मोबाईल कुठला घ्यावा ?

Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप

मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?

नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?

यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.

तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅन्ड्रॉईड मध्ये मोटो जी सिरीज स्वस्तात मस्त आहे. वन प्लस चेही पर्याय आहेत. अ‍ॅन्ड्रॉईडमध्ये ही फोन ट्रॅक/रिंग/लॉस्ट्मोड वगैरे करता येतो.
आताशा बहुतेक सगळेच ३२ जिबी किंवा जास्त स्टोरेज देतायत...
महागाचा अ‍ॅन्ड्रॉईड घेण्यापेक्षा मात्र आयफोन घ्यावा...

महागाचा अ‍ॅन्ड्रॉईड घेण्यापेक्षा मात्र आयफोन घ्यावा...>> शेवटी आमच गाड येवुन अ‍ॅपल पाशीच थाबल आणी आय-फोन एस ई घेतला लेकिसाठी. तिने बर्‍यापैकी पैसे साठ्वलेले आणी बर्थडे स्पेशल अस कबाइन केल.

मी पण एसस झेनफोन वापरतेय गेले दिड वर्ष. काहीही प्रॉब्लेम आला नाही.
ऑन लाईन घेतला होता. एक दोन त्रुटी अशा की म्युझिक फोन नाही हा, त्यामुळे साऊन्ड क्वालिटी छान नाही
सोबत हेड्सेट मिळत नाही, तो वेगळा घ्यावा लागला. बाकी फोन छान. किंमत पण मी घेतला तेव्हा ९९९९ होती.
आता मला या फोन चा कंटाळा आलाय. Happy

१० हजार पर्यंत चा नविन फोन सुचवा, शक्यतो रॅम जास्ती असावा, आणि म्युझिक साठी सोयीस्कर (आवाज आणि स्टोरेज इ.)

माझा लेनोवो ए६०००+ दोन अडीच वर्षं व्यवस्थित चालून परवा अचानक गंडला. डिस्प्ले गेला. अधिक तपासाअंती डिस्प्ले, टचस्क्रीन सहित आतली ग्राफिक चिप का काय ते पण खराब झाल्याचं कळलं. दुरुस्ती खर्च अंदाजे साडेचार... तेव्हा नवाच फोन घ्यावा का असा विचार चालूये.

एक साधारण नजर फिरवता साडेसात-आठ हजार (मला त्यापेक्षा जास्त पैसे आत्ता खर्च करायचे नाहीत) रेंजमधे खालील फोन दिसले. त्यापैकी कुठला कुणी वापरला आहे, अनुभव कसा आहे, हे फोन्स सोडून याच रेंजमधे इतर फोन्स काही आहेत का वगैरे माहिती असल्यास द्या...
१. लेनोवो वाईब के५ (परत लेनोवो घ्यावा का? भरवशाचा आहे का?)
२. मोटो ई३ पॉवर
३. सॅमसंग गॅलॅक्सी जे३ प्रो
४. पॅनॅसॉनिक पी८५
६. पॅनॅसॉनिक एलुगा रे

कमीतकमी २जीबी/१६ जीबी कॉम्बो असल्यास बरं... रेड मी चे फोन सेलमधून मिळणं अशक्य दिसतंय, त्यांच्या ऑफलाईन स्टोअरमधेही चक्कर मारेन. पण मुळात ते फोन बरे असतात का?

कृपया मदत करा

साठवलेले पैसे इन्व्हेस्ट केलेत तिनी म्हण्जे जरा नीट वापरेलच की! >> हो तिने बर्‍यापैकी पैसे साठ्वलेले पण तरी निम्मे घालावे लागले वर स्क्रिन प्रोटेक्टर , केस, प्लॅन सगळ मिळुन बर्‍यापैकी झाले... नीट वापरला म्हणजे झाल.
बाय द वे अ‍ॅपल मधे मॅक्बुक आणि आयपॅड वर स्टुडन्ट ला (हायस्कुलआअन अबाउव्ह), टिचरला डिसकाउन्ट असतो.. मला वाटत १० का १५ % असतो.

ओके. धन्यवाद. विचार करून बघते. मी खरं तर अजिबात ८च्या वरती खर्च करायचे नाहीत असं ठरवलं आहे. पण नोकिया असेल तर निदान विचारात तरी घ्यावा का असं वाटतंय. Happy

वरदा, मझे बाबा गेल्या वर्षीपासून मोटो ई३ पॉवर वापरतात. मस्त फोन आहे. जी४+ सारखं रॅपिड चार्ज होत नाही हाच काय एक फरक.अजूनही मार्श्मेलो वर आहे मात्र. नुगट (अ‍ॅन्ड्रॉईड ७.०) अपडेट मिळेल की नाही काही माहीती नाही.
बाकी स्क्रीन, आवाज, बॅटरी मस्तच. ५ इंची असल्यानी हाताळायलाही सोपा. दोन सिम स्लॉट्स + एक मेमरी कार्ड स्लॉट असं सगळ आहे. व्हिओएल्टीही चालतं.

धन्यवाद, योकु. मार्शमेलोवर असल्याने परफॉर्मन्सवर काय परिणाम होतो? इतरांपेक्षा हळू चालतो का? रॅपिड चार्ज होत नाही तरी एक तासदीड तासांत होतो ना?
कॅमेरा बराय का?

मार्शमेलोवर असल्याने परफॉर्मन्सवर काय परिणाम होतो? >> तसं म्हटलं तर काहीही नाही. सर्वसाधारण वापरकर्त्याला फार काही फरक नाही.
इतरांपेक्षा हळू चालतो का? >> नाही.
रॅपिड चार्ज होत नाही तरी एक तासदीड तासांत होतो ना? >> हो हो. दिड एक तासात बर्‍यापैकी चार्ज होतो.
कॅमेरा बराय का? >> दोन्ही कॅमेरे (फ्रंट आणि रिअर) चांगले आहेत.

मार्शमेलो काय भानगड आहे?
नवीन Submitted by दक्षिणा on 1 June, 2017 - 13:46
>>>>
डेव्हीड् मार्श हे ॲन्ड्रॉईडचे संस्थपक आहेत.त्यांचे नाव आहे त्या फोनला

ही अ‍ॅन्ड्रॉईड ची नावं आहेत दक्षे. जसं विंडोज ७, ८, १० तसं. खाली सुरुवातीपासूनच्या अ‍ॅन्ड्रॉईड व्हर्जन्स ची नावं आहेत...

वर्जन १ - काही नाव नाही
वर्जन १.१ - काही नाव नाही (इंटर्नली याला Petit Four हे नाव होतं
१.५ - कपकेक
१.६ - डोनट
२.० - २.१ - एक्लेअर
२.२ - २.२.३ - फ्रोयो
२.३ - २.३.७ - जिंजरब्रेड
३.० - ३.२.६ - हनिकोंब
४.० - ४.०.४ - आईस्क्रिम सँडविच
४.१ - ४.३.१ - जेली बीन
४.४ - ४.४.४ - किटकॅट
५.० - ५.१.१ - लॉलीपॉप
६.० - ६.०.१ - मार्शमेलो
७.० - ७.१.२ - नुगट
आणि यापुढे 'अ‍ॅन्ड्रॉईड ओ' ही येऊ घातलीय...

१) moto c+रु 7000 (online)
२)nokia 3 रु९५०० (दुकानात)
फारच इंट्रंस्टिंग मॅाडेल्स आली आहेत या आठवड्यात.

१) moto c+रु 7000 (online)
२)nokia 3 रु९५०० (दुकानात)
फारच इंट्रंस्टिंग मॅाडेल्स आली आहेत या आठवड्यात.

दोन्हींचे स्पेसि वाचल्यास
१) दोन्हींत क्वालकॅाम प्रसेसर नसून मिडियाटेक mtk6735 आहे तो फास्ट गेमिंगसाठी नाही.
२) मोटोतली काढता येणारी ४०००एमेच बॅट्री खास वाटते। नोकियाची २६५० काढता येत नाही.
३)दोन्हीstock android नुगा वर असले तरी नोकियात गुगलचे सिक्यु पॅच मिळणार आहेत जे खास आहे.
4)moto 8+2 camera .
nokia मध्ये 8+8 आहे. नोकियाचे कॅम्रे विश्वासार्ह असतात. मोटो Eचेही खास नव्हते तरC चे सांगता येत नाही.
५) उन्हात मोटोस्क्रीन दिसेल का शंका आहे. नोकियाचा दावा आहे त्यांचा स्क्रीन चांगला आहे. गोरिला आहेच
६) नोकियात NFC, magnetic sensor आहे.

मोटो सी कोणाला मिळाला आहे का? Review plz.

माझ्या आईला मोटो ई लेटेस्ट गिफ़्ट देण्याचा विचार आहे पण मोटो सी पण चांगला असेल तर मग कोणता बेटर राहील?

मला नोकिया ६ मध्ये रस आहे. त्याचे रीव्यूज चांगले असतील तर घेणार आहे. तोपर्यंत (आधीचा फोन गेल्यामुळे) सध्या पॅनॅसॉनिक पी७५ नामक कामचलाऊ फोन घेतला आहे. गेम्स आणि अ‍ॅप्सची भरताड केली नाही तर वापरायला चांगला आहे. (१जीबी रॅम, ८ जीबी रॉम - अ‍ॅक्च्युअल स्टोरेज ४.१७ जीबी). कॅमेरा सो सो आहे. पण स्टॉप गॅप अरेन्जमेन्ट म्हणून चांगला आहे. बॅटरी ५००० एमएएच ची आहे. अक्षरशः दणकून चालते.

Waiting eagerly for the new Nokia series. Nokia 3 suits to my requirements, is there anything similar out there?

nokia 5 ( १३०००र) आणि nokia 6 (१६०००रु) महिन्याभरात फक्त ओनलाइनच मिळतील.
१)दोन्हींत क्वालकाम ४३० आहे
२)android 7 nuga.
3) nokia 5 हा 720p
nokia 6 1080p full hd आहे.

नवीन लेटेस्ट मोटो E4 आणि E4+ announce झाले आहेत॥

*mideatek 6735 हा स्लो प्रसेसर आहे परंतू नोकियाची फाइल हँडलिंग सिस्टम किती कार्यक्षम androd वर चालते यावर नोकिया ३ यशस्वी होईल. नोकिया ५/६ क्वालकामवरच आहेत ते फास्टच असतील

>>>Nokia 3 suits to my requirements, is there anything similar out there?

>>>>

माइक्रोमॅक्सने चाइनिज कंपन्यांना टक्कर देण्यासाठी जुना cynogen os वर चालणारा Yu Yureka फोन गुगल android marshmallow / qualcom 430 वर आणला आहे. रु ९०००।
फुल एचडी आहे.
माइक्रोमॅकओसने फालतू अॅप्सही कमी केली आहेत.

हे सुद्धा येणारेत

MOTO E4
हा युएसमध्ये आला, इथे येईल ८५००रु
MOTOROLA MOTO E4
५ इंच,गोरिला ग्लास,720p hd,
Mideatek MT6737 प्रसेसर,
8mp +5 mp flash selfi
2800mAh li pol removable battery
GPS, compass.
-----
E4 plus
(11500रु)
13+5mp camera
5000mAh battery

मार्शमेलो हुन नुगाट ला अपग्रेड केलं तर मोबाईल च्या एकुण कार्यक्षमतेत फरक पडतं का.
नुगाट हुन परत मार्शमेलो असे डाऊनग्रेड शक्य आहे का.

मार्शमेलो > नुगट बराच फायदा आहे. मोठेमोठे अक्षरं कमी साईज मध्ये करता येतात. नोटिफिकेशन्स पॅनेल सुधारलंय इ. इ.
नुगट > माशेमेलो नही जमेगा... अर्थात रूट वगैरे करून करता येत असेलही (इथे माझा पास)

नेटवरच्या माहितीप्रमाणे अॅप्स एसडी कार्डावर ढकलता येणे हा मोठा बदल किटकॅट,लॅालिपापवर नसलेला मार्शमलो आणि नुगाटमध्ये आहे. बाकी मा/नु मधय्ये फरक कॅज्मेटिक आहे. "गुगल नाउ" हे काही हँडसेटात येत नाही.

५ ते ८ हजारात बर्यापैकी मोबाईल घेता येईल का ? आईचा सॅमसंग J१ सारखा हँग होतोय.जास्त काही गरजा नाहीत.
१)बेसिक फोन
२) काही बेसिक अँप उदा. एम इंडिकेटर, व्हाट्स अप
३)मुख्य म्हणजे हँग न होईल असा

सध्या अनेक उत्तमोत्तम , चांगल्या स्थितीतले सेकंड हँड फोन्स बाजारात उपलब्ध आहेत आणि अगदी 'थ्रो अवे ' किंमतीत मिळत आहेत . मी शिओमी चा एक फोन फक्त ३००० मध्ये उचलला, फक्त चार महीने वापरलेला आहे , मिंट कंडीशन ! उणीव एकच 4G नाही ! पण मला चालत असल्याने २०००० चा फोन ३००० मध्ये डील काही वाइट नाही.

नाशकात असला तर 'महावीर' मध्ये चौकशी करा. माझ्या समोर एकाने जवळजवळ नवाकोरा आयफोन ५स असाच थ्रो अवे (पिनटस ) कि^मतीत उचलला .

चेक करा , मिळून जाइल असेच एखादे डील !

नोकिया (hmd global) android फोन्सचे कस्टयमर केअर अजून डिक्लेअर झालेले नाहीत.
लेनोवो/मोटोरोला कस्टमल केअर-
Technotronics Technologies
Ghatkoper West
Shop No. 204, 2nd Floor, Rajgor Empire,
जयंतिलाल वैष्णव रोड
स्टेशनपासून तीन मिनिटांवर खरंच आहे हे खात्री करून आलो.
म्हणजे लेनोवो/ मोटेरोला फोन्सचा यांचा विचार करायला हरकत नाही.

असे रिसेलचे फोन चोरीचे असू शकतात आणि त्याचा आयएम आय ए नम्बर दुसर्‍याच्या नावाचा असू शकतो म्हनजे असतोच. काही क्रिमिनल कामाला वापरून पोलीसान्च्या ट्रॅक वर असलेला फोन असू शकतो.

माझ्याकडे सॅमसंग जीटी एस ७५६२ अ‍ॅन्डॉईड ४,०.४ आहे चांगला चालू आहे . ४ वर्षे होतील आता. पण त्यावर युपीआय चालत नाही.उबेर अ‍ॅप चालत नाही. रुट करायला दुकानदार तयार नाहीत. नवीन घ्या म्हणतात. माझे बजेट १०००० च्या आसपास आहे . नवीन घ्यावा की नाही यावर द्विधा मनस्थिती आहे. काय करावे बरं?

रुटिंंग अ‍ॅप असले तरी रुट केल्यावर दगड होण्याची शक्यता. शिवाय व्हायरसेस नंतर घुसतात असे ही ऐकलय.

असाही तुमचा फोन बाद झालेला आहे. अन काही व्हायरस येत नाही. ही भीती होती तर आपण दुकानदाराला रूट विषयी का विचारलेत?

>>असाही तुमचा फोन बाद झालेला आहे. अन काही व्हायरस येत नाही. ही भीती होती तर आपण दुकानदाराला रूट विषयी का विचारलेत?
मला मोबाईल मधील फारसे कळत नाही म्हणून काही मार्ग निघतो का हे पहाण्यासाठी

श्री. घाटपांडे जी , चार वर्षे जुना फोन असेल तर बदला , इतक्या जुन्या फोन मध्ये राम , राँम कमी असण्याची शक्यता असेल, ओएस च्या नव्या व्हर्शन्स , नविन आप्स कमी मेमेरी मध्ये व्यवस्थित चालत नाही . आणि तसेही सेल फोन साठी चार वर्षे खूप झाली , सरळ नवाच घेऊन टाका .

युपिआइ इतकं कशासाठी लागतं?
डेबिट कार्ड बय्राच ठिकाणी चालतं.
बाकी तो फोन उत्तम आहे. प्रवासात हाताशी ठेवायला.

ह्या नविन नोकिया फोनचा जुन्या नोकिया कंपनि शी काही संबंध आहे का? माझ्या मते नाही. कोणीतरी फक्त नोकिया ब्रँडनेम विकत घेतले आहे असे मला वाटते.

जुन्या परंतू विंडोज ओएसवरवर चालणाय्रा ६३०,६२०,७३० इत्यादींना माइक्रोसॅाफ्ट कंपनीचे सर्विस सेंटर्स इतर लुमिया ब्रँडसह सर्विस देतील.
नवीन नोकिया( अँड्राइड ओएस) ही एचएमडी गओलोबलशी संबंधित आहे आणि त्यांचे सर्विस सेंटर्च अजून जाहिर झालेले नाहीत.

पाॅवर बॅंक कोणती घ्यावी. आधीचे प्रतिसाद वाचले पण नीट काही कळले नाही. नेटवर फार मिश्र रिव्हयू आहेत.

Pages