"मला एक सी सी पी........अन् हां........डोन्ट पुट आईस अराऊंड इट........डोन्ट नो व्हॉट वॉटर दे यूझ"
(सी सी पी = चीज चेरी पायनॅपल)
"हे क्लीन धिस चेअर ना?"
"बिर्याणी इज सो टिपीकल, लेट्स हॅव कश्मीरी पुलाव"
================================================================
ही विधाने आहेत वय वर्षे सात ते पंधरा वयोगटातील मुलांची! वेटर्सना उद्देशून मुले अशी बोलताना पाहिली.
मनात कुठेतरी दुखावलो गेलो. आईवडिलांनी चुकून माकून वर्षातून एकदा हॉटेलमध्ये नेले तर वडिलांशी दुर्मीळरीत्या कुजबुजत्या स्वरात आईलासुद्धा बोलताना पाहिलेला मी!
अंकल नाही, प्लीज नाही, चक्क अॅरोगन्स!
ही पिढी बिघडली ती आधीच्या पिढीमुळे, हे सार्वकालीन लागू होणारे विधान मान्य करूनसुद्धा हे जरा अतीच होत आहे असे वाटत राहिले.
वेटर्स बिचारे मोठ्यांच्या उपस्थितीमुळे चेहर्यावर कौतुकाचे भाव आणून लहान मुलांना मोठ्यांइतकाच आदर देताना दिसले. वेटर्सच काय, तर कॅप्टन्ससुद्धा!
बायका एकमेकींना सांगू लागल्या.
"ऋषी म्हणजे तुला सांगते प्रज्ञा, कुठ्ठे काय खायचं हे ठरवूनच येतो. अगं खरंच! आमची ऑर्डरही तोच देतो"
मग ती कोण प्रज्ञा असते ती हसते. दोघींचे नवरे एकमेकांकडे बघून ग्लास उचलतात आणि त्यांच्यातला कोणीतरी एकजण म्हणतो........
"धिस जनरेशन इज जस्ट........हा हा........कोणत्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करतोयस सध्या?"
वेटर किंवा कॅप्टन चेहर्यावरचे अत्यंत प्रोफेशनल हास्य काम उरकून पाठ वळताच एका तिरस्कारयुक्त चेहर्यात रुपांतरीत करत पुढच्या टेबलकडे जातात.
पाल्यांच्या नव्हे, पाल्यांच्यादेखत पालकांच्या थोबाडात लगावावी असे मनात येते. टेबल पुसणार्या पोर्यालाही अहो म्हणणारे आम्ही वेटर्सशी विनंतीपूर्वक का बोलतो? का जमत नाही माज? किंबहुना, माज जमत नाही हे चांगले आहे हे इतरांना का समजत नाही?
हॉटेलिंग करणे हा माझा, माझ्या बायकोचा आणि अनेक अनेक फॅमिली फ्रेंड्सचा आवडत्या छंदांपैकी असलेला एक छंद! पण आमच्या अनुभवात आमच्या वर्तुळातील कुठलाही लहान मुलगा आजतागायत असा वागलेला पाहिलेला नाही. आजूबाजूला मात्र नमुने दिसतात.
फक्त आणि फक्त, 'हॉटेलमधील स्टाफशी तसेच वागा जसे आमच्याशी वागता' हेही सांगू शकत नाहीत पालक? की ती मुले पालकांशीही आदराने वागत नसतात?
मला तर सिरियसली वाटते की रेस्टॉरंटच्याबाहेर चक्क पाटी लावावी की लहान मुलांनी आमच्या स्टाफशी थेट बोललेले आम्हाला चालणार नाही.
काहीतरी भयंकर चुकतंय राव!
गेली कैक वर्षे आठवड्यातून दोन ते तीनवेळा रात्रीचे जेवण बाहेर असते त्यामुळे हे अगदी प्रकर्षाने जाणवले.
अगदीच राहवले नाही म्हणून हा धागा काढला.
तुम्हाला असे काही अनुभव आले आहेत का? आले असल्यास तुमचे काय मत?
===============================
-'बेफिकीर'!
बेफी अत्यंत योग्य मुद्द्याला
बेफी अत्यंत योग्य मुद्द्याला हात घातलात.
खरंतर माणसाला माणूस म्हणून वागवणं हेच बाळकडू मिळायला हवं. त्याचं काम कोणतंही असो मग. पण वेटर, ड्रायव्हर्स, पेपर टाकणारे, घरकाम करणारे हे कमी दर्जाचं काम करतात असं एक समाज मानून चालतो.
आम्ही खरंच सुदैवी होतो या बाबतीत. आमच्या आईवडिलांनी आमच्या कडे घरकाम करणार्या बायकांना कधी ही 'वेगळ्या' कपात चहा दिला नाही, किंवा त्यांना खाली बसवून स्वतः वर बसले नाहीत. आम्ही हे लहानपणापासून पहात आलो त्यामुळे आम्हाला वेगळ्याने त्यांचा आदर करायला त्यांना शिकवावा लागला नाही.
आमच्या आईवडिलांनी आमच्या कडे
आमच्या आईवडिलांनी आमच्या कडे घरकाम करणार्या बायकांना कधी ही 'वेगळ्या' कपात चहा दिला नाही, किंवा त्यांना खाली बसवून स्वतः वर बसले नाहीत. आम्ही हे लहानपणापासून पहात आलो त्यामुळे आम्हाला वेगळ्याने त्यांचा आदर करायला त्यांना शिकवावा लागला नाही.>>>>>+१ आणि हेच पुढे आमच्या मुलांनाही लागु.
खरे तर हा माज नाही आहे. ही
खरे तर हा माज नाही आहे. ही मुले पोस्ट लिबरलाइज्ड भारतात वाढलेली आहेत. आईबाबांना सुद्धा मित्रत्वाच्या नात्याने अरे तुरे करतात. मुळात ते थोरांचा आदर करायचा ( का?) ह्या संस्कृतीत वाढलेली नाहीत. त्यात नेट वापरा मुळे आपसूकच एक इक्वालिटीची भावना येतेच. मॅनरलेस वागायचे असे आजिबात नाही. पण जसे तुम्हाला वाटले तसे नसेल कदाचित. एकूणच सर्व नात्यांमध्ये एक इन्फॉर्मल
टोन येत आहे. बाबा आले हपिसातून चुप बसा हे आता इतिहासजमा झाले आहे.
मूल्याधारित भूमिकेतून वाढविली गेलेली मुले मुली अशी वागत नाहीत. प्लीज थँक्यू पदोपदी वापरतातच
तुमच्या पाह्ण्यात आली नसतील कदाचित. वेटरला अंकल म्हणणे डेंजरस आहे. नॉट डन. ते सर्विस स्टाफ आहे विनम्रपणे काय ते बोलावे आल्यावर थँक्यू म्हणून फोन मधे गुंगुन काय ते खावे पैसे देओन बाहेर. किस्सा खतम.
आमच्याकडे उलटे आहे. घरी जेवण सर्व्ह केले तरी थँक्यू. का तर बरीच मुले आईबाबांना टेक फॉर ग्रांटेड करतात. ते मी सांगून बंद केले आहे. मी आई आहे वेट्रेस नाही. प्लीज डोंट थँक मी.
मी अनू - ते मे आय पाहिजे कॅन आय बरोबर नाही.
अमा, पोस्ट पटली नाही
अमा, पोस्ट पटली नाही
बेफिकीर योग्य निरिक्षण. अशी
बेफिकीर योग्य निरिक्षण. अशी मुले पाहिली आहेत. इन्फॅक्ट ऑफीस मधे हाऊस किपिंग च्या मुलींशी ही उध्ह्ट्पणे बोलणारे कलिग्स डोक्यात जातात. मी हाऊस किपिन्ग च्या मुलींना मॅडम असेच बोलावते जे माझ्या कलिग्स ना पटत नाही, पण त्यांनी यांना मॅडम बोललेले चालते. ज्या मुली लहान आहेत त्या एक दोघींना नावाने हाक मारते , बाकी ज्या मोठ्या आहेत त्यांना मॅडम च.
"मी अनू - ते मे आय पाहिजे कॅन
"मी अनू - ते मे आय पाहिजे कॅन आय बरोबर नाही"
English winglish baghun pan non-technical English he ase amache 
ho kharech
(Marathi language change issue in dropdown on my browser)
भावना पोहोचली. ह्या गोष्टी मी
भावना पोहोचली. ह्या गोष्टी मी ही बघतो आहे आसपास.
आम्ही एखाद्या हॉटेलात दुसर्यांदा गेलो की आम्हाला आणि मुलांना वेटर लोक अत्यंत चांगली वागणूक का देतात हे ही आपसूक समजलं.
हा विषय छान पण मी सुद्धा अशा
हा विषय छान पण मी सुद्धा अशा केसेस निदान लहान वा टीनएजर मुलांमधे पाहिलेल्या नाहीत. पण तरुण मुलांमधे पाहिलेल्या आहेत.
आणि ह्याच्याच अगदी विरुद्ध मी मोलकरीणींमधे केसेस पाहिल्या आहेत ज्या आपण ज्यांच्याकडे कामाला जातो त्यांना किती सुनावतात.
आमच्याकडे पुण्याला घर पुसायला एक हेल्पर येते (मी मोलकरीण म्हणणार नाही) आणि ती मला दरवेळी सुनावते. मी तिला दरवेळी एकच म्हणतो की बाई तुम्ही आठवड्यातून एकदा तरी सोफा हटवून खालचे घेत जा तर तिला माझी सुचना नको असते. फक्त मी जेंव्हा अकोल्याला जातो तेंव्हा तिला सबंध ८-१५ दिवस पेड रजा मिळणार असतात त्या ती आनंदाने घेते.
आणि ह्यवेळी तर अमरावतीला माझ्या ताईकडे गेलेओ तर तिची हेल्पर अजूनच उग्र वाटली बोलायला. आमच्या मॅनेजर आम्हाला केवढी कामे सांङतत मग आम्ही पण असेच कुरबुर करतो का? ह्या बायला एकतर नियमित येत नाही. कामे मनलावून करत नाही. वर सुनावतात.
सिंङापुरला आमच्याकदे जी श्रीलंकन हेल्पर येते तिने माझ्या घरमालकिणीला घाली पाडोन बोचकारले. पहाट होती. मी शनवारी उशिरा उठतो. हॉल मधून जोरदार किंकाळी आली. बघितले तत्र घरमालकिईन खाली निपचित पडलेली होती.
>>>हॉल मधून जोरदार किंकाळी
>>>हॉल मधून जोरदार किंकाळी आली. बघितले तत्र घरमालकिईन खाली निपचित पडलेली होती.<<<
बी, माफ करा, राहवले नाही इतके हसू आले.
पण तुमचे हे अनुभव न्यारेच!
सर्वांचेच अनुभव तर्हेतर्हेचे आहेत.
बेफी हे खरे आहे. ह्या मोलकरीण
बेफी हे खरे आहे. ह्या मोलकरीण हेल्पर स्त्रियांवर खूप लक्ष ठेवावे लागते. खूप कमी हेल्पर मायेने प्रेमाने कामे करतात.
माझ्या घरमालकिनीने आता हेल्पर ठेवण्याचा बाऊ केला आहे. म्हातरी आहे त्यात पायदुखीचा त्रास आहे. तिच्याकडून होत नाही.
इतक्या गाजवतात ह्या बायका. दुसर्या मिळायला त्रास होतो म्हणून आहे तिचे सहन करावे लागते.
वेटर्स व स्टाफ पण खूप वेळा
वेटर्स व स्टाफ पण खूप वेळा रूड बोलतात. ते सहन करून कधीकधी निघावे लागते. एकदा एका कावळ्यासारख्या वेटरने आम्हाला नको असलेली पनीर प्लॅटर गळ्यात मारायचा प्रयत्न केला होता. तेव्हा वाद होता होता राहिला. स्टोअर क्लर्क पण नको असलेली कार्डे गळ्यात मारायचा प्रयत्न करतात, शॉप असिस्टंट मागे मागे करतात व खडूस पणे कमेंट करतात ते कधी कधी इग्नोअर करावे लागते. एकदाच सांगितले की नको माझे मी वाढून घेइन, कपडे सिलेक्ट करेन, तर ऐकत नाहीत. हॉस्पिटेलिटी ट्रेनिन्ग असलेला स्टाफ जबरी विनम्र असतो. उदा ताज डेक्कन, ते बिला बरोबर एक फीड बॅक फॉर्म येतो त्यातही आम्ही नेहमी बेस्ट विशेस. हार्ट स्मायली गूड वर्क असेच लिहीतो. अगदीच त्रास झाला असला तरी मुकाट बाहेर पडतो. ५०% बिहेविअर नेहमी आपल्या हातात असते.दुसरी पार्टी कशी का वागेना.
सर्विस स्टाफ ही एक चालवून घेण्याची गोष्ट आहे. दोन्ही बाजूंनी. नाते संबंध प्रस्थापित करणे सध्याच्या काळात सेफ नाही. विषय मुले वेटरशी पोलाइट वागण्याचा आहे हे मला माहीत आहे. पण परवाच पुण्यात घडलेले माहीतच असेल. मॅक्डी मधून हाकलूनच दिलेगेले एका मुलाला. तो गरीब आहे व साधे कपडे होते म्हणून.
उभयपक्षी ट्रेनिन्गची गरज आहे. मुलांचे वागणे मॅनेजमेंट एका लेव्हल परेन्तच खपवून घेते. हे सुपर्मार्केट
हॉटेल रिझॉर्ट कोणत्याही ठिकाणी लागू आहे.
अवांतरः बेफी सॉरी: इतक्या
अवांतरः बेफी सॉरी:
इतक्या गाजवतात ह्या बायका. दुसर्या मिळायला त्रास होतो म्हणून आहे तिचे सहन करावे लागते.>>
अरे बाबा हो, पण बोचकारायचे म्हणजे अती होते, पोलीस केस करायची ना.
लेख आवडला. केवळ वेटर्सच
लेख आवडला.
केवळ वेटर्सच नव्हेत तर बाहेरच्या जगात जे जे लोक आपल्याला सेवा (पैश्याच्या बदल्यात का होईना,) देतात, त्या सर्वांशी आपले वागणे सहृदयतेचे असले पाहिजे. उदा. रिक्शाचालक, पोस्टमन, दूधवाला,रद्दीवाला, कार पुसणारा, बसचालक, बस वाहक, दवाखान्यातला काम्पाउंडर, पेट्रोल पंपावरची मुले, हायवे वरचा टोल् स्वीकारणारा माणूस इ.इ.
परदेशात या सर्वांशी नजरानजर करून लोक बोलतात. हाय, हेलो, हाव् आर यू असे विचारतात. सरळ नजर फिरवून दुर्लक्ष करून निघून जात नाहीत.
अलीकडे 'अनाम प्रेम' या नावाची एक संघटना या विषयी लोकजागृती करताना दिसते.
नाते संबंध प्रस्थापित करणे
नाते संबंध प्रस्थापित करणे सध्याच्या काळात सेफ नाही>>
अमा, अगदीच तसं करावं असं कुणी म्हणणार नाही. मात्र किमान सौजन्य तरी दाखवता येईलच ना.
केस नाही केली उलट तिला तिचा
केस नाही केली उलट तिला तिचा पगार देऊन तिचे बोलणे खाऊन परत पाठवले होते. मी तिला विचारले तू खरच तिला मारले का तर ती हसून हो म्हणाली होती
कारण फक्त एकच की घर स्वच्छ असताना घरमालकीन झाडू पोछा मारायला सांगत होती.
@ बेफी - तुम्ही अश्या हॉटेल
@ बेफी - तुम्ही अश्या हॉटेल मधे का जाता की जिथे अश्या टाईप चे पब्लिक येते?
कदाचित तुम्ही ज्या प्रकारच्या घरातुन्/समाजातुन आलात तिथे तुम्हाला असे बघण्याची ऐकण्याची सवय नसेल. त्यामुळे तुम्ही जिथे तुमच्या सारखी लोक असतील अश्याच हॉटेल मधे जात जा.
मला तर कधी अशी उद्धट्पणे वेटरला बोलणारी मुले दिसली नाहीत.
उलट बर्याच वेटर आणि मॅनेजर चा अनुभव चांगला नाहीये.
>>>त्यामुळे तुम्ही जिथे
>>>त्यामुळे तुम्ही जिथे तुमच्या सारखी लोक असतील अश्याच हॉटेल मधे जात जा.<<<
सल्ल्याबद्दल आभार
@ बेफी - अजुन एक निरीक्षण -
@ बेफी -
अजुन एक निरीक्षण - सर्व प्रतिक्रीया देणार्यांपैकी कोणी किंवा त्यांची मुले असे वागत नाहीत. माबोवर सर्वच मायाळु, कनवाळु असे लोक बघुन भरुन आले.
टाळी एका हाताने वाजत नाही.
टाळी एका हाताने वाजत नाही.
परदेशात या सर्वांशी नजरानजर
परदेशात या सर्वांशी नजरानजर करून लोक बोलतात. हाय, हेलो, हाव् आर यू असे विचारतात.>> मॉल मध्ये जी पार्किंग टिकेट देणारी मुलगी असते तिच्या स्क्रीन वर लिहीलेले असते. प्लीज मेंटेन आय काँटॅक्ट डोंट फरगेट टु विश कस्टमर. हे सर्वच ठिकाणी असते.
कोकणस्थ>> उभयपक्षी ट्रेनिन्गची गरज आहे हे लिहीलेच आहे. आईवडिलांचे बघून मुले शिकतात. मूळ लेखाचा मुद्दा बरोबर आहे.
इंट्रेस्ट असल्यास कस्टमर्स फ्रॉम हेल नावाची साइट आहे तिथे किस्से अफलातून आहेत.
बी, तुमची पोस्ट लेखाशी
बी, तुमची पोस्ट लेखाशी संबंधित नाही बहुदा.
एकदा एका कावळ्यासारख्या वेटरने आम्हाला नको असलेली पनीर प्लॅटर गळ्यात मारायचा प्रयत्न केला होता.
>>>
कावळ्यासारखा वेटर म्हणजे काय अमा?
>>>कावळ्यासारखा वेटर म्हणजे
>>>कावळ्यासारखा वेटर म्हणजे काय अमा?<<<
बहुध टाळी किती हातांनी वाजते त्याचे उदाहरण
ह्या बायला एकतर नियमित येत
ह्या बायला एकतर नियमित येत नाही. कामे मनलावून करत नाही. वर सुनावतात.>>>>
बी अरे बाया असे हवे होते तिथे.:स्मित:
टाळी एका हाताने वाजत नाही.>>>>> मग दोन्ही हाताने वाजवा.:खोखो::दिवा:
कावळ्यासारखा वेटर म्हणजे काय
कावळ्यासारखा वेटर म्हणजे काय अमा?>> तो बारका गोरा फिट्ट व संपूर्ण काळे कपडे( वेटरचा ड्रेस घातला होता) काळी प्यांट शर्ट काळे केस, मिश्या. व सारखा भोवतली फिरत होता. मेन्यू कार्ड घेउन वाचेपरेन्त पेशन्स नाही व दुसरे तिसरे काही उपलब्धच नाही अश्याच व्हाइब देत होता.
कावळा किंवा वेटर दोघांचा अपमान करण्याचा उद्देश आजिबात नाही. उडदामाजी काळे गोरे. असायचेच. त्यात हा २००७ चा किस्सा आहे. मी माबो जॉइन होण्याआधीचा आहे. आता बिचारा सर्विस मॅनेजर झाला असेल. ब्लेस हिम. बरोबरचे लोक आय हेट पनीर टाइपाचे होते. तीनदा खालच्या स्वरात पोलाइटली नो वी डोंट लाइक पनीर असे सांगितल्यावरही तेच. तरी त्याला काही बोललो नाही.
अगं अगदी छान स्वभावाची मुले पण कधीकधी लाज आणतात. तो बाफच आहे इथे.
तीनदा खालच्या स्वरात पोलाइटली
तीनदा खालच्या स्वरात पोलाइटली नो वी डोंट लाइक पनीर असे सांगितल्यावरही तेच >> आमा बहिरा असेल वेटर. खालच्या स्वरात का बोललात ?
टाळी एका हाताने वाजत
टाळी एका हाताने वाजत नाही.>>>>> मग दोन्ही हाताने वाजवा>..
रश्मी बरोबर बोललिस दोन्ही हाताने नाही वाजवली तर बोचकारे खायला लागतिल.
हं! काही घरात कामवाल्याना जी
हं! काही घरात कामवाल्याना जी उपेक्षीत वागणूक मिळते, ती पण खेदजनक असते.
कदाचीत त्या श्रीलंकन बाईला ( हेल्पर) त्याचाच राग मनात राहीला असेल, त्यातुन तिने तसे केले असावे.
मुन्नाभाई मध्ये नाही का तो संजय दत्त त्या झाडणार्या बाबाजीला मिठी मारुन धन्यवाद देतो तेव्हा त्याला किती आनंद होतो,
आपल्याला आदर मिळावा असे आपल्याला जेव्हा वाटते, तेव्हा आपण दुसर्याला किती समजावुन घेतोय, त्याला किती आदर देतोय त्यातच ते सगळे दडलेले असते.
तो बारका गोरा फिट्ट व संपूर्ण
तो बारका गोरा फिट्ट व संपूर्ण काळे कपडे( वेटरचा ड्रेस घातला होता) काळी प्यांट शर्ट काळे केस, मिश्या. व सारखा भोवतली फिरत होता. मेन्यू कार्ड घेउन वाचेपरेन्त पेशन्स नाही व दुसरे तिसरे काही उपलब्धच नाही अश्याच व्हाइब देत होता.


>>
इमॅजिन केलं
माझ्या एका नातेवाईकांनी
माझ्या एका नातेवाईकांनी रिलायन्सचा धाबा चालवायला घेतला होता. तेव्हा ह्या वेटर लोकांबद्दल अधिक माहिती मिळाली. ओरिसातील लोकांचे मोठे गट ही कामे करतात.( सर्वच नाही पुण्यात वेगळे असेल पण मेजॉरिटी दिसते. ) अगदी गरीबीतून येतात.काँट्रेक्टर किंवा त्याचा माणूस ह्या गँग्ज इथून तिथे फिरवतो. खूप वर्किंग अवर्स, कष्ट व त्यामानाने कमी पैसे ह्यामुळे हे कायम वैतागलेले असतातच. त्यात परत नीट वागावे लागते. अगदी साध्या परिस्थितीत राहतात. जितका हॉटेलचा झगमगाट मोठा त्या प्रमाणात वेट स्टाफ वर खर्च केला जात नाही. वेलफेअर वर तर कमीच. युनीअन / कायद्याचे बॅकिन्ग कमी प्रमाणात. त्यांचा लीडर म्हटला तर अगदी एका दिवसात सोडून जातात. त्यांचे हिशेब लगेच करावे लागतात. रोगराई असते. वैयक्तिक स्वच्छता ह्या बाबीकडे कमी लक्ष दिले जाते. प्रॉपर इलाज होतोच असे नाही.
स्वभावाने फार कट थ्रोट. अगदी कमी पैशावरून भांडून खून पाडायला मागे पुढे पाहात नाहीत. सुर्या वगिअरे असतातच भाजी कापायच्या हाताशी. ह्या गटाचे फार शोषण होते म्हणून ते पण कायम डिफेन्सीव असतात.
लॉजिन्ग बोर्डिन्ग वाले वेटर ग्राहकांसाठी काही इतर कामे पण करतात. नेहमीचा प्रवासी असेल तर साटेलोटे असते. फॅमीली वाल्याना त्रास देत नाहीत सहसा. पण दूर राहिलेले बरे. स्त्री प्रवाश्यांना रात्री बेरात्री रूमचे बेल मारून पाणी हवे आहे का विचारणे वगिअरे प्रकार करतात. आत आले तर सर्व लक्ष असते. जितक्यास तितके ठेवलेले बरे. अगदी स्टार हॉटेल असले तरी. रूम सर्विस खाणे मागवले तर प्लेटा खाउन झाले कि बाहेर ठेउन दिल्या तर बरे. सेफ्टी साठी. मुलांना तर कमीत कमी इंटरअॅक्षन करू द्यावी. काम झाले, टिप दिली, बिल दिले, डन. नो मोअर नो लेस असे.
चांगली माहिती
चांगली माहिती
Pages