चष्म्याच्या किमती किती खर्‍या किती खोट्या?

Submitted by यक्ष on 8 December, 2017 - 09:42

साधा वाचनाचा चष्मा. फुटला!!
(वर्षापूर्वीच जंगली महाराज रोडवरील प्रख्यात डॉ़क्टरांकडे डोळे तपासून तिथल्याच दुकानातून सुमारे ६५०/- ला (फ्रेम व काचा मिळून) चष्मा करवून घेतला होता. अगदी समाधान कारक होता.)
एका नामांकित कंपनीच्या शो रूम मध्ये १ तासाच्या माहिती कार्यक्रमानंतर व निरनिराळ्या काचांच्या मेनुकार्ड च्या चर्चा सत्रानंतर (फक्त काचा बदलासाठी - फ्रेम जुनीच ठेउन) सुमारे ३ ते ५ ह. एवढे ऑप्श्न्स आले. न घेता निघालो तेंव्हा 'फ्रेम फ्री' देउ असे आमिष दिले.
ते काही ठिक वाटले नाही म्हणून दुसर्‍या एका परदेशी कंपनीच्या शो रूम मध्ये चौकशी करता डोळे पांढरे व्ह्यायची वेळ आली. त्याने नुसत्या काचा (त्या वेगवेगळ्या कोटिंग बद्दल काय खरे काय खोटे देव जाणे! (माहितीत्रकातील सगळे फोटो परदेशी व्यक्तिंचे त्यात देशी एकही नाही! ) सुमारे ७ ते १० ह. पर्यंत अंदाज सांगितल्यावर तिथून सटकलो!
चिरंजिवांन्ना एव्हाना माझी दया आली असावी. त्याने बर्‍याच ठिकाणी हेलपाटे मारून एका गावठाण एरियातून चष्मा करवून आणला व माझ्या हवाली केला. घातला व एकदम पटला. उत्सुकतेने किंमत विचारली. "साधे कांच लावलेत - हाय फाय नाही - खर्च १५०/- रुपये - सांभाळून वापरा" असे सुनवल्यावर उडालोच!.
डोळे भरून आले!. एकदम छान वाटले!.
चिरंजिवांन्नी चांगले काम केले म्हणून आणी (मला वाटणार्‍या) योग्य किमतीत चांगला चष्मा मिळाला म्हणून!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आज माझ्याच मागील धाग्यांवर एक सहज नजर मारतांन्ना हा जुना धागा वाचला.

विशेष म्हणजे हे वाचन त्याच 'साधे कांच लावलेल्या' - 'हाय फाय नसलेल्या' - '१५०/- रुपये - वाल्या चष्म्याने' वाचतान्ना मधला काळ झर्र्कन डोळ्यासमोरून गेला. सुदैवाने माझा नंबर इतकी वर्षे सारखा राहिल्याने चष्मा बदलण्याची पाळी आली नाही....

श्री. आ.रा.रा. ह्यांच्या त्यावेळेस व्यक्त केलेल्या मतांन्ने मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो ह्याचे आज समाधान वाटते.....

मायबोलीचा हाही एक फायदा....त्यामुळे मायबोलीलाही मनःपूर्वक धन्यवाद!

वर्णीता अहो प्रतिसाद बदलायची गरज नव्हती, जुना जोक आहे तो. तसेही हल्ली मोबाईल अन कॉम्प्युटर च्या कृपेने लहान मुलांना देखील चष्मा लागतो.
गेला तो काळ जेव्हा चाळशी चाळीशी ला आल्यावर लागायची.

काय आभाळ कोसळणार आहे वय कळल्याने?
एक धागा काढा पाहू, "तुम्हाला कोणत्या माबोकराचे वय किती वाटते?" त्यात कुणाला आपलं वय लोकांना फारच जास्त वाटतंय असं लक्षात आलं तर म्हणेल त्यापेक्षा खरं वय सांगितलेलं काय वाईट. Proud

काच, फ्रेम, नंबर हा प्रमाणे किंमत बदलत असते पब जास्त बदल होत नाहीत मी 10 वर्ष अनुभव घेऊन सांगत आहे

Pages