फास्टर फेणे

Submitted by मी - सागर on 13 September, 2017 - 02:02


https://www.youtube.com/watch?v=d7c_NBWaFhM

पुस्तकातून पडद्यावर ...... तो येतोय ......

Faster Fene First Look Teaser | Riteish Deshmukh | Zee Studios

अमेय वाघ लवकरच - फास्टर फेणे २७ ऑक्टोबर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असलेली मंडळी नकोच!! प्रॉपर १६ वर्षाचा एक नवा किडकिड्या मुलगा लागेल >>> टोटल अनुमोदन! >> अगदी अगदी !! कोणी तरी नविन लहान मुलगा शोधणे काय इतके अवघड आहे का ?

फाफे वर पिक्चर येतोय हे जितके चांगले वाटते आहे तितकेच त्यात अमेय वाघला बघून वाईट वाटतेय Proud

मराठी सध्याचे हिरो म्हणून गुगल केलं.
त्यातल्या त्यात डोळ्याला आदिनाथ कोठारे किंवा भुषण प्रधान फाफे म्हणून >>> आँ? मग ललित प्रभाकर काय वाईट आहे? Proud
नवीन Submitted by rmd on 13 September, 2017 - 19:38
》》》
ललित प्रभाकर हा फक्त मोगली म्हणून शोभेल.

ऋन्मेष, शाहरूखला बोलल्यावर तुला जसं झोंबतं तसं इतरांना दुसर्‍यांच्या बाबतीत बोलल्याने झोंबू शकतं हे तुला समजू नये? अवघडेय!

ऋन्मेष, शाहरूखला बोलल्यावर तुला जसं झोंबतं तसं इतरांना दुसर्‍यांच्या बाबतीत बोलल्याने झोंबू शकतं हे तुला समजू नये? अवघडेय!
>>>>>
मला नाही झोंबत. खास करून जर समोरच्याने विनोदाच्या भावनेने म्हटले असेल तर मी त्याला विनोद म्हणूनच घेतो. आणि ईथेही समोरच्याने जे ललित प्रभाकर बाबत म्हटले आहे त्याला विनोदाच्याच नजरेने बघितले आणि हसलो.
आणि यात त्याला त्याच्या दिसण्यावरून चिडवणेही नव्हते, कारण मुळात तो हिरो कमालीचा देखणा आहे हे फॅक्ट आहे Happy

फाफे म्हणून हृदित्य राजवाडे शोभेल -तोच तो 'ती सध्या काय करते' मधला लहान मुलगा.

बाकी हा फाफे मुव्ही अगदिच पकाऊ वाटतोय. अमेय वाघ काय. वेडगळपणा एकेक.

च्रप्स :
उकडलेला नाही, रात्रभर भिजायला घालून सुजलेला..☺️☺️
>>>>>

अरे हसुन हासुन खुर्चीतुन पडलो इथे...

मला वाटत त्यानी नवीन चेहरा घ्यायला काही हरकत नव्हती...
(सिनेमा पहुनच कळेल कि तो कसा झाला आहे..)

फास्टर फेणे ची पुस्तक वाचल्यानंतर त्याची एक प्रतीमा तयार झालेली आहे मना मध्ये..
पुस्तक वरुन एकाद पात्र सिनेमा मध्ये दाखवताना ते पुस्तका पेक्षा ही उत्तम वा बरोबरीच झाल तरच मजा येइल...
पात्र निवडी मध्ये आजुन थोडी मेहनत घ्यायला हवी होती अस वाटत.
उ दा. बॅटमॅन वर खुप सिनेमे आले पण Christian Bale ने जो बॅटमॅन उभा केला तेव्हा अस वाटल कि तो सोडुन आजुन कोणी बॅटमॅन म्हणुन चालेल का.. तेच हॅरी पॉटर च्या बाबतीत...

ह्म्म... नवीन मुलगा घ्यायला हवा होता याबद्दल जोरदार अनुमोदन.
दगडू - नको रे बाबा. बघवत नाही त्याच्याकडे.
ललित प्रभाकर दिसतो चांगला पण हा एक अत्यंत कंटाळवाणा व बावळट्ट प्राणी आहे, मायबोलीवर त्याला नको तितके चढवून ठेवले आहे.

माझं काही डेरींग होत नाहीये ट्रेलर बघायचं. फाफे म्हणजे माझ्यासाठी सुमित राघवनंच.+११
एकलातीगो मधला स्पृहा चा चुलत भाउ (ज्याला ती छोटी माकडतोंड्या म्हणायची :)) किंवा दिदोदु मधला शेजारचा स्कॉलर हा फाफे म्हणुन जास्त शोभला असता

Nah,
अश्विन चितळे श्वास छान वाटेल , त्याचे डोळे खूप बोलके होते
नाना पाटेकर आणि नारायणी चा एक मुवि होता, त्यात एक मुलगा होता, तो त्यावेळी खूपच आवडलेला, पण नंतर दे धक्का मध्ये नव्हता तितका आवडलेला.

नाना पाटेकर आणि नारायणी चा एक मुवि होता, त्यात एक मुलगा होता, तो त्यावेळी खूपच आवडलेला, पण नंतर दे धक्का मध्ये नव्हता तितका आवडलेला. >>> तो सक्षम कुलकर्णी आहे.

तो पैलवान आहे.. आपल्याला काडी पैलवान पाहिजे..
गाव गाता गाजली मध्ये एक पोरगा आहे, त्याचे केस थोडे वाढवले तर सूट होईल रोल ला

मालिका होती
>>>>>
ओके या विकेंडला यूट्यूब गूगाळून बघतो...
बघण्यासारखी होती का पण?

ऋन्मेऽऽष
तुम्हाला गुगल माहित आहे ? तुम्ही गुगल वापरता ? बाप रे ...
तसे पण तुम्हाला इंग्रजी तून टाईप करावे लागेल !

मला ओके वाटला अमेय वाघ फाफे म्हणून. मोठा आहे वयाने पण लटपट्या , हुषार म्हणून खपेल नक्की. सुस्त आणि तुपट ऑप्शन्स च्या मानाने स्मार्ट वाटेल. Happy
फाफे चे जरासे मोठा झाल्या नंतर चे अडाप्टेशन म्हणून केले असेल तर पर्फेक्ट कास्टिंग आहे अ‍ॅक्चुअली. अमेय वाघ काम चांगले करतो असे मुरांबा बघून वाटले.

Pages