फास्टर फेणे

Submitted by मी - सागर on 13 September, 2017 - 02:02


https://www.youtube.com/watch?v=d7c_NBWaFhM

पुस्तकातून पडद्यावर ...... तो येतोय ......

Faster Fene First Look Teaser | Riteish Deshmukh | Zee Studios

अमेय वाघ लवकरच - फास्टर फेणे २७ ऑक्टोबर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेय वाघ चटपटीत हालचाली करणारा वाटत नाही. पण तो नावडता नसल्याने चालवुन घेऊ. Happy सुमीत रागवन मस्तच शोभला होता.

मी असं वाचून आहे ( ऐकून आहे सारखं वाचा ) की फा फे मुळी मोठाच दाखवलाय ह्या मुव्ही मधे. म्हणून अमेय. आणि लोकहो teaser of the movie is already out! म्हणजे पिक्चर बनलाय ऑलरेडी मग आता फाफे च्या भूमिकेत कोण शोभला असता ही चर्चा व्यर्थ नव्हे का?

फाफे काय आहे??? एका लहान मुलाच्या साहसकथा का?
मला फाफे माहित नाही. अमेय वाघ आवडत नाही. पिच्चर बघणार नाही.
ललित प्रभाकर छान आहे.
सध्या काय करते वाला लहान मुलगा छान आहे.
दगडु नकोको
स्वप्निलने रिटायरमेंट घ्यावी आता

फाफे मी पण जास्त वाचले नाही, पण सुमित राघवन पर्फेक्ट होता हे तितकेच खरे आहे. जशी ही भूमिका त्याच्याकरताच लिहीली गेली असावी. अमेय वाघ? तो मोठाच वाटेल.

पण मोठा फाफे कसं शक्य आहे?
भागवतांनी लिहिलं नसेल तर - दुसर्या कोणी भागवतांची स्टोरी पुढे लिहिणं म्हणजे पैठणीला ठिगळ टाईप वाटेल.

फाफे म्हणून तुडतुड्या, स्मार्ट, चपळ कोणी हवा असेल तर लायनमधला 'सनी पवार' कसा वाटेल. अर्थात हा मुलगा फार मोठा नाहीये वयाने आणि घारा वगैरेही नाही. पण लायनमध्ये एकदम इंप्रेशन पाडून गेला.

अमेय वाघ ????????????????????????????????????????
ईईकककक.........
कुठे फाफेची image आणि कुठे ते बेडकासारखे डोळे?????

रितेश देशमुख??
परत एकदा नाही किंचाळून कानावर हात ठेवून पळून गेलेली स्मायली.
मला फाफे म्हणून आता २०१७ 'इट' मधला मुख्य नायक मुलगा बिल किंवा पेनीवाईज द क्लाऊन बनलेला स्विडिश अ‍ॅक्टर दोन्ही चालतील.
सध्या मराठी नावं येत नाहीच आहेत डोळ्यापुढे.

हा पेनीवाईज द क्लाऊन. याला थोडे रापवावे लागेल आणि झिपर्‍या घामाने भिजवून विस्कटाव्या लागतील.
PENNYWISE.jpg

आणी हा पिक्चर मधला बिल
http://www.teenidols4you.com/blink/Actors/jaeden-lieberher/jaeden-lieber...

सचिनपेक्षा अशोकमामा चालतील... प्रौढ फाफे >>> मग मी काय म्हणते , आपले प्रभावळकर काका चालतील की , काटकुळे ,स्मार्ट, तुडतुडे , मिश्किल , चलाख . परफेक्ट कास्टीन्ग होईल

https://www.youtube.com/watch?v=hCfAj91233k
फा फे

मस्तंय...
मी पहिल्यांदाच बोल्लेलो की त्याचा ट्टॉक! मस्त वाटतोय.
आणि आता हा ट्रेलर पाहून अमेय सोबत पिक्चर देखील लय भारी असेल असे वाटते. रितेश देशमुखचा पिक्चर आहे, बजेट चांगले दिलेले दिसतेय पिक्चरला. मराठी माणसांनो जागे व्हा आणि करोडोंच्या घरात न्या या पिक्चरला
आपण तर जाणार ... Happy

फाफे ला अगदीच मॉडर्न केलाय, मोबाईल, लॅपटॉप आणि काय काय.
जुन्या पठडीतील फाफे सोडून मोकळ्या मनाने पाहिल्यास कदाचित आवडू शकेल

चांगले केलेय ते. आजचा कॉलेजगोईंग ऑडियन्स खेचता येईल. त्यांना रिलेट व्हायला हवे. अन्यथा तो काळ व्यवस्थित उभा करून ठसवता आला नसता तर चित्रपट परीणामकारक झाला नसता.

स्टोरी सुद्धा आजच्या काळाल अनुसरून नवी घेतली हे सुद्धा चाण्गले केले.
अन्यथा दुनियादारीसारखे झाले असते. लोकं नॉस्टेल्जिक होत चित्रपटात मूळ पुस्तक शोधत बसतात आणि नवीन कलाकृती चांगली असूनही तिचा आस्वाद घेत नाही.
काही लोकं तर आम्ही फास्टर फेणेची मूळ पुस्तके वाचली आहेत आणि आम्ही दर्दी वाचक आहोत हे दाखवायला उगाचच पुस्तकाची मजा चित्रपटात नाही असे बोलू लागली असती. नकळत यात निगेटीव्ह पब्लिसिटी होते.

हिम्सकुल +१

नव्या प्रोमोत अमेय वाघ फाफे वाटतोय. ते टॉक्क पण मस्त म्हणतोय

मला आवडला अमेय फा फे म्हणून
फाफे आजच्या काळात असता तर कसा असता हे परफेक्ट पकडलंय अस वाटतय तरी
सिनेमा चांगला असावा रे देवा

Pages