आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -३

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 April, 2017 - 02:27

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कावेरीच्या नावावर क्लिक केल तर "पान पहायची परवानगी नाही" अस येतय>>>:२००० सालानंतरच्या गाण्यावर बॅन आणावा लागेल मग आता.
असो स्निग्धाताई द्या एखादे मस्त कोडे.

८१६ हिंदी
क ब ब अ ग ब म
ह ग न छ छ

२री ओळ ह?? गाऊ नाचू छम-छम / छुन-छुन / छनन-छनन काहीतरी असेल
तर पहिल्या ओळीत कोण? मोर, बादल, बरखा, मन..... अंदाज येत नाही. आता क्ल्यू उद्याच मिळणार...

स्निग्धाताई, कारवीताई आणि कृष्णाजी शक्यतो गाण्याचे दशक देण्याचा प्रयत्न करा म्हणजे जरी कोडे देऊन ऑफलाईन गेला तरी एक पर्याय राहील शोधण्यासाठी नाहीतर टाळ कुटण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही.

सॉरी सॉरी, क्लु लागेल अस वाटल नाही म्हणुन कोड देऊन निघुन गेले.,
@ अक्षय, मी दिलेले कोड म्हणजे ते जुनच. अगदिच अपवाद नवीन असेल तर मी तस लिहिते.

बर क्लु - आधी नायक आणि मग खलनायकची कामे करणारा नट
या एकाच नावाचे २ चित्रपट आले होते

८१७.

हिंदी (६०-७०)

ज र क ब ब क स
व ह अ ब न स र प

मराठी अभिनेत्री
गायिका मराठी
संगीतकार जोडीतला एकजण मराठी
कित्ती क्ल्यु दिले!

८१८ हिंदी
त ग क च ह म ध क ध ह
त प क द ह म स फ ह
त ह प म प त स म प ह

८१८..

तुम गगन के चंद्रमा हो मैं धरा की धूल हूं
तुम प्रणय के देवता हो मैं समर्पित फूल हूं
तुम हो पूजा में पुजारी तुम सुधा मैं प्यास हूं

प्रणय के देवता......
......... तुम सुधा मैं प्यास हूं
बाकी बरोबर
आधीचं अजितवालं गाणं -- मेंदी ते वावी.... गरब्यासारखी चाल आहे. छान आहे. मी नव्हते ऐकले.

कारवी त्यात " जमुना देती है ताल, उडने लगी मेघमाल, झुकने लगी डाल डाल, थम गयी पवन की चाल, बारा घोडोवाला सुरज का रथ भी चलने लगा रे धीरे" अशा सलग ओळी आहेत त्या मला प्रचंड आवडतात Happy

८१९.
हिंदी (६०-७०)

त ह म प द
अ च क द ह म
म क प ब अ
अ घ त प ह म

तु है मेरा प्रेम देवता
इ न चरनों की दासी हुं मै
मन की प्यास बुझाने आयी
अंतरघट तक प्यासी हुं मै

८२० . हिंदी
अ च अ अ च अ
त अ न द म ब
अ त स ज अ त स ज
क न न प ग

८२० . हिंदी -- उत्तर
अजी चले आओ, अजी चले आओ,
तुम्हे आंखो ने दिल में बुलाया
अब तो समझ जाओ, अब तो समझ जाओ
क्यों निगाहों ने परदा गिराया

Pages