"हे क्लीन धिस चेअर ना?"

Submitted by बेफ़िकीर on 19 January, 2015 - 10:28

"मला एक सी सी पी........अन् हां........डोन्ट पुट आईस अराऊंड इट........डोन्ट नो व्हॉट वॉटर दे यूझ"

(सी सी पी = चीज चेरी पायनॅपल)

"हे क्लीन धिस चेअर ना?"

"बिर्याणी इज सो टिपीकल, लेट्स हॅव कश्मीरी पुलाव"

================================================================

ही विधाने आहेत वय वर्षे सात ते पंधरा वयोगटातील मुलांची! वेटर्सना उद्देशून मुले अशी बोलताना पाहिली.

मनात कुठेतरी दुखावलो गेलो. आईवडिलांनी चुकून माकून वर्षातून एकदा हॉटेलमध्ये नेले तर वडिलांशी दुर्मीळरीत्या कुजबुजत्या स्वरात आईलासुद्धा बोलताना पाहिलेला मी!

अंकल नाही, प्लीज नाही, चक्क अ‍ॅरोगन्स!

ही पिढी बिघडली ती आधीच्या पिढीमुळे, हे सार्वकालीन लागू होणारे विधान मान्य करूनसुद्धा हे जरा अतीच होत आहे असे वाटत राहिले.

वेटर्स बिचारे मोठ्यांच्या उपस्थितीमुळे चेहर्‍यावर कौतुकाचे भाव आणून लहान मुलांना मोठ्यांइतकाच आदर देताना दिसले. वेटर्सच काय, तर कॅप्टन्ससुद्धा!

बायका एकमेकींना सांगू लागल्या.

"ऋषी म्हणजे तुला सांगते प्रज्ञा, कुठ्ठे काय खायचं हे ठरवूनच येतो. अगं खरंच! आमची ऑर्डरही तोच देतो"

मग ती कोण प्रज्ञा असते ती हसते. दोघींचे नवरे एकमेकांकडे बघून ग्लास उचलतात आणि त्यांच्यातला कोणीतरी एकजण म्हणतो........

"धिस जनरेशन इज जस्ट........हा हा........कोणत्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करतोयस सध्या?"

वेटर किंवा कॅप्टन चेहर्‍यावरचे अत्यंत प्रोफेशनल हास्य काम उरकून पाठ वळताच एका तिरस्कारयुक्त चेहर्‍यात रुपांतरीत करत पुढच्या टेबलकडे जातात.

पाल्यांच्या नव्हे, पाल्यांच्यादेखत पालकांच्या थोबाडात लगावावी असे मनात येते. टेबल पुसणार्‍या पोर्‍यालाही अहो म्हणणारे आम्ही वेटर्सशी विनंतीपूर्वक का बोलतो? का जमत नाही माज? किंबहुना, माज जमत नाही हे चांगले आहे हे इतरांना का समजत नाही?

हॉटेलिंग करणे हा माझा, माझ्या बायकोचा आणि अनेक अनेक फॅमिली फ्रेंड्सचा आवडत्या छंदांपैकी असलेला एक छंद! पण आमच्या अनुभवात आमच्या वर्तुळातील कुठलाही लहान मुलगा आजतागायत असा वागलेला पाहिलेला नाही. आजूबाजूला मात्र नमुने दिसतात.

फक्त आणि फक्त, 'हॉटेलमधील स्टाफशी तसेच वागा जसे आमच्याशी वागता' हेही सांगू शकत नाहीत पालक? की ती मुले पालकांशीही आदराने वागत नसतात?

मला तर सिरियसली वाटते की रेस्टॉरंटच्याबाहेर चक्क पाटी लावावी की लहान मुलांनी आमच्या स्टाफशी थेट बोललेले आम्हाला चालणार नाही.

काहीतरी भयंकर चुकतंय राव!

गेली कैक वर्षे आठवड्यातून दोन ते तीनवेळा रात्रीचे जेवण बाहेर असते त्यामुळे हे अगदी प्रकर्षाने जाणवले.

अगदीच राहवले नाही म्हणून हा धागा काढला.

तुम्हाला असे काही अनुभव आले आहेत का? आले असल्यास तुमचे काय मत?

===============================

-'बेफिकीर'!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पालक जर हॉटेलमधील स्टाफशी अदबीने वागत असतील तर मुले पण तसे वागायला शिकतील. दोष मुलांचा नाही पालकांचा आहे!!

हे फक्त हॉटेलमधल्या वेटरलोकांसाठीच नाही तर आपल्या आजुबाजुला असलेले वॉचमन काका / आजोबा , दुधवाले काका , शेतावरचे गडी मजुर वगैरे साठी पण लागु होत.

हो, असं दिसतं खरं आजूबाजुला. आपल्या मुलांनी कसं वागावं हे त्यांच्या आईवडिलांनीच नीट समजावायला हवं. त्याआधी आईवडिलांनी नीट भाषा वापरायला हवी
तो वेटरही आधी माणूसच आहे ना? ते लक्षात ठेवा; त्याचा आदर करा. भाषा आपोआपच नीट वापरली जाईल.

जगातली प्रत्येक व्यक्ती ही माणूस आहे आणि म्हणुनच माणूस म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाला आदरानेच वागवायला हवं असच मला वाटतं.

कालच काही कारणाने आमच्या घरातल्या फरशी पुसणार्‍या मावशींना माझी बहिण म्हणाली -
'अरे वा आज हॉल मधली फरशी पुसणार नाही का? मज्जाय तुमची तर'
मला आवडलं नाही आणि मी लगेच तिला ओरडले. नशिबाने मी तिला का ओरडले हे घरात सगळ्यांनाच पटलं (तिलाही) त्यामुळे लगेच ती त्यांना सॉरी म्हणाली पण घरी आलेल्या नात्यातल्या एका बहिणीने मात्र मला 'दिद्झ तू तिचा असा कामवाल्यांसमोर इन्सल्ट कसा करू शकतेस? मला अजिबात आवडलं नाही. डोण्ट हर्ट हर इगो इन्फ्रंट ऑफ सर्व्हट्ण्स' असं सुनवलं आणि त्यावर माझ्या बहिणीनेच तिला तिथल्या तिथे (डोण्ट कॉल हर सर्व्हंट. त्या आमच्याकडे माझ्या जन्माच्या आधी पासून काम करतायेत. मी असं बोलायला नक्कोच होतं. माय दी इज राईट) असं ऐकवून गप्प बसवल्याने चर्चा थांबली पण ती बहिण मात्र तोंड पाडून गेली.

>>>(डोण्ट कॉल हर सर्व्हंट. त्या आमच्याकडे माझ्या जन्माच्या आधी पासून काम करतायेत. मी असं बोलायला नक्कोच होतं. माय दी इज राईट)<<<

टाळ्या!

धिस इज टू गूड

मला तर सिरियसली वाटते की रेस्टॉरंटच्याबाहेर चक्क पाटी लावावी की लहान मुलांनी आमच्या स्टाफशी थेट बोललेले आम्हाला चालणार नाही >>>>

हे कळलं नाही. जर ती मुले आदराने, योग्य प्रमाणे बोलूनच आपल्या खाद्यपदार्थांच्या ऑर्डर्स नोंदवत असतील तर त्यात वावगं काय आहे? त्यानिमित्ताने मुलांचा आत्मविश्वास, बाहेर कसं बोलावं त्याची जाण याची वाढ व्हायला मदतच होते.

लहान मुले स्टाफशी बोलतात तेव्हा यूझ्वली पदार्थांची ऑर्डर किंवा इतर काही डिस्टर्ब करणार्‍या इश्यूबद्दल बोलतात. ते त्यांच्यावतीने त्यांचे पालक बोलू शकतात. पब्लिक स्पीकिंगची सवय लावण्याची इतर अनेक माध्यमे असू शकतात. Happy

लहान मुले स्टाफशी बोलतात तेव्हा यूझ्वली पदार्थांची ऑर्डर किंवा इतर काही डिस्टर्ब करणार्‍या इश्यूबद्दल बोलतात. ते त्यांच्यावतीने त्यांचे पालक बोलू शकतात. पब्लिक स्पीकिंगची सवय आवण्याची इतर अनेक माध्यमे असू शकतात.>>>>

सॉरी..असहमत आहे. अदबीने, योग्य रितीने जर पदार्थांची ऑर्डर कोणीही देत असला तर त्याची वयोमर्यादा आड येऊ नये अशी अपेक्षा आहे.

अगदी बरोबर!

अदबीने न बोलणार्‍या मुलांबाबत माझे म्हणणे आहे Happy

'पाटी' ही माझी भावना आहे, एखादा मुद्दा नाही, हे लेख 'मुद्दाम नकारात्मकपणे न वाचणार्‍या' सर्वांना समजू शकेल बहुधा! Happy

हे कळलं नाही. जर ती मुले आदराने, योग्य प्रमाणे बोलूनच आपल्या खाद्यपदार्थांच्या ऑर्डर्स नोंदवत असतील तर त्यात वावगं काय आहे? त्यानिमित्ताने मुलांचा आत्मविश्वास, बाहेर कसं बोलावं त्याची जाण याची वाढ व्हायला मदतच होते.>>>>+१

आदराने बोललं पाहिजे पूर्ण सहमत. सगळ्यानीच आदबीने बोललंच पाहिजे.
लहानमुलांनी बोलू नये, असहमत. ती चुकत असतील तर पालकांनी सुधारणा करावी तोंड बंद करून समस्या सुटेल असं वाटत नाही. माझ्या २ वर्षाच्या मुलाने काही चूक केलेली, समोरची व्यक्ती अरे जाउदे लहान आहे म्हणत होती, आम्ही त्याला माफी मागायला उद्युक्त केलं तो पुन्हा असं करणार नाही म्हणाला. लहान मुलांना चूक असेल तर सॉरी म्हणायला आणि बरोबर काय आहे हे मोठ्यांनी शिकवायला हवं. बोलती बंद करून उशिरा का होईना प्रश्न येणारच आहे.

>>>लहान मुलांना चूक असेल तर सॉरी म्हणायला आणि बरोबर काय आहे हे मोठ्यांनी शिकवायला हवं<<<

अनुमोदन

आमच्याकडे ऑफिसचे शिपाई , ड्रायव्हर यांचे सतत येणे असते. त्याना सवय असूनही आम्हीही कधी त्यांच्यावर डाफरलो नाही. आम्ही कधी कधी अरे तुरे म्हनतो पण मुलाना ती सवय लावली नाही. त्यामुळे मुले कधी असं बोलताना आढळली नाही . सव्वीस वर्षात कधीही मुलांसमोर बायकोचा अपमान केला नाही. भांडण तर नाहीच. (म्हनजे त्यांच्या समोर हं). आज मुलांच्या वागण्याबद्दल इतरांचे कॉम्प्लिमेन्ट मिळतात त्याचा अभिमान वाटतो.पेरलेले उगवल्याचे समाधान वाटते

मात्र काही मित्र हॉटेलात वगैरे गेल्यावर ज्या अ‍ॅरोगन्सने बोलतात ते फारच खटकते... पैसा फेकतोय त्यामुळे वाट्टेल ते बोलण्याचा हक्क मिळालाय..आणि त्यानुरुप तुच्छतेचे बोलणे डाफरणे इत्यादि. अगदी मूडचा बेरंग करणारे तर असतेच पण आपल्यालाही कानकोंडे करणारे असते. हे साधारण दोन नम्बरच्या पैशावाल्यांच्यात जरा जास्तच....

सुस्थितीतल्या पालकानी मुलाना गरिबी , त्याची कारणे , सामान्य लोकांचा प्रेमळपणा याबाबत प्रबोधन करणे आवश्यक आहे. गरीबाना डिग्निटी असते हे बिम्बवले पाहिजे. आमच्या नातेवाईकात बरेच ग्रामीण लोक गरीब आहेत .त्यामुळे ती समज मुलाना आपोआप येत गेली.काही नवश्रीमंताची मुले गरीबाना ' भिकारी ' असे सम्बोधन वापरतात . वर्गातल्या गरीब मुलाना ते भिकारी आहेत असे म्हणतात. तळपायाची आग मस्तकात जाते.

आता आडातच तसे विचार असतील तर पोहर्‍यात येतीलच.

मी लहान असताना वडलांच्या हाताखाली काम करणारी प्रत्येक व्यक्ती मग ती इंजीनीअर असो वा कामगार- ड्रायव्हर त्यांना अंकल म्हणूनच हाक मारायची अशी शिस्त होती. परिणामी नवर्‍याचा बॉस अजूनही माझा "अंकल" आहे आणि तेव्हा माझ्या वर्गात बारावीला शिकणारा आणि आमच्या गाडीवर पार्ट टाईम ड्रायव्हर म्हणून काम करणारा मित्रसुद्धा "अंकल"च.

>>>तेव्हा माझ्या वर्गात बारावीला शिकणारा आणि आमच्या गाडीवर पार्ट टाईम ड्रायव्हर म्हणून काम करणारा मित्रसुद्धा "अंकल"च.<<<

+१

अजूनतरी असं बोलणारी मुलं आजुबाजुला बघितली नाहीत. आमचा मुलगा घरी किंवा आजुबाजूला काम करणार्‍या व्यक्तींना (कामवाली, त्याला सांभाळणारी बाई, जुन्या कामवाल्या, ड्रायव्हर्स, त्यांच्या शाळेतले हेल्पर्स, आमच्या कॉलेजातील स्टाफ, गाडी साफ करणारे, वेटर्स, वॉचमन्स, दुकानातले सेल्समन्स किंवा होम डिलिव्हरी साठी येणारी मुलं, धोबी, धोब्याची मुलं इ.इ.) या सगळ्यांना त्या त्या वयोगटाप्रमाणे भैय्या, दिदी, अंकल, आंटी, बाबाजी, दादीजी, चाचु म्हणतो.
आमच्या ड्रायव्हर काकांची गोष्टच वेगळी. ५०-५५ चं वय असेल, गेल्या १०-१२ वर्षांपासून पुर्ण पांढरे केस. त्यांना घरचे/कॉलेजातले सगळेच जण सतिशजी म्हणूनच हाक मारतात. आणि लहान मुलांनी मात्र सतिशजी चा शॉर्ट फॉर्म पीजी केलाय. बरेच दिवस मुलाला पीजी हा बाबाजी ला समानअर्थी शब्द आहे असं वाटायचं. Happy

बाहेर जेवायला गेल्यावर बहूतेक वेळा मुलाला काही स्पेशल हवं असेल तर त्या अंकलना विचार ते देवू शकतात का असं आम्ही म्हणायचो. मुलगा नवख्या व्यक्तीशी बोलायला बुजायचा. तुम्ही सांगा म्हणायचा. अजूनही ऑर्डर देत नाही तो. पण जेवण संपल्यावर बर्‍याचदा वेटर्सना किंवा तिथल्या मॅनेजर्सना जावून थँक्यू म्हणतो. मुझे खाना अच्छा लगा असंही सांगतो.

घरातल्या व्यक्ती आपल्याकडे काम करणार्‍यांशी कश्या वागतात यावर मुलांचं वागणं अवलंबून असतं.

बरेचदा जी मुलं समवयस्क मुलांसोबत वाढदिवस वगैरे साजरा करायला येतात , ती आपल्याच धूंदीत स्टाफशी नीट वागताना दिसत नाही .

नवरा कधी कधी वेटरशी उखडून बोलतो तेव्हा मलाही राग येतो .
लेकाला सहसा कधी ऑर्डर द्यायला सांगत नाही .

कधी कधी आमचं संभाशण गंमतशीर असते .
एकदा आम्ही आणि नणंदेची फॅमिली दमन ला गेलो होतो .
लेक ३ वर्शाचा होता .
दूपारी जेवायला गेलो तर लेकाने घोशा लावला आधी बीचवर जाउया .
त्याला सांन्गितल जर नीट जेवलास तर हे (वेटर) काका तिकिट देणार आणि मग ते घेउनच आपल्याला बीचवर एन्ट्री देणार .
वेटर ही हसत हसत कबूल झाला .
तिकिटाच्या आशेने लेकाने व्यवस्थित जेवण केलं .
जिजाजींकडे मी हळूच एक जुनं कार्ड सरकवलं . ते म्हणाले थांब ग , पद्धतशीर होउ दे .
त्यानी जाउन वेटर ला कार्ड दिलं .
ते परत आला तसा लेकाने लगेच दाखवलं की मी सगळं जेवलो .
त्यानेही अगदी गूड गूड करत खिशातून कार्ड काढून ह्याला दिलं .
" दादा , टुक टुक , तुला नाही , काकानी मला कार्ड दिलं, मी जाणार तू नाही " त्या वेटरच्या चेहर्यावरही मोठ्ठ हसू पसरलं .

वेटरना थँक्यु म्हणनं , वॉचमन काकाना कधी कधी रात्रि उशीरा परतलो तर आठवणीने गूड नाईट म्हणणं -- लेकाला काही चांगल्या सवयी लावयाचा प्रयत्न करत आहे . बघूया !

बेफी,
उत्तम धागा !!
माझा मुलगा वय वर्ष २.५ !! घरात त्याचे आजी-आबु म्हणजे माझे आई बाबा नेहमी त्याच्या बरोबर च असतात...आमच्या पेक्षा ही त्यांनी आमच्या मुलाला जास्त चांगले वळण लावले आहे. आमच्या घरी काम करायला येणार्या ताई, आमच्या पेक्षा वयाने फार मोठ्या नाहीत, पण आम्ही म्हणजे मी व बायको त्यांना आधी पासुन "ताई" च म्हणतो व अहो जाहो करतो, परिणामतः आमचा मुलगा पण त्यांना आता अहो काकु किंवा कधी कधी अहो मावशी च म्हणतो, इतकेच नाही तर देवाचे म्हणुन झाल्यावर मोठ्यांना नमस्कार करायला सांगितला तर तो जाउन त्यांना पण नमस्कार करायला जातो, आणि आम्ही त्या बद्दल त्याला कधी ही टोकत नाही, उलटपक्षी त्या मावशीच त्याला नमस्कार करु देत नाहीत. वर अलप्ना म्हणाल्या आहेत त्या प्रमाणे घरातल्या व्यक्ती आपल्याकडे काम करणार्‍यांशी कश्या वागतात यावर मुलांचं वागणं अवलंबून असतं. हे शतप्रतिशत खरे आहे !!!

-प्रसन्न

हि आगाऊ की स्मार्ट (?) मुले आणि सोबत किटीपार्टीला आलेल्या त्यांच्या आगाऊ की आधुनिक (?) आई’ज या आमच्या साठी नेहमीचा टाईमपास आहे.

मी आणि माझी ग’फ्रेंड बरेचदा जातो त्या प्युअर वेजच्या हॉटेलात यांचा फुल्ल धिंगाणा चालू असतो.

अ‍ॅक्चुअली मी यांना वेटर्सशी ओवरस्मार्टगिरी करताना पाहिलेय पण त्यांचा अनादर नाही. चुकून तसे झालेच तर त्यांच्या आई’जना त्यांना दमही भरताना पाहिलेय. भले तो किंचित नाटकीच का वाटत असेना, पण ठिकाय वार्‍यावर सोडल्यासारखे नसतात. त्यामुळे प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास चीड येणे किंवा बिघडलीत पोरे असे नाही वाटत.

पण माझ्या ग’फ्रेंडला मात्र ते सारे दैत्य कम वानरे वाटतात. तिला गडबड गोंधळ फार सहन होत नाही. तिला माझ्याशी प्रेमाच्या चार गप्पा मारायच्या असतात.
याउलट मी मात्र मोठ्या उत्साहाने त्यांच्या मर्कटलीला एजॉय करत असतो. म्हणजे मस्ती तीच असते, बस्स तिच्याकडे बघायचा आम्हा दोघांचा द्रुष्टीकोन वेगळा.

'पाटी' ही माझी भावना आहे, एखादा मुद्दा नाही, हे लेख 'मुद्दाम नकारात्मकपणे न वाचणार्‍या' सर्वांना समजू शकेल बहुधा! >>>>

हेही कळलं नाही. तुमच्या लेखातल्या एका वाक्यावर मी माझं मत नोंदवलं तर त्यात लेख नकारात्मकपणे वाचण्याचा सूर कुठे आला ते समजलं नाही. कदाचित माझी आकलनशक्ती तोकडी पडत असेल बहुतेक Happy

>>>" दादा , टुक टुक , तुला नाही , काकानी मला कार्ड दिलं, मी जाणार तू नाही <<< अरेरे >>>

बेफि , त्याने हे त्याच्या दादालाच सन्गिलाच, वेटरला नाही

<<सव्वीस वर्षात कधीही मुलांसमोर बायकोचा अपमान केला नाही. भांडण तर नाहीच. (म्हनजे त्यांच्या समोर हं). >>

उत्तम विधान

बेफी सुरेख लेख.
पण यात दोष लहान मुलांचा आहे असे वाटत नाही.
खरेतर लहान मुले जेव्हा असे काही बोलतात तेव्हा कित्येक पालकांना यावर हसताना पहिले आहे. किंबहुना ते ही गोष्ट हसण्यावारी नेतात.
काहीना तर या गोष्टीचा अभिमान वाटतो की कसा माझा मुलगा याला उत्तर देतो.
म्हणजे मुळात त्यांना काहीतरी चुकत आहे असे वाटत नाही.

बरेच मुद्दे पटले. हा लेख वाचल्यावर जरा निरीक्षण करणे चालू केले.
मुलांना ऑर्डर देऊ देत नाही. दिली तर कॅन आय हॅव ने सुरु करायला सांगतो आणि काही आणून दिल्यावर न चुकता थँक्यु म्हणायला सांगतोच.

अशी मुलं अजुन बघण्यात आली नाहीत.
घरातल्या व्यक्ती आपल्याकडे काम करणार्‍यांशी कश्या वागतात यावर मुलांचं वागणं अवलंबून असतं.>>>+१

Pages