आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -३

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 April, 2017 - 02:27

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लागि नाही छूटे आज चाहे जिया जाये आज
चाहे जिया जाये
ओ मन अपनी मस्ती का जोगी
ओ मन अपनी मस्ती का जोगी
कौन इसे समझाये आ
कौन इसे समझाये रामा

८६३ हिन्दि २००५-१०
द क क ह म क म ब
त य स श म प ह
द क ह ट ट म च ज
च च क म य स क
र अ ह य व क इ
र अ ह ल ह प
र अ य ह द ह क त
ज म न द

२००० नंतर ची गाणी म्हटले की आमची बॅटरी गूल होते.. मग गुगलावे लागते आणि गुगलुन पण मिळेल ह्याची खात्री नाही!

क्लु-
१.अष्टपैलु नायक,वडिल गीतकार व आई नायिका
२. चित्रपटाचे नाव इंग्रजि
३. या गान्याचे शब्द हि नायकाच्या वडिलांचेच

फरहान अख्तर च्या ब र्‍याच सिनेमाची नाव इंग्रजी आहेत, डॉन, हनीमुन ट्राव्हल प्रा. लि., रॉक ऑन, लक बाय चान्स, कार्तिक कॉलिंग कार्तिक

२००५-१० मधले बघा ना.... मला क्ल्यू कळले पण सिनेमा, गाणे सापडले नाही अजून
मी ज म न द वरून जिंदगी ना.... कडे गेले पण ते इंग्लिश नाही...
३ ओळींत र अ दिसतेय, रॉक ऑन आधी तपासा, स्निग्धा.....

खरंय स्निग्धा....
तरी हे सरळ आणि भरपूर क्ल्यू देतात. पण स्टोव्ह सारखा पंप करायला लागतो डोक्याला.
ओळखत राहू, येतील हळूहळू.

८६४ हिंदी
द त ह म त ह स
त स क क त द क क
स घ क ह स
ज छ ह त प म स
त अ क क त ब क क
त ग क क ह स

८६४:

दिल तेरा है मै भी तेरी हूँ सनम
तेरे सर की कसम तेरे दर की कसम
सारे घर की कसम हो सनम
जग छोडा है तेरे प्यार मे सनम
तेरी आँखों की कसम तेरे बालों की कसम
तेरे गालों की कसम हो सनम

८६५. हिन्दि २०००-२००५
क च ह प क झ ह ग
क म ह म न त ज न ह
न त ज न ह
क अ ह ब क ल ह क
क ह ह प न त ज न ह
न त ज न ह

असे २००० नंतर चे दिले की न मागता क्ल्यु देत जा पाहू!

म्हणजे मानव ह्यांना सांगून नियमातच समावेश करावा ह्याचा! Wink

क्लु-नायक बोलिवुडमधिल उत्तम डान्सर
२. ह्या चित्रपटातिल एक न्रुत्यप्रकार खुप गाजलेला.
नायकाचा पहिलाच चित्रपट यशस्वि
नायकाच्या वडिलांनिच दिग्दर्शित केलाय

८६५:
क्यूं चलती है पवन, क्यूं झूमे है गगन
क्यूं मचलता है मन, न तुम जानो न हम

८६६.
आईये मेहरबाँ बैठिये जानेजां
शौक से लिजिये जी इश्क की इन्तेहां

८६७.
हिंदी
द अ द त ज न
त ज क ब क ह न

तुम्हि दिलेलि ७५% गाणि हि किशोर कुमार शि संबंधित असतात किशोर कुमारला तुम्हि उगाळुन पिलंय असे म्हनु हवे तर त्यामुळे लगेच ओळ्खता येतात. P Proud Proud

तुम्हि दिलेलि ७५% गाणि हि किशोर कुमार शि संबंधित असतात>>
मला तीच गाणी जास्त येतात! आता जरा दुसरी द्यावी लागतील ! Wink

Pages