मोबाईल कुठला घ्यावा ?

Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप

मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?

नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?

यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.

तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मॅक्सिमम पॉवर असलेली घ्या. एकदा चार्ज केली की मग बरेच वेळा फोन चार्ज करता येतात. एमाय ची २००००एमएच किंवा सॅमसंग ची २५०००एमएच अश्यापैकी पाहा.

मी उद्योग केले व किंग रुट अ‍ॅप वापरुन फोन रुट केला. यशस्वी झाला. आता नवीन अँड्रॉईड व्हर्जन कसे टाकायचे? फोन दगड झाला असता तर नवीन घेता आला असता. तेवढिच मनाची समजूत घालता आली असती कि दगड झाला म्हणून नवीन घेतला. उगीचच नाही.

मी रिसेंटली एमाय चा थ्री-सी राऊटर घेतला. कमी किंमतीत फार मस्त (किंमतीला अनुसरून) प्रॉडक्ट आहे. त्यावरून एमआय चे उत्पादनं चांगली आहेत असं मी तरी म्हणेल. सो पॉवर बँकही पाहायला हरकत नाही. १०००० आणि २०००० एमएएच मध्ये उपलब्ध आहेत या. किंमतही अगदीच परवडेबल आहे. विचार करायला हरकत नाही.

http://www.mi.com/in/20000mah-mi-power-bank-2/
http://www.mi.com/in/10000mah-mi-power-bank-2/

>> आता नवीन अँड्रॉईड व्हर्जन कसे टाकायचे?

तुमच्या फोनसाठी नवीन व्हर्जन उपलब्ध आहे का हे आधी शोधुन काढा.
https://forum.xda-developers.com/ या वेबसाईटवर बहुतेक सगळ्या फोनसाठीची माहीती मिळते.
तिथेच तुम्हाला कस्टम रॉम कशी इन्स्टॉल करयची याची माहिती मिळेल.

साधारणतः तुम्हाला डेस्कटॉप वरचं ADB/fastboot वापरुन फोनवर कस्टम रिकव्हरी इन्स्टॉल करावी लागेल आणि मग कस्टम रिकव्हरी वपरुन कस्टम रॉम इन्स्टॉल करायला लागेल.

माझा लेनोव्हो के३ नोट आहे..... खुप वेळा पडून त्याच्या ग्लासला खुप क्रक गेलेते. नविन ग्लास बसवू का? साधारण किती खर्च येईल??

पॉवरबँक व ट्रेनमधील मोबाईल चार्जिंग आऊटलेट वापरल्याने टचस्क्रीन मधे काहीतरी गडबड होते असे माझ्या ध्यानात आले आहे. २ फोन खराब झालेत. एक ट्रेनमुळे अन एक पॉवरबँक मुळे.

अर्थात पॉवरबँक कोणतेही स्पेसिफिकेशन न वाचता गिफ्ट मिळालेली वापरली होती, त्यामुळे कदाचित असेल..

पाॅवर बॅंक सहसा दुकानातून मोबाईल घेतल्यास फुकट देतात गीफ्ट म्हणून. माझ्या आधीच्या कंपनीनेही दिली होती आणि अतिशय चांगली होती. त्यावर ब्रॅंडनेम नव्हते. दोन तीन वेळा माझ्याकडून खाली पडली आणि खिळखिळी झाली पण तुम्ही म्हणताय तसा अनुभव कधी आला नाही.

घ्या, २-३ वर्षं आरामात चालेल>> अजून एखाद वर्ष वाढवा की हो. बायको आणी मुलीला विचारले होते की मला गिफ्ट देताय का? ते नाही म्हणाले म्हणून आता स्वतःलाच गिफ्ट घ्यायचा आहे.

मोटो ई किंवा लेटेस्ट मोटो सी / सी प्लस कोणी वापरले / हाताळले आहेत का? मोटो सी फक्त 7000 ला आहे, त्यामुळे प्रश्न पडलाय quality बद्दल. मला माझ्या आईसाठी घ्यायचा आहे.

https://www.amazon.in/Intex-Note-5-5-Champagne-Gold/dp/B074X1DDBH/ref=sr...

हा इंटेक्स, आणि
https://www.amazon.in/Lenovo-A6600-Plus-Black/dp/B01M0OXV1V/ref=sr_1_18?... हा लिनोवो.

नवीन स्मार्ट्फोन घ्यायचाय. कॉलिंग, स म स, थोडंफार नेट. पण कॅमेरा केवळ हौस म्हणून पण मुलीचे फोटो काढायला भरपूर वापरणार. आणि शक्यतो तिच्या हाती लागू देणार नाही पण लहान मूल म्हणजे धडपड आलीच त्यामुळे जरा स्टर्डी आणि जास्तीत जास्त ७-८के पर्यंतच्या बजेटचा हवाय. ऑडिओ-व्हिडिओ क्वालिटी चांगली हवी. तासनतास बोलत नाही त्यामुळे बॅटरी नीट वापरली जाईल पण अगदी ४ तासांत खपणारी नको. Proud

वरच्या दोनांव्यतिरिक्त अजून काही पर्याय असतील तर सुचवा प्लीज. आणि वरचे कोणाचे चांगले-वाईट अनुभव असतील तरी सांगा.

>>कॅमेरा केवळ हौस म्हणून पण~~~

काही दुकानात डिस्प्ले पीस असतात ( विजय सेल्स वगैरे) तिथे फोटो काढून त्याचे डिटेल्स पाहा. ८ एमपि किंवा १३ एमपि कॅम्रा असतो परंतू फोटोची फाइल साइज फक्त एक /दीड एमबि इतकी केविलवाणी असते. या फोटोंना मोठ्या स्क्रीनवर पाहायला मजा येत नाही.

लेनोवो A 6600 बहुतेक लॅालिपॅापवर आहे. अॅप्स मेमरी कार्डावर जात नाहीत

पॉवरबँक-

फोनचा चार्जरने जेवढ्या वेळांत फोन चार्ज होतो त्यापेक्षा लवकर पावरबँकने चार्जिंग होत असेल तर तिचे व्होल्टेज जास्ती आहे. ती वापरू नये.

moto g5s plus चा अनुभव आहे का कुणाला ? moto g5 plus लेकीकडे आहे आणि त्याचा mic चा प्रॉब्लेम येतोय म्हणून जरा डळमळीत आहे. आणि आता मोटो चे फोन लेनोवो बनवत असल्याने अजूनच साशंक आहे.

१५के बजेट मध्ये दुसरा कुठला चांगला कॅमेरा फोन सुचवा.

हो mic weak आहे.
कोणाचाच कॅम्रा खास नाही.
सर्विस सेंटर्स हुआवे,नुबिया,ओनर,शाओमि यांचे नसल्याने काही सांगता येत नाही.उरतात फक्त मोटो/लेनोवो

Moto c + kasa aahe?tyache sim nano aslyamule ghenyasathi mageputhe hotey.dusare kuthale mobile ya range madhale ahet ka?
Flipkart ६९९९
Amazon ६५९०
Tata click ६०९०
Ya kimati moto C plus sathi ahet.

मोटो C plus हा Mediatek 6737प्रसेसरवर आहे.
क्वॅालकॅाम ४२५वरचा शाओमि 5A बरा.
( प्रोप्याइटरी फोन्स शक्यतो टाळावेत)

सॅम्संगच्या किंमती जास्त होत्या.त्यामुळे मोटो सी प्लस,आईसाठी घेतला.१८ तरखेलाच Tata click वर बुक केला.
धन्यवाद!

१० ते १५ च्या बजेट मध्ये कोणता नवा मोबाईल चांगला आहे?
नेटवर शोधले असता मोटो जी ५ s बरा वाटला? कोणी वापरतेय का मोबाईल हा ? किंवा इतर कोणते सजेशन ?

गुढीपाडव्याला मोटो जी५s घेतला, म्हणजे एक महिनाही नाही झालाय, अजून वापरलाच नाही, नॅनो सिमची जुळवाजुळव वगैरेसाठी वेळ नाही मिळाला, तर फोन आणल्याबरोबर थोडावेळ चार्ज केला, नंतर पडून होता, काही दिवसांनी चालू केला तर पूर्ण डिसचार्ज झाला होता, परत चार्ज केला पूर्ण तर काही दिवसांनी परत तेच. काॅलिंग, इंटरनेट काहीही न करताही असं होऊ शकतं का. आज विजय सेल्समध्ये दाखवला तर तो म्हणाला हे नाॅर्मल आहे, चौदा तासाचा का काय स्टॅंडबाय टाईम आहे. आम्हाला हे नाॅर्मल वाटत नाही, काही वापरच नाही तर बॅटरी जायला नको, नाही का. कोणीतरी प्रकाश टाका प्लीज.

मोटो जी 5 नका घेऊ, कॅमेरा issue आहे. कॅमेरा रेस्टार्ट एरर येत असतो, मला अनुभव आहे.. पटत नसेल तर गूगल करून बघा ..
बत्तरी चा प्रोब्लेम नाही आहे, turbo charge आहे.. फटाफट चार्ज होतो पण कॅमेरा इससू आहेच.

रेडमी नोट ५, रेडमी नोट ५ प्रो आणि एम आय ए १
या तिन्हींपैकी कुणाचा वापरण्याचा अनुभव आहे का? रिव्ह्यू सांगाल का?

एम आय ए १ आता ऑनलाइन अ‍ॅमेझॉन वा फ्लिपकार्टवर वा एम आय च्या सायटीवरही मिळत नाहीये. दुकानांमधे अजून असू शकेल का?

तसेच मोबाइल फोटोग्राफीसाठी चांगले (+बाकीचा परफॉर्मन्सही) १०-१२ हजाराच्या रेंजमधे अजून काही पर्याय आहेत का फोन्सचे?
मला गेमिंग मुळीच लागत नाही. बेसिक फोन, समस, व्हॉट्सॅप, फेबु, इन्स्टा, ट्विटर आणि कॅमेरा हाच माझा मुख्य वापर आहे.

१०-१२ हजाराच्या रेंजमधे अजून काही पर्याय आहेत का फोन्सचे? >>> Moto G6- Play - Rs.11,999/- आजच अ‍ॅमेझॉन वर लाँच होतोय. चांगला वाटतोय.
Moto G Turbo वापरला असल्याने, एकंदर Moto च्या फोनबद्दल मत चांगलं आहे.

http://indianexpress.com/article/technology/mobile-tabs/moto-g6-moto-g6-...

Honor 8 lite मध्यंतरी घेतला. Redmi note 4 पेक्षा कॅमेरा जास्त चांगला वाटतो. बाकी उत्तम चालतो आहे

मी वापरतेय रेड मी नोट प्रो 15 दिवसांपासून. मस्त आहे.बॅटरी बॅकअप चांगला आहे. स्पीड छान आहे . फोटो खूप छान येतात.

मी वापरतेय रेड मी नोट प्रो 15 दिवसांपासून. मस्त आहे.बॅटरी बॅकअप चांगला आहे. स्पीड छान आहे . फोटो खूप छान येतात.
Submitted by अल्पना on 4 June, 2018 - 12:2
>>>>
यस,अल्पना!!
मी रेडमी नोट ५ वापरत आहे.उत्तम फोन आहे.फक्त ब्रॅण्ड व्हॅल्यु साठी सामसुम आणि मोटोला पैसे मोजण्यापेक्षा रेडमी मॉडरेट प्राइसला छान फोनस् ऑफर करत आहे.
रेडमी नोट ५ आणि ५ प्रो हे सहा इंचाचा डिस्प्ले असलेले १८० ग्रॅम वजनाचे फॅबलेट टाईप फोन असल्याने ज्यांचे तळहात आकाराने छोटे आहेत (espलेडीज बायका) त्यांनी फोन घेताना सहज हाताळता येईल का याचा विचार करुन घ्यावा.

मी गेले पाच वर्ष सॅमसंग नोट टू वापरतेय. हातात मावणे वगैरे प्रॉब्लेम्स नाहीत मला.
खरंतर अजूनही वर्षभर जाईल तो आरामात. पण ४जी नाहीये म्हणून बदलायचा विचार केलाय.

ओके.हातात मावणे हा इश्यु नसेल तर मग काहीच प्रॉब्लेम नाही.तुम्ही फिल्म इंडस्ट्रीत आहात ना? मग honor 9 lite बघा,कॅमेरा रिव्हूज खूप छान आहेत(assuming you need a good camera phone).फकत बॅटरी ३००० mamp आहे.साधारण वापर असेल तर honor 9 lite and redmi pro एकच पडेल .

fingerprint sensor आणि face unlock हे वापरणं कितपत सुरक्षीत आहे?
समजा सेन्सर बिघडला तर डिस्प्ले /स्क्रिन अनलॉक कसा होईल/करता येईल?.मी अजून हे फिचर वापरलेले नाही.

fingerprint sensor आणि face unlock हे वापरणं कितपत सुरक्षीत आहे?>>>>>
मी Xiaomi Redmi Note 3 वापरत आहे, त्यात fingerprint sensor आहे. ते कितपत सुरक्षित आहे, हा मलाही प्रश्न आहेच. कारण मी गाढ झोपेत असतांना एखाद्याने गुपचूप माझे बोट fingerprint sensor ला लावले तर कदाचित फोन unlock होऊ शकेल. म्हणून मी सर्व payment apps, messeging app ला fingerprint ऐवजी pin सेट केला आहे.

समजा सेन्सर बिघडला तर डिस्प्ले /स्क्रिन अनलॉक कसा होईल/करता येईल?>>>>>>
इतर फोनप्रमाणे (ज्यांना fingerprint sensor नाही), power बटन दाबून स्क्रीन चालू करून मग आपला pattern/pin/password टाकून
अनलॉक करता येईल.

इंटरनेटसाठी घरातला कुणाचाही फोन वापरतो म्हणून फेस/ फिंगरप्रिंट अनलॅाक ठेवले नाही. पिनच मारतो.
( हल्ली बाइकवरून येणारे मोबाइलचोर फोन कसा चालू करतात?)

अतिशय उत्तम बॅटरी, ५-६ वर्ष टिकेल असा (वापरणाऱ्याने १५ वर्षात २च फोन घेतले आहेत :D) आणि 4g असलेला बजेट फोन कोणता आहे? ५-७ हजार किमतीत येईल असा. कॅमेरा वगैरे मध्ये फार इंटरेस्ट नाही.

4g असलेला बजेट फोन कोणता आहे? 5 -7 हजारात येईल असा हवा. >>>>>> मोटो सी प्लस चांगला आहे. टाटा क्लिकवरून ६०९०/- ल मिळाला होता.

हाइब्रिड सिम अडाप्टरची जाहिरात आणि फोटो पाहिले, पण फारच जुगाड वाटतोय.
<<
लोक सिम कार्ड लायटरने गरम करून त्यातले पितळी पार्ट वेगळे करून एस्डी कार्डावर चिकटवून मग सिम प्लस एस्डी कार्ड असे वापरण्याचा जुगाड पूर्वी करीत. त्यामानाने हा जुगाड खूपच हायटेक आहे.

प्युअर ड्युअल volte ४जी, full HD, 4/64GB, 18:9 ratio वाला फोन हवा असेल तर oppo चा realme फक्त ११००० आहे. ३५००mh ची battery १.५ दिवस येते. फक्त गोरिला ग्लास आणि fingerprint sensor नाहीय पण फेस सेन्सर आहे. बेस्ट पार्ट म्हणजे दोन्हि ४जी कार्ड्स एकाच वेळी वापरता येतात. एस डी कार्ड स्लॉट पण आहे ज्याजोगे १२८ जीबी पर्यन्त मेमरी वाढवता येऊ शकते.

आस्पेक्ट रेशो १८:९ आल्याने पेज जास्त स्क्रॉल करावे लागत नाही.त्यामुळे स्क्रिन आस्पेक्ट रेशो १८:९ नॉर्म होत आहे.
हायब्रीड सिममध्ये एक मेमरी कार्ड आणि एक् नॅनो सिम बसते किंवा दोन नॅनो सिम. पण ६४ जीबी मेमरी लोकांना का पुरत नसावी हा मला प्रश्न आहे. काय भरतात एवढे स्मार्टफोनमध्ये?
बॅटरी ४००० mh च्या खाली नसावी. फोन डिस्प्ले फुल एचडी आल्याने आणि ६ इंचाचा स्क्रीन असेल तर ४००० mh पेक्षा कमी असलेली बॅटरी तग धरत नाही जरी कंपणीचा दावा काहीही असला तरी.
ऑप्पो रिलमी ची बॅटरी कमी वाटते आहे. दोन्ही एकदम सिम एकाचवेळी ४ G सिग्नल पकडत असतील तर बॅटरी जास्त ड्रेन होत रहाते. प्रायमरी सिम ४g व सेकंडरी २ जी वर ठेवावे.

माइक्रो मैक्स भारत 5 प्रो बद्दल काय अनुभव आहे का ?
3जीबी ram कितपत खरोखर फ़ास्ट चालते त्यात ?
स्क्रीन साइज 5.2 इंच आहे अन् बैटरी 5000

३जी बी रॅम नेहमीच्या वापराला सफिशियंट आहेत. हेवी ॲप्स आणि गेमिंग साठी ३ जीबी पुरनार नाही. परत मायक्रोमॅक्सचे युजर इंटरफेस स्कीन कीती हेवी आहे त्यावर पण रॅम कीती कंझ्युम होते ते समजेल.माझ्या शायोमी रेडमी नोट ५ ची ३ पैकी १.५ जीबी रॅम युजर इंटरफेसलाच जाते. पण ३ जीबी रॅम मॉडरेट आहे. पुढे मागे काही जुगाड करुन स्टॉक ॲन्ड्रॉईड सिस्टीम फ्लॅश करुन मॅन्युफॅक्चररची स्कीन उडवली तर जास्त रॅम मिळेल,पण जोखीम आहे.
स्क्रीम ५.२ इंची हे कमी वाटते आहे. बॅटरी मात्र तगडी आहे. मी असतो तुमच्या जागी तर इतर ऑप्शनचा विचार केला असता.

Pages