फास्टर फेणे

Submitted by मी - सागर on 13 September, 2017 - 02:02


https://www.youtube.com/watch?v=d7c_NBWaFhM

पुस्तकातून पडद्यावर ...... तो येतोय ......

Faster Fene First Look Teaser | Riteish Deshmukh | Zee Studios

अमेय वाघ लवकरच - फास्टर फेणे २७ ऑक्टोबर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असं नसते.
पुस्तकांची मजा आणि चित्रपटाची मजा या दोन वेगळ्या गोष्टी असतात आणि त्या दोघांना स्वतंत्र दृष्टीकोणातून एंजॉय करायचे असते.
अन्यथा स्वत: लिखाण करण्यातील मजा दुसरयाने केलेले लिखाण वाचण्यात नाही असेही उद्या कोणी म्हणू शकते. कोणी कश्याला मीच म्हणेन Happy

याऊपर कोणाला चित्रपट पाहण्यापेक्षा पुस्तके वाचण्यात जास्त मजा येत असेल (किंवा व्हायसे वर्सा) तर ती त्या व्यक्तीची वैयक्तिक आवड झाली आणि तिचा आदर केला पाहिजे. पण वैयक्तिक आवड हे वैश्विक सत्य नसते.

वैयक्तिक आवड हे योग्य कारण आहे...

मला हापूस आंबा आवडत नाही तर माझा एक मित्र तुला का आवडत नाही, अवडायलाच पाहिज.. भाई आपली वैयक्तिक आवड हाये ना..

फाफे बद्धल- फाफे पुस्तकर मी सगळी वाचलीयत आणि मूवी पेक्षा मला पुस्तक जास्त आवडेल पण हे मी मोवी न बघता देसाईड नाही करणार, मोवी बघणार नक्की.. बेडूक वाघ आवडत नाही पण फाफे साठी बघणार..

मी सुद्धा बालपणी जेव्हा वाचनाची अफाट आवड होती आणि कितीही पानांचे पुस्तक असो पुर्ण वाचूनच हातातून खाली ठेवायचो त्याकाळी जवळपास सारेच फाफे वाचले आहे. माझा मामा मला कसलीही गिफ्ट वा बक्षीस म्हणून फक्त पुस्तकेच द्यायचा आणि त्यात अर्धाअधिक फाफेच असायचा. आता त्यातील बारीक सारीक डिटेल विसरलो असलो तरी फाफे हे कॅरेक्टर मात्र मनावर कोरले गेले आहे. चित्रपटगृहात प्रवेश करताना आवर्जून त्यावर पडदा टाकून पुसट करून जाणार. अन्यथा आईसक्रीम चांगले की मिल्कशेक चांगले या तुलनेच्या नादात आईसक्रीम विरघळून जायचे. आणि मग ते विरघळलेले आईसक्रीम पिऊन मीच बोलायचो, छ्या यापेक्षा मिल्कशेकच चांगले Happy

पुस्तकांवरून बनवलेल्या चित्रपटांंच्या बाबतीत असे म्हणता येईल की पुस्तकाची मजा येत नाही उदा. शाळा, निशाणी डावा अंगठा, दुनियादारी. ई. चित्रपटाला दोन ते तीन तासात बसवावे लागते हे मान्य केलं तरी. आनंदाचे झाड ब-यापैकी जमला होता.

फाफे ची मजा त्या काळात गोष्टी फ्रेम करण्यात आणि 11 12 वर्षाच्या मुलाला उपलब्ध असणाऱ्या लिमिटेड रिसोर्सेस मध्ये बाजी कशी पलटवतो यात आहे.
उदा,
फाफे एक पार्सल चुकीच्या पत्त्यावर पाठवतो, आणि पोस्टच्या डिलिव्हरी ला ट्रॅक करत आधीच त्या पत्त्यावर जाऊन घोळ निस्तारतो.
आजच्या काळात, घरबसल्या डोकेट ट्रॅक करता येते, मोबाईल वापरून इसिली त्या गावातल्या मित्राला सांगून डिलिव्हरी थांबवता येते.

काळाला मॅच होणारे आव्हान म्हणजे गोष्ट सुद्धा वेगळी असणार. लॅपटॉप, मोबाईल घेऊन फाफे बनवायचा असेल तर त्या व्यक्तिरेखेला फाफे चे नाव द्यायची गरज नव्हती.
हे म्हणजे पिक्चरच्या प्रसिद्धी साठी फाफे नाव एक्सप्लोइत केल्या सारखे वाटते.

अमेय वाघ वैयक्तिक रित्या आवडत नाही ती गोष्ट वेगळी

प्रसिद्ध पुस्तकावर सिनेमा:

सगळे म्हणतात फक्त कल्पना पुस्तकावर आधारीत, बाकी सिने लिबर्टी. पण मग तुम्हाला पुस्तकाच्या नावाने सिनेमाची जाहीरात का करावी लागते? म्हणजे, पुस्तक वाचलेले त्या पुण्याई ने थिएटर ला येतील. न वाचलेले 'काय आहे बघू तरी, पुस्तक फेमस आहे म्हणतात' म्हणून येतील असा काहीतरी गाजराची पुंगी प्लॅन असतो.

चित्रपट काढायला पैसा असलेली माणसं ही लेखक नसतात, लेखक म्हणून ती खूप प्रसिद्ध पटकथा लेखक हायर करु शकत नसतील, पुस्तक निर्मात्याने/(किंवा जो कोणी चित्रपट क्रिएटर आहे त्याने) वाचले, त्याला भन्नाट आवडले म्हणून त्यावर चित्रपट काढावा वाटतो.

पण प्रसिद्ध पुस्तकावर चित्रपट काढणे हे शिवधनुष्य आहे.लोकांच्या डोक्यात मनात ते पुस्तक बसलेलं असतं.व्हेरिएशन्स करायची तर ती मूळ पुस्तकाचं दूध न नासवता त्यात योग्य फळाच्या फोडी टाकून करावी लागते. हे असं करणं कीती जणांना जमतं?

ठिके, पुस्तकाबद्दल विचार न करता वेगळा सिनेमा म्हणून बघू. पण तसा बघून तरी दुनियादारी आवडतो का? श्रेयस चं जे गारुड इतर पात्रांवर आहे ते का आहे, तो साधा असून इम्प्रेसिव्ह का आहे हे निट जस्टिफाय करणारे ट्रॅक्स नकोत? शिरिन च्या आईची अबॉर्शन्स, आई ची आत्महत्या प्रयत्न बाप राजकारणी याचा कथेत पुढे काय वापर केलाय?यातून शिरिन च्या व्यक्तीमत्वावर काही इम्पॅक्ट आहे?
जो आभाळ वाला मूळ कादंबरीतला डायलॉग वापरुन श्रेयस मिनू ला कटवतो तेच लॉजिक शिरिन ला अप्लाय नाही का होत?

फाइव्ह पॉइंट समवन हे यापेक्षा बेटर व्हर्जन आहे.बघता येते.पण इतका वर्ल्ड फेमस शास्त्रज्ञ लहान्पणी फॉल्स आयडेंटिटी बनवून वावरला हे कसं जस्टिफाय होतं? (हा पनिशेबल ऑफेन्स आहे. जावेद जाफ्री आमिर खान दोघांसाठी टेक्निकली.)
शू, शॉक वाल्या सीन ची खरंच गरज होती? रँचो चा सायन्स फ्रिक पणा दुसर्‍या मार्गाने दाखवता आला नसता? केवळ जिज्ञासा म्हणून उद्या रॅगिंग मध्ये या सोप्या रेसिपी चा वापर झाला तर?

घी साठी 'पुस्तकावर आधारीत' आणि बडगे पडतील तेव्हा 'सिनेमॅटिक लिबर्टी' असा डबल स्टँडर्ड इज नॉट डन.

'पुस्तकाची मजा नाय बुवा' म्हणून उसासे सोडणारे निव्वळ झारीतले शुक्राचार्य नाहीत. ठिके. तुम्ही पिक्चर दाखवून शेवटी क्रेडिट मध्ये लिहा पुस्तकावर आधारीत होता असं.ज्यांनी वाचलंय त्यांना पिक्चर बघताना कळेलच.पण ते पिक्चर एन्जॉय करतील.ज्यांनी पुस्तक वाचलं नाही त्याना असं पुस्तक अस्तित्वात आहे आणी पिक्चर त्यावर आहे हे पिक्चर पाहून झाल्यावर कळेल.
पिक्चर चं पुस्तकाच्या सावलीत न गुदमरता एव्हॅल्युएशन होईल.पण प्रोमोज ला पुस्तकाच्या नावाची पुण्याई वापरता येणार नाही. बोलो, हे हिम्मत?? (चतुर रामलिंगम सारखी तावातावात भिंतीवर बाटली फोडून.)

क्या बात है अनु....वाक्या वाक्याला सहमत आणि प्रचंड टाळ्या.

केवळ हिंदीच नाही हॉलीवूडवाले पण माती करतात चांगल्या चांगल्या पुस्तकांची

गॉन विथ द विंड हाच एक सणसणीत अपवाद

नविन टिझर आवडले. त्यांनी पुस्तकातलाच बनेश फेणे न ठेवता भा रा भागवतांच्या मानसपुत्राला आताच्या काळात ४ जी मध्ये आणले आहे. रितेश च्या आवाजातली प्रस्तावना आवडली. अमेय वाघ कितीही नावडता असला तरी सध्याच्या काळात त्या भुमिकेला सुसंगत मराठी हिरो तोच वाटतोय. त्यामुळे फाफे करता पाहूच पिक्चर. अमेयने चांगला अभिनय केला असेल तर सोने पे सुहागा Wink

https://www.youtube.com/watch?v=hCfAj91233k

स्वप्नील जोशी ची रिचफिल ची जाहिरात पहिलीत का?
अगदी शाळेतलाच दिसतोय लब्बाड !!
Swapnil Joshi.jpg

म्हणूनच मी म्हणतो कि स्वप्नील च फा फे म्हणून शोभतो !
https://youtu.be/PmddCy_D_8Q

अगदी शाळेतलाच दिसतोय लब्बाड !!
Lol

हा तर वेगळ्या धाग्याचा फोटो आहे Proud

मी अनू, मस्त पोस्ट लिहिली आहे.
त्यातील विचारांशी असहमत असलो तरी वाचायला मजा आली Happy

एक असा विचार कोणी करतेय का?
या फाफे चित्रपटामुळे आजच्या पिढीला फास्टर फेणे या पुस्तकाबद्दल समजेल, ते पुस्तक या पिढीतल्या मुलांपर्यंत पोहोचेल. जे अन्यथा शक्यच नव्हते.

मी तर हा चित्रपट ईतका हिट जावा की याच्या हॅरीपॉटर, जेम्स बॉन्ड सारख्या सिक्वेल बनाव्यात आणि फाफे घराघरात पोहोचावा म्हणून शुभेच्छाच देईन.

चित्रपट पुस्तकाची पुण्याई वापरतेय तर चित्रपटामुळे पुस्तकही पुन्हा चर्चेत येणार आहे. दोघांसाठी विन विन सिच्युएशन नाही का?

जर मराठी पुस्तकच मराठी चित्रपटांच्या मदतीला धावून जाणार नाही तर भोजपुरी कथांवर मराठी चित्रपट बनवायचे का?

फास्टर फेणेचे वैशिष्ट्ये होते ते त्याचे दिमागी कारनामे आणि करामती उपद्व्याप. निव्वळ गॅझेटस आले म्हणून कोणाला ती अक्कल येत नाही. ती कशी वापरायची असते हे जर चित्रपटात अचूक दाखवले असेल आणि त्याच्या तुडतुडेपणा फाफेलाच साजेसा असेल तर या फोर जी च्या काळातही तो फाफेच राहणार.. जर ते तसे दाखवूनही कोणाला नाही आवडला तर फाफे ही व्यक्ती तुम्हाला समजली पण वृत्ती नाही समजली असा त्याचा अर्थ झाला.

महाभारतातील कॅरेक्टर तुम्हाला आजच्या काळातही दिसतील. फक्त ते बंदुका किंवा आणखी काही डिजिटल उपकरण घेऊन लढत असतील. तुम्ही त्यातल्या अर्जुनाकडे धनुष्यबाण कुठेय म्हणून शोधायला जाल तर कसे चालेल Happy

मला तरी ट्रेलरच्या एक दोन दृश्यात दिसला फाफे !

मला वाटतं आहे की इथे निर्मात्यांनी / दिग्दर्शकाने मार्व्हल / डिसी सारखा स्टँड घेतलेला आहे. ते म्हणत आहेत की कॅरॅक्टर्स क्रिएटेड बाय बी आर भागवत. म्हणजे फाफेच्या ओरिजिन चे क्रेडीट ते भागवतांना देत आहेत पण त्याचवेळेस स्टोरी ती सांगत आहोत असे म्हणत नाहीत.

मला ३ - इडीयट्स आणि ५ पॉइंट समवन याची तुलना इथे सापेक्ष वाटत नाही कारण ती पूर्णपणे वेगळी केस आहे असे मला वाटते. इथे तुम्ही आयर्न मॅन १ कॉमिक्स आणि पिक्चर याची तुलना करा फार तर.

मला सिरीअसली रितेश देशमुख तुझे कौतुक आणि तुझा अभिमान आहे जे तुला आपल्या मराठमोळ्या फास्टर फेणेवर चित्रपट काढावासा वाटला आणि तू तो हातचे काही न राखता काढलास ! Happy

मी अनु, सहमत आहे! थ्री इडियट्स मधील अजून दोन महान प्रकार म्हणजे आजारी पडल्याचं नाटक करून विमान थांबवणं ( इतर प्रवासी लोकांची कनेक्शन्स मिस होतील, मिटिंग्जना पोचू शकणार नाहीत, कदाचित कोणी आजारी नातलगासाठी जात असेल याबद्दल पूर्ण बेपर्वाई). आणि रेप बद्दल casual joke हा खास राजू हिरानी टच.

असो. मूळ विषयाबद्दल सिम्बा यांच्या मुद्याशी सहमत. पिक्चरच्या प्रसिद्धीसाठी फाफे ब्रँड नेम वापरलेले दिसते. But this is certainly not bhara's faster fene.

अनु,
प्रतिसाद आवडल्याचे लिहायचे राहून गेले काल, पॉईंट्स पटले.

व्योमकेश बक्षी सिरियल पुस्तकाशी ईमान राखून होती...पण सिनेमा पूर्ण वेगळ्याच जॉनरचा होता.
अर्थात कुणाला आवडला कुणाला नाही.

चित्रपट पुस्तकाची पुण्याई वापरतेय तर चित्रपटामुळे पुस्तकही पुन्हा चर्चेत येणार आहे. दोघांसाठी विन विन सिच्युएशन नाही का? >> +११

फाफेचं नवं ट्रेलर मस्त आहे. चित्रपटात खुद्द भा. रा. भागवत आहेत. प्रभावळकरांचा मेकअप मस्त जमलाय.>> +१

फाफेला मोठा करून आत्ताची कहाणी दिली हे बरंच वाटतंय, नाहीतर चिंटूच्या सिनेमासारखा काहीतरी बालिश बोअर बनला असता.

Pages