"मला एक सी सी पी........अन् हां........डोन्ट पुट आईस अराऊंड इट........डोन्ट नो व्हॉट वॉटर दे यूझ"
(सी सी पी = चीज चेरी पायनॅपल)
"हे क्लीन धिस चेअर ना?"
"बिर्याणी इज सो टिपीकल, लेट्स हॅव कश्मीरी पुलाव"
================================================================
ही विधाने आहेत वय वर्षे सात ते पंधरा वयोगटातील मुलांची! वेटर्सना उद्देशून मुले अशी बोलताना पाहिली.
मनात कुठेतरी दुखावलो गेलो. आईवडिलांनी चुकून माकून वर्षातून एकदा हॉटेलमध्ये नेले तर वडिलांशी दुर्मीळरीत्या कुजबुजत्या स्वरात आईलासुद्धा बोलताना पाहिलेला मी!
अंकल नाही, प्लीज नाही, चक्क अॅरोगन्स!
ही पिढी बिघडली ती आधीच्या पिढीमुळे, हे सार्वकालीन लागू होणारे विधान मान्य करूनसुद्धा हे जरा अतीच होत आहे असे वाटत राहिले.
वेटर्स बिचारे मोठ्यांच्या उपस्थितीमुळे चेहर्यावर कौतुकाचे भाव आणून लहान मुलांना मोठ्यांइतकाच आदर देताना दिसले. वेटर्सच काय, तर कॅप्टन्ससुद्धा!
बायका एकमेकींना सांगू लागल्या.
"ऋषी म्हणजे तुला सांगते प्रज्ञा, कुठ्ठे काय खायचं हे ठरवूनच येतो. अगं खरंच! आमची ऑर्डरही तोच देतो"
मग ती कोण प्रज्ञा असते ती हसते. दोघींचे नवरे एकमेकांकडे बघून ग्लास उचलतात आणि त्यांच्यातला कोणीतरी एकजण म्हणतो........
"धिस जनरेशन इज जस्ट........हा हा........कोणत्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करतोयस सध्या?"
वेटर किंवा कॅप्टन चेहर्यावरचे अत्यंत प्रोफेशनल हास्य काम उरकून पाठ वळताच एका तिरस्कारयुक्त चेहर्यात रुपांतरीत करत पुढच्या टेबलकडे जातात.
पाल्यांच्या नव्हे, पाल्यांच्यादेखत पालकांच्या थोबाडात लगावावी असे मनात येते. टेबल पुसणार्या पोर्यालाही अहो म्हणणारे आम्ही वेटर्सशी विनंतीपूर्वक का बोलतो? का जमत नाही माज? किंबहुना, माज जमत नाही हे चांगले आहे हे इतरांना का समजत नाही?
हॉटेलिंग करणे हा माझा, माझ्या बायकोचा आणि अनेक अनेक फॅमिली फ्रेंड्सचा आवडत्या छंदांपैकी असलेला एक छंद! पण आमच्या अनुभवात आमच्या वर्तुळातील कुठलाही लहान मुलगा आजतागायत असा वागलेला पाहिलेला नाही. आजूबाजूला मात्र नमुने दिसतात.
फक्त आणि फक्त, 'हॉटेलमधील स्टाफशी तसेच वागा जसे आमच्याशी वागता' हेही सांगू शकत नाहीत पालक? की ती मुले पालकांशीही आदराने वागत नसतात?
मला तर सिरियसली वाटते की रेस्टॉरंटच्याबाहेर चक्क पाटी लावावी की लहान मुलांनी आमच्या स्टाफशी थेट बोललेले आम्हाला चालणार नाही.
काहीतरी भयंकर चुकतंय राव!
गेली कैक वर्षे आठवड्यातून दोन ते तीनवेळा रात्रीचे जेवण बाहेर असते त्यामुळे हे अगदी प्रकर्षाने जाणवले.
अगदीच राहवले नाही म्हणून हा धागा काढला.
तुम्हाला असे काही अनुभव आले आहेत का? आले असल्यास तुमचे काय मत?
===============================
-'बेफिकीर'!
आपल्याला आदर मिळावा असे
आपल्याला आदर मिळावा असे आपल्याला जेव्हा वाटते, तेव्हा आपण दुसर्याला किती समजावुन घेतोय, त्याला किती आदर देतोय त्यातच ते सगळे दडलेले असते. >> हे अत्यंत गरजेचं आहे. माझा मोठेपणा सांगत नाही पण माझ्याकडे घरकाम करणारी बाई मला ओपनली सांगते की आज मला कंटाळा आलाय मी फरशी उद्या पुसेन. मी ही ओके म्हणते. पण तेच मी कटकटी असते आणि जर तिने कशीतरी फरशी पुसली असती तर ते सगळं गणित किती बिघडलं असतं ? माझ्यासाठी कुणितरी मनापासून काम करणं फार महत्वाचं आहे. जुलमाचा राम राम कधीही खरा नसतो.
आपण समजून घेतलं की ते लोक ही आपलं घर समजून सगळं करतात. मी कधी तिला म्हणलं की तुझ्या मुलानं उद्या तुला कामं बंद कर म्हणून सांगितलं तर? ती म्हणते तरी मी तुमच्याक डं येणारच.
माहिती चान्गली आहे. पण यान्चे
माहिती चान्गली आहे. पण यान्चे जीवन खरच किती यातनामय आहे.:अरेरे: दुसर्यान्चे खरकटे, उष्टे उचला, त्यान्चे रागरन्ग सहन करा. एवढे करुन याना तरी पोटभर जेवायला मिळते का? इकडे श्रीमन्त लोक अन्नाची नासाडी करुन ताटात तसेच सोडतात, तर एकीकडे यान्ची गरिबी.
माझी हॉटेल वारी ३-४ वर्षातुन एकदा असते. पण तेव्हा खरच मी माझ्या आणी मुलीच्या तसेच नवर्याच्या डिशभोवताली जे पडले असेल ते उचलुन त्या डिशमध्ये ठेवते. माझ्याकडे विचीत्र नजरेने पहाणारे भेटलेत पण मी पर्वा करत नाही.
एलतिगो मधल्या वेटरची फार आठवण
एलतिगो मधल्या वेटरची फार आठवण येते आहे.
मुलांना जे दिसतं तेच ते बघतात. आईवडील मुलांच्या शाळेबद्दल, शिक्षकांबद्दलही अनादराने बोलतात तेव्हा ती मुले नंतर शाळेविषयी किती तुच्छतेने बोलतात हे ही पाहिले आहे.
पण कुणाशीही 'नम्रपणे' वागावे हे बरोबरच. नम्रता आणि सलगी यातले अंतर ओळखायला अमा सांगत असाव्यात. मोठ्यांचे याबाबतीत अनुकरण करणारे छोटे पाहिले आहेत. आधी मोठ्यांनी नीट वागावे. एखादा अनपेक्षित पदार्थ समोर आला तर हॉटेल डोक्यावर घेणारे पाहिले आहेत. तुमच्या चार पाचशे रूपड्यांपायी एखाद्याच्या नोकरीवर गदा येऊ शकते याचे जरा तरी भान ठेवावे असे वाटते त्यावेळी. शिवाय जर त्याला एवढी अक्कलहुशारी व नशीबाची साथ असती तर तो टेबलवर तुमच्यासमोर बसला असता, बाजूला उभा राहून तुमची अॉर्डर नसता घेत बसला, असे सांगावेसे वाटते.
वारंवार एखाद्या हॉटेलात गेल्यावर तिथे झालेल्या ओळखीतून वेटरने आपल्याला दिलेली चांगली सर्व्हिस आपल्याला खूश करतेच की. मला लहानपणी गंधर्व हॉटेलमधला एक वेटर नेहमी अमूल आईस्क्रीमसोबत मिळणारे रंगीत गोल चमचे द्यायचा जे खूप वर्षं माझ्या भांडीकुंडीत होते.
माझी हॉटेल वारी ३-४ वर्षातुन
माझी हॉटेल वारी ३-४ वर्षातुन एकदा असते.>>> खरच आश्चर्य वाटले. चांगले आहे पण एका अर्थाने.
वत्सला हे खरे आहे. माझ्या
वत्सला हे खरे आहे.:स्मित: माझ्या नवर्याच्या मते मी जरा कटकटी आहे.:फिदी: खर तर पदार्थान्चे बील पाहुन माझा जीव दडपतो, लवकर निर्णय होत नाही. बाहेरगावी जायची वेळ क्वचीत येते, मग तेव्हा कधी तरी बटाटेवडे ( कामत मध्ये बरे कारण निदान वातावरण तरी बरे असते) वगैरे खाऊन पटकन निघावे वाटते. पुण्यातली हॉटेल्स तरी बरी, पुण्याबाहेर अजून वान्दे. पण सातारा कोल्हापूरकडचे अन्न चविष्ट आणी थोडक्या मध्ये समाधान देणारे असते.
याच स्वभावामुळे नवरा मला बाहेर फिरायला नेत नसावा.:डोमा: कारण मुलीला पण बाहेरचे खाणे सोसत नाही. आणी परदेशात पिझा,बर्गर शिवाय व्हेज वाल्याना पर्याय नसतो, भारतील हॉटेल महाग.
मी माझ्या आयुष्यात आजवर
मी माझ्या आयुष्यात आजवर एकदाही, एकाही वेटरला 'वेटर' किंवा 'ए वेटर' अशी हाक मारलेली नाही. महाराष्ट्रात असलो की बसल्या ठिकाणीच हात वर उंचावून 'ए मित्रा' अशी हाक मारतो. महाराष्ट्रा बाहेर गेलो की स्टाईल तीच पण मित्रा ऐवजी 'ए दोस्त' अशी हाक मारतो.
शेजारच्या टेबलावर कोणी डाफरत असल्यास 'उधर का पहिले निपटाले, बाद मे मुझे देना' असं सरळ सांगुन टाकतो.
आणी परदेशात पिझा,बर्गर शिवाय
आणी परदेशात पिझा,बर्गर शिवाय व्हेज वाल्याना पर्याय नसतो >> अवांतर होतंय.. पण हे मिथ आहे.. व्हेज वाल्यांना इतरही पर्याय असतात
हतोडावाला आवडलं हे मी भैय्या
हतोडावाला आवडलं हे
मी भैय्या म्हणते, तर माझ्या सोबतीचे लोक मला चिडवतात. हिचा भाऊ आहे म्हणतात. मला चालते. निदान मेहनत करून कमवतोय हेच मोठं आहे.
व्हेजवाल्याना काय पर्याय
व्हेजवाल्याना काय पर्याय असतात्?:फिदी: एकदा उड्या मारुन पेस्ट्रीज खाल्ल्या, आणी नेटवर वाचले की पेस्ट्री कव्हरमध्ये डुकराची चरबी वापरतात.:अरेरे: दे माय धरणी ठाय झाल्याने पेस्ट्रीज बन्द. मग नुसता डोमीनोज किन्वा पिझा हट जिन्दाबाद. अर्थात, परदेशातही घरा बाहेर जास्त जाणे झाले नाही.
हतोडावाला आवडलं हे स्मित मी
हतोडावाला आवडलं हे स्मित
मी भैय्या म्हणते, तर माझ्या सोबतीचे लोक मला चिडवतात. हिचा भाऊ आहे म्हणतात. मला चालते. निदान मेहनत करून कमवतोय हेच मोठं आहे.
>>>
+१
मला तसही सगळ्यांना दादाच म्हणायची सवय आहे
वर कोणीतरी उपरोधिकपणे म्हणाले
वर कोणीतरी उपरोधिकपणे म्हणाले आहे की मायबोलीकर अगदी नेमके सगळे चांगले वागणारे दिसत आहेत. त्यात उपरोध कशाला आणायला हवा होता? नक्कीच मी जितक्या मायबोलीकरांना प्रत्यक्ष भेटलेलो आहे व जितक्यांचा येथील वावर पाहिलेला आहे त्यापैकी कोणीच वेटर्सशी स्वतः असे वागत नसतील आणि मुलांनाही वागू देत नसतील ह्याची खात्री वाटते. शिवाय, जे चुकून माकुन कधी तसे वागले असतील ते हा धागा वाचून इथे काही लिहिणारच नाहीत ना?
सर्व सुजाण मायबोलीकरांचे ह्या निमित्ताने हार्दिक अभिनंदन!
अर्थातच, प्रतिसादांसाठी अनेक आभारही!
विबासंला ग्लोरिफाय
विबासंला ग्लोरिफाय करणारा/मानणारा लहान मुलांच्या वागणुकीवर आक्षेप घेत आहे ?
हे म्हणजे आपले ठेवायचे झाकुन दुसर्याचे बघायचे वाकुन
लेकरे पुण्याचेच दिस्तातात …।
लेकरे पुण्याचेच दिस्तातात …। वळणच नाय राव…।
माझ्या पाहण्यात सुदैवाने अशी
माझ्या पाहण्यात सुदैवाने अशी माजुरडी मुले आलेली नाहीत. पण उगाच अल्लेले करत, गालगुच्चे घेत, केस बिस विस्कटणार्या एका वेटरला एका लहान मुलाने गोडपणे सुनावले होते ते मला फार आवडले होते. त्या वेटरने पहिल्यांदा तसे केल्यावर मुलाने आपले अंग चोरून, डोके हलवून नापसंती व्यक्त केली पण पुढच्या वेळेला परत तेच केल्यावर तो मुलगा आईला धाडकन म्हणाला "स्ट्रेंजर्सनी अंगाला हात लावला तर जोरात ओरडायचे असे तू सांगितले होतेस तर आता तुझ्यासमोर ते काका असं करतायत तरी तू काही म्हणत का नाहीस?"
आईने शिकवले तेव्हा आईला कल्पना नसणार हे असे उलटेल याची. ती 'कार्टं जाईल तिथे लाज काढतं!' या भावनेने हताश झाली होती. वेटरला सवय असणार लहान मुलांचे केस बिस विस्कटण्याची म्हणजे त्याच्या डोक्यात विकृती असेलच असं नाही, नुसतीच सवय असेल आणि हे मुलांना नको असू शकते, त्याचाही आदर करायला हवा हे त्याला माहित नसणार.. असे अनेक असतात.
लहान मुलांनी सगळ्या मोठ्यांशी
लहान मुलांनी सगळ्या मोठ्यांशी आदराने बोलावे याबद्दल काहीच दुमत नाही पण "बिर्याणी इज सो टिपीकल, लेट्स हॅव कश्मीरी पुलाव" असे बोलणे हा उद्धटपणा कसा काय?
लहान मुलांनी सगळ्या मोठ्यांशी
लहान मुलांनी सगळ्या मोठ्यांशी आदराने बोलावे याबद्दल काहीच दुमत नाही पण "बिर्याणी इज सो टिपीकल, लेट्स हॅव कश्मीरी पुलाव" असे बोलणे हा उद्धटपणा कसा काय?
>>>
अॅक्च्युअली मला तिन्ही वाक्यांमधे काहीही उद्धट वाटलं नाही पण लेखकाला काय म्हणायचंय ते कळालं.
मलाही 'त्या' तीनही वाक्यांत
मलाही 'त्या' तीनही वाक्यांत कुठेही उद्धट्पणा जाणवला नाही. आणि सर्व प्रकारच्या हॉटेलांतून गेलेल्या आठवणी चाळल्या, पण मुलं अशी वागताना दिसली नाहीत. हे फारच सरसकटीकरण आहे (आणि बेफिकीर यांच्या लिखाणातून ते आता फारच वारंवार दिसायला लागलं आहे) असं वाटतं. यातून इथं 'जनजागृती' हा हेतू असेल, तर 'असं आम्ही बघितलं नाही / मुलं असं करणार नाहीत याची काळजी आम्ही घेतो'- असंच इथल्या अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्या हेतूचं काय- हा प्र्शनच आहे. वेगळ्या प्रतलावर मुलांचं वेगळ्या संदर्भातलं वागणं हे याहून जास्त चिंताजनक आहे.
अमांच्या सगळ्या पोस्ट्सना अनुमोदन. मायबोलीच्या (किंवा कुठच्याही सोशल फोरमच्या) आभासी दुनियेला आपण फारच भाबडं आणि निकराचं रूप देऊन ठेवतो. पण तेही दुरूस्त होईल काही दिवसांत. 'नो सरसकटीकरण' हे नव्या जगाचं 'स्लोगन' झाल्यास काहीच आश्चर्य नाही.
बाकी- "आमच्याही घरात आम्ही मुलांना शिकवतो- कचरावाले काका म्हणायचं नाही, सफाईवाले काका. कचरा आपण करतो, ते सफाई करून चांगलं काम करतात" हेही आहेच. मात्र संबोधने बदलल्याने 'बघायचा दृष्टीकोन' बदलतो / सुधरतो / बिघडतो- हे जास्त महत्वाचं आहे. नाहीतर नव्या युगाची पोरं अतरंगी होण्यासाठीच जन्म घेतात, आणि आपल्याला सतत नवेनवे दृष्टांत देतात - हा 'सरसकट' म्ह्णता येईल असा अनुभव आहे.
>> अॅक्च्युअली मला तिन्ही
>> अॅक्च्युअली मला तिन्ही वाक्यांमधे काहीही उद्धट वाटलं नाही
लेखकाला तर यात माज दिसतो. पाल्यांच्यादेखत पालकांच्या थोबाडात लगावावी असे मनात येते.
>> मला तर सिरियसली वाटते की रेस्टॉरंटच्याबाहेर चक्क पाटी लावावी की लहान मुलांनी आमच्या स्टाफशी थेट बोललेले आम्हाला चालणार नाही.
सिरियसली?? हे म्हणजे उगाचच लहान मुलांबद्दल मनात अढी ठेवून लिहिल्यासारखं वाटतंय
मलाही 'त्या' तीनही वाक्यांत
मलाही 'त्या' तीनही वाक्यांत कुठेही उद्धट्पणा जाणवला नाही >> एक्सेप्ट 'हे क्लीन धिस चेअर ना?'.
पण हेही 'हाऊसकिपिंग' स्टाफला सांगितलं असेल तर बरोबरच आहे, कारण त्यांची ती जबाबदारीच आहे. खुर्च्यांची स्वच्छता आणि बेसिक हायजीनही न पाळणार्या इथल्या रेस्टॉरंट्सबद्दल काय बोलावं..! ते फक्त 'हे क्लीन धिस चेअर ना?' यातच मावणार नाही.
याबाबतीत खरंतर आपण आणि आपल्या आधीची पिढी आपल्या मुलांपेक्षा जास्त उद्धट आणि मॅनरलेस होती असं म्हणायला पाहिजे. मुलं 'कॅप्टन' किंवा 'हॅलो' असं तरी म्हणतात, आणि अपरिचित व्यक्तीशी बोलायचे बेसिक मॅनर्स त्यांना असतात. आपल्याला तीही समज नव्हती. रिक्षावाला आणि वेटर यांना शुकशूक करून बोलावण्याचे मुर्खपणे करणार्या याच दोन पिढ्या. नव्या पिढीला (इतर बरंच काही माहिती असेल पण) 'शुकशूक' माहिती नाही.
'पाटी' ही माझी भावना आहे,
'पाटी' ही माझी भावना आहे, एखादा मुद्दा नाही, हे लेख 'मुद्दाम नकारात्मकपणे न वाचणार्या' सर्वांना समजू शकेल बहुधा!
<<
सरसकटीकरणासोबत, ही असली पर्सेक्युशन अँक्झायटीही फार दिसायला लागली आहे आजकाल.
प्लस एक होलियर दॅन दाऊ अॅटिट्यूड :
>>
शिवाय, जे चुकून माकुन कधी तसे वागले असतील ते हा धागा वाचून इथे काही लिहिणारच नाहीत ना?
<<
म्हणजे, मी काही(ही) लिहिलं तर फक्त चान चान म्हणा. नैतर तुम्ही काहीतरी गुन्हा नक्कीचे केलेला असेल.
बट इट्स ओके. हे असं कशाने होतं ते मी समजू शकतो.
असो. साजिरा यांनीच लिहिलं म्हणून बरं. नाही तर सध्या खुलेआम चंमतग सुरू आहेच.
अवांतर @ साजिराजी, अपरिचित
अवांतर @ साजिराजी,
अपरिचित लोकांना,' अहो, शुक्शुक' असं करणे कुणीएकेकाळी नॉर्मल होते. सायकलला घंटी नसल्याने पाठीमागून 'शुकशुक' आले, तर तो आपले लक्ष वेधून घेण्यासाठी कुणीतरी केलेला प्रयत्न आहे, इतकाच त्याचा अर्थ होत असे. कालचे इन्सल्टिंग शब्द आज साधे वाटणे, किंवा त्यांना वेगळा अर्थ चिकटणे हे होताना दिसतच असते.
ते मान्य आहे, लेकिन जी मत
ते मान्य आहे, लेकिन जी मत लगाव.
Please, Thank you आणि sorry
Please, Thank you आणि sorry हे तीन शब्द योग्य जागी (म्हणजे sorry च्या जागी please नको अशा अर्थाने योग्य जागी!) वापरायला शिकलं पाहिजे सगळ्यांनी. अतिरेक झाला तर कदाचित हसं होईल फार तर पण कधीच कोणाचे नुकसान होणार नाही! बेफिंनी ऐकलेल्या वाक्यांत हे शब्द (please आणि thank you) घालून पहा म्हणजे ती वाक्यं का खटकू शकतात हे कळेल
मला उर्दूमधला तरबियत हा शब्द फार आवडला! Upbringing/संस्कार या अर्थाचा शब्द आहे हा. पण मला वाटते की एका विशिष्ट वयापर्यंत (साधारणतः १८) तुमच्या वागण्याचे श्रेय/अपश्रेय तुमच्या पालकांना जाते त्यानंतर तुम्ही जसे वागता त्याला सर्वस्वी तुम्ही स्वतः जबाबदार असता.
(साधारणतः १८) >>> १४
(साधारणतः १८) >>> १४
'पाटी' ही माझी भावना आहे,
'पाटी' ही माझी भावना आहे, एखादा मुद्दा नाही, हे लेख 'मुद्दाम नकारात्मकपणे न वाचणार्या' सर्वांना समजू शकेल बहुधा!
<<
सरसकटीकरणासोबत, ही असली पर्सेक्युशन अँक्झायटीही फार दिसायला लागली आहे आजकाल.
प्लस एक होलियर दॅन दाऊ अॅटिट्यूड : >>>>>
सहमत आहे इब्लिसजी
मायबोलीच्या (किंवा कुठच्याही
मायबोलीच्या (किंवा कुठच्याही सोशल फोरमच्या) आभासी दुनियेला आपण फारच भाबडं आणि निकराचं रूप देऊन ठेवतो. >> नुसतं हेच नाही 'हीच खरी दुनिया आहे' असंही बर्याच जणांना वाटतंय असं दिसतंय कधी कधी
नवीन प्रतिसाददात्यांचे आभार!
नवीन प्रतिसाददात्यांचे आभार!
१. सरसकटीकरण - जर फक्त 'हॉटेल स्टाफशी मॅनरलेसली वागणार्या' मुलांबाबतच्याच भावन मांडल्या आहेत तर सरसकटीकरण कसे झाले? एक दोन उदाहरणे पाहून सगळीच्या सगळी मुले तशी असतात असे लिहिले असते तर ते सरसकटीकरण झाले असते ना?
२. सरसकटीकरण वारंवार दिसणे -
http://www.maayboli.com/node/52262
http://www.maayboli.com/node/52222
http://www.maayboli.com/node/52000
बहुतेक वरील तीन लेख वाचून हे मत लिहिले गेले आहे की काय, नक्की माहीत नाही. स्पष्टीकरण देण्याचा हेतू खरे तर नव्हता, पण देण्याचा मोह मात्र होत आहे. तीनही लेखात अनुक्रमे 'मनात आलेल्या भावना, पडलेले प्रश्न किंवा मिळवलेली माहिती' ह्यापलीकडे काहीच नाही. ह्या तीन गोष्टी चर्चेसाठी आणल्या इतकेच. एका कॉलेजमध्ये धिंगाणा झाला म्हणजे सगळ्या कॉलेजेसमध्ये होतो, एका शाळेत शिक्षा केली जात नाही म्हणजे आता मुलांना शिक्षाच नसते किंवा मी जे आदिवासी पाहिले त्यापलीकडे आदिवासी जीवनच नसते असा दावा कुठेही केलेला नाही. असो!
होलिअर दॅन दाऊ आणि पर्सेक्युशन अॅक्झायटी ह्या कमेंट्स विचारात घेत नाही आहे.
जिज्ञासांनी लिहिल्यानुसार ती तीनही विधाने एका लहान मुलाने अधिकारवाणीने उच्चारणे व त्यात प्लीज, थँक यू असे शब्द समाविष्ट नसणे हाच प्रॉब्लेम मला नोंदवायचा होता.
धन्यवाद!
माझी मुलंही ऑर्डर वगैरे
माझी मुलंही ऑर्डर वगैरे देतात. आगाऊ म्हणायचं तर म्हणा, पण वेटर्सना अंकल म्हणतात. इथे येऊन जास्त दिवस झालेले नाहीत.सुरुवातीला ओ काका म्हणून हाक मारायचे. आपल्याकडची सवय. आधी तर ओ भैय्या म्हणायचा माझा मुलगा. रिस्पेक्ट च्या बाबतीत ठीक. पण आपली ऑर्डर हा मनुष्य घेतो याचं त्याला अप्रूप असायचं.यात पालकांचा गुण दोष कसा चिकटतो माहीत नाही. मुलांना हॉटेलिंग, मॉल मधे शॉपिंग वगैरे आवडतं. त्याबरोबर त्यांना आवर्जून मैदानात, गार्डन मधे नेत असाल तर काही चुकतंय असं वाटत नाही.
जिज्ञासांनी लिहिल्यानुसार ती
जिज्ञासांनी लिहिल्यानुसार ती तीनही विधाने एका लहान मुलाने अधिकारवाणीने उच्चारणे व त्यात प्लीज, थँक यू असे शब्द समाविष्ट नसणे हाच प्रॉब्लेम मला नोंदवायचा होता.>>
ह्याही पुढे जाऊन मला असे वाटते की केवळ लहान (वयाने) मुलाने म्हटली म्हणून ही वाक्ये खटकली असे न होता कोणीही, वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीने जरी ही वाक्ये म्हटली तरी ती खटकू शकतात (त्यांच्या टोनवरून वै.) तेव्हा ते तीन जादूचे शब्द तुमच्या वाक्यांना योग्य टोन देण्याचे काम करत असतात म्हणून वापरले जावेत!
वीणा सुरू, काका / अंकल इतके
वीणा सुरू,
काका / अंकल इतके म्हणणेही खूप आहे.
निदान काका म्हणणार्या मुलाच्या मनात आपोआप समोरच्याबद्दल आदराची भावना येते तर काका हा शब्द ऐकणार्याच्या मनात आपला आदर ठेवला असल्याची भावना येते.
कोणी मुलगा असे कधीच म्हणणार नाही:
"ए काक्या, एक व्हर्जिन मजेटो आण मला"
(अर्थ - काका ह्या शब्दाने सुरू केलेले वाक्य आपोआपच बर्यापैकी नम्रता घेऊन बाहेर पडेल)
Pages