आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -३

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 April, 2017 - 02:27

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रुश्नाजी क्ल्यु ???

अवांतर : काल आपण हरलो (है.बाद)... Sad

आता बस्स पुणेच जिंकली पाहिजे आणि ती को.ना.रा.कि बच्ची फायनलमधे पण नाही पोहचावी Angry

१०१४:

तुझको आज बताना होगा क्या थी वो मजबूरी
साथ उम्र भर का देना था दे दी उम्र भर की दूरी
कितने अटल थे तेरे इरादे याद तो कर तू वफा के वादे
तूने कहा था, खाकर कसमें सदा निभायेंगे प्यार की रसमें
तू औरों की क्यों हो गयी
तू हमारी थी, जान से प्यारी थी
तेरे लिये मैंने दुनिया संवारी थी
तू औरों की क्यों हो गयी

अवांतर : काल आपण हरलो (है.बाद)... Sad>

हो ना! खराब बॅटींग केली! किमान १६०-१७० धावा करायला हव्या होत्या. म्हणजे सुधारीत टार्गेट मोठे झाले असते पावसानंतरचे!

क्ल्यु:
१. पहिल्या दोन ओळी गद्य.
२. गायकाच्या एका वक्तव्यामुळे हल्लीच एक controversy घडली आहे.

नाही समजत मला...
अजून एखादा क्ल्यु मिळेल का??
नाहितर थोड वेट करू,पंदितजी नाहितर दादा सोडवतील..

क्ल्यु:
नायिका: बॉलिवूड ची बबली गर्ल.
नायक: याच नावाच्या सदस्याची या धाग्यावर नियमित हजेरी असते.

पहलि पहली बार बलिये दिल गया हार बलिये ,
रब्बा मैनु प्यार हो गया...दिल का करार हो/खो गया..

हे आहे का?

कोदे क्र. १०१६ हिन्दी (१९९६-२००३)
त य म प प र ह,
ब त ज न य स ह ,
अ त म त प ...
न ज द प च ,
ह ह ह ...ह त द स ह...
ह ह ह ... ह त द स ह..

क्रुश्नाजी Lol
ओके..सॉरी..

क्ल्यु:
१) हसणारा गायक
२) या मुव्हीत नायक्/नायिका भाऊ-बहीण दाखवले आहेत..

१०१६ :
तेरी याद मे पागल पल पल रोता है
बिन तेरे ना जागे ये ना सोता है
अक्सर तनहाई मे तुझे पुकारे, न जोर दिल पे चले
हारे हारे हारे, हम तो दिल से हारे

करेक्ट Happy
कोदे क्र. चुकला वातत माझा...चेन्ज करते.

क्ल्यु:
१. गानकोकिळा
२. भारतकुमार Wink

Pages