडला सांगितले की दहा वर्षाच्या मुलासाठी गिफ्ट हवेय तिने आणून दिले. काहीतरी एज्युकेशनल टॉय होते. काय ते विचारायच्या भानगडीत मी पडलो नाही. कारण मला अभ्यासाचा आजही तितकाच कंटाळा आहे.

९) मला लहान मुलांच्या पार्टीत बोर होत नाही. चिकन स्टार्टर खात त्यांचे बालकिडे बघायचे हे एक मनोरंजन आहे. तसेच कोणी खेळता खेळता माझ्या जवळ आले की त्यालाही प्रेमाने एक घास भरवायचो. त्यामुळे ऑड मॅन आऊट वगैरे झाले नाही.

१०) रिटर्न गिफ्ट साठी मी हात पुढे केलेला, पण त्यावर एक चापटी पडली. मग मी त्या रागात पोट भरलेले असतानाही चिकनच्या अजून दोन तंगड्या उचलल्या. पैश्यात त्यांची किंमत रिटर्न गिफ्ट ईतकीच असावी. थोडक्यात वसूल झाले.

अवांतर - गिफ्ट काय द्यायचे या मदतीव्यतिरीक्त माझ्या गर्लफ्रेंडचा बड्डेशी काहीही संबंध नव्हता. सारखं सारखं काय ते गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड, बोर नाही काहो होत तुम्हाला. त्यादिवशी सहज मायबोलीवर गर्लफ्रेंड नावाने सर्च केले. ब्याण्णव दशलक्ष अष्ट्यात्तर हजार एकोणीसशे बहात्तर वगैरे सर्च रिझल्ट आले. सर्वर उडेल अश्याने एक दिवस मायबोलीचा.. आणि बिल पुन्हा माझ्या गर्लफ्रेंडवरच फाडाल

सोनु +१
@ सिम्बा दोन्ही लेकिंची खरेदी जोरदार चालू आहे. रोज अॅमेझोनवर नवीन काहीतरी सापडते. माझा सहभाग गेले काही दिवस फक्त मोबाईलवर आलेला OTP देण्यापुरता उरला आहे. (च्यायला त्या अॅमेझोन वाल्यांच्या XXXX) Wink

करणी सेनेचा इथे काय संबंध...चर्चा तुम्ही करता ...ती पण उगाच फालतू गोष्टीवर.. मी फक्त इतकं च म्हटलं , की जर इतकीच ती गोष्ट तुम्हाला आवडली नव्हती तर तिथे बोलायचं होतं इकडे लिहून काय साध्य होणार होतं... असो चालुद्या तुमचं...

पाफा,
तुमच्या दोन्ही मुलींना असा धुडगूस घालू देऊ नका. अमेझॉन वाले प्लास्टिक च्या पिशव्या हवा भरून पाठवतात पॅकिंग मधे त्या उड्या मारून फोडू द्या, टाचण्या देऊ नका.

हायला! खरंच की! घरी मी पोरांना amazonच्या हवा भरलेल्या पिशव्यांवर नाचायला शिकवलंय. आता त्याचा फोटो काढून फिलिंग समाजकंटक असा टॅग लावुन चिकटवावा का?
आता सोनूची कमेंट परत वाचली तर नॉट फिलिंग समाजकंटक असा टॅग करतो.
घरात चटईला टोचायलाही टाचणी नाही. सो मी मुलांचं बालपण हिरावून घेतोय असा फील आणतोय आता. हिराविंग बालपण टॅग. हाकानाका

) हातातील अनुकुचीदार वस्तू टाचणी होती. नुकतेच मी कन्फर्म केले आहे. मुले दहा ते बारा वयोगटातील होती. बड्डे बॉय दहाचा होता. तो धुडगूस घालत नव्हता. त्याचे फोटोसेशन पाहुण्यांना निरोप देणे चालू होते.
>>>
भाऊ आत्ता रात्रीचे १२ वाजलेत.इतक्या उशीरा तुम्ही जाऊन तुम्ही चौकशी करून टाचणी कन्फर्म केलीत. धन्य आहात. _/\_

४) राजसी, खरेच या धाग्याला अर्थ नाहीये. असे तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच या धाग्याची गरज होती. कारण जे घडलेय ते काही चुकीचे घडलेय असेच कित्येकांना वाटत नसेल तर खरेच ही गंभीर गोष्ट आहे.
>>>
तुमचे धागे वाचून वाचून आमची अवस्था "लांडगा आला रे आला " अशी झाली आहे. :हहपुवा:

७) बाकी जेवण मस्त होते. वेज नॉनवेज दोन्ही होते. चापून खाल्ले.
>>>
गिफ्ट गफ्रे ने आणून दिले. तुम्ही चापून जेवलात. निदान खाल्ल्या कोंबडीला (मीठाला) तरी जागून धागा नव्हता काढायचा.

१०) रिटर्न गिफ्ट साठी मी हात पुढे केलेला, पण त्यावर एक चापटी पडली.
>> कोणी ते सांगाल का?

सारखं सारखं काय ते गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड, बोर नाही काहो होत तुम्हाला.
>>
तुमच्या लेखात तुमची गफ्रे सतत वावरत असते. आम्हालाही आता सवय झाली आहे तिच्या असण्याची. तीचा उल्लेख नाही आला तर आम्हाला चुकल्या चुकल्यासारखे होते. सवयीचे गुलाम दुसरे काय.

पाफा,
तुमच्या दोन्ही मुलींना असा धुडगूस घालू देऊ नका. अमेझॉन वाले प्लास्टिक च्या पिशव्या हवा भरून पाठवतात पॅकिंग मधे त्या उड्या मारून फोडू द्या, टाचण्या देऊ नका.
नवीन Submitted by सोनू. on 31 January, 2018 - 23:50
>>>
आयडीया चांगली आहे. पण फक्त लहान लेकीसाठी (वय वर्षे ७). मोठ्या लेकीला (पक्षी बायको ) सांगितले तर सोसायटी वाले घराबाहेर काढतील. Rofl

द्वादशांगुला - तुमच्या घरातली फ्रस्ट्रेशन्स काढायला तुम्हाला इथे कोणी तरी भांडायला हवा असेल तर मी तो नव्हे.. दुसऱ्या एखाद्या आयडी ला भडकवा ☺️
@ वेमा - हा आयडी पर्सनल गेल्यामुळे ही पर्सनल कंमेंट !

 खरेच या धाग्याला अर्थ नाहीये. असे तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच या धाग्याची गरज होती. ---- काय हे ! चित भी मेरी, पट भी मेरी, अंडा मेरे बाप का! मराठीत - दुटप्पीपणा ! ते वर वर तुम्ही सलमान खानच लिहिलेत ते बरोबर आहे. तुमचा काही संबंध! फुगे कोणाचे, फुगवले कोणी, पैसे कोणाचे, फोडले कोणी, मजा कोणाला आली आणि रागावून धागा कोण काढतंय ? कशाचं काही तारतम्य नाही! उद्या म्हणाल अमका @@@मध्ये जाऊन आल्यावर मला खूप वास आला! आदल्या रात्री काय आणि किती खायचं शिस्त नाही, exhaust / फ्रेशनर वापरलं नाही किती लाडवलेपणा आणि त्याला मोकळं झाल्याचा छान वाटलं (उन्माद आला) म्हणून मला त्रास झाला! मला तरी एवढाच संबंध दिसतोय.

मोठ्या लेकीला (पक्षी बायको ) सांगितले तर सोसायटी वाले घराबाहेर काढतील. >> मी मारते उड्या ( वय 40 च्या आसपास). अगदी ऑफिसमधे पण उड्या मारून फोडते त्या पिशव्या.

समाजकंटक कुठल्या !!!! तुम्ही एमएनसीत आहात का? पायात मोजे घालता का? उड्या मारताना पादत्राणे पायात ठेवता का? बॉसची तुमच्यावर मर्जी आहे का? का तुम्हीच बॉस आहात?
जाउद्या राव. लिही बाबा तू रुन्मेश.
बायबाय

Pages