फास्टर फेणे

Submitted by मी - सागर on 13 September, 2017 - 02:02


https://www.youtube.com/watch?v=d7c_NBWaFhM

पुस्तकातून पडद्यावर ...... तो येतोय ......

Faster Fene First Look Teaser | Riteish Deshmukh | Zee Studios

अमेय वाघ लवकरच - फास्टर फेणे २७ ऑक्टोबर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फास्टर फेणेची पुस्तके म्हणजे एक मस्त पर्वणीच होती. विशेषतः दिवाळीची सुट्टी आणि भा.रा. भागवंताचा सुपुत्र हे ठरलेले.
धन्यवाद चित्रपटाची माहिती दिल्याबद्दल.

पण अमोल वाघ फाफे ????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????
(कनावर हात ठेवून पळून जाणारी स्मायली)

टिझर आजिबात आवडत आवडला नाही Sad
उगीच गॉट ची स्टाईल मारण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. फाफे चा genre आणि टिझर चा genre याचा कुठे ताळमेळ बसत नाहीये.
शिवाय अमेय वाघ ≠ फास्टर फेणे (अमोल वाघ? लग्नानंतर अमेयने नाव बदललं की काय? ;))
फाफे हा एक स्मार्ट आणि चुणचुणीत मुलगा असायला हवा.

अगदी अगदी, फा फे हा शाळकरी मुलगा आहे ना गोष्टींमधे, मग अमेय वाघ ला का कास्ट केलं असेल ? तो काही इतका लहान दिसत नाही.

किल्ला मधला अर्चित योग्य वयाचा आहे पण तो मिष्किल, खोडकर नाही वाटतं.

अमेय वाघ ... फाफे.....सॉरीच बरं का...
प्रौढांची दुनियादारी पाहिली... अजून काय काय पहायचे बाकी आहे देवा.....

हां हां अमेय वाघ.
माझ्या डोळ्यासमोर सध्याच्या मराठीतलं कोणीच येत नाहीये फाफे म्हणून.सुमित राघवन इमेज पुसणं कठीण आहे.

शेरलॉक होम्स ची भुमिका करायला विशीष्ठ लुक्स आणि बिल्ड ची माणसं लागतात तसेच फाफेलाही एक स्पेसिफिक टाईप लागतो.
तुडतुड्या, चपळ, सतत उन्हातान्हात भटकत असल्याने स्किन जरा रापट (सगळे जे कोणी आरस्पानी गोरेघारे डोळ्यासमोर देखणे म्हणून येत असतील ते आधी कटाप करा!) आणि असं कोणीच मराठीत मला माहित नाही.

पण दगडू चे एक्स्प्रेशन्स...
परश्या ने बॉडी कमी करुन चालला असता.पण तो त्याच्या गावकरी आशिक रोल मधून बाहेर पडला तर शक्य

माझ्या डोळ्यासमोर सध्याच्या मराठीतलं कोणीच येत नाहीये फाफे म्हणून.सुमित राघवन इमेज पुसणं कठीण आहे>> अगदीच पटलं.
तरीही फाफे आणि अमेय वाघ दोन्हीही तितके आवडते असल्याने फिंगर्स क्रॉस्ड मोड सध्या !

मी ती चित्रफित पाहिलेली नाही. फक्त एक मराठी लेखकाचा अविष्कार रुपेरी पडद्यावर येत आहे याचा आनंद आहे .

अमेय वाघ फास्टर फेणेची भुमिका करणार आहे. मग करु द्या. अभिनय पाहून पोचपावती द्या. घाई कशाला?

फाफे म्हणजे सुमित राघवनच... अमेय वाघ फाफे हे वाचूनच माझा उत्साह मावळला. बालपणी इतका हुशार असणारा फाफे मोठा झाल्यावर बावळट होणार हे पचणे जरा कठीण....

हम चार मालिका पुर्वी दुरदर्शनवर होती. त्यातील एक मुलगा होता त्याने फास्टर फेणेची भुमिका एका दूरदर्शनवरील मालिकेत केली होती.

स्वप्नील जोशी ?

परत एकदा नाही म्हणून कानावर हात ठेवून पळून गेले
स्वजो ला फाफे मित्र सुभाष देसाई किंवा शरद शास्त्री म्हणून ठेवता यील.

फास्टर फेणे वाचलेलं दिसत नाही इथे! स्वजो काय?
१०-१२ वर्षाचा उद्योगी मुलगा आहे फाफे. त्यासाठी कोणीतरी नवीन चेहरा हवा. माझा अंदाज आहे की चित्रपट फ्लॅशबॅक मध्ये उलगडत असणार आणि आजचा फाफे = अमेय वाघ.

@जिज्ञासा
वाचलेच नाही तर विकत घेवून ठेवलेय

पण स्वप्नील जोशी ला घ्यायला काय हरकत आहे ? उकडलेला फास्टर फेणे ! Wink
कोठे आहे ऋण्मेश ??

तो वाघ चालतोय यांना म्हणजे ग्रोन अप फाफे दाखवत असतील गं जिज्ञासा इथे बहुतेक (मग वाघ मोठा फाफे चालतो तर स्वजो किंवा आस्ताद वस्ताद फ्रेंड सुभाष म्हणून चालत असेल.)

कोणी माझी आठवण काढली का Happy

अजून वरची लिंक पाहिली नाही.

अमेय वाघचा कैवल्य माझा आवडीचा असला तरी त्याला फाफे म्हणून बघणे अवघडेय.

दगडू म्हणजे तो टाईमपासवाला असेल तर नकोच. उगाच आपल्या मनातला फाफे आपल्या डोक्यात जायचा.

स्वप्निल आता फाफे साकारायच्या वयाच्या किंचित पुढे गेला आहे. तसेही फाफे म्हणजे किडकिडीत पोर हवे. स्वप्निल हेल्दी बॉडी आहे.

चटकन डोळ्यासमोर खरेच कोणी येत नाही... आणि म्हणूनच ईथे नवीन चेहरयाची गरज होती.
ईंडियन आयडिऑल सारखे मुंबई-पुण्यात ऑडीशन घेतले असते तर ट्राय करायला आवडले असते.
फक्त सायकल तेवढी चालवायला शिकावे लागले असते.

अमेय वाघ फास्टर फेणे म्हणून बघणं अगदीच अवघड आहे. स्मार्ट, तुडतुड्या, चुणचुणीत वगैरे विशेषणं त्याला लागू पडत नाहीत असं मला वाटतं. शिवाय तो शाळकरी म्हणून दाखवणार असतील तर फार्फार अवघड आहे.

सुमीत राघवन त्या भूमिकेत फिट झाला होता आणि शिवाय तो तेव्हा लहानही होता वयाने. इतका मोठा फाफे दाखवून जर खरंच त्याचा फ्लॅशबॅक दाखवणार असतील तर अर्थातच लहान फाफे वेगळा असेल. पण मग त्यालाच दाखवा की फक्त! अमेयला आणायचा अट्टाहास कशाला?

माझ्या डोळ्यासमोर सध्याच्या मराठीतलं कोणीच येत नाहीये फाफे म्हणून.सुमित राघवन इमेज पुसणं कठीण आहे >>>>> + १००००००००००००

चटकन डोळ्यासमोर खरेच कोणी येत नाही... आणि म्हणूनच ईथे नवीन चेहरयाची गरज होती. >>> अनुमोदन
कोणीतरी दूसरा सिरियल , नाटक , जाहिरात कुठेतरी मिळालाच असता ना , अगदीच नविन नको तर Sad

मराठी सध्याचे हिरो म्हणून गुगल केलं.
त्यातल्या त्यात डोळ्याला आदिनाथ कोठारे किंवा भुषण प्रधान फाफे म्हणून किंचितसे पटले.
पण हे सर्व हिरो आता मोठे दिसतात.(या सर्वाना नुकतं लग्न होऊन एक लहान मूल वगैरे वाली भुमिका सुट होईल.)
बाकी लहानसं आणि तरीही दिसायला चांगला फाफे वगैरे असं कोणीच नाहीये.
(तो सैराट मधला सल्या?)

मराठी सध्याचे हिरो म्हणून गुगल केलं.
त्यातल्या त्यात डोळ्याला आदिनाथ कोठारे किंवा भुषण प्रधान फाफे म्हणून >>> आँ? मग ललित प्रभाकर काय वाईट आहे? Proud

ललित प्रभाकर जरा गीक आणी झिपर्‍या दिसतो.तो नको Happy
भुप्र पण नको.टु मच शहरी दिसतो.फाफे फुरसुंगीचा आहे.
आको ठिके पण मोठा आहे.
परश्या ला बरंच रिव्हॅम्प करुन परश्या ठसा पुसला तर तो चालेल.

(कोणीच जमत नाहिय.असलेली मंडळी नकोच!! प्रॉपर १६ वर्षाचा एक नवा किडकिड्या मुलगा लागेल.)

स्वस्ति हो नक्कीच मिळाला असता. परश्या आणि आर्ची मिळालेलेच ना. मुळात या भुमिकेसाठी अभिनयात नटसम्राट असणे गरजेचे नव्हते. स्मार्टनेस आणि तो कॅरी करायचा कॉन्फिडन्स. आजकालच्या स्मार्ट जनरेशनमध्ये हा शोध तुलनेत सोपाही झाला असता.

Pages