आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -३

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 April, 2017 - 02:27

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉरी सॉरी मी विसरूनच गेलेलो मला कोडे द्यायचंय ते हे घ्या आता एकदम सोपे
कोडे क्र ८४५ मराठी (१९६५-१९७०)
स क क त भ म म
र क द त ल फ

८४५

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
रंग कधी दिसणार तुला लाजणार्‍या फुलातला

८४६ हिंदी (००-१०)
ब म द च अ स,
ब स म क द, ब ह ब
ब स ध ह, ब ह स
ब स क स न द भ
ब स न च, ब झ स
ब न क त, ब म द च अ स

बावरा मन देखने चला एक सपना
बावरे से मन की देखो बावरी हैं बातें
बावरी सी धड़कने हैं, बावरी हैं साँसें
बावरी सी करवटों से निंदिया दूर भागे
बावरे से नैन चाहे, बावरे झरोकों से, बावरे नजारों को तकना
बावरा मन देखने चला एक सपना

८४७ हिंदी (००-१०)
श ह ज ह अ ह न
त भ ह म प ह
छ ह र फ भ ह ब
क ध ह द क क ह द
द क अ त न य प
अ क र ह ह क प ह क ख ह क

८४७
शाम है जाम है और है नशा
तन भी है, मन भी है पिघला हुआ
छाई हैं रंगीनियाँ, फिर भी हैं बेताबियाँ
क्यूँ धड़कता है दिल, क्यूँ ये कहता है दिल
दीवानों को अब तक नहीं है ये पता
आज की रात होना है क्या
पाना है क्या, खोना है क्या

८४८
हिंदी (१९९० - २०००)

अ क ग म ह
अ ट त द ह
ज ब क च ज
त य व क ह

८४९ क्ल्यू
वोह सात दिन..पुन्हा एकदा

८४९
आँखों की गुस्ताखियाँ मांफ हो,
टिकटूक तुम्हे देखती हैं
जो बात कहना चाहे ज़ुबां,
तुम से ये वो कहती हैं

चित्रपट : हम दिल दे चुके सनम

८४९
हिंदी (२०१२ - २०१७)
क त ख न ध च न छ
क त ख क ठ ट न प
ब ल अ प त ल त स स
फ भ स म क अ क र ग
र क म ज र फ म ज
अ त प त प

क्ल्यु
नायक :- कपूर घराण्याचा वारस
नायिका :- एका स्पोर्ट्स पर्सन ची मुलगी
गायिका :- याच नावाची एक जुनी अभिनेत्री आहे

रिपीट पोस्ट

कैसी तेरी खुदगर्जी ना धूप चुने ना छाँव
कैसी तेरी खुदगर्जी किसी ठोर टिके ना पाँव

रणबीर, दिपिका, रेखा भारद्वाज

साडेआठशे!
(७०-८०)
हिंदी

ह त न म न ह
म प ब ह
त ब म ग ह
अ म क ह
अ त फ क ज ह ख
अ म म क र अ ब म क र

सोप्पे आहे खूप! अजुन उत्तर नाही!
क्ल्यु
१. अभिनेता सुपर स्टार!
२. संगीतकाराने बरेच हीट्स गाणी दिलीत!
३. द्वंद्वगीत दोन्ही विख्यात गायक गायिका.

कारवी, अक्षय कोणी तरी या. इतका वेळ कधीच लागला नाही. आज अगदिच डोक चालत नाही आहे. त्यात मधेच कामात गुंतल्यावर आणखीनच वेळ जातोय. Sad

पहिले दोन अक्षरे एवढी गाण्याचा भाग म्हणावे असे नाही पण सुरुवात होते तशी!
अश्या प्रकारचे गाणे राजेश खन्नाच्या अजुन एका अतिशय गाजलेल्या सिनेमात होते!
हं तर काय म्हणतोय मी आले ना लक्षात?

साडेआठशे! (७०-८०) हिंदी -- उत्तर
हाँ तो, नैनों में, निंदिया है
माथे पे, बिंदिया है
तो बालों में, गजरा है
आँखों में, कजरा है
ओह तो, फिर कौन सी जगह है खाली,
ओ मतवाली, मैं कहाँ रहूँगा, ओ बोलो कहाँ रहूँगा

ओह, माझी शोधाशोध फुकट. मला हे गाणं माहितीच नाही. कितीही डोक फोडल असत तरी ओळखता आल नसतं

मला हे गाणं माहितीच नाही. कितीही डोक फोडल असत तरी ओळखता आल नसतं>> बर्‍यापैकी गाजलेले हे 'जोरु का गुलाम' चित्रपटाले!

पहिली २ अक्षरे सोडून द्या म्हणालात मग 'न' वरून शोधले,
आधी नव्हते ओळखले; ऐकलेले आहे, थोडेसे देव-आनंद टाईप वाटते ऐकताना.

Pages