स्मूदी फॅन क्लब

Submitted by मेधा on 9 January, 2018 - 11:20

वेग वेगळ्या भाज्या, फळे यांचा आहारात समावेश असावा म्हणून, सोपे , सहज जमणारे प्रकार म्हणून, व्यायामशाळेत जाताना हातात स्मूदीचा प्याला दिसला तर जास्त भाव मिळतो म्हणून, अशा अनेकविध कारणांनी अनेक जण स्मूदीचे फॅन आहेत. आंतरजालावर वजन वाढवणे, वजन कमी करणे, इथपासून प्रत्येक प्रकारच्या व्याधी साठी स्मूदी च्या कृती सापडतात. तरिही, मायबोलीकरांच्या ट्राईड अ‍ॅण्ड टेस्टेड स्मूदी पाककृतींकरता हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही स्मुदी मी ब्रेफासाठी करते- २ चमचे रोल्ड ओटस, ५-६ आक्रोड, अर्धा इंच आलं किंवा गवतीचहाचं एक पान, मुठभर ब्लु बेरीज किंवा ४-५ स्ट्रॉबेरीज, अर्ध्या आंब्याच्या फोडी किंवा तेवढंच अननस. लक्षात राहिलं तर यात जवसाची पूड पण घालते. पाणीदार फळं कमी असतील तर नारळाचं पाणी घालते नाहीतर फार घट्ट होते स्मुदी. केल्या केल्या लगेच प्यायली नाही तर ओट्स सगळं पाणी शोषून घेतो.

या दोन स्मुद्या उन्हाळ्यात -
* वॉटरमेलन, पायनॅपल, पुदिना. यातच ग्रीन अ‍ॅपल, काकडी किंवा हनीड्यु मेलन पण आवडतं.

* हनीड्यु मेलन आणि खरबुजाच्या फोडी, बर्फ थोडासा, एका वेलदोड्याचे दाणे.

याखेरीज आंब्याच्या फोडी, व्हनीला आइसक्रीम, दूध, वेलदोड्याचे दाणे आणि असल्यास थोडी बदामाची पूड घालून मॅन्गो मिल्कशेक करते तो पोट्टेमंडळीत 'आँटीज मँगो स्मुदी' म्हणून ओळखला जातो Happy

अजून ह्या बँडवॅगन वर स्वार झालेली नाही.

घरात सर्व लोक (इन मीन तीन लोकांच्या घरात) फळं खाणारे, स्मूदी ची आवड असणारे किंवा चालवून घेणारे नसले तर किचन मॅनेजमेन्ट कठिण होतं विशेषतः फळांचा स्टॉक.

रेग्युलर स्मूदी करणार्‍या/खाणार्‍या लोकांकरता प्रश्नः तुम्ही फ्रोजन फळं/भाज्या वापरता का स्मूदीकरता? की काही फ्रोजन आणि काही फ्रेश, जे फळ/भाजी वापरणार असाल त्यावर अवलंबून?

माझी आवडती स्मुदी रेसिपी:
ग्रीक यिगर्ट, व्हे प्रोटीन पावडर, फ्रोजन ब्लु बेरीज आणि पिकलेल्या केळ्याचे स्लाइसेस फ्लेवरला (ऑपशनल)
सगळं ब्लेंड करायचं आणि हाय प्रोटिन स्मुदी तयार !.
ब्लुबेरीमुळे रंग मस्तं येतो.

मी पण स्मूदी फॅन नाही. पण सिंडीची स्मूदी वाचूनच प्यावीशी वाटते आहे.
सशलच्या फ्रोझन प्रश्नाला+१. केळं फ्रोजन घालतात वाचलेलं तुम्ही पण तसच घालता का?

मी फ्रोझन फळं नाही वापरली कधी. पण ग्रोसरीतून आणलेली फळं ताजी म्हणावीत की नाही हा प्रश्नच आहे.

१-२ वेळा चिटींग करून देशी दुकानातला आंब्याचा पल्प वापरला आहे.

सशल, एवढं काय अवघड आहे त्यात. फळं चिरली की स्मुदीवाल्यांनी स्मूदी करावी बाकीच्यांनी नुसती खावीत.

(अवांतरः ह्या बीबीशी बहुतेक सबंध नाही)
अवघड आहे असा अनुभव आहे म्हणून लिहीलं तसं.
आमच्या घरच्या तीन लोकांनां वेगवेगळी फळं कशीबशी आवडतात. "लाईफस्टाईल चेन्ज" चं मिशन राबवलं तर काही शक्य आहे.

स्मूदी मनापासून आवडणारं कोणीच नाही. फॅड च्या नादात एक दोनदा फ्रोजन बेरीज् वगैरे पाकीटं आणली आणि जेमतेम एका वापरानंतर पडून राहिली. हौस म्हणून स्मूदी करायची तर ग्रोसरी शॉपींग कसं मॅनेज करावं हा खरोखरचा प्रश्न आहे.

म्हणूनच मी फ्रोझन फळं आणत नाही. लहानातलं लहान पॅक पण संपत नाही. ताजी फळं जशी आवड-निवड आहे त्या प्रमाणात कमी-जास्त आणता येतात.

मेधा येणार आता काठी घेऊन Lol

बेरीज् फ्रीज करता येतील (त्या छोट्या असतात ; कापायची भानगड नाही).
मोठी फळं, पटकन पिकणारी (केळी वगैरे) उरून बसली की प्रॉब्लेम

मी इतर फळं कधी घरी आणून फ्रीझ* केली नाहीत. किंवा फ्रोझन फळं पण आणली नाहीत. आमच्याकडे केळी वेळेवर संपवणे हा मात्र कायमचा प्रॉब्लेम आहे. केळी वाया जाऊ नयेत म्हणून ( सालं काढून ) फ्रीझ करते. आधी फक्त बनाना ब्रेड मधे वापरत असे. गेल्या आठवड्याभरात स्मुदी करताना पण वापरली आहेत.

* संपत नाहीत, किंवा स्वस्त आहेत तेंव्हा आणून फ्रीझ करावीत अशा उद्देशाने. पंच किंवा कॉकटेल साठी कधी कधी द्राक्षं फ्रीझ केली आहेत.

मी ग्रीन स्मुदी रोज करते.
मुठभर पालक (किंवा कॉस्कोतले पॉवर ग्रीन्स, किंवा इतर पाला), एक अ‍ॅपल, कढीपत्त्याची पानं ५-७, पुदिन्याची पानं ४-५, अर्ध्या लिंबाचा रस, दालचिनी पूड एक-दोन चिमुट, पिंक सॉल्ट एक चिमुट. एव्हढे सगळे ब्लेंडटेक मध्ये टाकून होल ज्यूसच्या ऑप्शनला फिरवते. मी व नवरा ही स्मुदी साधारण एप्रिलपासून ऑलमोस्ट रोज घेत आहोत. दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरपासून येणारे सर्दि खोकले अजुनपर्यंत आले नाहीत. अजुन दोन महिने लक्ष ठेवीन. पण जर ह्या काळात सर्दी खोकला झाला नाही तर मी टोटल क्रेडीट ह्या स्मुदीला देईन! एव्हढी एकच गोष्ट आम्ही वेगळी केली पण कन्सिस्टंटली केली. Happy

एनीवे , अंधश्रद्धा (:फिदी:) सोडून द्या. मी ग्रीन स्मुदीचा अजुन एक प्रकार करते. फॅट, सिक & निअरली डेड ह्या डॉक्युमेंटरीत पाहिलेला. पालक, केल, कोथिंबीर, पार्सले, सेलरी स्टिक, लिंबू, काकडी व ग्रीन अ‍ॅपल. हे सगळं ब्लेंड करायचे. ही पण स्मुदी मस्त होते व न्युट्रिअंट रिच आहे..

फळं संपत नसतील (स्ट्रॉबेजीज, अती पिकलेले केळे, ई. ) तर मी ब्लेन्डर मधे टाकता येतील ईतक्या आकाराचे कापुन फ्रिझ करते.
ग्रीन स्मुदी ज्यात भाज्यांचा ओव्हर डोस असेल अश्यात केळी/खजुर टाकली तर चांगली चव येते. व्हायटामिक्स मुळे स्मुदीची गोडी लागली. Happy

बस्के, मीपण साधारणपणे अशीच स्मूदी गेले काही दिवस पीत आहे. पालक/ गाजराची पानं/ बीटची पानं ४, पुदिन्याची पानं २०, अर्धं सफरचंद, चिमूट चिमूट दालचिनी पूड आणि मिरपूड, अर्धा ग्लास पाणी.
मस्तच लागते. कढीपत्ता घालून बघते आता.
गाळून घेतलं की ज्यूस आणि गाळले नाही तर स्मूदी अशी व्याख्या असते का?

फॅट, सिक & निअरली डेड << ह्यात ज्युस आहे.
गाळुन घेतलेल्या ज्युस मधे बराच ज्युस फेकला जाईल. ज्युसर मधे रस आणि चोथा पुर्ण पणे वेगळा केला जातो. ज्युस मधे ही कोल्ड प्रेस ज्युस चांगला असतो.
स्मूदी मधे फायबर असते. व्हायटामिक्स सारख्या पावर फुल ब्लेन्डर मधे केलेली स्मुदी एक्दम स्मुथ होते आणि टेस्टी लागते.

मला फार बेसिक प्रश्न पडला आहे. स्मूदी करतात कशी?

बस्के ने वर लिहिलंय की ग्रीन स्मुदी.. त्याची डिटेल पाकृ मिळेल का?

मी तरी सगळे घटक मिक्सरच्या ज्यूस करण्याच्या भांड्यात १ मि. फिरवून घेते आणि न गाळता पिते. मी वरच्या पोस्टमध्ये लिहिले आहे काय काय घालते ते.

. स्मूदी करतात कशी?
घरात जी फळे आहेत ती, म्हशीच्या दुधापासुन बनवलेले दही किंवा ग्रिक योगर्ट, ब्रोकोली सारख्या भाज्या त्या बरोबर ओट्/जवस/चिया सिड्स (optional) , चवी नुसार साखर आणि पाणि /बर्फ (किती पातळ्/थंड पाहिजे त्यासाठी) हे सगळे मिक्सर मध्ये फिरवले की झाली स्मूदी ,

बर्फ घालण्या आधी मिक्सरची क्षमता आणि मिक्सरचा ब्लेड मजबुत आहे की नाही ते तपासणे.

ओके थोडी फार कल्पना आली मला.
म्हणजे आपण गोड स्मूदी पण बनवू शकतो का? विविध फळं एकत्र करून वगैरे? मग त्यात योगर्ट म्हणून घरगुती दही घातले तर चालते का?
वर कुणीतरी काकडी घालते असं लिहिलं आहे सालं काढून की सालासकट? Uhoh
फार बेसिक प्रश्न आहे हा Sad

दक्षिणा, आपल्याला हवी तशी स्मुदी बनवू शकतो. नुसत्या फळांची, नुसत्या भाज्यांची, फळं-भाज्या-नट्स मिक्स करून. त्यात योगर्ट/दूध/बर्फ हवं ते घालून. तुला हवे ते सगळे घटक पदार्थ जमा करून मिक्सर/ब्लेन्डरच्या तब्येतीनुसार बारीक-मोठ्या फोडी करून एकजीव मिश्रण केलं की ती स्मूदी. हा एकदम हेल्दी ऑन-द-गो ब्रेफा/स्नॅक आहे.

काकडीची सालं काढत नाही मी तरी. नीट स्वच्छ धुवून घ्यावी लागते मात्र. खूप व्हॅक्स असतं काकड्यांवर. सफरचंदाचं पण तेच.

फॅट, सिक & निअरली डेड << ह्यात ज्युस आहे.>>> हो.. तेव्हा आम्ही पण मोठा ज्युसर वापरून ज्युस काढायचो. पण त्यात चोथा वाया जातो. सो आता ब्लेंडटेक घेतलाय त्यात खुप पॉवरचे ब्लेड असते सो सफरचंद वगैरे टाकले तरी छान स्मुदी होते. प्लस फायबर मिळते. माझ्यामते तरी एकदा अशाप्रकारचे ज्युस्/स्मुदी घ्यायला हरकत नाही. कारण द्रवपदार्थातून न्युट्रिअंट्स फास्टेस्ट पद्धतीने शरीरात जातात. शिवाय एव्हढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या व फळं एरवी खाल्ली जातीलच असे नाही. (मला फळं खायचा कंटाळा आहे.) सो ह्यानिमित्ताने पोटात जातात.

दिवसातून एकदा म्हणतेस का बस्के? मी तो लेख वाचला नाही पण मी एकुणात मॉडरेशनची भक्ती करते त्यामुळे आठवड्यातून ३-४ वेळाच अशी स्मूदी घेते. सॅलड असतंच जेवणात ३ -४ वेळा.

हो मी रोज एकदा घेते. सकाळी ब्रेफा बरोबर. (अर्थात हे ही मिस होते. पण रोज घेण्याने मला तोटे दिसले नाहीत अजुन..)

सिंडरेला धन्यवाद.
म्हणजे आपण भाज्या किंवा सॅलड्स एकत्र केली तर त्यात बर्फ आणि सैंधव घालून स्मूदी करू शकतो.
फळं घेतली तर त्यात साखर्/मध्/दही/दुध घालून करू शकतो ना?

हे स्मूदी स्मूदी प्रकरण नुसतंच ऐकून होते. मला वाटायचं फार कायतरी हाय फाय फुड असेल म्हणून कधी चौकशीच्या पण वाट्याला नाही गेले.
आता खरंच करून पाहिन.

हो दक्षिणा! तुला आवडेल ती कॉम्बो ट्राय कर, फक्त मिक्सरच्या पात्याला बर्फाचे खडे वैगरे झेपले पाहिजेत , ते न घालताही स्मुदी होवु शकतेच... पण इथे सगळ्या स्मुदीत इतका बर्फ घालतात ते गारेगार प्रकरण पार ब्रेन फ्रिज करत .

मी स्मुदी खालील प्रकारात करते

१. दही, सोया मिल्क , २ स्ट्रोबेरीज, १ वेलची केळे, १ कीवी, आर्धे पीच = ही फक्त ब्रेफा साठी
२. पालक, कोथीम्बीर, पुदिना, काकडी, सैन्धव मीठ, चाट मसाला = अधे मधे प्यायला
३. फक्त कोथीम्बीर पुदिना व सैन्धव मीठ= हे ही अधे मधे प्यायला.

इकडे हॉटेलांमध्ये वगैरे फ्रूट पन्च नामक प्रकार मिळतो. तेच हे / तीच ही स्मूदी का?

सिंडीच्या स्मूदीचे सर्व जिन्नस घरात आहेत. करून बघते.

Pages