स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे - २

Submitted by मॅगी on 21 June, 2016 - 05:59

मंजूडीच्या पहिल्या धाग्यावर २००० हून अधिक पोस्ट्स झाल्यामुळे हा दुसरा धागा काढला आहे..
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल हितगुज..

आता इथे वाजू देत भांड्याला भांडी Wink

पहिल्या धाग्यावरची चर्चा इथे पहाता येईलः
http://www.maayboli.com/node/6204

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बजाज फूड प्रोसेसर बद्दल इथे वाचून घ्यावासा वाटतोय. एक प्रश्न आहे - ह्यात भेंडी पण चिरली जाते का? बुळबुळीत असते म्हणून विचारले.

सध्या मिक्सर कोणता चांगला आहे?
मला कोरडे मसाले आणि ओलं / ग्रेव्हीचं वाटण होईल असा हवा आहे. परत आवाज किंवा आकार खूप नको.
कपाटात ठेऊन सारखा आत-बाहेर करावा लागेल.
याचा आधीच कुठे धागा आहे का?

चिउ, इथे पहा http://www.maayboli.com/node/35310

२२० व्होल्ट वाल्या देशात असाल तर भारतातले बजाज /प्रीती वगैरे चालतील.

११० व्होल्ट वाल्या देशात ऑस्टर, व्हाय्टामिक्स, निन्जा असे बरेच चॉइसेस आहेत

धन्यवाद मेधा. त्या लिंकवर मिक्सरपण आहेत हे माहित नव्हते. आता बघते सगळी.
मला फूड प्रोसेसर नको आहे. नुसता कोरड्या आणि ओल्या वाटणाला हवा आहे. यासाठी हँड ब्लेंडर - छोटे भांडे असलेला बरा होईल का?
आत्ता घरी फूड प्रोसेसर आणि एक मोठा मिक्सर आहे पण त्यात फक्त इडली डोशाचं पीठ होतं. कमी प्रमाणातलं काहिही होत नाही आणि गंधासारखं वाटण तर नाहीच नाही.

आमच्याकडे लहानपणी एक दळणाची वेगळी कापडी पिशवी होती. ती कोणत्या प्रकारच्या कापडाची असायची? मला शिवून घ्यावची आहे पण कोणते कापड शोधू? जरा दणकट पांढुरके कापड होते.

सिंगापुरच्या घरासाठी एक अवन आणी पुण्याच्या घरासाठी एक मायक्रोवेव घ्यायचा आहे. प्लीज चांगले ब्रॅंड सुचवा. अवन चे टिफाल / पॅनसाॅनिक कसे आहेत?

फुड प्रोसेसर्समध्ये रोनाल्डचा उल्लेख अगदी तुरळकपणे झालेला पाहून आश्चर्य वाटले. रोनाल्ड हा एक संपूर्ण किचन साहाय्यक आहे. आमच्याकडे सुमारे तीन पिढ्या १९९३-९४पासून हाच प्रोसेसर वापरला जात आहे. तेव्हापासू मॉडेल्मध्ये अनेक सुधारणा, नवीन अ‍ॅटॅचमेंट्स असे बदल होऊन तो अधिकच उपयुक्त झाला आहे. नारळ खरवडण्याचे काम पुरुष उभ्या उभ्या मस्त करू शकतात.

हिरा, तुमच्याकडे सध्या रोनाल्ड फूड प्रोसेसर चे कोणते मॉडेल आहे ते सांगू शकाल का? इथले कौतुक वाचून आम्ही बजाज fx13 घेण्याचे ठरवले आहे पण तो फक्त विजय सेल्स मध्ये मिळतो. जर रोनाल्ड अॉनलाईन मिळत असेल तर तो ही पर्याय तपासून पाहीन. धन्यवाद!

हिरा, +१.
माझ्याकडे रोनाल्ड होता.आता नारळ खोवण्याचे अ‍ॅटॅचमेंट्स पाहून घ्यावासा वाटतोय.

रोनाल्ड हल्ली मिळत नाही वगैरे ऐकलं मी बर्‍याच दुकानांत. मग मीपण मार्च महिन्यात एफेक्स १३ घेतला. फुप्रो चांगलाय, पण मी मिक्सरही तोच वापरते कारण माझा मिक्सर खपला म्हणून मी फुप्रो-मिक्सर घेतला. पण मिक्सरचा आवाज महाभयानक मोठाय. कणीक शांतपणे फुप्रोत मळून होते, चटणी किंवा काही केलं की आवाज फार येतो. पण आता नाईलाज.

साबांसाठी घ्याचाय फुप्रो आता. आणि त्या मिक्सर वेगळा वापरतात त्यामुळे फुप्रोच्या मिक्सरचा फार वापर होणार नाही. अगोदरच फुप्रो १२-१३ वर्षं जुना आहे, बहुतेक सिंगर चा. अगदी सोन्यासारखा होता बिचारा Wink

http://www.ronaldmixers.net/purchase.htm

रोनाल्ड कमी ठिकाणी मिळतो.आमच्याकडे नेहमी रोनाल्ड आहे.म्हणजे रोनाल्ड जुना झाला मोडला म्हणून तो देऊन परत रोनाल्ड घेतला असं.
त्यांच्या सुचना व्यवस्थित पाळल्या आणि स्पीड व्हेरी करायचा नॉब सेटिंग बदलले नाही तर वर्षानुवर्षे नीट चालतो.
खोबरे त्यांनी सांगितलेल्या स्पीड वरच खवावे.मोअर स्पीड इज नॉट इकवल टु फास्ट आउटपुट. उगीच आगावपणा करून हायस्पीड ला खवायला गेल्यास करवंटी उडून आपल्या टाळक्यात लागते किंवा दुधात पडते.

आमचे २०१२चे जुने मॉडेल आहे. आता नवीन एक्स्चेंज करायचे आहे. पण त्या काळातही त्यात नारळासाठी अ‍ॅटॅचमेंट होती. आणि आम्ही ती वापरत आलो आहोत. मुंबईत त्यांच्या कुर्ला ऑफिसकडून छान सर्विस मिळते. आता ते एक्स्चेंजसाठी मागे लागले आहेत. एक दोन महिन्यात नवा घेऊ बहुतेक. कुर्ला ऑफिसमध्ये फोन केला तर पुण्यातही ते डिलिवरी देतात.

माझ्याकडे २००५ ला घेतलेल्या मॉडेल ला पण नारळासाठी अ‍ॅटॅचमेंट होती कायमच वापरली आहे.
आता बदलून पुन्हा रोनाल्ड्च आहे. Happy

धन्यवाद हिरा, अनु, आणि अनुश्री! YouTube वर एक demo video पाहिला तो चांगला वाटला. Renolds च्या website वर चौकशी करते आता Happy

एक पिटुकला फुड चॉपर मैत्रीणीने दिलाय ती मुव्ह झाली तेव्हा.. खूप हँडी आहे. एक कांदा, मिरची असं पटकन चॉप होतं.. ब्रेंटवूडचा आहे.

Stahl brand ची भांडी कुणी वापरली आहेत का? दुकानदार म्हणत होता की non stick सारखी असतात, पण surgical steel ची असतात. प्लीज तुमचे अनुभव सांगा.

टोस्टर ओवन कुठला घ्यावा? लेक आणि त्याचे दोघे रुमीज वापरणार. दरवेळी इलेक्ट्रिक रेंजचा मोठा ओवन वापरायला लागू नये ही अपेक्षा आहे. $५०-६० पर्यंत बजेट आहे.

किचन वेईंग स्केल घ्यायची आहे. आॅनलाईन जास्त विकल्या जाणा-या चायना मेक आहेत आणि वाॅरंटी वगैरै काही नाही, रामभरोसे. कोणी वापरत असेल तर अनुभव आणि कोणता स्केल वापरता सांगाल का प्लीज. आधी चर्चा झाली आहे का या भागात किंवा आधीच्या.

रायगड, माझ्याकडे दोन वेगळ्या कंपन्यांचे ब्रेड मेकर होते. एक कोणी तरी लग्नात भेट दिलेला आणि एक मैत्रिणीने इथून युरोपात जाताना दिलेला असे. ( ब्रँड आता मी विसरले. ) तेंव्हा पीठ मळणे त्यात होत होते हा एकच फायदा दिसलेला. मला तरी त्याचा फारसा उपयोग झाला नाही. अलिकडे बरीच वर्षे किचन एडचा मिक्सर वापरुन पीठ मळणे आणि लागेल तसा शेप करुन अव्हन मधे बेक करणे हेच जास्त सुटसुटीत वाटत आहे. दोन्ही ब्रेड मेकर असेच कोणा कोणाला देऊन टाकले १०-१२ वर्षांपूर्वी.
शक्य असल्यास कोणाकडून १-२ आठवड्यांसाठी बोरो करुन २-४ वेगवेगळ्या प्रकारांचे ट्रायल घ्या - व्हाइट ब्रेड / होल ग्रेन ब्रेड/ पिझा डो इत्यादी. आणी मगच विकत घ्या

Pages