"मला एक सी सी पी........अन् हां........डोन्ट पुट आईस अराऊंड इट........डोन्ट नो व्हॉट वॉटर दे यूझ"
(सी सी पी = चीज चेरी पायनॅपल)
"हे क्लीन धिस चेअर ना?"
"बिर्याणी इज सो टिपीकल, लेट्स हॅव कश्मीरी पुलाव"
================================================================
ही विधाने आहेत वय वर्षे सात ते पंधरा वयोगटातील मुलांची! वेटर्सना उद्देशून मुले अशी बोलताना पाहिली.
मनात कुठेतरी दुखावलो गेलो. आईवडिलांनी चुकून माकून वर्षातून एकदा हॉटेलमध्ये नेले तर वडिलांशी दुर्मीळरीत्या कुजबुजत्या स्वरात आईलासुद्धा बोलताना पाहिलेला मी!
अंकल नाही, प्लीज नाही, चक्क अॅरोगन्स!
ही पिढी बिघडली ती आधीच्या पिढीमुळे, हे सार्वकालीन लागू होणारे विधान मान्य करूनसुद्धा हे जरा अतीच होत आहे असे वाटत राहिले.
वेटर्स बिचारे मोठ्यांच्या उपस्थितीमुळे चेहर्यावर कौतुकाचे भाव आणून लहान मुलांना मोठ्यांइतकाच आदर देताना दिसले. वेटर्सच काय, तर कॅप्टन्ससुद्धा!
बायका एकमेकींना सांगू लागल्या.
"ऋषी म्हणजे तुला सांगते प्रज्ञा, कुठ्ठे काय खायचं हे ठरवूनच येतो. अगं खरंच! आमची ऑर्डरही तोच देतो"
मग ती कोण प्रज्ञा असते ती हसते. दोघींचे नवरे एकमेकांकडे बघून ग्लास उचलतात आणि त्यांच्यातला कोणीतरी एकजण म्हणतो........
"धिस जनरेशन इज जस्ट........हा हा........कोणत्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करतोयस सध्या?"
वेटर किंवा कॅप्टन चेहर्यावरचे अत्यंत प्रोफेशनल हास्य काम उरकून पाठ वळताच एका तिरस्कारयुक्त चेहर्यात रुपांतरीत करत पुढच्या टेबलकडे जातात.
पाल्यांच्या नव्हे, पाल्यांच्यादेखत पालकांच्या थोबाडात लगावावी असे मनात येते. टेबल पुसणार्या पोर्यालाही अहो म्हणणारे आम्ही वेटर्सशी विनंतीपूर्वक का बोलतो? का जमत नाही माज? किंबहुना, माज जमत नाही हे चांगले आहे हे इतरांना का समजत नाही?
हॉटेलिंग करणे हा माझा, माझ्या बायकोचा आणि अनेक अनेक फॅमिली फ्रेंड्सचा आवडत्या छंदांपैकी असलेला एक छंद! पण आमच्या अनुभवात आमच्या वर्तुळातील कुठलाही लहान मुलगा आजतागायत असा वागलेला पाहिलेला नाही. आजूबाजूला मात्र नमुने दिसतात.
फक्त आणि फक्त, 'हॉटेलमधील स्टाफशी तसेच वागा जसे आमच्याशी वागता' हेही सांगू शकत नाहीत पालक? की ती मुले पालकांशीही आदराने वागत नसतात?
मला तर सिरियसली वाटते की रेस्टॉरंटच्याबाहेर चक्क पाटी लावावी की लहान मुलांनी आमच्या स्टाफशी थेट बोललेले आम्हाला चालणार नाही.
काहीतरी भयंकर चुकतंय राव!
गेली कैक वर्षे आठवड्यातून दोन ते तीनवेळा रात्रीचे जेवण बाहेर असते त्यामुळे हे अगदी प्रकर्षाने जाणवले.
अगदीच राहवले नाही म्हणून हा धागा काढला.
तुम्हाला असे काही अनुभव आले आहेत का? आले असल्यास तुमचे काय मत?
===============================
-'बेफिकीर'!
>>>इतरांवर दया आणि प्रेम हे
>>>इतरांवर दया आणि प्रेम हे सुद्धा माणुस स्वताला आनंद, समाधान वगैरे मिळवण्यासाठी करतो दुसर्यांसाठी नाही<<<
माफ करा. माझ्या धाग्यावर प्रतिसाद देताना तुमचा कल बव्हंशी 'ह्याला कुठे पकडता येईल ते बघू' असा (मला तरी) दिसत आहे, त्यामुळे मी आपला गप्प राहात आहे. पण वरील प्रतिसाद ज्यांच्यासाठी आहे त्यांना तो समजेलच. त्यातील कोणतेतरी एकच विधान सेपरेटली कोट करून त्यावर कीस काढण्यात अर्थ नाही. तरीही तुमच्या वरील विधानाला उत्तर देण्याचे करतो.
इतरांवर दया आणि प्रेम, हे माणूस स्वतःच्या आणि त्या इतरांच्याही आनंदासाठी करत असतो. दुसर्याच्या आनंदात आनंद मानणारी काही माणसे अस्तित्त्वात असतात.
बेफ़ि, बेफ़ि मी तुमच्या
बेफ़ि,
बेफ़ि मी तुमच्या लिखाणाची पंखा आहे... अतिशय छान धागा आहे.... अगदी खरे आहे की मुले ही अनुकरण प्रिय असतत. पण हिच गोSट्त मोठ्यांनी पण लक्षात ठेवली पाहिजे आणि जिथे आपल्यला अयोग्य वाटते तिथे निदर्शनास आणून दिले पहिजे...
मी ज्या दुकानातून धान्य आणते...तो दुकानदार त्याच्यकडे असलेल्य लोकनचे खूप बोलयचा....एक दिवस मे न रहवत दुकनदरल गोद शब्दत सुचवले की कमीत कमी माज़्यसमोर तरी इतके अपमानस्पद बोलू नका नहीतर मी दुकानात येणार नाही...पण दुकानदरने मज़्य बोलणे एकले आणि माज़्या देखत तरी तो त्यांच्याशी चांगला बोलतो...
अवांतरः एक चूप सौ को हराये और
अवांतरः एक चूप सौ को हराये और एक चूप हम को सौ सुख दे जाये>>>>>:अओ: डोक्यावरुन धावत गेल.
जे विचार आयुष्यभर बाळगतो /
जे विचार आयुष्यभर बाळगतो / बदलतो / त्यागतो ते म्हणजेच आपण!
असो. चेअर क्लीन करण्यावरून तत्त्वं क्लिअर करेपर्यंत म्हणजे फारच भव्य विषयांतर झालं आता.
>>>
बरोबर आहे. त्या सुनिताबाई मोठ्या सांगतायत, पण ते तत्त्वं-मतं वालं प्रकरण त्यांच्याही उतारवयातच लक्षात आलं.
डोक्यावरुन धावत गेल. >> रश्मे
डोक्यावरुन धावत गेल. >> रश्मे मी हसून मेले
मी पण...आधी हेपण डोक्यावरून
मी पण...आधी हेपण डोक्यावरून गेलं होतं पण समजलं नि लोळलेच
इतरांवर दया आणि प्रेम, हे
इतरांवर दया आणि प्रेम, हे माणूस स्वतःच्या आणि त्या इतरांच्याही आनंदासाठी करत असतो. दुसर्याच्या आनंदात आनंद मानणारी काही माणसे अस्तित्त्वात असतात.>>>>>
दुसर्याला आनंद होतोय पण स्वताला दु:ख, त्रास होतय असे एक तरी वागणे सांगा.
मी असे म्हणले नाही की दुसर्यांना पण आनंद देता येत नाही, पण मुळ प्रेरणा स्वताला आनंद, समाधान किंवा गेला बाजार गिल्ट मुक्त करण्याची असते. त्यातुन दुसर्याला आनंद झाला तर तो बाय्-प्रॉडक्ट आहे.
आणि ह्या विचारसरणीचा प्रचंड मोठ्ठा फायदा आहे एक.
प्रत्येक गोष्ट मी स्वता साठीच करतो आहे असा विचार करायची सवय बाळगली की मी अमक्या साठी हे केले, टमक्याला अशी मदत केली वगैरे असले वाईट विचार मनात येत नाहीत आणि त्या अनुशंगानी येणारा अहंकार, दंभ, दर्प पण येत नाही. तसेच ज्याला मदत केली त्याच्या कडुन कसल्याही प्रकारच्या रीटर्न ची ( अगदी धन्यवाद धरुन ) अपेक्षा रहात नाही.
डोक्यावरुन धावत गेल.>>>
डोक्यावरुन धावत गेल.>>> ज्यांना समजले त्यांना विचारणे
समजा त्या वेटरने तुम्हाला पण
समजा त्या वेटरने तुम्हाला पण "काय मित्रा, चल कॉफी पाज" असे म्हणले तर चालेल का?>> टोच्या,
आमच्याकडे वयानी लहान असलेल्या एखाद्या अनोळखी मुलाशी बोलताना/त्याला काम सांगताना/काही विचारताना इ. इ. वगैरे संवादात "दादा" असे म्हणतात. अगदी नात्यातल्याही लहान मुलाना...
'ए दादा कुठे चाललास?'
'दादा, बाबा आहेत का घरी?'
' काय दादा अभ्यास झाला का?'
असे बोलतात.
आता हा (ज्याला आपण दादा म्हणतो तो) कुठल्याही एंगलनी दादा नसतो. तरी ही एक पद्धत आहे. तसेच मित्रा म्हणताना तो मित्र असलाच पाहिजे असे नसून ती एक पद्धत आहे.
---------
काही लोकं सेम वरील परिस्थीतीत "काय रे पोरा, बाबा आहेत् का घरी?" असे बोलतात. माझ्या बापानी मला तसे नाही शिकविले, एवढेच!
मित्रा म्हणताना तो मित्र
मित्रा म्हणताना तो मित्र असलाच पाहिजे असे नसून ती एक पद्धत आहे. >>>>>>
उत्तम आहे. मला वाटले तुम्हाला त्या बिचार्या वेटर बद्दल खरेच मैत्री वाटते. ही तर बिचार्याची मानसिक फसवणुक झाली.
मला वेटर ला वेटर म्हणण्याची पद्धत जास्त आवडते.
ज्यांना समजले त्यांना विचारणे
ज्यांना समजले त्यांना विचारणे फिदीफिदी>>>.ज्याना समजले त्यान्च्या पण डोक्यावरुन आधी धावत गेले असणार.:खोखो::दिवा:
बेफिजी, माझा मुलगा नेहमी
बेफिजी, माझा मुलगा नेहमी हॉटेलमधल्या वेटर्सना काका अशीच हाक मारतो. लेख वाचल्यावर त्यामुळे जरा बर वाटले, अजुन प्रतिक्रिया वाचल्या नाहीत.
प्रतिक्रिया वाचूही नका.
प्रतिक्रिया वाचूही नका.
बेफीजींचा मुद्दा
बेफीजींचा मुद्दा पटला.
एखाद्याचा मुलगा काका म्हणतो तर म्हणू द्या ना. कीस पाडलाच पाहीजे असं बंधन आहे का ? ज्याची त्याची विचारसरणी. माझ्या घरात तर मुलं कधी इतरांना काका म्हणायला शिकली हे कळालंच नाही. सुरुवातीला एकत्र कुटुंबात असल्याचा परीणाम असावा.
आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला काका, मामा म्हणून संबोधलं तर त्यात चुकीचं काय आहे ? तुलना कशाला हवी ? इथे आल्यावर अंकल म्हणणं हे सुद्धा कुणाला खटकतंय असंही नाही. उलट झाली या गो-यांना आपल्या संस्कृतीची ओळख तर ती चांगली असेल की वाइट ?
इतका चोथा का चघळताय? फक्त एका
इतका चोथा का चघळताय?
फक्त एका माणसाने दुसर्याला आदार द्यावा/घ्यावा इतकं कठिण नसावं. पण हे शिकवणं जरूरी नसावं काहींना आपल्या मुलांना व काहींना स्वतःलाच जमत नसावं.;) .
माझी भाचरं/पुतणी वगैरे मला नावानं हाक मारतात. पण काय फरक पडतो? त्यांना आदर नक्कीच आहे व प्रेम सुद्धा म्हणून नावाने हाक मारली तर मारु देत.
पण बाहेर व्यवस्थित बोलतात, कसा आदर द्यावा मोठ्या, लहानांना कळतं त्यांना. आता घरातच कोणी उद्धट वागत नाही कोणाशी मग प्रश्णच येत नाही.
मित्रा म्हणताना तो मित्र
मित्रा म्हणताना तो मित्र असलाच पाहिजे असे नसून ती एक पद्धत आहे. >>>>>>
उत्तम आहे. मला वाटले तुम्हाला त्या बिचार्या वेटर बद्दल खरेच मैत्री वाटते. ही तर बिचार्याची मानसिक फसवणुक झाली.
मला वेटर ला वेटर म्हणण्याची पद्धत जास्त आवडते.
Submitted by टोचा on 21 January, 2015 - 19:33
मला माझ्या एका मित्राने सांगितलेला किस्सा!
एकदा तो कुठेतरी जात होता तेव्हा त्याने पहिले की एक जण आपली bike बाजूला उभी करून फोनवर बोलत होता. परंतु त्यामुळे मागे वाहतुकीची कोंडी झाली होती. तेव्हा त्याला एका वाहतूक पोलिसाने (हो!) सांगितले, "मित्रा, जरा bike बाजूला घे ना!, मागे खूप traffic jam झाले आहे." आणि त्या वाहतूक पोलिसाच्या या वर्तनामुळे माझा हा मित्र त्या घटनेशी काहीही संबंध नसतानासुद्धा खूप भारावून गेला होता. पण हेच जर का त्या वाहतूक पोलिसाने, "अरे ए ***, गाडी बाजूला घे ना, दिसत नाही का एवढं traffic jam झालं आहे ते? कान फुटलेत का?" वगैरे वगैरे असे म्हटले असते तर काय झाले असते??
काही झाले नसते उलट असेच
काही झाले नसते उलट असेच बोलायला हवे होते. स्वतः चे वाहन वापरायला येत नाही मागे ट्रॅफिक आपल्यामुळे झाली आहे इतके ही त्याला कळू नये?
यांच्याशी कोण कसे आणि का बरं प्रेमाने बोलावे?
>>यांच्याशी कोण कसे आणि का
>>यांच्याशी कोण कसे आणि का बरं प्रेमाने बोलावे?
मित्रा, चांगले बोलण्याचे उदाहरण दिले आहे तर त्याला असे बोलून खोडा घातलाच पाहिजे का ?
सर्वांनी जर त्या पोलिसाप्रमाणे एकमेकांशी सौजन्याने वागायचे ठरविले तर जगातले निम्म्याच्या वर प्रॉब्लेम्स सुटतील.
Pages