आरोग्याचा श्रीगणेशा!

Submitted by संयोजक on 17 September, 2015 - 06:46

नमस्कार!

मायबोलीवरचा गणेशोत्सव म्हणजे धमाल, मजा आणि मस्तीच्या कार्यक्रमांची नुसती रेलचेल असते. मायबोलीकर जितक्या उत्साहाने या सर्व उपक्रमाची मजा लुटतात तितकेच ते आहार, व्यायाम, कायदे, चालू घडामोडींविषयी जागरुकही असतात. गेल्या वर्षी बाप्पांनी आपल्याला स्वतःची, आपल्या कुटुंबाची सुरक्षा जपण्यासाठी काही कानमंत्र दिले होते, लक्षात आहे ना? याही वर्षी बाप्पा या धाग्यावर आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, आरोग्याबद्दल! बाप्पासारखेच सुपाएवढे कान करुन ऐकूया! चला, तर मग करुया , निरामय आरोग्याचा श्रीगणेशा! गणपती बाप्पा मोरया!

G2_mod.jpg

******

aarogya_ganesh_2015_4.jpg

******

aarogya_ganesh_2015_6.jpg

******
aarogya_ganesh_2015_7.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणपती कसला क्यूट आहे!
मिर्चीताई, पुढचा धागा डोळ्यांवर असणार बघा.

हा फार छान उपक्रम मागच्या वर्षी पासून सुरू केला आहे. तो पुढे नेत असल्याबद्दल धन्यवाद.

यंदा, आमच्या भागात तरी गणेशोत्सवाचा आवाज नक्कीच कमी आहे. सुधारणा होत आहे म्हणायची हळूहळू.

भारी Happy

अरे व्वा, रंग गडद झाले. धन्यवाद संयोजक.
भरत, माझे डोळे ठाकठीक असल्याची पोचपावती मिळाली. आता डोळ्यांवरचा धागा आला तरी हरकत नाही Lol

अरे देवा! अशानं समस्त मायबोलीकर कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रॉमनं त्रस्त असणार.

ओ संयोजक,
त्या मधल्या लायनी वाचायला चष्मा लावावा लागला Sad
सगळ्या चित्रांना दणदणीत मोठं करा की! गडी अंगानं उभा नी आडवा टाईप.

Pages