"हे क्लीन धिस चेअर ना?"

Submitted by बेफ़िकीर on 19 January, 2015 - 10:28

"मला एक सी सी पी........अन् हां........डोन्ट पुट आईस अराऊंड इट........डोन्ट नो व्हॉट वॉटर दे यूझ"

(सी सी पी = चीज चेरी पायनॅपल)

"हे क्लीन धिस चेअर ना?"

"बिर्याणी इज सो टिपीकल, लेट्स हॅव कश्मीरी पुलाव"

================================================================

ही विधाने आहेत वय वर्षे सात ते पंधरा वयोगटातील मुलांची! वेटर्सना उद्देशून मुले अशी बोलताना पाहिली.

मनात कुठेतरी दुखावलो गेलो. आईवडिलांनी चुकून माकून वर्षातून एकदा हॉटेलमध्ये नेले तर वडिलांशी दुर्मीळरीत्या कुजबुजत्या स्वरात आईलासुद्धा बोलताना पाहिलेला मी!

अंकल नाही, प्लीज नाही, चक्क अ‍ॅरोगन्स!

ही पिढी बिघडली ती आधीच्या पिढीमुळे, हे सार्वकालीन लागू होणारे विधान मान्य करूनसुद्धा हे जरा अतीच होत आहे असे वाटत राहिले.

वेटर्स बिचारे मोठ्यांच्या उपस्थितीमुळे चेहर्‍यावर कौतुकाचे भाव आणून लहान मुलांना मोठ्यांइतकाच आदर देताना दिसले. वेटर्सच काय, तर कॅप्टन्ससुद्धा!

बायका एकमेकींना सांगू लागल्या.

"ऋषी म्हणजे तुला सांगते प्रज्ञा, कुठ्ठे काय खायचं हे ठरवूनच येतो. अगं खरंच! आमची ऑर्डरही तोच देतो"

मग ती कोण प्रज्ञा असते ती हसते. दोघींचे नवरे एकमेकांकडे बघून ग्लास उचलतात आणि त्यांच्यातला कोणीतरी एकजण म्हणतो........

"धिस जनरेशन इज जस्ट........हा हा........कोणत्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करतोयस सध्या?"

वेटर किंवा कॅप्टन चेहर्‍यावरचे अत्यंत प्रोफेशनल हास्य काम उरकून पाठ वळताच एका तिरस्कारयुक्त चेहर्‍यात रुपांतरीत करत पुढच्या टेबलकडे जातात.

पाल्यांच्या नव्हे, पाल्यांच्यादेखत पालकांच्या थोबाडात लगावावी असे मनात येते. टेबल पुसणार्‍या पोर्‍यालाही अहो म्हणणारे आम्ही वेटर्सशी विनंतीपूर्वक का बोलतो? का जमत नाही माज? किंबहुना, माज जमत नाही हे चांगले आहे हे इतरांना का समजत नाही?

हॉटेलिंग करणे हा माझा, माझ्या बायकोचा आणि अनेक अनेक फॅमिली फ्रेंड्सचा आवडत्या छंदांपैकी असलेला एक छंद! पण आमच्या अनुभवात आमच्या वर्तुळातील कुठलाही लहान मुलगा आजतागायत असा वागलेला पाहिलेला नाही. आजूबाजूला मात्र नमुने दिसतात.

फक्त आणि फक्त, 'हॉटेलमधील स्टाफशी तसेच वागा जसे आमच्याशी वागता' हेही सांगू शकत नाहीत पालक? की ती मुले पालकांशीही आदराने वागत नसतात?

मला तर सिरियसली वाटते की रेस्टॉरंटच्याबाहेर चक्क पाटी लावावी की लहान मुलांनी आमच्या स्टाफशी थेट बोललेले आम्हाला चालणार नाही.

काहीतरी भयंकर चुकतंय राव!

गेली कैक वर्षे आठवड्यातून दोन ते तीनवेळा रात्रीचे जेवण बाहेर असते त्यामुळे हे अगदी प्रकर्षाने जाणवले.

अगदीच राहवले नाही म्हणून हा धागा काढला.

तुम्हाला असे काही अनुभव आले आहेत का? आले असल्यास तुमचे काय मत?

===============================

-'बेफिकीर'!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकंदरीत आजकाल असे दिसत आहे की पडलेले प्रश्न, निर्माण झालेल्या भावना शेअर करणे हे वादोत्पादक ठरू शकते. उदाहरणार्थ, एखाद्या गोष्टीचा राग आला बुवा, असे फोरमवर लिहिले की येणार्‍या प्रतिसादांचे प्रकार साधारण असे असतात.

१. हो, आम्हालाही येतो. / छान लेखन / मुद्याला हात घातलात.
२. सोडून देत चला.
३. हे फार वाढलं आहे हल्ली.
४. त्यात काय राग यायचाय? आता सगळं बदलतंय!
५. तुमची औकाद आहे का ह्या विषयावर लिहायची?
६. ह्याचा राग आला? पण हेच सगळीकडे आहे हे कशावरून ठरवलंत?
७. असे खरे तर मुळीच नाही आहे / तुमचा परिघ मर्यादीत आहे. (असा एक प्रतिसाद आजच इतरत्र कोणाच्यातरी धाग्याखाली वाचला आणि थक्क झालो)

अर्थातच ह्यातील पहिले तीन प्रकार भावतात, चौथा चर्चेस योग्य असतो, पाचवा दुर्लक्षणीय असतो, सहावा वादोत्पादक असतो (अरे मी जितके पाहिले तितक्याबद्दल बोललो बाबा) आणि सातवा 'डन विथ धिस' वाटायला लावणारा असतो.

हे सगळे प्रतिसादही खूप बोलकेच असतात. त्यांच्यातील मूळ मुद्दा काहीही असो, त्याद्वारे एक माणूस काही ना काही प्रमाणात आपली भडासच काढत असतो. हे भडास काढणे मात्र सार्वत्रिक असावे असे वाटते. ह्या भडास काढण्याचे सरसकटीकरण करण्याचा मात्र मोह होत आहे.

घाईघाईत शिक्के मारणे, प्रतिसादांमधून अंतर्गत कलह स्पष्टपणे जाणवणे वगैरे (अर्थातच माझे प्रतिसाद अपवाद असतात असा दावा अजिबातच नाही) हे अगदी सर्रास!

इतरत्र काय झाले ते विसरून निव्वळ ताज्या मनाने एका नवीन धाग्याकडे बघण्याचा संयम दुर्मीळ!

हे सगळे उगाच लिहिले. पण लिहावेसे वाटले. हे कोणा एकाला उद्देशून नाही.

बेफीजी

फेसबुकचं अकाउंट होतं तेव्हाची गंमत. एका आयडीला खूप शॉर्ट प्रतिसाद द्यायची सवय होती. दुर्दैवाने त्याचे माझे चाळीसेक मित्र कॉमन असल्याने त्याचे प्र्तिसाद दिसायचेच. शॉर्ट म्हणजे किती शॉर्ट तर एका शब्दाचे सुद्धा. एखाद्याने जीव तोडून लिहीलेल्या स्टेटसवर यांचे एका शब्दाचे प्रतिसाद आल्यानेकाय व्ह्यायचं तर एकामराठी सिनेमाच्या अभ्यासपूर्ण स्टेटसवर यांचा प्रतिसाद काय ---- अरे !
काय समजायचं ?
बरं, बघू, हायला, मग ? असले प्रतिसाद मग डोक्यातच जायला लागले. एकदा एका मालिकेबद्दल स्टेटस टाकलं तेव्हां हे महाशय आले तिथं. मी वाटच बघत होते. त्यांनी सवयीप्रमाणे हुश्श असा असंबद्ध प्रतिसाद दिला. मग त्यांच्या वॉलवर जाऊन पंधरा वीस स्टेटसवर अ, ब , क असे प्रतिसाद दिले.

त्यांनी ब्लॉक केल्याचा मला खूप फायदा झाला. इथे काही तशी सोय दिलेली नाही. Sad

त्यांनी ब्लॉक केल्याचा मला खूप फायदा झाला. इथे काही तशी सोय दिलेली नाही

>>> इथे आत्महत्या केल्या सारखे आपले आपणच स्वतःच ब्लॉक व्हायचे... हाकानाका ?

मायबोलीच्या (किंवा कुठच्याही सोशल फोरमच्या) आभासी दुनियेला आपण फारच भाबडं आणि निकराचं रूप देऊन ठेवतो. >> नुसतं हेच नाही 'हीच खरी दुनिया आहे' असंही बर्‍याच जणांना वाटतंय असं दिसतंय कधी कधी>>>.

असे कुणाच्या बाबतित घडत असेल तर त्याच्या साठी हे चांगले नाही.

माझ्या साठी मायबोली फक्त विरंगुळा व टाईमपास आहे.
यावरिल वाचणामुळे किंवा लिखाणामुळे कुणाला माणसिक त्रास होत असेल तर याच्यापासुन दुर राहने शहाणपणाचे आहे.

>>> इथे आत्महत्या केल्या सारखे आपले आपणच स्वतःच ब्लॉक व्हायचे... हाकानाका ?

आत्महत्या Proud

मायबोलीच्या (किंवा कुठच्याही सोशल फोरमच्या) आभासी दुनियेला आपण फारच भाबडं आणि निकराचं रूप देऊन ठेवतो. >> नुसतं हेच नाही 'हीच खरी दुनिया आहे' असंही बर्‍याच जणांना वाटतंय असं दिसतंय कधी कधी>>>.

असे कुणाच्या बाबतित घडत असेल तर त्याच्या साठी हे चांगले नाही.

माझ्या साठी मायबोली फक्त विरंगुळा व टाईमपास आहे.
यावरिल वाचणामुळे किंवा लिखाणामुळे कुणाला माणसिक त्रास होत असेल तर याच्यापासुन दुर राहने शहाणपणाचे आहे.
>>>>
अनुमोदन्..शेवटी रियल जग काय आणि व्हर्चुअल जग काय ते प्रत्येकाने ठरवायचे आहे.

मुद्दा लक्षात आला, आणि थोडाफार भारतात बघितलेला ही आहे, पण सुरूवातीला दिलेली उदाहरणे आहेत त्यापैकी क्लीन द चेअर सोडले तर इतर दोन अ‍ॅरोगंट वाटली नाहीत (आणि एकतर आपापसात बोललेली वाक्ये वाटतात). क्लीन द चेअर सुद्धा मोठ्या टीन एजर मुलाने/मुलीने साधारण त्यांच्याच वयाच्या कामगाराला म्हंटले असेल तर त्यात फारसे गैर वाटत नाही - अर्थात ते अ‍ॅरोगंटली होते का ते तुम्ही तेथे असल्याने तुम्हाला जास्त चांगले सांगता येइल. पण एखादे वाक्य प्लीज वगैरे न म्हणता केवळ टोन वरून व चेहर्‍यावरून "अ‍ॅरोगंट नाही" असे असू शकते.

अमा - तुमच्या पोस्ट्स आवडल्या. फक्त 'अंकल' हे भारतात कोणत्याही वयाने मोठ्या अनोळखी व्यक्तीला सुद्धा म्हणायची पद्धत आहे. त्यामुळे फक्त तसे म्हंटल्याने सलगी दाखवली जाते असे नाही. पण सलगी दाखवायची गरज नाही हे बरोबर.

बेफि, तुमच्या वरच्या "७" लिस्ट मधे एक "८" ही असायला हवा - "सहमत नाही. कारण <डीटेल मत/उदाहरण>". तसा क्वचित का होईना पण बघायला मिळतो Happy

बेफी चांगला मुद्दा मांडलात.काही ठिकाणी असे नमुने बघण्यात आले आहेत त्यामुळे तुमचा मुद्दा पटलाही.

इतरत्र काय झाले ते विसरून निव्वळ ताज्या मनाने एका नवीन धाग्याकडे बघण्याचा संयम दुर्मीळ!>>अगदीच पटलं (क्याटेगरी १ Proud )

अमा - तुमच्या पोस्ट्स आवडल्या. फक्त 'अंकल' हे भारतात कोणत्याही वयाने मोठ्या अनोळखी व्यक्तीला सुद्धा म्हणायची पद्धत आहे. त्यामुळे फक्त तसे म्हंटल्याने सलगी दाखवली जाते असे नाही. पण सलगी दाखवायची गरज नाही हे बरोबर.
>>
+१

जिज्ञासाच्या दोन्ही पोस्टी आवडल्या आणि पटल्या.

"हे क्लीन धिस चेअर ना?">>>>>

ह्यात काही उद्धट वाटले नाही. खरे तर शेवटी "ना" लावलाय.
खुर्च्या स्वच्छ ठेवणे हे कामच आहे आणि तेच सांगायला लागत असेल तर "प्लीज" कशाला?

बाकीची २ वाक्य तर अजिबात उद्धट नाही वाटली.

उसाच्या रसात सुद्धा बर्फ घालु नको असे सांगतोच ना ( बरेच जण ), कारण बर्फ चांगल्या पाण्याचा नसतो हे माहीती असते.

वेटर ला वेटर म्हणले तर त्यात काय चुक आहे.

उगाच अंकल वगैरे कशाला?

वर एकानी लिहीले आहे की मी वेटर ला "मित्रा" म्हणतो. मला असे विचारायचे आहे की तुम्हाला तो वेटर खरच तुमचा मित्र वाटतो का? आणि नसेल वाटत तर खोटे मित्रा कशाला म्हणायचे.

समजा त्या वेटरने तुम्हाला पण "काय मित्रा, चल कॉफी पाज" असे म्हणले तर चालेल का?

वेटर ला वेटर पेपरवाल्याला पेपरवाला म्हणणे उद्धटपणाचे अजिबात नाही.

एकंदरीत ईथल्या 'तुम्हाला काय वाटले' अशा धाग्यांचे प्रमाण बघता जुन्या माबो वरील V n C ची आठवण झाली.. Happy
असो. आपल्याकडे सर्वसाधारण सामाजिक जाणिवा, सार्वजनिक आचरण ई. बद्दल कुठेही standards सर्वत्र वेग वेगळे बघायला मिळतात त्यामूळे नक्की कुठल्या संदर्भात, काय बोलले गेले यावरून 'शिक्का' मारणे अवघडच आहे. शिवाय वरील ऊ.दा. फक्त एका बाजूने लिहीलेले आहे.. 'माज' करणारे वेटर्स देखिल कमी नाहीत... आणि माज करणारे हॉटेल मालक तर एका विशीष्ट शहरात देखिल आहेतच..थोडक्यात कुठल्याही सेवा क्षेत्रात टाळी एका हाताने वाजत नाही.

तरिही प्रतिसाद द्यायचाच तरः (प्रतीसाद त्या घटनेला अपेक्षित आहे असे गृहीत धरतो.. अन्यथा ईथे आम्ही मुलांना वळण कसे लावतो ई. च्या असंख्य पोस्टि पडत आहेत...!)

"मला एक सी सी पी........अन् हां........डोन्ट पुट आईस अराऊंड इट........डोन्ट नो व्हॉट वॉटर दे यूझ": ..
>>अगदी बरोबरच आहे की कुठले पाणी कुठे वापरतात ही शंका अगदी रास्त आहे, कुठल्याही हॉटेल मध्ये. त्यावर शांतपणे 'नाही सर आम्ही कटाक्षाने स्वच्छ पाणीच वापरतो... मालकाची तशी सक्त ताकीदच आहे..!' एव्हडे बोलायचे प्रशिक्षण वेटर ला दिले गेले असेल तर निदान गिर्‍हाईकाचा तो शेरा त्याच रूपांतर सकारात्मक संभाषणात होऊ शकते. मुख्य जबाब्दारी अर्थातच हॉटेल मालकाची!

"हे क्लीन धिस चेअर ना?":
हेही गैर नाही वाटत... मुळात हे सांगायचीच वेळ येऊ नये.. आणि नविन गिर्‍हाइक आलय तेव्हा त्यांनी बसायच्या आधी मुद्दामून पुन्हा एकदा टेबल खुर्ची तिथल्या सेवेकर्‍याने स्वच्छ केली तर ऊलट हॉटेल बद्दल नक्कीच चांगले मत तयार होईल..!

"बिर्याणी इज सो टिपीकल, लेट्स हॅव कश्मीरी पुलाव":
काहीच गैर नाही... आजकालची 'मोबाईल' पिढी मतस्वातंत्र्या बाबतीत निश्चीतच खूप पुढे आहे हे मान्य करावे लागेल.. व्यक्त करण्याच्या प्रत्येकाच्या पदधतिही वेगळ्याच असतील..

आता मूळ मुद्दा किंवा व्यक्त केलेली चिडचिड ही 'वरील कशा प्रकारे वरील वाक्ये म्हटली गेली' या अनुशंगाने असेल तर मात्र पुन्हा एकदा वर म्हटल्या प्रमाणे social courtesy, social norms, public behavior.... ई. बाबतीत एकूणातच सगळीच सरमिसळ असल्याने कुणाचं कुठे नेमकं चुकतय अस. black n white विश्लेषण अवघड आहे.

'एकमेकांशी आदराने वागा' (मग तुमच नाव, काम,, क्षेत्र, ई. काहिही असो..) हे तर आपण सर्वच जण म्हणत असतो.. पण मुळात तशी 'संस्कृती' रूजवण्या साठी दोन्ही अंगाने (वरील उदा. मधे सेवा देणारा व घेणारा) प्रयत्न होतात का हेच पहावे लागेल.. नियम फक्त हॉटेलासाठी, गिर्‍हाईकासाठी मात्र फक्त 'संकेत' हेही बघायला मिळतच.. दुर्दैवाने आपल्या समाजात पैसा फेकून 'दर्जा' (एकंदरीत आयुष्याचा) विकत घेता येतो हे सत्य असल्याने, quality of life ची परिमाणच बदललेली आहेत. जिथे मुळात वेटर हे कामच आवडीने स्विकारणारे किंवा त्या कामाकडे ईतर कामा ईतकेच आदराने बघणारे लोक, व तशी संस्कूतिक व सामाजिक व्यवस्था नसेल तर अशी ऊदाहरणे 'खमंग' चर्चेपुरती बरी वाटतात. त्यातून प्रातिनिधीक वा ठोस असे काही विशेष निघत नाही असे वाटते.

भंगी [माफ करा!] चे 'सफाई कामगार' नामकरण करण्या एव्हडीच एक समाज म्हणून आपली मजल गेलेली आहे. त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र जुनाच आहे हेच अनेक ऊदाहरणांवरून दिसतं..!

बेफिकीर जी अत्यंत कटू सत्य आहे जे तुमी मांडले आहे ,, शहरातच काय अहो लहान लहान गावाजवळ हायवे ला असणार्या धाब्य्वारती पण असेच प्रकार चालू असतात , अमी लहान असताना ४ ते ५ वर्षातून कधीतरी हॉटेल ला जेवायला जाण्याचा प्रसंग यायचा त्यामुळे हॉटेल ला जाने म्हणजे पण एकाद्या ट्रीप ला जाण्यासार्के असायचे आणि ऑर्डर काय जे काय मिळेल ते पण नवलच असायचे पण आत्ताची मुले पालाकापेक्षा पण स्वताला इतकी मोठी समजतात कि कोणाला किती आणि काय आदर द्यावा हे हि त्यांना काळात नाही .

तसे नाही योग! Happy

तुमचे व तुमच्यासारखे म्हणणे असणार्‍यांचे मुद्दे गैर वाटले आहेत असे मुळीच नाही.

मुद्दा इतकाच आहे की 'वेटर्सशी उद्धटपणे व अधिकारवाणीने बोलणार्‍या' मुलांबाबत (पालकांच्या उपस्थितीत) हा लेख आहे. ह्याचा अर्थ वेटर्स स्वभावाने गरीब असतात, मालक नम्र असतात असे काहीही गृहीतक नाही आहे.

पुन्हा तेच लिहावे लागत आहे ह्याचा खेद वाटतो.

मी समजा २ + २ = ४ होतात असे लिहिले असले तर 'हो पण ३ + ३ = ६ होतात' हेही बघा की, असे म्हणण्यात काय अर्थ आहे?

पुन्हा........असो!

बर्‍याच लोकांना असे कोणतेही अनुभव आलेले नाहीत ही बाब नक्कीच चांगली आहे. Happy

तसेच, आजकालची अनेक मुले (अनेकदा आजकालचे युग बदललेले असल्यामुळे, अधिक व्यावसायिकता लहान वयातच अंगात भिनत असल्यामुळे म्हणा किंवा चांगल्या शिकवणीमुळे) आधीच्या पिढीपेक्षा नम्रपणे वागतात ह्या वर कोणीतरी लिहिलेल्या मताशीसुद्धा सहमत आहेच. तीसुद्धा नक्कीच एक अधिक चांगली बाब आहे. Happy

आभासी जगाला आभासी जग म्हणण्याचे दिवस जात चालले आहेत असे वाटत नाही का कोणाला?

खूप मोठ्या संख्येने माणसे आता एकेकटी होऊ लागली आहेत. जॉगिंग / वॉकिंगच्या वेळी स्वतःची स्वतः गाणी ऐकत जाणे, किंचित जरी फावला वेळ मिळाला तरी स्मार्टफोनमध्ये डोके घालणे, इन्टरनेट फोरम्सवर अनेक तास घालवणे (विरंगुळा किंवा इतर कोणत्याही कारणास्तव), इतकेच काय तर घरात आपल्या खुर्चीवर बसून अर्धा अर्धा, पाऊण पाऊण तास कँडी क्रश खेळणे! ही सगळी लक्षणे माणूस एकटा, यांत्रिक व तरीही अपडेटेड होत असल्याची लक्षणे आहेत. आजकाल पेपर नाही वाचला (किंवा एखाददिवस पेपर आलाच नाही) तरी एक सवयीमुळे चुटपुट लागणे सोडले तर तसे काही बिघडत नाही. ब्रेकिंग न्यूज मोबाईलवर केव्हाच आलेल्या असतात. वाहिन्यांवर जगाच्या कानाकोपर्‍यात काय घडत आहे हे दिसत असते. माणूस कसाही अपडेटेड राहतोच. तब्येत बिघडते (/बिघडू शकते) हे मान्यच आहे. पण हे सगळे आभासी जग आता खरंच आभासी राहिले आहे का? कोणीतरी एबीसी असा आय डी घेऊन रोज फोरमवर खूप छान गप्पा मारत असेल आणि एखाद्या गटगला येऊन सांगत असेल की मी 'एबीसी' तर ती बाब आभासी राहते का? जे भेटत नाहीत, आय डी बदलतात, इतरांना त्रास देतात (/देण्यासाठीच फोरमवर येतात) तेही कोणीतरी असतातच ना? कदाचित ते एरवी छान गप्पा मारणारे 'एबीसी'सुद्धा असू शकतात. हा अपेक्षाभंग, ही विश्वास न राहण्याची बाब प्रत्यक्ष आयुष्यात होत नाही का? पाहता पाहता प्रत्यक्ष आयुष्यातील माणसे बदललेली आपण सगळेजण बघत असू. मग?

आभासी जगाला आभासी मानावे की नाही हाच खरा तर प्रश्न आहे असे मला वाटते.

ह्या जगात कितीही अरेरावीने संवाद झाले तरी 'गुड लिसनर' नसल्यामुळे प्रत्यक्ष संवादांत होणारा घोळ येथे होत नाही. एकमेकांची अक्षरे अन् अक्षरे कोट करून लोक हुज्जती घालतात. ते करण्यासाठी त्यांना गुड लिसनर (येथे अर्थ - गुड रीडर) व्हावेच लागते. हुज्जती घालण्यात अहं असला तर तो अहं प्रत्यक्ष आयुष्यातही नसतो असे नाही. ह्या जगात विचार बनू शकतात, बदलू शकतात. प्रत्यक्ष आयुष्यातही आपण असेच बदलत व बनत असतो.

एक प्रचंड लोकसंख्या ह्या जगात वावरण्यात उर्जा, वेळ, बुद्धी व पैसे खर्च करत असेल तर अजून किती काळ ह्या जगाला आपण आभासी जगत म्हणू शकू? Happy

मुद्दा इतकाच आहे की 'वेटर्सशी उद्धटपणे व अधिकारवाणीने बोलणार्‍या' मुलांबाबत (पालकांच्या उपस्थितीत) हा लेख आहे. ह्याचा अर्थ वेटर्स स्वभावाने गरीब असतात, मालक नम्र असतात असे काहीही गृहीतक नाही आहे. >> खूपच पटलं. पण इथे तुम्ही दाखवलेलं न पाहाता, जे दाखवलेलं नाही त्याबद्दल चर्चा करण्यात लोक अधिक रस घेत आहेत.

वेटर्स अत्यंत साळसूद असतात असा मुद्दा नसून फक्त समाजात त्यांचे काम हे 'क' दर्जाचे मानले गेल्याने त्यांना फक्त माणूसकीची वागणूक मिळा वी इतकंच.
क्लिन धिस चेअर ना हे वाक्य अनेक लोकांना खटकले नाही. पण ते ऑर्डर सोडल्यासारखे वाटते. मला नक्कीच खटकलं. मी त्या जागी 'प्लिज मला ही खुर्ची थोडी स्वच्छ करून देऊ शकाल का?' असं म्हणलं असतं.

वरच्या पोस्ट मध्ये कुणितरी आदर देणं आणि आदर देणं उल्लेखलेलं आहे ते आहे हे. कोणतीही कंपॅरिझन नाही किंवा कोण कसं वाईट आणि कोण किती साळसून हे दाखवण्याचा इथे साधा प्रयत्न सुद्धा नाही.

आभासी जगाला आभासी मानावे की नाही हाच खरा तर प्रश्न
>>>
तुमच्या "पहिले तीन प्रकार भावतात, चौथा चर्चेस योग्य असतो, पाचवा दुर्लक्षणीय असतो, सहावा वादोत्पादक असतो (अरे मी जितके पाहिले तितक्याबद्दल बोललो बाबा) आणि सातवा 'डन विथ धिस' वाटायला लावणारा असतो." या वाक्यानंतर मी "आभासी दुनियेला आपण फारच भाबडं आणि निकराचं रूप देऊन ठेवतो." लिहिलं असतं तरी चललं असतं, पण ते आधीच लिहिलं गेलं.

पण हा या बाफाचा विषय नाहीच. त्यासाठी वेगळा बाफ काढला पाहिजे. (कोण आहे रे तिकडे? :फिदी:)

आपण कधीकधी फार गांभीर्याने बिहेवियर अ‍ॅनालिसिस करत बसतो, पण व्यवहारात सगळ्याच गोष्टी केस टू केस बेसिसवर ठरतात, आणि या आभासी जगातला त्यांचा प्रवेश, स्वरूप इ. फारच आभासी आणि काल्पनिक होऊ शकतं. प्रत्यक्ष अनुभवांचा पोत आणि संदर्भ पार बदलून जातात. (हेच काहींनी वरती त्यांच्या पोस्ट्समध्ये वेगळ्या शब्दांत लिहिलं.)
खरंतर प्रत्यक्ष जगताना सुद्धा आपली तत्त्वं-तत्त्वं, मतं-मतं म्हणून जे काही आपण शेकडो वर्षे कवटाळत बसतो, ते सुद्धा फक्त फक्त 'प्रासंगिक तपशील' होते, त्यापेक्षा अधिक काही नाही- असं पुढे कधी तरी लक्षात येतं आणि मग आपल्याला आपलंच हसू येतं. (असं सुनिता देशपांडेबाई म्हणून गेल्या)

विषयांतराबद्दल क्षमस्व, पण तुमच्या वरच्या पोस्ट्स वाचून लिहावंसं वाटलं.. Happy

.

>>>तुमच्या "पहिले तीन प्रकार भावतात, चौथा चर्चेस योग्य असतो, पाचवा दुर्लक्षणीय असतो, सहावा वादोत्पादक असतो (अरे मी जितके पाहिले तितक्याबद्दल बोललो बाबा) आणि सातवा 'डन विथ धिस' वाटायला लावणारा असतो." या वाक्यानंतर मी "आभासी दुनियेला आपण फारच भाबडं आणि निकराचं रूप देऊन ठेवतो." लिहिलं असतं तरी चललं असतं, पण ते आधीच लिहिलं गेलं.<<<

ठळक केलेल्या भागातील मनोव्यापार प्रत्यक्ष आयुष्यातही होतातच की! Happy

>>>पण व्यवहारात सगळ्याच गोष्टी केस टू केस बेसिसवर ठरतात<<<

हे पटत नाही. व्यवहारात पूर्वग्रह मोठ्या प्रमाणावर आढळतो. इन फॅक्ट, पूर्वग्रहामुळे / तत्त्वामुळे / मतांमुळे कित्येक मोठाल्ली डील्स टाळली जातात किंवा केलीही जातात. रोटीबेटी व्यवहार कोणाशी करावा हेसुद्धा माणसाचे एक मत, एक पूर्वग्रह, एक तत्त्वच असतं! 'व्यवहारात सगळ्या गोष्टी केस टू केस बेसिसवर ठरतात' हे विधान तुम्ही लिहिलंत ह्याचे आश्चर्य वाटते.

विषयांतराचा बाऊ (ह्या धाग्यापुरता) करण्यात विशेष अर्थ उरलेला नाहीच आहे. Proud त्यामुळे तुमच्या पुढच्या विधानाबद्दलही मत प्रदर्शीत करतो.

>>>खरंतर प्रत्यक्ष जगताना सुद्धा आपली तत्त्वं-तत्त्वं, मतं-मतं म्हणून जे काही आपण शेकडो वर्षे कवटाळत बसतो, ते सुद्धा फक्त फक्त 'प्रासंगिक तपशील' होते, त्यापेक्षा अधिक काही नाही- असं पुढे कधी तरी लक्षात येतं आणि मग आपल्याला आपलंच हसू येतं. (असं सुनिता देशपांडेबाई म्हणून गेल्या)<<<

हे कोणीही म्हणालेले असले तरी पटण्यासारखेच आहे. पण तेच माणूसपणही आहे. बाकी तसे तुम्ही-आम्ही किंवा कोणी इथे येऊन 'आलो आहोत म्हणून जगण्याशिवाय' काहीच करत नसतो. जे विचार आयुष्यभर बाळगतो / बदलतो / त्यागतो ते म्हणजेच आपण! (गुरुत्वाकर्षणाचा शोध लागलेला नव्हता तेव्हाही जग सुरू होते. त्यामुळे इतरांवर दया / प्रेम करणे हा एक भाग सोडला तर तसे कोणीच भरीव असे काहीही केलेले नसते किंवा कोणाच्याच असण्या-नसण्यात काही विशेषही नसते) Happy

त्यामुळे इतरांवर दया / प्रेम करणे >>>>>>

इतरांवर दया आणि प्रेम हे सुद्धा माणुस स्वताला आनंद, समाधान वगैरे मिळवण्यासाठी करतो दुसर्‍यांसाठी नाही.

Pages