आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृष्णाजींचे हे फारच आवडते गाणे आहे असे दिसते. दुसर्‍यांदा दिलय सेम कोड>>> रिपीट झालेले का?
मला वाटले देखिल तरी केले पोस्ट.....

अक्षय आता हातासरशी ७०० वे पण सोडवा आणि द्या पाहु पुढील चटकन....

तसं नव्हे... म्हणजे तिने सोडवायचे... वाट बघायची .... की येइल त्याने लिहायचे?
नाहीतर पुन्हा लिटमस मोड...:)

ओके.
७०० उत्तर
अगर मैं कहूँ मुझे तुमसे मोहब्बत है
मेरी बस यही चाहत है तो क्या कहोगी
मैं तुमसे कहूँगी इस बात को अगर तुम
ज़रा और सजा के कहते
ज़रा घुमा फिरा के कहते तो अच्छा होता

अक्षय तुम्ही ७०१ द्या... एक गाणे ओळखलंत ना कृष्णांनी दिलेलं....

कोडे ७०२ हिंदी ७-१७
त म क क अ ह
ड क त अ क ह
स म ब ग श
श र अ म ग

अगदी निरर्थक शब्द आहेत आणि घोड्याच्या टापांसारख्या हालचाली
मारामारी निपुण अभिनेत्यावर चित्रित + भारदस्त नायिका
नृत्य निपुण व्यक्ती चित्रपटाची दिग्दर्शक
गाण्यातील / आद्याक्षरातील ९ शब्द नेहमीच्या वापरातील.

मी जातेय आता.... नाहीच आलं तर हे बाजूला ठेवा कावेरिसाठी आणि ७०३ घ्या / द्या

नाही.
या व्यक्तीचे माधुरी बरोबरचे गाणे फेमस झाले होते पूर्वी

भारदस्त नायिका - सोनाक्षी सिन्हा ?
मारामारी निपुण अभिनेत्यावर चित्रित > अजय देवगण / अक्षय कुमार ?

मुव्ही: अ‍ॅ क्शन जॅक्सन
director: प्रभू देवा
अजय्,सोनाक्षी

तुमसे मिलने का कीड़ा अंदर है ,
डेटिंग करले तू ओपन कैलेंडर है ,
सोम मंगल बुध गुरु शुक्र शनी रवि ,
आजा मेरी गली, आजा मेरी गली आजा मेरी गली, आजा मेरी गली

९शब्द..

बरोबर कावेरि
पण ९ शब्द ---
ओपन
कैलेंडर
सोम मंगल बुध गुरु शुक्र शनी रवि ,
इतकाच फरक

Lol
कारवी ताई तुमचे क्लु वाचून जाम हसले...
निरर्थक शब्द आहेत आणि घोड्याच्या टापांसारख्या हालचाली>>> Lol हे भन्नाट होतं...

Happy Happy
हो स्निग्धा ...... चक्क !.. !!..!
म्हणूनच म्हटले निरर्थक शब्दाचे गाणे
मी पण पहिल्यांदा ऐकले तेव्हा ऐकतच राहिले.

कावेरि ७०१ बाकी आहे...... अक्षयनी दिले नाही अजून, तो क्रमांक वापरा प्लीज

तुमसे मिलने का कीड़ा अंदर है , >>>> हे गाण्याचे शब्द आहेत >>> Rofl
स्निग्धा ताई...१दा पुर्न ऐकून पहा...कलेल तुम्हाला ...कसा किडा आहे ते... Lol

Lol नको गे बाय असले गाणे ऐकायला

कावेरि.....पण तुम्हाला ७-१७ असून क्ल्यू वाचायला लागले..? not fair... Happy
ते कृष्णा आणि स्निग्धा यांच्यासाठी होते.

Pages