कृष्ण सावळा तो राधेचा

Submitted by पुरंदरे शशांक on 21 April, 2017 - 04:52

कृष्ण सावळा तो राधेचा कुठे हरवला तरी
व्याकुळलेली दिसे बावरी फिरते यमुनातीरी

सूर कुठे पाव्याचा घुमतो कान देऊनी उभी
झुळझुळणारा वारा वाहे नादावून ती खुळी

चमकून बघता अाभाळीचा मेघ शामवर्णी
कान्हा कान्हा शब्द विराले निश्चळ ती रमणी

मेघ थबकला माथ्यावरती राधा फुटली ऊरी
अलगद सुटता भान तयाचे बरसे वरचेवरी

चिंब भिजूनिया कृष्णप्रेमिका अंतरात श्रीहरी
जळ यमुनेचे कृतार्थतेने लोळे चरणांवरी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कविता....
शेवटची ओळ खूप आवडली...

अहाहा...! गोड कविता!
<<जळ यमुनेचे कृतार्थतेने लोळे चरणांवरी<< खरच कळस चढवलात! __/\__

Sundar