गोरी गोरी पान फुलासारखी छान v/s कंगणा रानावत!

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 May, 2015 - 16:46

१) कंगणा ही माझ्या आवडत्या नट्यांपैकी नाही.
२) मला स्वत:ला ती फारशी कधी आकर्षक वाटली नाही.
३) तिचा अभिनय मला उच्च दर्जाचा आणि हटके वाटत असला तरीही आजवर मी पाहिलेल्या तिच्या चित्रपटांपैकी कोणत्याही भुमिकेने मला ईम्प्रेस केलेले नाही.

पण, तरीही आज तिच्या संदर्भातील या एक बातमीने मला नक्कीच ईम्प्रेस केले. हि बातमी कुठेतरी पेज-थ्री न्यूजमध्ये हरवू नये असे वाटल्याने इथे धागा काढून हाईलाईट करत आहे.

बातमी खूप साधी सरळ आहे, कंगणाने एका फेअरनेस क्रीमची दोन कोटींची ऑफर धुडकावली.
http://www.hindustantimes.com/bollywood/never-understood-the-concept-of-...

यामागचे कारणही खूप साधे सरळ आहे, गोरा उजळ रंग म्हणजेच स्त्रीचे सौंदर्य नाही, आणि अश्या प्रकारचे सौंदर्य म्हणजेच सारे काही नाही.
तिच्यामते तिची बहीण जी दिसायला फारशी उजळ नाही, पण तरीही ती सुंदर आहे. तर अश्याप्रकारे गोरा रंग हेच खरे सौंदर्याचे लक्षण म्हणत मी तिचा अपमान नाही करू शकत.
जर हे मी माझ्या बहिणीशी नाही करू शकत तर ईतर देशातल्या ईतर कोणत्याही मुलीशी नाही करू शकत.
एक स्टार सेलेब्रेटी म्हणून माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे जे मला याची परवानगी देत नाही.

कंगणाच्या या विचारांना आणि कृतीला माझा सलाम.

तळटीप - या आधी रणबीर कपूरने देखील अशीच ऑफर धुडकावली होती.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विवेक ओबेरॉयकडे अभिनय नावाचा प्रकार नव्हता.
मला त्या सुरेश ओबेरॉयचे कौतुक वाटते जे त्याच्याकडेही यातले काही नसून तो ईंडस्ट्रीत बराच टिकला.

असो, वरचा कंगणाचा ईंटरव्यू नक्की बघा.. मी अर्धाच पाहिला.. अर्धा अजून बघायचाय.. पण सही काढतेय एकेकाची

कंगणाची वरील मुलाखत पाहिली. तिचे मुद्देही पटण्यासारखे आहेत. तीही धुतल्या तांदळासारखी नाहीये, इतके वर यायला तिलाही लोकांचा आधार घ्यावा लागला असणारच पण त्या बदल्यात त्यांनी मारहाण, मानसिक छळ वगैरे करणे अपेक्षित नाहीय. हा सगळा गिव व टेक धंदा आहे. नो फ्री लंचेस.

ती जे बोलली त्यावरून ती व्यवस्थित विचार करून बोलणारी स्त्री वाटली. उगीच माझे असे झाले म्हणून गळा काढला नाही की डोळ्यातून पाणी आणायचा अभिनयही केला नाही. रितिकबद्दल बोलताना आवाज जड झालेला तिचा पण तिने क्षणात स्वतःला सावरून पुढे गेली. तिच्या जागी कोणी दुसरी असती तर नक्कीच 2 अश्रू गाळून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न केला असता. तिच्या अभिनयात तिचे व्यक्तिमत्व दिसते. क्वीनपासून ती आवडत होतीच, मुलाखत पाहून अजून आवडली.

फक्त 1 गोष्ट आवडली नाही तिची. तिचे ज्या ज्या कोणाबरोबर संबंध होते त्यात तिची स्वतःचीही मर्जी/गरज होती म्हणून तिने ते सुरू ठेवलेले. ते संपल्यानंतर त्या लोकांविषयी बोलताना एका 17 वर्षांच्या मुलीबरोबर असे करताना, मुलीपेक्षाही लहान मुलीबरोबर असे करताना लाज वाटली नाही का वगैरे बोलणे आगाऊ वाटले. जेव्हा सगळे चांगले होते तेव्हा मी या माणसाच्या मुलीपेक्षाही लहान आहे हा विचार सुचला नाही मग रिलेशन फाटल्यावर तो का सुचावा?

बेबे पोस्ट आवडली. सध्या कंगनाचा हा इंटरव्ह्यु खूप गाजतोय. मी पण वेळात वेळ काढून पाहिला काल. विचारात भलती
क्लॅरिटी आहे तिच्या. मला मात्र काहीही आगाऊ वाटले नाही. आदित्य पंचोली बरोबर तिचे संबंध नव्हते, मदतीच्या नावाखाली त्याने तिला खूप वापरले आणि छळ्/मारहाण केली. शेखर सुमनच्या मुलाबद्दल फार काही कळले नाही पण हृतिक बद्दलची तिची विधानं ऐकून शॉक बसला मला. सुझान ने जे केले ते योग्यच असं वाटलं एक क्षण. उगिच माया नगरी म्हणत नाहीत बॉलिवूड ला. नेट वर तिने हृतिक ला लिहिलेली पत्रं (ईमेल्स) पण अपलोड केली गेलेली आहेत

चकचकीत जगाच्या मागे बरीच कुरुप सत्यं असावीत!!
कंगना खरी की बाकी सगळे ते खरं खोटं करणं कठीण आहे.
पण हे लोक येणार्‍या पिक्चर्स च्या आधी मुद्दाम चर्चेत यायचा प्रयत्न करत असल्याने सर्वच विथ पिंच ऑफ सॉल्ट घ्यावे लागेल असे वाटते.

ती सिमरनच्या प्रोमोसाठी हे करतेय हा आरोप होतोय तिच्यावर. पण तिला हे आडून करायची गरज नाही कारण क्वीनपासून तिने स्वतःचा फॅन फोल्लोविंग तयार केलाय. तिचे चाहते तसेही सिमरन पहातीलच जर त्यांना इच्छा असेल तर.

हृतिक माझा आवडता स्टार होता पण घटस्फोटाचे जाहीर होताच त्याने एक पत्रक काढून त्यात सुझानला घटस्फोट हवाय, म्हणून मी हे करतोय हे स्ट्रेस केलेले पाहिल्यावर मनातून माणूस म्हणून उतरला. त्यावेळचे वागणे पाहता कंगना जे बोलतेय तेही खरे वाटतेय.

अवांतर >>>>विवेक ओबेरॉयकडे अभिनय नावाचा प्रकार नव्हता.>>> मला मात्र कंपनी पासुन साथिया पर्यंत तो आवडला.सुरुवातीलाच काही चित्रपटातच पहिल्या ५ हिरोत फिल्मफेअर साथी त्याचे नाव होते.
नंतर त्याची चॉईस चुकली,एअ‍ॅश च्या मागे लागुन मोठी चुक केली त्याने,सल्लुशी पंगा घेतला,गेल्यातच जमा झाला तो.

कंगना मला अभिनेत्री आनि माणुस म्हणुन आवडते.करण जोहर ला पण तिने चांगलेच सुनावले होते.मात्र हे प्रत्येक वेळी तिच्या चित्रपटाच्या प्रदर्शानाच्या वेळीच होते.(डाऊट) बहुधा त्याआधी किंवा नंतर पत्रकार जात नसेल किंवा तिला वेळ नसेल.

बरेच जणांनी कंगना मला अभिनेत्री आणि माणुस म्हणून आवडते असं लिहिलंय.
अभिनेत्री म्हणुन ठीक आहे. पण माणुस म्हणुन म्हणजे कसं? असं काय माहित आहे तिच्याबद्दल जे तिला एक चांगला माणुस म्हणुन डीफाईन करतंय? मला माहित नाही म्हणुन विचारतेय.
मला ती अभिनेत्री म्हणुन, सुंदर म्हणुन, कशीच आवडत नाही.

येस दक्षिणा... मलाही पटलं... माझा कम्प्लिट पॉईंट ऑफ व्ह्यू चेंज(चांगल्या अर्थाने) झाला एपिसोड बघून... मला आधी ती कधी एवढी आवडली नाही म्हणण्यापेक्षा तिला क्वीन च्या आधी इतकं कधी सिरिअसली घेतलही न्हवत... क्वीन मध्ये जाम आवडली...मग परत तनु वेड्स मनू 2 मध्ये दोन व्यक्तीरेखा वेगळ्याच वाटाव्यात असा अभिनय... मग हृतिक च प्रकरण झालं मग थोडं वाटायला लागलं की सायको दिसतियी बाबा खरंच ही बया.. इमेल वाचले थोडे नेट वर..मग मत थोडं हृतिकच्या बाजूने झुकायला लागलं कारण आधी तिने ज्या सायको प्रकारच्या भूमिका केल्या होत्या ती तशीच आहे वाटत रिअल लाईफ मध्ये अस वाटायला भाग पडलं हृतिक सुमन आणि पंचोली ने... म्हणजे पार वेडीच ठरवलं तिला सगळ्यांनी... पागल सायको...पण आपण तिची बाजू कधी ऐकलीच न्हवती... आज तिची बाजू ऐकून ती खरंच बोलत असावी असं वाटतंय...कारण mr हृतिक च्या बायकोने त्याला सोडलंय...पंचोलीची बायको ही वेगळी राहत होती म्हणे...मग परत आली... आणि नो वंडर तो सुरज ,पंचोली च्या मुलाला हे असल मारहाणीचाच बाळकडू मिळालं असेल तर मग जिया खान ची आई पण मेबी खर बोलत असेल....देव जाणे... मायानगरी... चपखल शब्द आहे खरा... सब माया हैं... ग्रुपीझम आणि नेपटीझम आहे हे तर कोणीही नाकारू शकत नाही.. कपूर,खान ,जोहर,भट कॅम्प, चोप्रा मंडळी आहेतच की.. अभिषेक बच्चनला अजूनही चित्रपटात घेतात बच्चन आडनाव आहे म्हणून... (फक्त गुरू,युवा मध्ये ठीक वाटला तो मला)..... बाकी आनंदी आनंद...
एका सामान्य घरातून येवून,या सगळ्या बड्या पावरफुल लोकांशी लढून,स्वतःच टेम्पर कूल ठेवून , काम करून 3 नॅशनल अवॉर्ड मिळवणं माझ्यासाठी तरी आवाक्याबाहेरची गोष्ट आहे म्हणून हॅट्स ऑफ टू कंगना...
ता.क. - (हे माझं वयक्तिक मत आहे )

पण माणुस म्हणुन म्हणजे कसं? >>
सस्मित काहीही असो, एखाद्या अभिनेत्रीचा आपण फक्त दुरून अभिनय पहात असलो तरिही त्यातून त्या व्यक्तिची माणूस म्हणून जी झलक दिसते ती ही सामान्य जनता टिपत असतेच. त्याला जोड् मिळते त्यांच्या मुलाखती, त्यांच्या बद्दलच्या चांगलया बातम्यांमुळे (पूरग्रस्तांना मदत, दान धर्म इ)

असं काय माहित आहे तिच्याबद्दल जे तिला एक चांगला माणुस म्हणुन डीफाईन करतंय? >> याबद्दल बोलायचं झालं तर, तिची मुलाखत पाहिल्यावर कळतं की इतक्या लहान वयात तिने जो स्ट्रगल केलाय तो अफलातून आहे. एका छोट्या खेड्यातून येऊन आपलं बस्तान बॉलिवूड् मध्ये बसवणं, अनेक इमोशनल, फिजिकल टॉर्चर्स मधून जाऊनही उभं राहणं... विचारांची पुरती क्लॅरिटी असणं, स्वतःवर झालेल्या अन्यायाबद्दल बेधडकपणेबोलणं, इतकंच नव्हे तर हृतिकबरोबर ची रिलेशनशीप ओपनली स्विकारणं, आदित्य पंचोली बद्दलही स्पष्ट बोलणं.. नाहीतर तिलाही ते नातं नाकारता आलंच असतं की, कुणाला आपले धिंडवडे काढलेले आवडतात? मला वाटतंय की माणूस म्हणून ती कशी आहे याचा गंध यायला इतक्या गोष्टी पुरे असाव्यात.
मी काही कंगनाची बाजू घेत नाही किंवा तिची वकिली करत नाही, मला जे वाटलं ते मी सांगितलं.

नटुकाकी तुझी पोस्ट पण आवडली.. मलाही कंगना चक्क अचानक आवडायला लागली कालपासून. आतून सुंदर आहे ती.

एका सामान्य घरातून येवून,या सगळ्या बड्या पावरफुल लोकांशी लढून,स्वतःच टेम्पर कूल ठेवून , काम करून 3 नॅशनल अवॉर्ड मिळवणं माझ्यासाठी तरी आवाक्याबाहेरची गोष्ट आहे म्हणून हॅट्स ऑफ टू कंगना... >> नटुकाकी +११११
या कंगनाला ती करिना कपूर वाट्टेल ते बोलली होती, कुणी तिच्या इंग्रजीची पण टर उडवली होती.
काल आपकी अदालत चा एपिसोड पाहिल्यावर मी अनेक गोष्टी सर्च केल्या तिच्या बद्दल त्यात सगळीकडे मला एकवाक्यता दिसली... त्यामुळे मला तरी तिच्याबद्दल खूप रिस्पेक्ट वाटला... शिवाय मी तिची एक क्लिप पण पाहिली ज्यात ती स्टेजवर उभे राहून अस्खलित पणे इंग्रजीत बोलली आहे, त्यात मला टर उडवण्याजोगे काहीही वाटले नाही. आणि जरी ते अ‍ॅक्वायर्ड स्किल असले तरी असू दे ना, त्याला पण गट्स लागतात.

या उलट मी म्हणते असेल कंगना कांगावखोर, मग हृतिक आहे सच्चा तर त्याने एक तरी आरोप खोडायचा प्रयत्न करायचा ना? एकूण आंतरजालावर असंच चित्र आहे की तो तिच्या वार्‍याला ही उभा राहू पहात नाहिये.

किमान मला तरी कंगणा मानसिक रुग्ण वाटते. स्प्लिट पर्सनॅलटी टाईप. पल मे माशा पल मे तमाशा. स्वतःचे काम झाले की समोरच्याबद्दल कधी काय बोलेल करेल याचा अंदाज तिला सुध्दा येत नसेल. तिचे हसणे वेडसर वाटते.

ऱितिक भले पडला असेल प्रेमात पण नंतर बाईचे रंग कळल्यावर लांब जाण्यात भले वाटले असेल

प्राण आणि सस्मित यांच्याशी सहमत. गॉन केस आहे ही बया - http://www.loksatta.com/manoranjan-news/refutes-kangana-ranauts-claims-o...

नुसताच धुरळा उडवायचाय तिला केआरकेप्रमाणे.

अहो मग काय महिला आयोग स्वीकारणार आहे का आरोप..की हा आम्ही पैसे खाऊ लोक आहोत...
फेटाळणारच ना..

<<<<तिच्या त्या एका कृतीचे जास्त उदात्तीकरण होऊ नये. >>>
गोरेपणातच सौंदर्य आहे नि काळेपणात नाही हे इतके सतत सांगण्यात येते तर जरा काळेपणातहि अगदीच काही टाकाऊ आहे असे नाही एव्हढेच म्हणणे आहे.
आता तिने काळ्या बूट पॉलिशची जाहिरात केली नि म्हंटले की हे लावा, काळे व्हा नि सुंदर दिसा तर ते अतीच होईल हे मान्य

इमेल वाचले थोडे नेट वर>> म्हणजे कुठे ?
क्वीन पासून भलतीच आवडायला लागली होती पण तिने जे काही हृतिक आणि पंचोली बद्दल सांगितलं ते अजिबातच माहिती नव्हतं . ग्रुपीझम हा प्रकार सगळ्या फिल्ड मध्ये असतो . स्टार्स च्या मुलांना सगळं आयत मिळत. त्यांना काम जरी मिळालं नाही तरी बापाचा पैसा असतो . त्याचा त्यांना माज येतो हे माहित होतच आणि म्हणूनच घरातलं कोणीही या इंडस्ट्री मध्ये नसताना परत इंग्रजी वीक असतानाही . तिच्या इंग्रजीची जी काही उडवत होते इंडस्ट्रीत हे सगळं पचवूनही तिने जे काही यश मिळवलं आहे ते नक्कीच हे काहीतरी वेगळं आहे . प्रेरणादायी आहे.
महिला आयोगाचे निर्णय विकाऊ असून, श्रीमंतांच्याच कलाने त्यांचे निर्णय दिले जातात >> हे तीच वक्तव्य बरोबर हि असू शकत . तिने अनुभव घेतला आहे .

ऋन्मेष, थँक्स फॉर द लिंक.. आता या वीकेण्ड्ला बघेन घरी

दक्षुतै आणि नटुकाकी +१ मला कंगना आवडते, ती बेधडक आहे म्हणूनच... ती ही धुतल्या तांदळासारखी स्वच्छ नाहीये पण आय गेस ती ते मान्य करतेच आहे.

खुप सॉर्टेड आहे ती आय फिल

कंगना मला गॅगस्टर पासुन आवडते. तिच्या भुमिकांमुळे ती वेड्सर, स्प्लिट पेर्सनॅलिटी वैगरे वाटते पण ह्या मुलाखतीमधे एक्दम सॉर्टेड वाटली. तिने तिघांवर जे आरोप केले आहेत ते त्यानी खोडुन काढावेत.
हा सिली एक्स कोण असावा बर? तिघही एकसे बढकर एक आहेत ...

मी खूप बझ असल्याने मुलाखत बघितली पण काही उत्तरं देताना ती उलटसुलट बोलत होती. वर्षांचा गोंधळ होत होता- २०१३, २०१४ ,२०१५ - तिलाच नक्की आठवत नव्हतं. शिवाय एकट्या करण जोहरवर राग आणि त्याच्यासोबत तिची टर उडवणाऱ्या सैफ आणि वरुणला मात्र क्लीन चीट. ते पण काय कळलं नाही.
ह्रिथिकची मात्र मस्त पोलखोल केली तिनी. हर बार बाप लॉन्च कर देता है वगैरे जबरीच. बाकी ह्रितिक ने कदाचित मुद्दाम पब्लिसिटी साठी हा ड्रॅमा केला असेल असंही वाटलं.
फ़ॅशन, क्वीन , तवेमरी मुळे ती अभिनेत्री म्हणून आवडतेच. तीन वेळा नॅशनल अवार्ड- वेल डिझर्वड ईच टाईम- खायचं काम नाहीच. आपले रिलेशन्स - भले चुकीच्या माणसाबरोबर असले- तरी जाहीर स्वीकारणं - हॅट्स ऑफ टू हर.

कंगनाची मुलाखत बघितली..जे काही ती बोलली त्यासाठी धाडस पाहिजे खरचं.. ह्यातील बर्याच गोष्त्टी माहित नव्हत्या..
ह्रितीक रोशन्च्या मॉटर मध्ये तेव्हा सहानुभुती त्याच्याच बाजुने होती.अंधुकस आठ्वतय..तेव्हा बहुतेक ती सायको आहे असं वाच्लं होतं.मे बी त्यानेच स्प्रेड केलं असेल..पण विवाहित पुरुषाशी संबंध ठेवणे हे अयोग्यच आहे..तसंही ही मायानगरी आहे त्यामुळे ईथे जे काही चालते ते माझ्यासार्ख्या सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरच आहे..
पण एकटी असून तिने केलेला स्ट्रगल आणि अभिनयातली पारितोषिकं निश्चितच कोतुकास्प्द आहे..!
@ नटुकाकी..पोस्ट आवडली.

@सुजा- कंगना राणावत इमेल्स अस गुगळुन बघा...सापडतील भरपूर लिंक्स...आणि जेव्हा हे सगळं झालं तेव्हा TOI पेपर मध्येही मोठे मोठे ई-मेल छापून आले होते.. काही तर फार मोठे होते..
@बी.एस - धन्यवाद कळवल्याबद्दल Blush

आपल्याला गोत्यात आणणाऱ्याना सायको ठरवणे खूप सोपे आहे हृतिक व आदित्य सारख्या लोकांना. यांच्या विरुद्ध ओपन फोरम मध्ये नाव घेऊन बोलणे कठीण आहे. हिम्मत लागते हे करायला. ह्या हिंमतीलाच काही जण वेडाचार म्हणतात. पण खरे बोलणाऱ्याचा खरेपणा चेहऱ्यावर दिसतो, जो कंगनाच्या चेहऱ्यावर दिसत होता.

पण खरे बोलणाऱ्याचा खरेपणा चेहऱ्यावर दिसतो, जो कंगनाच्या चेहऱ्यावर दिसत होता.>>>> +१००
दक्षिणा +१
मलाही ती अशीच खरी वाटते.म्हणजे वर लिहले आहे तसे धुतल्या तांदळासारखी नाही, जे आपण नही आहोत हे तिला ही माहित आहे,आनि ते ही तिच्या बोलण्यातुन जाणवत.
माणुस म्हणुन ती मला आवडते कारण बहिणीवर अ‍ॅसिड अ‍ॅटक झाल्यानंतर तिच्यासोबत राहता याव्,म्हणुन तिने काही काळ ऑफर घेतल्या नव्हत्या कामाच्या.अर्ध्यातासाचे स्टेज परफॉर्म्स्न साथी जे लाख लाख रुपये मिळतात ते ही धुडकावले होते.
बरं फिल्म इंडस्ट्री मधल्या लोकांविषयी जेवढ्या सहजतेने ती विरोधात बोलते,तेवढेच तिच्या घरच्यांबाबत ही बोलते.आम्हांला मुली म्हणुन दुय्यम वागणुक मिळते,आनि ते मला पटत नव्हत.हे ही ती सहज सांगते.
असेल ही ती थोडीफार सायको,,तरी ती मला आवडते.तसे तर आपण सगळेच थोडेफार असतो.बाकी अजुन वरच्या पोस्ट मधे आहे लिहलेले.

Pages