आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -३

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 April, 2017 - 02:27

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिंदी - (२००० - २०१०)
अ ब क स ब म स
क अ ब म ग ल
अ व ब व य व म त ब
अ व ग अ म ल अ ह अ म ल
स अ स, त द ह त स ह ब य
त ज म स द, स ग भ क ज ल म य ज
त द द म स थ ल ह, च ज भ ह ब
त ब द द म स

कृष्णाजी, प्रयत्न करा. माझ्या अंदाजाने या गायकाचा आवाज तुम्हालाही आवडत असावा. खुप गोड गळ्याचा गायक आहे

सुरवातीच्या ४ ओळी वेगळ्या भाषेतील
अभिनयाची क्वीन नायिका
गोड गळ्याचा गायक
पाचव्या ओळीतल्या पहिल्या काही अक्षरांवरुन गाण ओळखता येईल

Baby, come, stand by my side
Come and be my guide in life
I'll be what you want me to be
I'll give all my love in whole of my life
सोनियो ओ सोनियो
तुम्हें देखता हूँ तो सोचता हूँ बस यहीं
तुम जो मेरा साथ दो
सारे ग़म भूला के, जी लूँ मुस्कुराके ये ज़िन्दगी
तू दे दे मेरा साथ थाम ले हाथ
चाहे जो भी हो बात
तू बस दे दे मेरा साथ

क्लू

कुणी क्लू देत का रे ? क्लू
ह्या कोडे सोडवणार्याला कोणी क्लू देता का ?
हे कोडे अडलय नायकावाचून, नायिकेवाचून, कोडे देणाऱ्याच्या क्लू वाचून, गुगल वर फिरत आहे
जे दिल की पटकन कोडे सुटेल अश्या क्लू वाचून
कुणी क्लू देत का रे ? क्लू

सोप्पंय असाच एक डायलॉग ह्या चित्रपटात नायकाने म्हणलाय ओळखा आणि लिहा

नटसम्राट.

नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही,
साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही...

१०२७:

सजण दारी उभा, काय आता करू
घर कधी आवरू मज कधी सावरू

पुढचे द्या कुणीतरी.

कृष्णाजी, वरच मी दिलेल मराठी गाण देखील सुरेश भटांच आहे. आर्या आंबेकर ने आत्ता गायलेल असल तरी मुळ शोभा जोशींच्या आवाजात आहे, यशवंत देवांच संगीत आहे. थोडक्यात जुन होत की Sad तुम्ही प्रयत्नच केला नाही

तुम्ही प्रयत्नच केला नाही>>

असे काही नाही! खरे तर सकाळ पासून जरा जास्त बिझी हे मुख्य कारण! Happy
अक्षय, अहो किल्ली द्या एखादी!

Pages