स्मूदी फॅन क्लब

Submitted by मेधा on 9 January, 2018 - 11:20

वेग वेगळ्या भाज्या, फळे यांचा आहारात समावेश असावा म्हणून, सोपे , सहज जमणारे प्रकार म्हणून, व्यायामशाळेत जाताना हातात स्मूदीचा प्याला दिसला तर जास्त भाव मिळतो म्हणून, अशा अनेकविध कारणांनी अनेक जण स्मूदीचे फॅन आहेत. आंतरजालावर वजन वाढवणे, वजन कमी करणे, इथपासून प्रत्येक प्रकारच्या व्याधी साठी स्मूदी च्या कृती सापडतात. तरिही, मायबोलीकरांच्या ट्राईड अ‍ॅण्ड टेस्टेड स्मूदी पाककृतींकरता हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ललि फ्रुट पन्च म्हणजे बहुधा विविध फळांचा एकत्र केलेला रस असावा.
स्मूदित गर पण असतो फळांचा.
बरोबर ना?
जाणकारांनी लाईट मारावा.

फ्रुट पंच मध्ये गरासकट फळं आणि अजून पण काय काय असतं- सोडा, क्रीम(?) भारी टेस्टी लागतं. मला नीट रेसिपी मिळाली नाहीये. Online आहेत त्या मी प्यायली आहे तशी चव येईल असे वाटत नाही.

२. पालक, कोथीम्बीर, पुदिना, काकडी, सैन्धव मीठ, चाट मसाला = अधे मधे प्यायला >> हे फ्रीजमधे आणि फ्रीज बाहेर किती वेळ राहु शकते?

फ्रूट पंच मधे साधारणपणे फळांचे ज्युसेस मिक्स केलेले असतात. मोठ्या पार्टीसाठी वगैरे असेल तर त्यात फळांचे तुकडे, अल्कॉहॉल, सोडा किंवा स्प्राइट वगैरे पण घालतात.

स्मूदी मधे फळे / पाले भाजी, / काकडी / बदाम अशा गोष्टी एकदम गंध वाटलेल्या असतात . वाटून झाल्यावर रस गाळून घेतला जात नाही.

स्मूदीज मधे घट्ट गर असलेला रस असतो. अशा दिसतात -
smoothies.jpg

फ्रूट पंचः यात गाळ काढलेला पाणीदार रस वापरतात
punch.jpg
चित्रे पाहून कल्पना येईल.

मी आजवर फ्रूट पंच म्हणून जे प्यायले आहे, ते 'गर काढलेलं पाणीदार' आणि 'घट्ट गर असलेलं' यांच्या अधलंमधलंच होतं.

काल सिंडीच्या पाकृचं/पाकृची स्मूदी करून पाहिलं/पाहिली. (ती स्मूदी/ते स्मूदी - नक्की काय म्हणायचं?)
आल्यामुळे स्वाद वेगळा आणि छान वाटला. पण वाटण अंमळ जरा घट्टच झालं, म्हणून त्यात जरा दूध घातलं. Uhoh
आलं + दूध हे काही मनाला पटत नव्हतं, पण तरी (देअर इज ऑलवेज फर्स्ट टाईम म्हणत) ग्लासभर संपवलं.

दुधाऐवजी साधं पाणीच घालायला हवं होतं असं नंतर वाटलं.

ललिता, नारळाचं पाणी किंवा बर्फ घाल पुन्हा केलीस तर. तुमच्याकडे तर चांगलं ताजं नारळाचं पाणी मिळतं. नारळाची मलई पण मस्त लागेल स्मुदीमध्ये.

ती स्मूदी/ते स्मूदी - नक्की काय म्हणायचं? >>>> वाघोबा म्हण Proud

>>फ्रीजमधे आणि फ्रीज बाहेर किती वेळ राहु शकते?>> जनरली केल्या केल्या लगेच पिऊन टाकावं, नाहीतर नंतर गर आणि पाणी सेपरेट होतं असं बघितलं आहे.

Pages