चष्म्याच्या किमती किती खर्‍या किती खोट्या?

Submitted by यक्ष on 8 December, 2017 - 09:42

साधा वाचनाचा चष्मा. फुटला!!
(वर्षापूर्वीच जंगली महाराज रोडवरील प्रख्यात डॉ़क्टरांकडे डोळे तपासून तिथल्याच दुकानातून सुमारे ६५०/- ला (फ्रेम व काचा मिळून) चष्मा करवून घेतला होता. अगदी समाधान कारक होता.)
एका नामांकित कंपनीच्या शो रूम मध्ये १ तासाच्या माहिती कार्यक्रमानंतर व निरनिराळ्या काचांच्या मेनुकार्ड च्या चर्चा सत्रानंतर (फक्त काचा बदलासाठी - फ्रेम जुनीच ठेउन) सुमारे ३ ते ५ ह. एवढे ऑप्श्न्स आले. न घेता निघालो तेंव्हा 'फ्रेम फ्री' देउ असे आमिष दिले.
ते काही ठिक वाटले नाही म्हणून दुसर्‍या एका परदेशी कंपनीच्या शो रूम मध्ये चौकशी करता डोळे पांढरे व्ह्यायची वेळ आली. त्याने नुसत्या काचा (त्या वेगवेगळ्या कोटिंग बद्दल काय खरे काय खोटे देव जाणे! (माहितीत्रकातील सगळे फोटो परदेशी व्यक्तिंचे त्यात देशी एकही नाही! ) सुमारे ७ ते १० ह. पर्यंत अंदाज सांगितल्यावर तिथून सटकलो!
चिरंजिवांन्ना एव्हाना माझी दया आली असावी. त्याने बर्‍याच ठिकाणी हेलपाटे मारून एका गावठाण एरियातून चष्मा करवून आणला व माझ्या हवाली केला. घातला व एकदम पटला. उत्सुकतेने किंमत विचारली. "साधे कांच लावलेत - हाय फाय नाही - खर्च १५०/- रुपये - सांभाळून वापरा" असे सुनवल्यावर उडालोच!.
डोळे भरून आले!. एकदम छान वाटले!.
चिरंजिवांन्नी चांगले काम केले म्हणून आणी (मला वाटणार्‍या) योग्य किमतीत चांगला चष्मा मिळाला म्हणून!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

(ते माझ्यासाठी मायबोलीवरचे हाऊस एम डी आहेत)
<<
Lol थँक्स! I really like that character, and, फक्त एवढ्यासाठी धाग्यातल्या शंकांना उत्तरे देणार आहे.

सर्वात आधी तुमची शंका/प्रॉब्लेम.

पुण्यात कुण्या जुन्या डॉक्टरकडून नंबर काढून घ्या. जुन्या = अ‍ॅट लीस्ट ४०+ वयाचे.

अर्धा पाव पाऊण (.५०, .२५, .७५) असे नंबर जवळजवळ प्रत्येकाला असतात, अन ते वापरायची सहसा गरज नसते. जर तुमच्या नेहेमीच्या कामात दिसण्यात अडचण येत आहे, किंवा डोके दुखी इ. त्रास होतो आहे, तर त्या नंबरचा चष्मा वापरला पाहिजे.

इतक्या बारिक नंबरची लेन्स फारच बारीक /थिन बनते अन डोळ्यात बसण्याआधीच तिची कशी घडी होते, ते तुम्ही अनुभवले आहेच.

चष्मा इज बेस्ट ऑप्शन फॉर यू. अन तो नंबर जुन्या डॉ. कडून तपासायचे कारण म्हणजे, त्या डॉ. ला डोळ्याचे आजार + डोळ्याचा नंबर या दोघांचे ज्ञान आहे. आजकालचे नवे डॉ, नव्या टेक्नॉलॉजीने नंबर काढणे = ऑप्टोमेट्रिस्टचे काम, म्हणून ते शिकत नाहीत, त्यांच्या ट्रेनिंग इस्पितळांत नंबर काढण्याचा वर्क लोड ऑप्टोमेट्रिस्ट लोक (जे लोक आजकाल स्वतःला डॉक्टर डिक्लेकर करतात.) सांभाळत असतात, ज्यांना टेक्नॉलॉजी तर येते, पण डोळ्याच्या आजारांची पुरेशी माहिती नसते. तस्मात, डॉ. ला नंबर काढायला पूर्वीइतके नीट शिकवले जात नाही, प्लस प्रॅक्टीस नसते, अन ऑप्टोमेट्रिस्टला डॉक्टरकी शिकवायचा संबंधच नाही. तात्पर्य, चश्मा या एका बाबतीत ऑप्टोमेट्रिस्ट अन आजकालचे तरूण डॉक्टर दोघेही नीमहकीम आहेत Sad

*
आपण चष्मा म्हणजे काहीतरी मोठे व्यंग, डिसॅबिलिटी वगैरे समजतो. हे कन्सेप्ट्स कुठून आलेत ते जौ द्या.
चष्मा ही "डोळ्याची चप्पल" आहे. डोळ्याच्या कामात मदत म्हणून वापरायची.
घरातल्या घरात फिरणे असेल, तर चप्पल घातलीच पाहिजे असे नसते. मॅरेथॉन रनिंगसाठी, फुटबॉलसाठी असे आपण वेगवेगळे शूज आणतो. नुसतेच फॅशनसाठीही आणतो. कधी ऑर्थोपेडिक शूजही आणतो. ती पायाला चालतानाची 'मदत' असते. तसेच डोळ्याला पाहण्यासाठीची मदत चष्मा. नजरेचा वापर फार नसला तर नाही वापरून चालतो. म्हणूनच उदा. ८० वर्षांच्या अशिक्षित आजीला चश्मा नाही लावला तरी चालते. Treat it as a fashion accessory. You may flaunt it. Wink चप्पल चावते तसा तो कधी चावतोही Lol

We DO wear clothing 24/7. And dont think that as a problem. Why should we think that wearing glasses is a problem?
*

Submitted by VB
इतर कसलाच त्रास नाही, मला रात्री उशिरा पर्यंत मोबाईल वापरायची सवय लागलीये अन दिवसभर सुद्धा pc न मोबाईल असतोच.
<<

कृत्रीम अश्रूंचे ड्रॉप्स आणलेत ना विकत? ५-१० मिलि ची बाटली असेल. त्यावरून अश्रूंचा प्रति लिटरचा भाव लिहा बरं इथे.
हेच होऊ नये म्हणून २०-२०-२०. आता हे काय ते परत सांगणार नाही.
अन हो. स्र्कीन टाईम कमी करा.
जीव जात नाही, सारखा मोबाईल पाहिला नाही तर.

*
लेसर डॉ लोक्स नको म्हणतात कमी नंबराचा चशमा असल्याने
<<
असे डॉ. भेटले हे तुमचे सौभाग्य.
देवकी, तुमचेही अभिनंदन.

*

काँप्युटर वापरल्याने नव्हे, तर ४० वय झाल्याने वृद्धदृष्टीता उर्फ प्रेस्बायोपिक / वाचण्याचा चष्मा लागणार आहे. @ "अजून चश्मा ना।ई पण काँप्युटर वापरून लागेल"

*

अभिनव,

ऑल्मोस्ट सर्व ब्रँडेड गॉगल कंपन्या एकाच मातृसंस्थेच्या मालकीच्या आहेत, अन तेच मोनोपली करून संपूर्ण मार्केटच्या किमती मॅनिप्युलेट करतात, असे नेटवर सरचल्यास सापडेल.

ऑल्मोस्ट सर्व ब्रँडेड गॉगल कंपन्या एकाच मातृसंस्थेच्या मालकीच्या आहेत, अन तेच मोनोपली करून संपूर्ण मार्केटच्या किमती मॅनिप्युलेट करतात, असे नेटवर सरचल्यास सापडेल.
>>>>
कोण आहेत हे? हा सर्च कसा घ्यायचा याची कल्पना नाही, पण उत्सुकता आहे.

We DO wear clothing 24/7. And dont think that as a problem. Why should we think that wearing glasses is a problem?
<<
याबद्दल उलिसं अजून.

मला ना! अस्ला कंटाळा आलाय त्या चष्म्याचा! उठल्यापासून चष्मा घातल्याशिवाय बेडबाहेर पडता येत नाही.. Angry

या वाक्यातला "चष्मा" शब्द "अंडरवियर्/अंडरपँट्/कपडे" याने रिप्लेस करा बरं Rofl

डोळ्यांचे प्रेशर चेक करून घ्या. >>> देवकी ताई नक्की काय असते हे.
>>>>>>

हे नक्की मलाही माहीत नाही पण माझे डोळ्यांचे प्रेशर मागे वाढलेले. अर्थात माझे डोळे अंधारात रॉकेट चालवण्याईतके महान असले तरी मला एक आतड्याचा लाईफटाईम आजार आहे. सुरुवातीला त्याच्या ज्या गोळ्या होत्या त्यांचा साईडईफेक्ट मला झेलायचा होता. त्याअंतर्गत मला ऑफिसमध्ये अचानक काम करता करता स्क्रीन धुरकट दिसायची. सोबत अलगद एखादी हलकीशी अंधारीयुक्त चक्कर, गरगर असेही काहीबाही जाणवायचे. दहापंधराच मिनिटे हा ईफेक्ट राहायचा. पण दिवसातून २-३ वेळा व्हायचे. म्हणजे असा फक्त दोन दिवसांचा अनुभव घेताच मी पुन्हा माझ्या डॉक्टरला गाठले. त्याने मला डोळ्यांच्या डॉक्टरची भेट घ्यायला सांगितली. त्याने माझे डोळ्यांचे प्रेशर चेक केले. कसे ते आठवत नाही. पण ते जास्त आहे बोल्ला. त्यावर औषधपाणी सुचवले. तसेच अजून काहीतरी त्याला शंका होती. एक टेस्टचे नाव घेत करूया का विचारले. आता आपण काय बोलणार. आपल्याला यातली शून्य माहिती असते. आपण अश्यावेळी जो पहिला प्रश्न विचारतो तोच मी त्याला विचारला. याचा खर्चा किती येईल? तर आणखी साडेतीन हजार म्हणाला. मी म्हटलं ठिक आहे, कधी करायचे? तो बोल्ला, आत्ता. लगेच, ताबडतोब. आणि आपल्या बायकोची मदत घेत पंधरा मिनिटात टेस्ट उरकूनही टाकली. कसले तरी ग्राफ आले त्यात. चार पाच कागदाचे चिटोरे, पंधरा मिनिटांचे काम, छोटीशी मशीन. आणि रिझल्ट नॉर्मल. अश्यावेळी काहीतरी निघाले तर बरे झाले असते असे वाटते. नाहीतर पैसे फुकट गेल्यासारखे वाटतात. हूमायून टेंडेंसी आहे. तुम्ही अगदी ठणठणीत आहात हे डॉक्टरकडून ऐकायला पैसे खर्च करायचे म्हणजे खरेच जीवावर येते. जसे महिनाभर टीसी भेटलाच नाही तर उगाच पास काढला असे वाटते अगदी तसेच.

२२--२०-२० mhanajech Google varil khalil mahiti

If you have, it's likely the result of eye strain, which happens when your eyes get tired from intense use. Luckily, it can be remedied with a helpful trick called the 20-20-20 rule: Every 20 minutes, look at something 20 feet away for 20 seconds.

देवकी,
माबो गणेशोत्सवात ही माहिती मी दिलेली आहे ऑलरेडी. Happy

*

Luxotica che nav lihayala evadhe ka ghabartay?
<<
बन्धू पाय,
मी व्होल्डेमॉर्टला व्होल्डेमॉर्ट तसेच त मोदीला मोदी म्हणणारा माणुस आहे. (जी न लावता) नाव घ्यायला लाज वाटण्याचा संबंधच नाही. पण ज्यांना गृहपाठ दिलाय, त्यांचे माझे जुने "संबंध" आहेत. तेव्हा जास्त टेन्सन घेऊ नका.

*

रुन्म्या, तुमचा डोळा अन त्याचं प्रेशर व साडेतीन हजाराची टेस्ट, कागदाचे चिटोरे, मद्दड उकचावूपणा, इ., फाट्यावर Wink

रुन्म्या, तुमचा डोळा अन त्याचं प्रेशर व साडेतीन हजाराची टेस्ट, कागदाचे चिटोरे, मद्दड उकचावूपणा, इ., फाट्यावर Wink >> का Lol

चांगल्या डोळ्यांच्या डॉक्टर कडे तपासले डोळे तर त्यांनी >>>>
चांगल्या डोळ्यांसाठी वेगळे डॉक्टर असतात का? आणि बिघडलेल्या डोळ्यांसाठी वेगळे? Wink

हे वरच खुसपट उगाच आपलं,

भरपूर मोबाईल वापरून आणि भरपूर वाचन करूनही माझी नॉर्मल vision शाबूत आहे, डोळ्यांचा काही त्रास नाही, त्यामुळे इकडे काहीच लिहिता येत नाहीये.

पण लहानपणी चष्मा हवा असे सॉलिड फॅसिनेशन होते, त्यात 3री मध्ये एक मित्राला चष्मा लागला, मग मी वॉर फ़ुटिंग वर कामाला लागलो, शाळेत फळ्यावरचे दिसत नाही, डोके दुखते वगैरे तक्रारी सांगायला लागलो,
मग घरचे एका डॉक्टर कडे घेऊन गेले, त्याने नम्बर काढायचा सांगून खुर्चीत बसवले, तो लेन्स बदलता येणार चष्मा लावला आणि तक्ता वाचायला सांगितला, मी फटाफट अगदी बारीक type पण वाचून दाखवला,
मग त्याने तो चष्म्या काढला आणि काचांच्या जागेतून बोट खुपसले, त्याने कोणतीच लेन्स घातली नव्हती Wink

आई बाबांनी असली कान उघडणी केली की ज्यासाजे नाव ते....

AA.raa.raa.
Ho tumhi dili hoti hi mahiti ,pan nit athavt navhti.
Ata,dole adhikadhik lharab hot chalale, tar gogalale.

सिम्बा, झकास किस्सा.. तुमच्या किश्शाने मला एक किस्सा आठवला. सातवीत होतो तेव्हा साडेतीन च्या सुमारास एक पिरियड असायचा. जाम रटाळ असायचा आणि त्या बाई खूप लिहायला लावायच्या. का कोण जाणे रोज माझे डोळे भरुन यायचे. ब्लर दिसायला लागायचं. विशिष्ट त्याच पिरियडला. मी लिहायचो नाही, वर्गात हुशार असल्याने पहिल्याच बेंचवर म्हणजे लुकाछुपीचा चानस नाय... साहाजिक बाईंनी विचारले का लिहित नाही. त्यांना सांगितले मला त्रास होतोय. मग दोन चार दिवस तसेच रेटले. त्या बाई खनपटीला बसल्या की डॉक्टरकडे जा. आता घरी सांगु शकत नव्हतो. मुळात त्या विशिष्ट वेळेला का डोळे भरुन यायचे तेच कळायचे नाही. ताण यायचा खूप... हे सगळं घरी काय सांगणार, त्यांना काय समजणार आणि आपलीच काहीतरी खरडपट्टी निघणार. म्हणून टाळत राहिलो.. पुढे काय झाले आठवत नाही. काहीतरी वेळ मारुन नेली असणार..

आता बर्‍याच वर्षांनी त्याचा छडा लागल्यासारखा वाटतो. Happy मला दुपारी जेवल्यावर बरोबर ३५ मिनिटांची वामकुक्षी हवीच असते. ती बरोबर तीन ते चार दरम्यान हवी असते. माझ्या बॉडीक्लॉकमध्ये प्रोग्राम्ड आहे बहुतेक. नाहीतर जाम त्रास होतो, कामात लक्ष लागत नाही आणि सगळ वेळ तसाच वाया जातो. त्या क्लासलाही तेच होत असावं. Happy

सिम्बा Lol

मलाही लहानपणी अ‍ॅडमिट व्हायचे आणि सलाईनचे खूप कौतुक होते. कारण लोकं खाऊ घेऊन बघायला येतात आपल्याला. डॉक्टरकडे गेलो की माझा एकच भाबडा प्रश्न असायचा, सलाईन लावणार का? मला अ‍ॅडमिट करा ना.. Happy

आरारा
उत्तम माहिती.
40 नंतर चे ऑपटो डॉक म्हणजे एम एच 12 मध्ये जायला हवे
तसे दिव्या आय चे मुख्य डॉ खूप चांगले आहेत, वय कळायची वेळ आली नाही पण अबोव्ह 40 असावेत
चष्मा लावायला लाज वाटत नाही.त्यामुळे स्क्रॅच दुरुस्त करून जवळ ठेवतेच आता.
चूक माझी पण आहे.डोळ्याला ऊन ऍलर्जी म्हणून 3 वेळा घालायचे ड्रॉप दिले होते.एकदाही जमले नाही टाकणे Sad

1.मी एक प्रोग्रेसीव्ह लेन्स चा चश्मा केला. लक्ष्मी रस्ता. (रु. 8000/-) सुट झाला नाही. पैसे वाया.
2. दुसरीकडे परत केला. कोथरूड. अनेक हेलपाटे. (रु. 10000/-) सुट झाला नाही. पैसे वाया.
3. रास्ता पेठेत 1500 ला मिळाला. सुट झाला नाही. पैसे वाया.
प्रोग्रेसीव्ह चा नाद सोडला. आता चाळीशी गळ्यात घालून हिंडते. वाचताना वापरते. एरवी लांबचे अजून चांगले दिसते.

वर आरारांनी लिहिलेले चष्मा कपड्यासारखे असण्याबाबतः माझ्यासारख्या तिशी/पस्तिशीत (व अनेक चाळिशीत) चष्मा लागलेल्यांना ती चष्म्याची सवय व्हायला वेळ लागतो. मागल्या आठवड्यात दुसर्‍या गावी कामाला गेलो होतो, चष्मा विसरला, डोके जाम दुखले. आता बहुतेक परत विसरणार नाही. आमच्या वडलांसारखे चष्म्याबरोबर जन्मलेले लोक बहुतेक तो कधीच विसरत नाहीत.

सुट झाला नाही. पैसे वाया.>>>>>>
मेधावि, तुम्हाला त्या दुकानदाराने प्रोग्रेसीव्ह मधला फरक सांगितला होता का?
बाबांच्या वेळेला करायला गेलो होतो तेव्हा चा अनुभव आहे,
प्रोग्रेसीव्ह मध्ये मधले फिल्ड ऑफ व्ह्यु जितके मोठे घ्याल तितका तो वापरायला आणि ऍडजस्ट व्हायला सोपा, आणि अर्थात महाग,
जी सगळ्यात बेसिक लेवल होती , त्यात मधले फिल्ड अतिशय चिंचोळे होते, कदाचित तसे काही झाले आहे का एकदा चेक करा.

Simba, मी घेतलेले सगळेच स्वस्तातले होते असे धरले तरी कीमतीत किती जास्त फरक होता. आता कसलेच धाडस होत नाहीये.

काँप्युटर व्हिजन सिंड्रोमचा इलाज "ए आर सी" कोटिंगची काच नव्हे तर २०-२०-२० आहे>> +२०. मला एका भल्या डॉक्टराने हेच सांगितले होते आणि केवळ काही दिवसातच चांगलाच फरक जाणवला.

सिम्बा, मेधावि.

प्रोग्रेसिव्ह किंवा कोणताही चष्मा बनवताना आधी ती काच चष्म्यापेक्षा खूप मोठी गोल "ब्लँक" म्हणून मिळते.
ही अशी :

तिच्यावर फ्रेम आखून त्या मापाने काच कापून फिटिंग करतात. अर्थात, लहान फ्रेम अन मोठी फ्रेम यांच्या किमतीत फरक पडायचा संबंध नाही, उलट छोट्या फ्रेममधे जास्त काच वाया घालवलेली आहे.

चष्मावाले काय वाट्टेल ते फंडे देतात, अन ज्या प्रमाणे आपल्या देशात डॉक्टरपेक्षा मेडिकलवाल्या पोर्‍याला "काहो, ही गोळी कशाची असते?" असे विचारून व किम्मत पाहून मग प्रिस्क्रिप्शनातील कोणती औषधे किती विकत घ्यायचे ते ठरते, त्याप्रमाणे चष्मावाला सांगतो त्यावर जास्त विश्वास ठेवायचा प्रघात आहे. चष्मावाल्याचं काम, तुम्हाला फ्रेम विकणं अन त्यात प्रिस्र्किप्शन लेन्स तुमच्या चेहर्‍याच्या मापाने बसवून देणं, इतकंच आहे.

ऑफ्थॉल्मॉलॉजिस्ट - ऑफ्थॅल्मिक असिस्टण्ट - ऑप्टोमेट्रिस्ट - या कडीतला पुढचा दुवा म्हणजे चष्मावाला उर्फ ऑप्टिशियन. आसो. तर,

ही अशी काच फिट होते.

आता या फोटोत प्रोग्रेसिव्ह ब्लँकवरची मार्किंग्ज पुसलेली नाहीत. खालचे जाड सर्कल हा जवळचं बघण्याचा अन वरचं बारीक अर्धवट सर्कल हा दूरचं बघण्याचा ठिपका आहे.

नीट पाहिले तर लक्षात येईल, की दूर अन जवळ हे दोन्ही ठिपके, सरळ एकाखाली एक नसून खालचा ठिपका नाकाजवळ आहे. याचे कारण म्हणजे, दूर बघताना एकमेकांपासून दूर असलेले डोळे जवळचे वाचताना एकमेकांजवळ खाली येतात. इंग्रजी V आकारात प्रवास करून.

प्रेस्बायोपिक बायफोकल टिकलीवाला चष्मा हा दोन पायर्‍यांचा जिना असला, प्रोग्रेसिव्ह काच हा रॅम्प आहे. काचेच्या दूर व जवळ या दोन ठिपक्यांदरम्यान काचेची पॉवर हळुहळू वाढत जाते आहे. याने होतं काय, की जर तिरके कटाक्ष टाकले, तर दोन डोळ्यांसमोर काचेची वेगवेगळी पॉवर येते. त्यामुळे दोन डोळ्यांना दोन जरा जास्तच वेगळी चित्रे दिसतात.

यामुळे सेन्सिटिव्ह लोकांना दोन डोळ्यांतील चित्रांतला फरक स्पष्ट जाणवतो, व तो पॅरलॅक्स, अर्थात, दोन्ही चित्रे एकत्र करून एक ३डी इमेज बनवण्याचे काम करताना मेंदूला चक्कर येते. काँप्युटरचा स्क्रीन शंकरपाळ्यासारखा (ट्रॅपेझॉईड) दिसतो इ. त्रास होतात, अर्थात, चष्मा सहन होत नाही.

हा सहन झाला नाही तर फेकूनच द्यावा लागतो.

छोट्या फ्रेममधे अगदीच काटछाट केल्याने दूरच्या बघण्याच्या जागीची पॉवर वाली जागा (एरिआ) कमी केली जाते, अन अगदी चष्म्याच्या कडेने पाहिले तर दूरचे अन खालच्या टोकाने जवळचे नीट दिसते, हे छोटा प्रोग्रेसिव्ह सहन न होण्याचे खरे कारण आहे. फोटोत वरच्या सर्कलचे केंद्र डोळ्याच्या बाहुलीसमोर नाही. अ‍ॅक्चुअली त्या जागेतून दूरचे व्यवस्थित दिसणार आहे.

असो.

हे अती टेक्निकल होते. जमत नसेल तर सोडून द्या.

पुढचा लेख कुणीतरी श्रवणयंत्रांवर पाडा, म्हणजे मग presbyacusia अर्थात वृद्धश्रवण, व ४०शीनंतर प्रत्येकालाच खरंतर हियरिंग एड का वापरायाला हवी, हियरिंग एड्सचे प्रकार वगैरे चरचा करू. Wink

मागल्या आठवड्यात दुसर्‍या गावी कामाला गेलो होतो, चष्मा विसरला, डोके जाम दुखले. आता बहुतेक परत विसरणार नाही.
<<

चाळीशी उर्फ वाचण्याचा चष्मा लागलेल्या सर्व ४०+ वयाच्या लोकांना फुकट हिंट Wink

चष्म्याविना वाचन करायची वेळ आल्यास, किंवा अती बारीक अक्षर्/वस्तू पहायची वेळ आल्यास, तुमच्या खिशात मोबाईल नावाचा एक प्रकार आहे, तो कामी येतो.

बेटे, फोन तो सिर्फ बात करने के लिए होता है..?(!) Wink

तर,

तुमच्या स्मार्टफोनाचा कॅमेरा सुरू करा, डिजिटल झूम वापरून लाईव्ह वाचा, किंवा कागदाचा/वस्तूचा फोटू काढून मोठा करून पहा, अन वाचा/पहा.

- (टेक्नोसॅव्ही) आपलाच,

कळलं. मस्त समजवलंय.
Multi focal contact lenses चं काम कसं चालतं ते पण सांगा.
मला प्रोग्रेसिव्ह चष्म्यातून जास्त बारीक टाईप वाचता येत नाही. म्हणजे औषधाच्या खोक्यांवरचा मजकूर, user manuals वगैरे. चष्मा कपाळावर लावला की वाचता येतात.
फोनवर वाचतानाही अक्षरं मोठी करायची सोय आहे हे लक्षात न आल्याने अनेकदा चष्मा कपाळावर जातो.

नाईस वन, आरारा. व्यवस्थित समजावलंत. मला स्वतःला प्रोग्रेसिव्ह वगैरे नाही, पण तुम्ही सांगितलेली माहिती अगदी सहज लक्षात राहील.

वरच्या पोस्टमधे प्रोग्रेसिव्हचे तोटे समजवून झाले.

त्याचं कौतुक करायचं राहूनच गेलं.

तर दोन स्टेप वाल्या बायफोकलात, दूरचे, अर्थात ६ फुटापलिकडले, अन जवळचे, अर्थात, सव्वा फुटावरचे, क्लिअर दिसेल इतक्याच दोन पायर्‍या असतात.

मधले अंतर, मिडल डिस्टन्स, भयंकर मार खाते.

यामुळे काँप्युटर वापरणार्‍या म्हातार्‍यांना लय त्रास होतो. एकतर (उदा.ब्यांकेच्या) नोकरीच्या संध्याकाळी काम्प्युटर बोकांडी बसलेला.
खालच्या टिकलीतून कीबोर्ड दिसतो, पण मॉनिटर पहायला अशी मान वर करुन पुढे वाकावे लागते. Lol

या अशा लोकांसाठी प्रोग्रेसिव्ह चष्मा खरे वरदान आहे. थोडी नजर "उचलली" की वरचे खालचे दूरचे सगळे व्यवस्थित दिसते.

थोडक्यात,

सूट झाला तर प्रोग्रेसिव्हसारखा उत्तम दुसरा नाही, पण सूट झाला नाही, तर फेकून द्यावा लागेल, हे लक्षात ठेवा. किंमत जास्त असते, फेकावा लागला, तर माझी शेंडी धरायला यायचं नाही. Happy

भरत,
लेन्सेसबद्दल नंतर लिहितो. बेसिकली बाहुलीच्या साईझवर काम करतात काँटॅक्ट लेन्सेस किंवा मल्टिफोकल आयोएल्स.

भाचा,
धन्यवाद!

Hearing aid चष्म्याएवढे स्वस्त कधी होतील? Happy फोन सारखे इलेक्ट्रिक charge कधी करता येतील? Happy

Hearing aid चष्म्याएवढे स्वस्त कधी होतील?
<<

reddit.com वर एक r/ULPT अर्थात अनेथिकल लाईफ प्रो टिप्स असा सब् आहे.
तर ही एक ULPT.
जुन्या निरुपयोगी हेडफोनचा कानातला भाग, थोड्या वायरसह कापून घ्या. बोंडुक कानात अन वायर खिसापर्यंत न्या.
फुकटात हियरिंग एड.
तुम्हाला ऐकू येत नाही असे समजून लोक मोठ्यानी बोलतील. Wink

***
फोन सारखे इलेक्ट्रिक charge कधी करता येतील?

<<
बॅटरी टेक्नॉलॉजीवर अवलंबून आहे. इन द इयर मशिन्सची बॅटरी चार्जेबल बनली तर मजा येईल.

प्रोग्रेसिव्ह लेन्सेस म्हणजे चष्म्याच्या काचेवर खाली अर्धगोल दिसतो, त्या का?
<<
अर्धगोल दिसत नाही, त्या प्रोग्रेसिव्ह. अर्धी टीकली दिसते, तो बायफोकल. एक ट्रायफोकल म्हणूनही मिळत असे पूर्वी.

छोट्या फ्रेममधे अगदीच काटछाट केल्याने दूरच्या बघण्याच्या जागीची पॉवर वाली जागा (एरिआ) कमी केली जाते,>>>>> तरीच आमचा चश्मेवाला प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी मोठ्याच फ्रेमचा आग्रह धरतो.

मॉनिटर पहायला अशी मान वर करुन पुढे वाकावे लागते>>>>>. प्रोग्रेसिव वापरूनही मी असेच वाचते.अर्थात हा माझा दोष आहे.

आ.रा.रा.,
धन्यवाद!

प्रोग्रेसिव्ह किंवा कोणताही चष्मा बनवताना आधी ती काच चष्म्यापेक्षा खूप मोठी गोल "ब्लँक" म्हणून मिळते.
ही अशी :>> खूप छान माहिती आ.रा.रा. !

आरारा, खूप छान पद्धतीने माहिती दिलीत, त्याबद्दल आभारी आहे. _/|\_ नवीन काहीतरी शिकायला मिळाले.

आ रा रा, छान समजावलं आहे तुम्ही. धन्यवाद. आता नेहेमीचा चष्मा घालून जवळचं वाचता येत नाहीये त्यामुळे चाळिशी लागली असणार असं दिसतं आहे पण बायफोकल करू की प्रोग्रेसिव अशा दुग्ध्यात आहे. कारण सतत कॉम्प्युटर वर काम असलं तरी आसपास पुस्तकं, नोट्स असं कायकाय संदर्भासाठी पडलेलं असतं ते वाचत वाचत काम चाललेलं असतं.

आ रा रा, छान समजावलं आहे तुम्ही. धन्यवाद. > +१. एक ' Better Eyesight Without Glasses' नावाचं पुस्तक वाच्लं होतं . त्यात कितपत तत्थ्य आहे?

आरारा सर्व पोस्ट्स छान. खूप आवडल्या.

सुमु तुला प्रोग्रेसिव्ह लेन्स सुट नाही झाल्या म्हणजे नक्की 'एरर' काय येत होती? Proud ऑप्टिशियन ला भेटलीस का? चश्मा केल्यावर डॉक्टरला दाखवलास का?

मला २ वर्षापुर्वी जवळचा चष्मा लागला, (त्या आधी दूरचा होता पण नंबर फार नव्हता.) नुसता दुरचा बनवला होता तो कर्वेनगर मध्ये बनवला होता एकूण किंमत साडेतीन हजार ज्यात १९०० ची फ्रेम होती. फ्रेम म्हणजे डोंबल दोन काड्या फक्त. कारण नॉर्मली मी फुल फ्रेम नाही वापरत (जड जड होतो नाकावर) जवळचा लागला तेव्हा परत त्याच दुकानात जाऊन चौकशी केली असता त्यांनी मला प्रोग्रेसिव्ह ची गळ घातली आणि किंमत कमीत कमी (सर्वात साध्या प्रोग्रेसिव्ह ची किंमत) ५५०० रुपये सांगितली. मला प्रश्न पडला होता. सुदैवाने तेव्हाच आमच्या सोसायटीत (सिंहगड रोड) एक चष्म्याचे दुकान नवे सुरू झाले होते, तिथे चौकशी केली तर मला सेम तशी फ्रेम (जरा त्यापेक्षा बरिच बरी) ११०० रुपयांना मिळाली आणि प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची सुरुवातीची किंमत २५००. मी बनवून घेतला आणि घातल्या घातल्या मला जो काही हर्ष झाला सांगता सोय नाही. उत्तम बनवला होता चश्मा. काय सुंदर दिसत होतं.
त्यानंतर जेव्हा पुन्हा एकदा जरा डो़कं वगैरे दुखतेय असं वाटलं तेव्हा ऑप्टिशियन कडून नंबर काढून घेऊन नवा नंबर केला ८ दिवस डोकं नुसत दुखलं दुख्लं. मग डॉक कडे जाऊन जुना नवा दोन्ही चष्मे दाखवले, डोळे पण दाखवले. तो म्हणाला नवा जास्त नम्बरचा बनवला आहे. म्हणजे माझा होता ०.२५ समजा, तर बनवलेला होत ०.७५ आणि डॉक ने काढलेला होता तो होता ०.५० सो ते म्हणाले एक वेळ कमी नंबरचा वापरला तर चालेल जास्ती नंबरचा नको. तो ठेवून दिला आहे (प्रोग्रेसिव्ह आहे) तितका नंबर झाला की वापरेन म्हणते Happy त्यामुळे एरिया नुसात फ्रेम्/लेन्स च्या किंमती दुकानदारांच्या सोयीने बदलतात हे नक्की.

सन ग्लासेस विषयी मला फार कळत नाही आणि मी ब्रँड फ्रीक नाही, त्यातल्या त्यात मी फास्टट्रॅक चे गॉगल्स वापरले आहेत. खूप पुर्वी म्हणजे २००१ साली वगैरे मी पोलोराईड चा गॉगल घेतला होता किंमत आठवत नाही पण २-३ हजार होतीच. इतकी किं मत का असे विचार ता दुकानदाराने काचेच्या काऊंटर खालचा १०० चा बल्ब फक्कन लावला आणि म्हणाला नुसत्या डोळ्यानी याच्याकडे पहा, मला पाहवले नाही, मग त्याने गॉगल लावून पहा सांगितले तर छान दिसत होता बल्ब, मग विचार केला नाही, घेऊन टाकला तो गॉगल अजूनही आहे माझ्याकडे. फ्रेम फार जुनाट असल्याने वापरात नाही, पण मैत्रिणीची आई राजस्थान आणि दुबईला जाताना आवर्जुन मागून घेऊन जाते.
सध्या "व्होग" नावाच्या कंपनीचा वापरतेय.

बाकी डोळे ड्राय होणे ही समस्या आजकाल फारच आहे. मी पण नियमित "अ‍ॅड टियर्स" नावाचे ड्रॉप्स डोळ्यात घालते दिवसातून २ वेळा/३ वेळा. ते गरजेचे आहेत.

मस्त धागा आणि उपयुक्त माहिती.
माझा चष्मा मला जवळचा आणि लांबचा असे दोन्ही लागल्यावर नेहमीच प्रोग्रेसिव्ह असतो . मला छान वाटतो तो . चष्म्याच्या किमती हल्ली खूप वाढल्या आहेत पण तो एक दागिनाच वय वाढल्यावर करायचा असं समजून करते खर्च. नंबर नेहमी dr कडून काढून घेते आणि चष्म्याचं फेवरीट दुकान म्हणजे लॉरेन्स अँड मेयो. एकदा काही तरी प्राब्लेम झाला होता नव्या चष्म्यात तर त्यांनी मला फ्री मध्ये फ्रेम exchange करून दिली जे होईल असं मला स्वप्नात ही वाटलं नव्हतं.

पण तो एक दागिनाच वय वाढल्यावर करायचा असं समजून करते खर्च.
<<
प्रेस्बायोपिक चष्म्याचा नंबर साधारणतः २-२॥ वर्षांत बदलतोच.
*
डोळ्याचा दागिना, ही उपयोगाची उपमा आहे. खासकरुन ४०शीतल्या बायकांसाठी. या कायम पहिला चष्मा तरी न लावून वाया घालवतात. हो, डोकं दुखलं तर चालेल. नवरा भातातले खडे खाऊन घेईल. पण मी चष्मा वापरणार नाही अशी व्हॅनिटी अन्नेकदा असते.

तर अशांना, "इतका मोठा डोळ्याचा दागिना घेउन दिलाय नवर्‍याने, जरा तो घालून मिरवा!" असे सांगितले की मात्र लागू पडते Wink

आरारा छान समजावलेत.
उत्पादका कडून असा गोल येतो आणि ऑप्टिशिअन तो कापून फ्रेम मध्ये बसवून देतो माहित होते. पण जर आज काल छोट्या फ्रेम खपत आहेत तर तो गोल छोटा करुन फोकल पॉइंट योग्य जागी येउ शकेल का? अशी काही एक जेनेरिक छोटी आणि एक मोठी साईझ का बनवत नाहीत? काही टेक्निकल/ मेडिकल/ प्रोसेस रिलेटेड इश्यु आहे का जस्ट अजुन कोणी केलं नाहीये?
त्या गोलाच्या बाहेरच्या बाजुच्या काचेची जाडी मधील जाडी पेक्षा कमी असते, आणि म्हणून लहानपणी नंबर जास्त असल्याने थोड्या छोट्या फ्रेम सिलेक्ट करत असे जेणे करुन चश्मा फार जाड दिसणार नाही असं आठवलं. आता हाय इंडेक्स परवडू लागल्याने तोच वापरतो.
पण आता छोट्या फ्रेमची सवय झाली आणि नजरेचा आवाका कमी झाला (असला तरी)य असं जाणवत नाही.

आरारा यांनी छान माहीती दिली(मला कळली नाही याचा अर्थ छानच असणार,त्या इमेज बघून बारावी फिजिक्सच्या क्लासची आठवण आली.)
@ बिंन्डोकभाऊ णमोस्कार मी अक्कलशून्य,तुमचा भाऊच नामसाधर्म्याने.

उपयुक्त प्रतिसादांबद्दल सर्वांन्ना मनःपुर्वक धन्यवाद! आ.रा.रा. जींन्ना अमुल्य व योग्य मार्गदर्शनासठी 'विषेश' धन्यवाद!
आ.रा.रा. जीं; फक्त योग्य दर्जाचा चष्मा कुठे मिळू शकेल ह्याबद्दल कृपया मार्गदर्शन होउ शकेल काय? त्यासाठी 'जी असेल ती' किंम्मत हा मुद्दा मान्य. कारण जे आवश्यक त्यात तडजोड नाही पण अनुपयुक्त खर्च टाळणे हा दृष्टिकोण!
मी पहिला चष्मा जेथून खरेदी केला होता ते ठिकाण मला योग्य वाटते. अजून ठिकाणे कळल्यास मदत होइल.
धन्यवाद!

Pages