फास्टर फेणे

Submitted by मी - सागर on 13 September, 2017 - 02:02


https://www.youtube.com/watch?v=d7c_NBWaFhM

पुस्तकातून पडद्यावर ...... तो येतोय ......

Faster Fene First Look Teaser | Riteish Deshmukh | Zee Studios

अमेय वाघ लवकरच - फास्टर फेणे २७ ऑक्टोबर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक फिक्शनल कॅरॅक्टर आहे टिनटिन सारखे.. भा रा भागवत यांनी लिहलेले.. बरीच पुस्तके आहेत त्यांची फास्तर फेणे च्या साहासावर..

फा फे कमी आणि एक्शन हिरो जास्त केलय असं वाटत .
>>><>>

अजून नवीन ट्रेलर आला असेल तर अजून बघायचाय पण तरी आधी एक मत माण्डतो,
ट्रेलरमध्ये एक्शन द्रुश्ये दाखवणे सोयीचे आणि परीणामकारक ठरते. चित्रपटात ते कॅरेक्टर तसे असेलच असे नाही. मात्र येस्स, फाफेबाबत प्रसंगावधान आणि डोकॅलिटी याचा मेळ हवा आणि एक्शनमध्ये ताकदपेक्षा धाडसाचा भाग जास्त असावा.. तरच तो फाफे

चर्चा वाचली.पण हे फास्टर फेणे नक्की आहे काय????
>>>>>

हा प्रश्न वाचून मी माझ्या कॉन्वेन्ट शाळेत शिकलेल्या गर्लफ्रेण्डला विचारले, तू फास्टर फेणे वाचले आहेस का? निदान ऐकून तरी माहिती आहे का?

तिचा रिप्लाय आला - त्याचा पिक्चर येतोय ना आता? कोण आहे तो?

मी लागलीच तिच्यासोबत पिक्चर प्लान केलाय. निदान पिक्चरमुळे का होईना तिला फाफे समजेल, आणि मग मला माझ्या बालपणीच्या आठवणी तिच्यासोबत शेअर करता येतील Happy

नविन ट्रेलर पाहिल्यावर भारा भागवतांचा फेणे आणि अमेय वाघचा फेणे यांच्यात फक्त नामसाधर्म्य आहे असे वाटत आहे.

त्यांनीही हुशारी करत बेस्ड ऑन असे म्हणत सुटका करून घेतली आहे. ज्यांना आवडेल ते म्हणतील वाह वाह छान, नाही आवडला त्यांनी टीका केली तर म्हणतील, हे त्यावर आधारित आहे.

एकूणातच या चित्रपटाचा 'आजोबा' होऊ नये हीच कळकळीची इच्छा

फाफे चा ट्रेलर आवडला
प्रभावळकर सुपरब.
अमेय वाघ पण पोरगेला दिसतोय नीट
फाफे म्हणून नाही पण एक चांगला मराठी पिक्चर म्हणून नक्की पाहणार

फाफे चा ट्रैलर आवडला... अमेय वाघ छान वाटतोय...
फाफेच्या कथां मध्ये ...सिनेमान्ची सिरीज बनवण्याच पोटॅन्शीयल आहे...

फाफेच्या कथां मध्ये ...सिनेमान्ची सिरीज बनवण्याच पोटॅन्शीयल आहे...
>>>>

+ 786
मी सुद्धा आधी या सिक्वेलच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

https://www.youtube.com/watch?v=wTh3r7OixOM
आत्ता पाहिला हा फाफेचा लेटेस्ट ट्रेलर...
हायला तो गिरीश कुलकर्णी कसला खतरनाक दाखवलाय... ए फेणेssss... एकच शॉत जबरशॉट.. धमाल येणार आहे पिक्चर बघायला.. चित्रपट नाही बघणार बोलणे खूप सोपे आहे, पण हा चित्रपट बघायला जाणे गरजेचे आहे Happy

रच्याकने, चौकडीचा शर्ट आणि ब्लॅक सॅंन्डो बनियान... फा फे स्टाईल येणार बहुतेक या पिक्चरनंतर मार्केटमध्ये.. मी कॉलेजमध्ये असायला पाहिजे होतो यावेळेस

या सिनेमाच्या ट्रेलर ने खुप लवकर १ मिलीयन व्हिवुज पार केले... तुनळीवर... ( टिजर आणि ट्रेलर पकडुन)
चान्ग्लाच गल्ला जमवेल अस दिसतय...

या सिनेमाच्या ट्रेलर ने खुप लवकर १ मिलीयन व्हिवुज पार केले...
>>>>>>
मी रोज दोनचार वेळा बघून घेतो Happy

गाणी आहेत का यात?
किंवा थीम साँग ..??
बाकी ट्रेलरची म्युजिक मस्त आहे

त्या आज आम्ही सारे खवैय्ये मध्ये आलेल्या...

पण हा पिक्चर या शुक्रवारी का नाही प्रदर्शित केला. पटकन बघितला असता यार..

मी आहे इथेच.
मी भरपुर विरोध करत होते अमेय वाघ फाफे म्हणून.
पण मला पिक्चर खूप आवडला. चांगला बनवला आहे. काही छोटि मोठी लुपहोल्स पण पिक्चर मस्तच.
यावर मल्टिपल धागे असल्याने बाकी २ धाग्यांवर लिहीले आहे.

Pages